राहुल बाबांनी सांगितलेली न्यूज ऐकल्यानंतर ऑफिसमधून लगेचच निघतो व थेट दिव्याला बिल्डरच्या ऑफिसमध्ये जातो तर बिल्डरच ऑफिस बंद असतं. म्हणून तो त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करतो पण बिल्डरचा फोन लागत नाही.
"राहुलला मधूराच्या बाबांचा फोन येतो... काय हो जावई बापू ,भेटलात का बिल्डरला. काय बोलला तो बिल्डर?
'नाही बाबा ....नाही भेटलो... त्याच ऑफिसही बंद आहे'. आणि त्याचा फोन देखील लागत नाही.
"काय सांगताय जावईबापू ! आता काय करायचं ? मधुरा आणि तिला ही गोष्ट समजली तर त्या दोघींना धक्काच बसेल".
"राहुल निराश चेहऱ्याने घरी येतो . घरात लाईट न लावताच , तो अंधारामध्ये डोक्याला हात लावून बसलेला असतो. त्याला मधुरा विचारते काय झालं राहुल? एवढां अंधार करून डोक्याला हात लावून का बसला आहेस तू? कोणत्या तरी टेन्शनमध्ये दिसत आहेस. मधुरा काळजीने त्याला विचारते.
'राहुल वरती बघतो त्याच्या डोळ्यात पाणी दाटलेलं असतं ते बघून मधूराला अजूनच टेन्शन येतं. तुझ्या डोळ्यात पाणी!....
"राहूल मधुराच्या गळ्यात पडून रडतो व बोलतो मधुरा आपलं घर बांधण्याआधीच मोडून गेलं".
"म्हणजे! काय बोलतेस तू राहुल. मला काही समजेलं असं बोलशील का?
'अगं, मधुरा आपण ज्या बिल्डिंगमध्ये आपलं घर घेतलं होतं, त्या बिल्डिंगची ती जागा ..... खरंतर राहुल पुढे काहीच बोलता येत नव्हतं...
'काय झालं ...आपल्या घराची जागा....बोल राहुल पटकन'...
'अगं मधुरा आपण जे घर घेतलं होतं ना , ती जागा सरकारची होती आणि त्यांनी ते सर्व कंट्रक्शन
पाडून टाकल आहे'.
पाडून टाकल आहे'.
'काय बोलतोयस तू राहुल !....नाही असं नाही होऊ शकत. आपलं घरटं उभ राहण्याआधीच असं मोडू शकत नाही. दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून फक्त रडत होते.
तितक्या तिथे मधुराचे आई आणि बाबा येतात. ते दोघांनाही समजावून सांगतात आता जे झालं ते झालं आता रडून काही उपयोग नाही त्या बिल्डरला पोलीस शोधत आहेत. झालं गेलं ते आता विसरून जा आणि नव्याने पुन्हा सुरुवात करा....
मधुराची आई बोलते ....."अरे बोध घ्या त्या चिमण्यांकडून वादळी वाऱ्यात , पावसात ज्यावेळी त्यांचे घरटे तुटून खाली पडते , त्यावेळी त्या जिद्दीने पुन्हा दुसरं नवीन घरटं बांधायला चालू करतात". आणि तुम्ही दोघ तर चांगले शिकलेले आहात . तुम्हाला दोघांनाही चांगल्या पगाराची नोकरी आहे .' मगं , रडण्याची काहीच गरज नाही. पुन्हा नव्याने सुरुवात करा आणि नवीन घर घ्या फक्त एवढेच की आता घर घेताना नीट चौकशी करूनच घ्या.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा