मोड ही प्रथा
भाग 7
श्याम ,श्रावणी ,निर्मलाताई ह्यांनी तयारी केलीच शेवटी हळदीला जाण्याची..
मस्त दोघी माय लेकी सजल्या होत्या ,लेकीने आईला तयार केले होते..
आईची छान भारी साडी होती ,तर श्रावणीने घागरा घातला होता...मोकळे लांब सडक केस..छोटी टिकली, हलका मेक अप...मोठे कानातले...छोटे पैंजण...गळ्यात डायमंड चा नेकलेस...नाजूक अंगठी...केसात खड्यांचा ब्रोच...कानात डायमंड चे वेल... हातात ही खड्यांच्या बांगड्या...सगळे कसे कोणालाही तिची भुरळ पडणारे होते... हळद जोरात होणार हे ठरलेले होते... आज जादू होणार होती कोणावर तरी...
"आई तुझाच मेक अप नाही करू दिलास तू मला.."
"असू दे ग, साडीत सगळे सौंदर्य आले...ती व्यवस्थित असेल तर मेक अप ची गरज नसते...आणि तसे ही तुमचे दिवस आहे आमचे नाहीत.." आई तिला तीत लावत म्हणाली
"हम्मम्म ,तरी बाबा सहज फिदा झाले होते ना तुझ्यावर..." श्रावणी
"श्रावणी ,हे अति होतंय नाही का .." आई कान पकडत
"पण आई बाबांनी कधी तिला राहणीमानाच्या बाबतीत आड काठी केली नाही ना कधी.." श्रावणी
"त्यात ही घराण्याची शान समजतात ,स्त्री ही नेहमी टापटीप आणि सुंदरच दिसली पाहिजे...शेवटी घराण्याची शान असते ती.." आई हसून म्हणाली
"आज श्याम हवा होता सोबत...काय ऐनवेळी त्याला कामाला लावले.. तो पण काय आज्ञेचे पालन करत बसला..." श्रावणी
तितक्यात श्याम मागून आवाज देतो...त्या गाडीत बसणार इतक्यात तो धावत येतो
"चिमणे ऐक मी येईल नक्कीच ,तू काळजी करू नकोस...निदान तुमच्या जाण्यावर काही बोलले नाहीत ह्यात मी आंनद मानतो ,म्हणून जरा स्वतःवर थोडी जबाबदारी घेतो...बाकी मी ही फार वेळ लावणार नाही...पंकजने सगळ्या जबाबदाऱ्या हातात घेतल्या आहेत...मी फक्त त्याला भेटून येतो..."
"म्हणजे पंकज ने जबाबदारी घेतली तर तुझी.." श्रावणी खुश झाली
"अखिर दोस्त है यार...तोच तर कामी येतो.."
"बेस्ट है.." श्रावणी मनातून खुश झाली होती दादा ही सोबत असणार आता ,मग काळजी नाही..
दोघी आता निर्धास्तपणे निघाल्या होत्या, गाडी हळदीच्या ठिकाणी पोहचणार होती पण वेळ लागणार होता
"आई पंकज किती चांगला मुलगा आहे हो ना.." श्रावणी च्या मनात काय आले कोण जाणे पण तिला पंकजच्या ह्या मदतीची नोंद घ्यावी वाटली
"मित्र असतातच त्यासाठी ,आणि श्याम ही म्हणूनच सतत पंकज पंकज करत असतो."
"हम्मम्म्म ,आता समजले मला.." श्रावणी
श्रावणी त्याचाच विचार करत होती ,त्यात श्याम घरातील सगळ्या गोष्टी स्वतःवर घेतो ,त्याचा श्यामवर ही खूप परिणाम होत असेल...तो बोलत नाही पण त्रास होतो...सहन करून पुन्हा दोन शब्द ही गोड ऐकायला मिळत नाही...भावासाठी श्रावणीचा जीव तुटत होता...तेव्हा तर जास्तच तुटला होता जेव्हा ,तो तयार होऊन आलेले पाहिल्यावर ही बाबांनी त्याला ट्रॅक्टर च्या कामासाठी पाठवले... त्यात कोण कुठला तो पंकज त्याच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या अंगावर घेतो... गरीब आहे पण चांगला मित्र आहे...
