Login

मोड ही प्रथा भाग 9

Mod Prtha
भाग 9

मोड ही प्रथा

सगळ्या मैत्रिणी हळदीला आलेल्या असतात, त्यात सगळ्या फक्त मेघा बद्दल बोलून तिला चिडवत होत्या..

मेघा अजून ही बाहेर वाट बघत उभी होती..

श्याम येणार होता ,बोलला होता मी येणार आहे मग अजून कसा नाही आला तो..बराच वेळ झाला आहे..

जर श्रावणी किंवा त्याच्या आईला सहज जरी विचारावे तर त्या मग नाहक शंका घेत बसतील..त्यात श्रावणी तर आगाऊ आहे नुसती.. तिची आमच्या प्रत्येक हालचालीवर नजर असते.


श्रावणीला सगळे कळते ,मेघा श्याम आता फक्त मित्र मैत्रिण नाही राहिले असे जाणवले तर तेव्हा पासून तो जिथे जातो तिथे ती ही येतेच..

तर कधी तो वेडा पंकज नेहमी सोबतीला असतोच..का कोणी त्याला जरा ही एकटे सोडत नसतील..मान्य आहे माझा श्याम चांगलाच आहे ,पण म्हणून काय त्याला जरा ही एकटे सोडायचे नाही का ह्यांनी...मूळ तर श्याम ने लाडाऊन ठेवली आहे त्याची लाडकी बहीण आणि तो लाडका मित्र..आता येऊ देत मी बघतेच त्याच्या कडे...

मेघा स्वतःशी बोलत होती ,तिला राग तर होताच त्याच्या उशिरा येण्याचा पण सगळ्यात जास्त राग त्या दोघांचा होता ,एक लाडकी बहीण तर दुसरा लाडका मित्र...कसे जुळले असेल हे मैत्र..आमच्या मध्ये आलात तर लाडकी बहीण ही बाजूला करेन आणि लाडका मित्र ही...श्याम आता तरी येशील का रे लवकर...बघ तुझ्यामुळे कसे कसे वाईट वाईट विचार येत आहेत माझ्याच प्रिय मित्रांबद्दल...

एक प्रिय ती आगाऊ तुझी लाडकी बहीण आणि तो प्रामाणिक मित्र पंकज दोन्ही ही खूप चांगले आहेत पण तुला सोडत नसतील तर माझे दुष्मन आहे नुसते...

आता ये ,कुठे आहेस...इतका कुठे अडकला आहेस..मी घरी बोलून आले होते अगदी क्षणात येते..सगळे भेटतील म्हणून माझ्या बाबांनी जरा तरी मोकळीक दिली आहे...

श्याम श्याम ये...मी इतकी कधीच अधीर झाले नव्हते..पण जेव्हा कळले मी तुला आता मैत्री पलीकडे जाऊन खूप मिस करते तेव्हा समजले मी प्रेमात पडले तुझ्या...आणि आत्ता तर जेव्हा माझेच प्रिय मित्र मैत्रिणी दुष्मन वाटत आहेत तेव्हा पक्की खातर जमा झाली माझ्या वेड्या मनाला की मेघा बरस जा !! यही प्यार है... और श्याम ही वो प्रेम है...


मेघा वेडी झालीस तू ,काय कवी बीवी व्हायचा इरदा आहे का तुझा !! अग आपला पिंड नाही ग हा...! कर त्याला फोन ,का उगाच ये ये म्हणतेस..

मेघा फोन मधील त्याचा नंबर काढते ,तर त्याचा नंबर श्याम म्हणून save केलेला असतो..एकदम सर्वात खाली असतो..

ती मनात म्हणते ,इतक्या खाली का ठेवले असेल मी तुला हा खरेतर सगळ्यात वरती असायला हवा होता...खास व्यक्तीचा नंबर आहे तो खास असायला हवा...आधी नव्हतास तू खास... गावातील इतर मुलांसारखाच एक तू ही होता श्याम वेड्या...आता प्रिय श्याम आहेस..तुझी माझ्या मनातील जागा खूप खास आहेस..अगदी खास...हृदयात..इन माय हार्ट समजून घे..


