Login

मोगरा असा हा फुलला : भाग १०

उद्ध्वस्त झालेल्या नात्याची पुन्हा प्रेमाने फुललेली गोष्ट!
"मीरा बोलता बोलता थांबली पण तिचे बोलणे ऐकून घनश्याम मात्र चांगलाच थक्क झाला होता.

" आणि एकेदिवशी कायं मीरा? "

मीराने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली.
" आणि एकेदिवशी आदित्य थेट माझ्या घरी आला. त्याला अचानक समोर पाहूनच मी इतकी भांबावले होते खरंतर पण त्याने मात्र अगदी येऊन आई बाबांसमोरच पुन्हा लग्नाचे विचारले.

आई बाबांना तर कायं आयती संधी यावी तसा समोरून एवढा चांगला मुलगा आलेला मगं कायं त्यांनी एकसारखा तगादा लावला मागे. मला आदित्यचा खूप राग आलेला आणि माझ्या त्या ऑफिस कलीगचा देखील जिने आदित्यला माझ्या पुण्यातील घराचा पत्ता दिला होता पण मी त्यावेळी शांत राहण्यापलिकडे कायं करू शकतं होते.

खूप प्रयत्न केला घरच्यांचा आणि आदित्यला हे सांगायचा की, 'मला हे दुसरं लग्न नको आहे म्हणून' पण कोणीही माझं ऐकूनचं घ्यायला तयार नव्हतं.

बाबांनी शेवटी मला भाग पाडले. खरं सांगायचं तर त्यांच्या आनंदासाठी ती तयार झाले होते आदित्य सोबत नव्याने नातं जोडायला कारण मला आयुष्यात पुन्हा नात्यांची जबाबदारी नकोच होती पण हा समाज एका स्त्रीला एकटीने शांतपणे नाही जगू देतं कायमचं तिला प्रश्नांना सामोरे जावे लागते.

मी तर समाजातील या अशा प्रश्नांकडे दुर्लक्षच करत होते पण आई बाबा मात्र कधीकधी त्या प्रश्नांमुळे खचून चालले होते आणि त्यांना असे पाहूनचं मी निर्णय घेतला आदित्य सोबत लग्नाचा.

अगदी लगेचचं साखरपुडा ही पार पडला आणि सहा महिन्यात लग्नाची तारीख ही ठरवली गेली लगेचचं.

शेवटी मी ही विचार केला आदित्य तसा चांगला होता एक मित्र म्हणून शिवाय आई बाबांनंतर मी एकटीच त्यापेक्षा ठीक आहे.

आयुष्यात भलेही पैसा, घर सगळे काही असले तरी सोबतीला आपलं म्हणता येईल असं एखादं हक्काचं माणूस हवचं असतं!

मी मागचे सगळे विसरून आदित्य सोबत नवे आयुष्य मनापासून जगण्याचा प्रयत्न करायला लागले होते. " मीरा एवढे बोलून थांबली.

"मीराsss " म्हणून घनश्याम थांबला एक क्षणभर आणि पुन्हा बोलायला लागला.

" मीरा आदित्य चांगला होता, तू नव्याने सुरुवात करायचा प्रयत्न करत होती असेही म्हणालीस आत्ता मगं नेमके कायं झाले की तुमचे ठरलेले लग्न मोडले? " घनश्यामचा प्रश्न ऐकून मीराच्या चेहर्‍यावर लगेचचं एक प्रकारची उदासी घनश्यामला दिसून आली. घनश्यामने मगं पुढे काही न बोलणे योग्य ठरेल असा विचार करून शांत रहायचे ठरवले.

पाच एक मिनिटांनी मीराने बोलायला सुरुवात केली.
" हो छान होता आदित्य. नाव ठेवायला जागा नाही असाच. खूप काळजी घ्यायचा माझीही आणि मी ही हळू हळू त्याची काळजी पाहून त्याच्यासोबत नवं नातं, नवं आयुष्य पहायला लागले होते.

सहवासाने माणस जास्त कळतात हे अगदी खरं आहे बाकी. त्याच्यासोबत रोज ऑफिसला जाता येता मला एक एक गोष्टी कळायला लागल्या.
मी अजूनही त्याच्या सोबत तितकीशी मनमोकळी होऊ शकतं नव्हते पण काही गोष्टीत त्याचं स्वतःचं म्हणणं खरं करणं, त्याला आवडतं म्हणून केस कुरळे करून घे असा हट्ट धरणं आणि अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी मला नंतर नंतर नकोशा वाटायला लागल्या.

आदित्य सोबत असताना मला माझ्या काही चुकांची जाणीव व्हायला लागली श्याम. ज्या चुका तू मला बोलून दाखवायचा त्याच आदित्य देखील पण तू मला प्रत्येक वेळी, 'होते चूक मी ही चुकतोच आपण परफेक्ट नाहीच आहोत दोघेही', असे म्हणून माझी समजूत घालायचा कायमचं पण आदित्य सोबत मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे, 'तो कायमचं तो किती परफेक्ट आणि मी कशी चुकते', हे दाखवून द्यायचा.

मी खूप गोष्टी बदलल्या त्याच्यासाठी पण त्याची तक्रार काही केल्या कमी होतचं नव्हती मगं वाटलं की,
' मी आत्ता हे आदित्य सोबत नातं टिकवण्यासाठी म्हणून जशा स्वतःच्या काही गोष्टी बदलल्या, स्वतःमध्ये बदल केला तोच बदल मी आपल्या नात्याच्या वेळी का नाही केला? का मी प्रत्येकवेळी हट्ट करतं राहिले?
आदित्य देखील त्याच्या आईची बाजू घ्यायचा कधीतरी, त्याची आई म्हणेल ते मी ऐकायचे मगं मला वाटले की आपल्या नात्यात ही मी ही तडजोड केली असती तर? '

हो सतत विचार करायचे. कायमचं मी आपल्या दोघांचे आणि आदित्य व माझे नाते यात फरक पहायला लागले मगं थोडीशी खंबीर होऊन आदित्यला काही गोष्टींना नकार द्यायला शिकले.

नातं तुटायला कायं कारण थोडीच लागतं बस्स! आदित्यला फक्त मीच तडजोड करायला हवी होती वैयक्तिक तो स्वतःमध्ये काही बदल करू इच्छित नव्हता खूप प्रयत्न केला मी पण नाही जमलं शेवटी मी स्पष्टपणे नकार दिला मगं आदित्य सोबत लग्न करायला आणि घरी आई बाबांना ही सांगितले तसे. " मीरा पुढे बोलायची थांबली.

" तू घरी सांगितले आणि आई बाबांनी लगेचच ऐकले देखील हे पटत नाही आहे. त्यांनी तुला समजवण्याचा प्रयत्न नाही केला का? " घनश्यामने अगदी लगेचचं विचारले मीराला तशी मीरा गूढ हसली.

क्रमशः

कायं असेल मीराच्या या गूढ हास्यामागे कारण? हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग वाचावा लागेल. भेटूयात कथेच्या पुढच्या भागांत लवकरचं.