मोड ही प्रथा भाग 10
"सगळ्यांना आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा दादासाहेब..."
"थांबायचे आहे तुम्ही ताईसाहेब.." दादा
"हो मग ,घरी सांगूनच आलो आहोत तसे...की उशीर होईल...दोघे ही मुलं पक्का इरादा करून आले आहे...हळद जोरात होईल...आठवणीत राहील सगळ्या विसापूर वाल्यांना.."
तसे ही दादासाहेब यांनी जवळपास सगळे विसापूरच बोलावून घेतले होते.. त्यांनी त्यांच्या चांगल्या कर्माने सगळे गाव जोडून घेतले होते
"आज तुम्ही मोठी वृद्ध मंडळी आमच्या टीम मध्ये येणार की कुठे कोपरा धरणार...?" श्रावणी
श्रावणी सगळ्यांना मुद्दाम डीवचवत होती ,जेणे करून सगळे जण हळदीच्या गाण्यावर नाचतील..
"हे कसलं बोलणं ग तुझं, तुला समजायचे ते समज...आम्ही आमचे शांत बसून तुमचा नाच बघू .." आई म्हणाली
सगळे तसे लगेच सहमत झाले... पण तिकडून चालत आलेली नवरी पाहून सगळे बघतच राहिले
तिचा पिवळा घागरा ,त्यावर फुलांचे दागिने..हातभार मेहंदी...छान केस रचना...हिरवा चुडा...ती गुलाबी ओढणी...चमक होती चेहऱ्यावर आणि गालावर हसू...सुंदर दिसत होती मीरा...रोज वाटते तशी वाटत नव्हती ,ओळखू ही येणे कठीण होते....ही तीच मीरा...सगळे खूप विस्मय करून बघत होते...
तिला बघताच मैत्रीण तिला गरडा घालायला पाळल्या....तिच्या गळ्यात पडल्या..सगळ्याच खुश होत्या...सगळ्यांनी ठरवून एक सारख्या रंगाचे घागरे घातले होते...
सगळ्या मग बाजूला झाल्या ,त्यात मीरा डान्स करून नवऱ्या मुलांकडे चालत जात होती..
तिने मस्त गाणे लावायला सांगितले ,ओ मैं तो भूल चली बाबूल का देस पिया का घर प्यारा लगे..
तिकडे तो ही रेड शेरवानी मध्ये उभा होता, गोल्डन शेला,कट्यार,मोजडी..आणि गॉगल....उंच पुरा...सावळा...हसतमुख ,हातात महागडे घड्याळ,त्याचे मित्र त्याच्या बाजूनं गोल फेरा करून उभे होते...तो डान्स करत होता ,ते त्याच्या तालावर नाचून नवरीवर फुले टाकून स्वागत करत होते....इकडून मुलींनी ही फुलं टाकायला सुरुवात केली....दोघांना डान्स करण्यासाठी dj लावला...
"मेहंदी लगाके रखना लावा रे भावांनो..." मीरा एकदम जोशात
"अरे वा!! भाई आपली मीरा तर गरीब गाय होती...बघा नवऱ्याच्या मिठीत काय समावली आणि शेरणी झाली की...! " श्रिया म्हणाली
"ही पावर ऑफ नवरोबा आहे तर.. बेबी आज फुल्ल जगून घे आधी हळद नंतर जखम रे..." पंकज म्हणाला
पंकजला समोर बघताच श्रावणी चपकली....
ती त्याच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीवर थाप देत म्हणाली..."दादा दादा कुठे पंकज..?"
तो काही ऐकू शकत नव्हता...त्याला फक्त तिचा स्पर्श जाणवला...तो अर्धा तिथेच गार होऊन तिच्याकडे बघत राहिला..
"नाही ऐकू येत, काय झालं श्रावणी..?"
"तू पण ना ,मुर्खच आहेस...जाऊदे असू दे.."
तो खुणावत विचारत होता, कोण कुठे...काय कळत नाही...
