"थोड्याच दिवसात मधुरा आणि राहुलचा लग्न सोहळा थाटात पार पडतो".... येणारे पाहुणेमंडळी मुलगा काय करतो ? कुठे राहतो? विचारतात त्यावेळी मधुराचे बाबा बोलतात फायनान्स कंपनीमध्ये कामाला आहेत. आणि मुंबईत घाटकोपरला ते राहतात.
'पाहुणे मंडळी, अरे वा!... घाटकोपरला, म्हणजे काय जावयांना भरपूर पगार असणार . घर चाळीत आहे की फ्लॅटमध्ये?
'नाही अजून त्यांच स्वतःचं घर नाही. मधुराचे बाबा उदास चेहरा करून बोलतात'.
" तरी तुम्ही अशा मुलाला तुमची मुलगी दिली" ज्याला अजून स्वतःचं घर देखील नाही. पाहुणेमंडळी खोचकपणे बोलतात....
'हो दिली आम्ही आमची मुलगी राहुलला' कारण आमचा माझ्या मुलीवर आणि आमच्या होणाऱ्या जावयावर पूर्ण विश्वास आहे. ते एक ते दोन वर्षात ते स्वतःच घर घेतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. असे बोलून मधुराचे बाबा सर्व पाहुणेमंडळींचं तोंड गप्प करतात.
"मधुरा माप ओलांडून ,आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात अगदी हसत आणि आनंदात करते. राहुल देखील मथुराला काही सुद्धा कमी पडून देत नाही. तिच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करतो. सकाळी उठल्यानंतर दोघेही एकत्र घरातले कामावरून एकत्रच ऑफिसला जाण्यासाठी निघतात . संध्याकाळी आल्यानंतर देखील राहुल मधुराला घरातली काम करण्यात मदत करत ".
एक दिवस मधुरा तिच्या माहेरी जाते . त्यावेळी तिची आई तिला विचारते ...काय गं मधुरा,' मी तुला फोनवरती बोलली होती की स्वतःच घर घ्यायचा विचार कर म्हणून' या विषयावर तुझं आणि राहुलचं काही बोलणं झालं आहे का?
'नाही गं आई '....मी राहुलला या विषयावर अजून काहीच विचारलं नाही . आता कुठे आमच्या संसाराला सुरुवात झाली आहे आणि लग्नात देखील त्याचा खूप खर्च झाला आहे. त्यामुळे घर घेण्यासाठी लगेचच आमच्याकडे पैसे नाहीत.
अगं पण,' भाड्याच्या घरामध्ये आता किती दिवस राहणार'. पाहिजे तर थोडेफार आम्ही तुला पैसे देतो ,पण तू नवीन घर घ्यायचा विचार कर. 'मधुराची आई बोलते.
"ठीक आहे आई. उद्या गेल्यानंतर मी या विषयावर राहुल सोबत बोलेन"...
घरी गेल्यानंतर मधुरा राहुलला विचारते अरे राहुल आपण आपलं स्वतःचं घर घेऊ या का? आपल्याकडे आता थोडेफार पैसे आहेत आणि आई बोलत होती की ती देखील आपल्याला घर घेण्यासाठी थोड्याफार पैशांची मदत करेल म्हणून. आणि मला लग्नात जे सोनं मिळाल आहे ते सोनं आपण मोडूया. त्याच्यातून थोडेफार पैसे मिळतील असं करून आपण स्वतःचं घर खरेदी करू शकतो.
'राहुल तू म्हणत आहेस तर मग बघूया आपण स्वतःचा घर'.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा