Login

मोडलेलं घरटं (भाग चार)

घरावर पैसे गुंतून सुद्धा घर मिळत नाही.
'मधुरा , आईला फोन करते.

'हॅलो ...आई, मी मधुरा बोलते... आम्ही आमचं स्वतःचं घर घेतोय ,आम्ही दोघांनी दिव्यात एक फ्लॅट बघितला आहे. तो मला आणि राहुल ला खूप आवडला आहे.

"काय सांगतेस मधुरा "अरे वा !छान छान...

'अगं पण, आई ...मला थोड्या पैशांची मदत लागेल. एक ते दीड लाख रुपये मला बाबा देतील का?

'हो तू नको काळजी करू, मी तुझ्या बाबांशी बोलते'.

'चालेल आई ...तू बाबांशी बोल आणि मला काय ते सांग'.

"हो चालेल,  आता बघ मी सगळ्या पाहुण्यांना फोन करून सांगते की माझ्या मधुराने स्वतःच हक्काचं घर घेतलं आहे म्हणून".


'अगं हो आई ....अगोदर सर्व फायनल होऊ दे, तोपर्यंत कोणालाही सांगू नको. चल मग मी फोन ठेवते.

"राहुल आणि मधुराचं सर्व सोनं  एका ज्वेलरकडे विकतात . त्याचे त्यांना दोन ते अडीच लाख रुपये मिळतात. बाबाही एक लाख रुपये मधुराला देतात.
तरी थोडीफार रक्कम कमी पडत होती, म्हणून राहुल त्याच्या मित्रांकडून थोडेफार पैसे घेऊन ते पैसे घेऊन तो बिल्डरकडे जातो".


बिल्डर त्यांना  सर्व प्लॅन समजावून सांगतो. दीड ते दोन वर्षात ही बिल्डिंग पूर्ण बांधून होईल. पण  पाच लाख रुपये दिले तरच फ्लॅट ची किंमत मी थोडीफार कमी करेल.

राहुल आणि मधुरा जमवलेली सर्व रक्कम बिल्डरकडे  देतात. मोजून घ्या पाच लाख रुपये आहेत.

"फायनली आज आपण स्वतःचा हक्काचं घर घेतलं! राहुल आणि मधुरा एकत्रच बोलतात. दोघेही खूप आनंदात असतात. दोघेही घरी जाताना मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतात. मधुरा राहुलला बोलते ...राहुल जाता जाता आपण आई-बाबांना भेटून जाऊया .

राहुल हो चालेल.....

मधुरा आणि राहुल दोघेही घरी पोहोचतात.जाताना ते मिठाईचा बॉक्स घेऊन जातात... दोघेही आई-बाबांच्या पाया पडतात व बोलतात तुमच्या आशीर्वादामुळेच आज आमच्या दोघांचा हक्काचं घर होऊ शकलं.

'मधुराचे आई-बाबा दोघांनाही मन भरून आशीर्वाद देतात'. सुखात रहा ...आनंदात रहा....

'काही दिवसांनी ,......मधुराचे बाबा टीव्हीवर न्यूज बघत असतात त्यावेळी एक न्यूज अशी असते की "दिव्यामधील अनेक बांधकामे  धुळीस मिळाली". दिव्यामध्ये सरकारी जागेत बांधण्यात आलेले अनेक बांधकाम पाडण्यात आली आहेत. आणि त्याचे बिल्डर फरार झाले आहेत.
हे ऐकल्यानंतर मधुराचे बाबा लगेचच राहुला फोन करतात. व ते राहुलला बोलतात जावईबापू  दिव्यातील अनेक बांधकाम पाडण्यात आली आहेत....


0

🎭 Series Post

View all