Login

मोगरा असा हा फुलला : भाग ३

उद्ध्वस्त झालेल्या नात्याची पुन्हा प्रेमाने फुललेली गोष्ट!

दोघांचाही नजरेने एकमेकांशी संवाद सुरू होता इतक्यात घनश्यामचा फोन वाजला तशी मीराने तिची नजर वळवली.

घनश्यामने फोन कट करून सायलेंट वर टाकला कारण त्याला पुन्हा मीराच्या आणि त्याच्या गप्पांमध्ये कुठलाही डिस्टर्बन्स नको होता.
त्याने मीराकडे नजर टाकली ती मात्र कॅफेतील डाव्या बाजूला बसलेल्या जोडप्याकडे कुतूहलाने पाहत होती.

"मीराss"

"ह्म्म" त्याच्या हाकेवर मीराने फक्त एक हुंकार भरला.

"तु पुन्हा मुंबईत आलीस रहायला आणि साधे कळवले देखील नाहीस." घनश्यामच्या बोलण्यातून नाराजीचा स्वर स्पष्टपणे ऐकू आला होता मीराला. खरंतर इतक्या वर्षांनी त्याचं असं हक्क दाखवणं तिला आवडलं होतं पण त्यांच्या नात्याला मोकळीक ही त्यानेच तर दिली होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला.

"काही शहरांत पुन्हा कधीच परतावेसे वाटत नाही आणि आजही मी आले ते फक्त कामासाठी. इथले काम झाले की मी चार दिवसांनी पुन्हा पुण्यात जाणार आहे.

घनश्याम आणि कळवायचे म्हणशील तर या शहरांत आता कोणी ओळखीचे राहत आहे याचा विसरचं पडलाय मला जणू. काही आठवणी इतक्या त्रासदायक असतात की तुम्हाला सगळ्या ओळखी विसरायला भाग पाडतात. " मीराचे हे बोलणे त्याच्या जिव्हारी लागले खूपच त्याने पट्कन पाण्याचा ग्लास तोंडाला लावला आणि गटागटा पाणी पिले.

'मला ठाऊक आहे रे तूला लागले असेल माझे हे बोलणे पण अजूनही मनातलं सगळं फक्त तुझ्यासमोरचं तर बोलू शकते मी म्हणून आजही मनातलं बोलून बसले.' मीरा घनश्यामकडे पाहून मनातल्या मनांत बोलली कारण त्याची ती घालमेल तिला आजही लक्षात आली होती.

'मीरा मला कळतंय गं तूला खूप त्रास झाला आहे ते पण इतके वर्ष झाले अजूनही इतका राग आहे का गं?

आपण पुन्हा पूर्वीसारखे नाही का होऊ शकतं? ' घनश्याम मीराकडे पाहून मनातल्या मनांत पुटपुटला.

पुन्हा एकदा दोन मूक नजरांचा संवाद सुरू झाला होता इतक्यात व
"कॉफीss" असे म्हणतं वेटर टेबलवर कॉफी ठेऊन गेला.

दोघांनाही कॉफीचा कप घेण्यासाठी एकदाच हात पुढे केले तेव्हा एकमेकांच्या हाताचा पुसटसा स्पर्श झाला क्षणभर आणि करंट लागावा तितक्या वेगाने मीराने हात मागे घेतला.

"सॉरीss" घनश्याम तिच्या या कृतीने भांबावून गेला अगदीच आणि त्याने तिची माफी मागितली.

मीरा मात्र काहीही न बोलता कॉफीचा कप तोंडाला लावून एक एक घोट रिझवू लागली. तिची शांतता पाहून घनश्यामने ही कॉफीचा कप तोंडाला लावला.

"आऊचचचsss" त्याला कॉफीचा चटका बसला जोरात कारण मीराकडे पाहण्याच्या नादात कॉफी गरम आहे हे तो विसरूनच गेला होता जणू.

"कायं रे तूला आजही कॉफी गरम आहे हे साधे कसे लक्षात येत नाही.कधी कधी खूप लहान मुलांसारखा वागतोस खरचं. खूप जोरात चटका बसला का?" स्वतःचा कॉफीचा कप बाजूला करत मीरा घनश्यामवर ओरडली तसे इतकावेळ दुखावला गेलेला तो आता मात्र तिच्या या ओरडण्याने थोडासा सुखावला गेला.

" मीराss मी ठीक आहे " त्याच्या शांत उत्तराने ती हसली नुसती कारण आपण काही क्षणांपूर्वी कसे रिएक्ट झालो हे आठवले तिला. तिने पुन्हा एकदा कॉफीचा कप तोंडाला लावला.

"मीरा आजही माझ्या सवयी तूला इतक्या लक्षात आहेत का गं?" त्याच्या अचानक आलेल्या प्रश्नाने मीरा भारावून गेली पण तिने लगेच स्वतःला सावरले.

"नातं बदलतं.. माणसंही बदलतात पण काही सवयी नाही विसरता येतं सहजपणे श्याम" तिने निर्विकारपणे उत्तर दिले.

"श्यामsss आत्तापर्यंत कुठल्यातरी अनोळखी व्यक्तीसोबत बोलतोय असे वाटत होते पण आत्ता 'श्याम' म्हटलीस तर किमान ओळख आहे असे वाटायला लागले आहे."

त्याचे बोलणे ऐकून मीरा पुन्हा एकदा मूग गिळून गप्प बसली आणि तिने कॉफीवर लक्ष केंद्रित केले.

घनश्यामला ही आता पुढे कायं बोलायचे हे कळत नव्हते पण त्याला तिची शांतता ही खटकत होतीच.

" मीरा घरी सगळे कसे आहेत? आई बाबा आणि दादा वहिनी कायं म्हणत आहेत? " त्याने काहीतरी विषय हवा म्हणून तिच्या घरच्यांची विचारपूस केली.

"सगळे अगदी मजेत आहेत. दादा आणि वहिनीला दोन वर्षांपूर्वी मुलगा झाला."

"हो मला प्रसाद कडून कळले तसे." त्याने सांगितले.

"ओह्ह.. " तिचा पुन्हा शांत रिप्लाय पाहून त्याला आता खूप राग येत होता तिचा.

"मीरा मला नाही का विचारणार तू की घरी कसे आहेत सगळे म्हणून? "

" ह्म्म कसे आहेत सगळे? " तिच्या बोलण्यातून बळजबरीचा स्वर जाणवला त्याला.

" ठीक आहेत सगळे. " त्याने यावेळी नाराजीनेच उत्तर दिले.

मीराने कॉफी संपवली.
"मी निघूss" तिच्या या प्रश्नावर त्याला तिला थांबवायचं होतं खरंतर पण कुठल्या हक्काने थांबवणार होता तो तिला काही वर्षांपूर्वी तिच्यावर असलेले सगळे हक्क त्याने स्वतःहून काढून घेतले होते.

"मी निघूss" तो त्याच्यात विचारतं हरवला होता तसे तिने पुन्हा विचारले.

"मीराss कशी जाणार आहेस?"

"पुढे स्टॉपवर टॅक्सी मिळेल ती पकडून जाईल."

"मी येऊ तिथपर्यंत सोबत चालेल?" त्याच्या प्रश्नावर तिला नकार ही देता आला नाही तशी ती पुढे चालायला लागली आणि तो तिच्या अबोला होकार समजून तिच्या पाठोपाठ चालायला लागला.

'मीरा कायं करतेय तू? का नाही नकार देता आला तुला?' तिचं मन तिच्याशी द्वंद्व करत होतं.

'मीरा मी तुझ्याशी बोलल्याशिवाय किमान यावेळी तरी तुला असं नाही जाऊ देणार' दुसरीकडे घनश्यामने मनाशीच निर्धार केला होता जणू.

क्रमशः

नक्की कायं घडणार आहे पुढे? त्याचा निर्धार पूर्ण होईल की मीराचा हट्ट हे पाहण्यासाठी कथा वाचत रहा.