"श्याम आला नाही का तुझ्यासोबत...तू एकटा का सोडुन आला आहेस..." ती ही खुणावत
"तो येत आहे बाहेर थांबला आहे,येईल तो " त्याने ही खुणावत सांगितले
"ओके,म्हणजे तो आलाय तर ...कुठे आहे.." ती
"तिकडे तिकडे बघ बाहेर दिसेल तो तुला.."
तिला हसू आवरेना ,कसा आहे हा...इशारे कसे कळून घेतले..काय सांगायचे ते समजले बरे याला...तो साथ देणारा मुलगा आहे...दादाला जो कधी एकटा सोडून येऊच शकत नाही..
"तू आज छान दिसत आहेस..! " इशाऱ्यात
"हम्मम, थँक्स...आणि तू ही छान दिसत आहेस.." तो
ती तसे म्हणून बाहेर गेली....
तोच श्याम आणि मेघा एकमेकांनाच्या हातात हात घेऊन उभे होते...तिला तो काही तरी सांगत होता..तिला ते पाहून आता शंका आली..
"काय करत आहेत हे दोघे..? मेघा म्हणूनच बाहेर उभी होती आता येत नसावी .." ती
ती लगेच हळूहळू त्यांच्या कडे चालत जात होती...तसे थोडे लांब उभे होते दोघे ही...ती येत आहे हे त्यांना माहीत नव्हते...
त्याने तिचे डोळे पुसले...आणि तिला त्याच्या गाडीच्या बोनेट वर बसवले...हे श्रावणी बघू शकत नव्हती...तिच्या मनात एकच येत होते...हे गाव आहे...आणि ह्यांनी दोघांनी असे काही करू नये ज्यामुळे गावात त्यांचे नाव खराब होईल . . दोन्ही घराण्याची इज्जत जाईल...मेघा असे वागू शकते.?? श्याम कडून ही अपेक्षा नाही...
"थांबवा हे, अरे काय करत आहात तुम्ही.. "
श्रावणी एकदम जाऊन ओरडली..
"काय श्रावणी काय होते हे..? "
"तुमच्या दोघांचे वागणे ,हे काय होते..? मी हे पाहून थक्क झाले..." श्रावणी
"अग मैत्रिणी आहे ना ती माझी, तुला तर माहीत आहेच..." श्याम
"नाही श्याम ,अति होऊ देऊ नकोस मैत्रीत फक्त इतके अंतर ठेव...गाव आहे हे इथे आपली एक इज्जत आहे...आणि तिच्या ही घरची.." श्रावणी
इकडे मेघा स्तब्ध झाली होती ,श्रावणीच्या अश्या अचानक पाठीमागून येऊन असे बोलणे आणि आपण असे एकांतात बोलणे ती गप्प करून गेले...जणू अपराधी वाटले..
"थांब श्रावणी ,तुला काही गैरसमज झाला आहे..आमचे असे काही नाही...मैत्री आहे आमची...बस्स इतकेच..." ती तत पप करत बोलत होती
"तू कश्याला तिला स्पष्टीकरण देत आहेस...तू काय चुकीचे केलेस का..!! आपण नेहमी बोलतो तसे बोलत होतो...त्यात गैरसमज काय करून घेईल ती...हो ना श्रावणी"
श्रावणी डोक्याला हात लावून घेत गाडीच्या बोनेटवर जोरात थाप मारते..
"मेघा त्याला कळत नाही ठीक ,पण तू का अशी वागतेस....मुलगी आहेस तू...लोक बघतात येता जाता..."
मेघा आता पुरती घाबरली होती ,श्रावणीला तिच्या भावाच्या जवळ आलेले आवडले नसावे म्हणून ती रागावली आता ती तिच्या आईला जाऊन सांगणार हे मेघाला वाटू लागले होते..
श्रावणी सांगणार का हे आईला ,कोणी बघितले असेल का ह्या दोघांना असे एकत्र हातात हात घालून...त्याने श्रावणीला आता तिची हद्द दाखवावी का ??? की सांगून माझे मेघावर प्रेम आहे..
©®अनुराधा आंधळे पालवे
क्रमशः