"आपण जाण ठेवण्यात कमी पडतो ग आई लोकांच्या उपकाराची.. कसलं घराणं आहे ग आपलं " श्रावणी ने प्रश्न विचारला
"मला कळतंय तू काय म्हणतेस ते श्रावणी. " आई
"नाही ग ,पण मला कधी कधी वाटते आपण ह्या घरात जन्म घेऊन काय कमावले...अभिमान नाही वाटत पण शिक्षा किंवा पाप वाटू लागते..."
"आता आपण ह्या विषयावर बोलणार आहोत का ??? नाही अजिबात नाही !! माझी मुलगी सजली धजली आहे ते हिरमुसण्यासाठी नाही...तर आंनद घेण्यासाठी...हो ना बाळा " आई तिला समजावत होती.
"मिराला आंनद दुःख दोन्ही ही होत असेल..!" श्रावणी आईच्या डोळ्यात पाहून
"लेक परकी होणार ह्या भावणेने दुःखी होत असते ,आणि मी कोणाच्या आयुष्याचा भाग होणार आहे म्हणून तिला आंनद ही होत असतो, तुला ही असेच वाटेल..?" आई
"मला तर आनंदच होईल आई...दुःख फक्त इतकेच होईल की तुझी सखी तुझे दुःख वाटून घेणारी मी नसेल .." डोळे पुसत श्रावणी आईच्या नजरेला नजर न मिळवत खिडकीतून बाहेर बघते.
आई तिला काहीच जाणीव करून देत नाही, मन मोकळे झाले तरच मन हलके होईल म्हणून लगेच विषय अजून तणाव पूर्ण वातावरणातून दुसरी कडे वळवण्यासाठी आई म्हणाली ,"तू गेल्यावर माझी दुसरी लेक येईल ना !! करेन तिच्यासोबत ही मैत्री..."
"मैत्री करशील पण मनातले थोडेच सांगू शकणार तू तिला.. मलाच सांगावे लागणार ना ??" श्रावणी डोळे पुसत आई कडे येते आणि आईला मिठत घेऊन म्हणते.
गाडी आता जवळपास हळदीच्या ठिकाणी येऊन पोहचली होती... आई आणि श्रावणी बघत होत्या सांगितलेले ठिकाण हेच आहे का..
त्यांना असे वाटू लागले होते की जणू हळदीचा कार्यक्रम उरकून गेला असावा, गर्दी कमी होती..ओळखीचे कोणी दिसत नव्हते..लगोलग हवी तशी दिसत नव्हती, कोणी गावातील माणसे ही दिसत नव्हती...सगळा मंडप फुलांच्या माळांनी सजवलेला होता...कमान ही गुलाबाच्या फुलांनी बनवलेली होती....केळीचे पान लावले होते दोन्ही बाजूनी...
आता कुठे स्पीकर मधून आवाज येत होता, माईक चेक ,माईक चेक...कोणी म्हणत होते...हा खांब इथे लाव...ती फुल दाणी तिकडे सरकव...माईक चा आणि dj चा आवाज मॅनेज कर... पटापट हात चालवायला शिका... रंगोळीवाली कुठे...? त्यांना बोलून घ्या...उद्या घाई नकोय मला...एकदम बेस्ट व्हायला पाहिजे सोय..अक्खा गाव नाचून दमला पाहिजे...भाई गावात आपला dj आणि आपला दरारा आहे...नाहीतर आपले श्याम दादा सोडणार नाही प्रोग्राम खास नाही झाला तर...
"आई समजलं का काही तुला ??? " श्रावणी
"काय समजलं ??" आई
"हा कोण आहे ते.."
त्या टाळी देत हसत होत्या...कारण त्या दोघी समजून गेल्या हा आपल्याच गावातील रवींद्र माईक साउंड आणि dj वाला आहे...
आज किती दिवसांनी आई आणि लेक मन मोकळेपणाने हसत होत्या...खऱ्या मैत्रिणी होत्या...काय असते ना आईला लेकी इतकी चांगली मैत्रीण नसते ,आणि लेकीला आई इतकी चांगली मैत्रीण नसते..
क्रमशः
©®अनुराधा आंधळे पालवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा