Login

मोडलेलं घरटं (भाग एक)

घरावर पैसे गुंतवून देखील घर मिळत नाही...

"अगं ऐकलसं का? मुलाकडच्या मंडळींनी आपल्या मधुराला होकार दिला आहे".... बाबांच बोलणं ऐकून मधुरा लाजून मान खाली घालते. मधुराच्या आईला देखील खूप आनंद होतो , पण त्यांना काळजी देखील वाटते.

मधुराची आई काळजीने विचारते..'अहो, त्या मुलाचे आई-वडील गावाला राहतात. मुलगा  मुंबईमध्ये मामाच्याघरी राहत आहे. त्याच स्वतःचं घर नाही आणि लग्न झाल्यानंतर आपली मधुरा कुठे राहील.

'आईचे बोलणे ऐकल्यानंतर मधुरा बोलते , 'आई अगं.. आमचं बोलणं झालं आहे या विषयावर . त्याने मला सांगितलं आहे , की लग्न झाल्यानंतर एक ते दोन वर्षात आपण आपलं स्वतःचं घर घेऊया . तोपर्यंत आपण भाड्याच्या घरामध्ये राहूया. आणि आई फक्त घर असून उपयोग नाही . मुलाचा स्वभाव आणि घरातील माणसं देखील चांगली असली पाहिजेत. "जर मुलाला स्वतःचं घर,  गाडी, बंगला सर्व काही असेल" पण घरातील माणसं चांगली नसतील तर त्या घरात मी सुखी राहू शकेल का ?

तुझं ही बरोबर आहे मधुरा . पण भाड्याच्या घरामध्ये संसार करणं सोपी गोष्ट नाही. आणि मुंबईत भाड्याच्या घरात राहणं म्हणजे आता सर्वसामान्य लोकांच्या आवाक्या बाहेर झाल आहे." एका घरात मांडलेला संसार एक किंवा दोन वर्षांनी पुन्हा मोडून दुसऱ्या घरामध्ये मांडणं " ही काही सोपी गोष्ट नाही.'मधुराची आई...

'अगं हो बरोबर आहे तुझं . आपण  लग्न झाल्यानंतर भाड्याच्या घरामध्ये राहिलो.  एकमेकांना आधार देत आपणही स्वतःचं घर खरेदी केल . तसंच आपली मधूरा देखील करेल , हळूहळू शकेल सर्व.' मधुराचे बाबा ....

'अहो, आपल्या वेळेचा काळ वेगळा होता. आपल्याला एखादी गोष्ट कमी असेल तरी आपण ती जमवून घ्यायचो. पण, आत्ताच्या मुलांना या गोष्टी सांभाळून घेणं जमणार आहे का ? भाड्याच्या घरात राहणं हे बोलणं खूप सोपं आहे. पण एकदा मांडलेला संसार पुन्हा मोडून दुसऱ्या ठिकाणी मांडणं ही गोष्ट खूप कठीण आहे..

'अगं पण... मुलाचा स्वभाव खूप चांगला आहे. तो मुलगा आपल्या मधुराला अगदी सुखात ठेवेल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि आपली मधुरा देखील  ऑफिसमध्ये काम करते .तिलाही चांगल्याप्रकारे पगार मिळतो. लग्न झाल्यानंतर दोघांनी ठरवलं तर ते लगेचच स्वतःच घर देखील घेऊ शकतात. मधुराचे बाबा विश्वासाने बोलतात.

"बाबा तुम्ही मुलांकडच्यांना होकार कळवा"? मधुरा बोलते.


0

🎭 Series Post

View all