Login

मोडलेलं घरटं (भाग तीन)

घरात पैसे गुंतवून देखील घर मिळत नाही.
'राहुल आणि मधुरा  एजंट लोकांना भेटून फ्लॅट बघण्यासाठी जातात'. परंतु फ्लॅटच्या किंमती ऐकून , फ्लॅट घेणं आपल्याला परवडण्यासारखं नाही असा ते दोघेही विचार करतात.

'राहुल मधुराला बोलतो .…. आपण एक काम करूया. आपण कल्याण अंबरनाथ बदलापूर येथे  फ्लॅट बघूया. तिकडे आपल्याला जरा स्वस्त फ्लॅट मिळतील.

'अरे पण , राहुल आपण कल्याणच्या पुढे फ्लॅट बघितले तर आपल्या दोघांना ऑफिसला यायला खूप लांब पडेल. आणि  ट्रॅव्हलिंग करून आपल्याला घरची काम करणं जमणार आहे का?

थोडेफार पैसे ॲडजस्ट करून आपण डोंबिवली दिवा कळवा या ठिकाणीच आपण फ्लॅट बघूया.

एका एजंटच्या मदतीने त्यांना दिव्या मध्ये एक फ्लॅट आवडतो. ते दोघेही फ्लॅट बघण्यासाठी जातात. त्यावेळी त्यांना बिल्डर बोलतो हा सॅम्पल फ्लॅट आहे . आमचं अजून अंडर कंट्रक्शन काम चालू आहे. जर तुम्ही आत्ताच आम्हाला चार ते पाच लाख रुपये दिलेत, तर या फ्लॅट ची किंमत मी अजूनही कमी करू शकतो.

राहुल बिल्डरला बोलतो...' अहो , पण आत्ता आमच्याकडे इतके पैसे नाहीत. खरं सांगायला गेलो तर आत्ता आमच्या अकाउंट मध्ये फक्त एकच लाख रुपये आहेत चार ते पाच लाख रुपये जमवणे आम्हाला शक्य नाही.

जर तुम्हाला चार ते पाच लाख रुपये देणं शक्य नसेल, तर तुम्हाला पूर्ण फ्लॅट ची किंमत भरावी लागेल. आणि जर तुम्ही कॅश मध्ये आम्हाला काही रक्कम दिली तर या फ्लॅटची किंमत कमी करून  देऊ शकतो.

राहुल बिल्डरला बोलतो ठीक आहे . आम्ही विचार करतो, पैशांची जमवाजमव होते का ते बघतो, आणि नंतर तुम्हाला चार ते पाच दिवसांमध्ये फोन करून सांगतो.

मधुर आणि राहुल दोघेही तिथून निघतात. मधुरा राहुलला बोलते राहुल मला हा फ्लॅट खूप आवडला आहे. आता काही झालं तरी आपण थोडेफार पैसे ॲडजस्ट करून हा फ्लॅट फायनल करून टाकूया.

अगं पण,' वरचे चार लाख कसे आपण आणणार.

मधुरा राहुलचा हात हातात घेते व बोलते." हे बघ आता सोन्याला भाव चांगला आहे माझं जे काही सोन आहे ते सर्व आपण मोडूया आणि बाबा आपल्याला एक लाखांची तरी मदत करतील असे करून आपल्याकडे चार ते पाच लाख सहज जमा होतील".

ठीक आहे मग मधुरा तू म्हणतेस तर मग आपण तसेच करूया...


0

🎭 Series Post

View all