ती वेडी होणार होती ,रागाचा पारा आता चढत होता...किती अंत बघत आहेस ,प्रेमाला अजून किती वाट बघायला लावणार आहेस...

बघ तिकडे सगळे मस्त मज्जा करत आहेत ,आणि मी बसले तुझी वाट बघत अशी खुळी होऊन...अजून जरा वेळ झाला तर तुझी लाडकी बहीण हाताची घडी घालून माझ्या समोर अचानक येऊन उभी राहील...तिच्या नजरेत किती तरी प्रश्न उभे असतील...ती लगेच विचारणार पोलीस चौकशी करतात अगदी तसेच ,प्रश्न विचारणार... माझी चांगलीच परेड घेणार...

मेघा मागे वळून बघते तर काय, खरंच श्रावणी तिरक्या नजरेने ने तिच्या कडे बघतच उभी होती ,हाताची घडी घालून तिच्या कडे शंका खोर नजरेने बघत होती... जणू आता तिने चोर पकडला आहे असे फिल येत होते..

"चोर पकडला आहे मी असे का वाटत आहे मला..तुझ्याकडे बघून मेघा "

"अग चोर पकडला आहेस तू, बघ ना किती वेळ झाला आहे माझा खास मित्र श्याम आणि पंकज दोघे येणार होते ,आणि अजून ही आले नाहीत..ही वेळ निघून जात आहे हळदीची यांना कळत कसे नाही बघ ना...! मेघा श्रावणीचा हात पकडून रडवेल्या स्वरात म्हणाली.

"त्यातला कोणी ही एक जण आला तरी चालेल ना तुला ,कारण दोघे ही पक्के मित्रच तर आहेत...एकमेकांची सावली आहेत...हो ना.!! श्रावणी मेघाची फिरकी घेत म्हणाली.

"कोणी तरी एक जण कोणी तरी एकच जण..पण असे कसे ग?" मेघा म्हणत होती

"दोघे ही खास मित्रच आहेत तर कोणी एक खास मित्र असला तरी आपण काय मज्जा करू..श्याम नसला तरी चालेल ना तुला...?" श्रावणी मुद्दाम करत होती ,तिला रडकुंडीला आणायचा प्रयत्न करत होती


मेघा हो म्हणून मान हलवत होती ,कधी नाही नाही म्हणून मान हलवत होती...पुन्हा श्याम नको पंकज आला तरी आपण मज्जा करू म्हटल्यावर नको नको प्लॅन दोघे मित्र असल्यावर मज्जा येईल असा होता ,मग श्याम नसल्यावर कसली मज्जा...तिने हो ,नाही ,नाही नाही..हो ,हो नाही नाही....दोघे ही असू दे...नको श्यामला निवडते...


"किती विचारात पडतेस ग मला श्रावणी, श्याम येऊ दे, तो भेटू दे...त्यासोबत पंकज असेलच... पण श्याम हवाय मला.. असे सांगू असा विचार करत होती मनात...मनात श्रावणीचा राग ही येत होता... मूर्ख मुद्दाम माझी परीक्षा घेते "


"सांग कोणाला बोलू आता.." खोड काढत

"बोलवत बस पंकजला ,मी निघाले.."मेघा तणतणत


"अग श्याम ला काय सांगू तू न थांबता निघून जात आहेस हे कळल्यावर तो नाराज होईल ग.." श्रावणी


" श्याम येणार असतात तर अशी वाट पाहायला नसती लावली मला..." मेघा


"बघ विचार करून बोल ,त्याने जर ऐकले तर तो खरंच नाराज होईल ..." श्रावणी

"मी पुन्हा नाही इतकी वाट बघणार सांग जाऊन तुझ्या भावाला..." मेघा


मेघा मधूनच जायला निघते ,तेव्हा तिच्या पुढे तो उंच पुरा ,गोरा ,सुंदर श्याम उभा असतो ,तिला त्याचा धक्का लागतो आणि ती त्याच्या मिठी समावते...

"श्याम !!!! " अशी खुश होऊन हाक अचानक तो समोर पाहिल्यावर तिच्या तोंडातून निघते..आणि तोच हृदयाची गीत वाढते..डोळ्यात चमक येते..

"काही सांगायचे आहे तुला श्याम ..म्हणूनच मी आतुरतेने वाट बघत होते"