दुपारची एक दीडची वेळ ती.. इतकावेळ आग ओकून सूर्यदेवता थकून थोडा विश्रांतीसाठी गेलेला त्यामुळे थोडीशी सावली जाणवत होती आणि या वातावरणात त्या मुंबईच्या रहदारीत या दोन जीवांचा शांतपणे प्रवास चालू होता एकत्र.
एव्हाना कॅफेतून बाहेर पडून त्यांना पाच एक मिनिटे झाली होती पण अजूनही मीरा आणि घनश्याम फक्त सोबत चालले होते रस्त्याने पण दोघांपैकी एकानेही संवादाला सुरूवात केली नव्हती .
'ती नाहीच बोलणार मुळी तिचा हट्टी स्वभाव तूला का ठाऊक नाही. यानंतर पुन्हा ती भेटेल की नाही माहित नाही कारण आजसारखा योगायोग सारखा घडेलच असे नाही घनश्याम आजतरी बोलंss " त्याचे मन वारंवार त्याला तिच्याशी बोलण्यासाठी सांगत होते पण तो मात्र तिच्याशी बोलण्यासाठी सुरूवात कुठून करायची याची वाट पाहत होता.
" मी निघू का स्टॉप जवळ आलाच आहे. " घनश्याम मीराशी बोलण्याची जुळवाजुळव करतच होता इतक्यात मीराने निघायची वेळ आली आहे असे सांगितले.
"मीराss"
"कायं?" तिने विचारले त्याचवेळी त्याला तिला ओरडून सांगायचे होते की जाऊ नकोस थांब पण कुठल्या हक्काने तो थांबवणार होता तिला आज आणि जरी थांबवले तरी मीरा थांबेल का याबतीत ही तो साशंकचा होता.
"ओके बाय.. काळजी घे" मीरा त्याच्या शांततेला होकार समजून पुढे चालायला लागली.
'मीरा नको जाऊsss थांब' त्याचं अंतर्मन ओरडत होतं जोरजोरात.
'का थांबवत नाहीस तू आजही.. तूला बोलायचं आहे हे कळतंय मला पण तू स्वतःहून थांबव ना मला आजतरी किमान' मीराची पाऊले पुढे चालत असली तरीही तिला वारंवार वाटत होते की त्याने थांबवावं म्हणून.
बोलायचं दोघांनाही होतं पण आजही त्या दोघांचा इगोच मध्ये येत होता. मीराला वाटतं होते की आजतरी श्याम पुढाकार घेईल आणि श्यामला वाटत होते की मीरा स्वतःहून काही बोलेल पण प्रत्यक्षात पुढाकार कोणीही घेत नव्हते.
मीरा आता टॅक्सी जवळ पोहचतचं होती इतक्यात त्याने जोरात आवाज दिला तिला.
"मीराss ss" तिची पाऊले जागीच थांबली.
घनश्याम तिच्या दिशेने चालत चालत पुढे गेला आणि समोर जाऊन उभा राहिला मीराच्या.
"मीराss थांब ना थोडावेळ."
"मला उशीर होईल घरी जायला."
"कमॉन मीरा तू इथे सीमा मावशीकडे राहत असणार मला माहित आहे आणि तिकडे तुला थोडा उशीर झाला तर फार कोणी काळजी करणार नाही. सीमा मावशी आणि त्यांच्या कुटुंबियांना मी तेवढे तर ओळखतो.
इथे जवळ एक गार्डन आहे बसूयात काहीवेळ. " घनश्याम इतक्या स्पष्टपणे बोलला की त्याला कायं उत्तर द्यायचे हे मीराला समजलेच नाही.
इथे जवळ एक गार्डन आहे बसूयात काहीवेळ. " घनश्याम इतक्या स्पष्टपणे बोलला की त्याला कायं उत्तर द्यायचे हे मीराला समजलेच नाही.
" ओके. " मीरा त्याच्या बरोबर चालायला लागली.
'कधी काळी हट्टाने ही मला सोबत चालायचा आग्रह धरायची आणि आज इतकी शांत झाली आहे. खरंच माणूस एवढा बदलतो की मी भाग पाडलं मीराला बदलायला?' घनश्यामचे मन त्याला आतून कैक प्रश्नांनी पोखरत चालले होते.
एकीकडे घनश्याम त्याच्या विचारांत धुंद आणि मीरा मात्र त्याच्याकडे पाहत होती.
' आजही तुझ्या काही गोष्टी अगदी तशाच आहेत एकदम. ' मनातल्या मनात त्याच्याकडे पाहून मीरा पुटपुटली.
दोघेही आपापल्या विचारांत इतके गुंग होते की मीरा चालता चालता कधी रस्त्याच्या डाव्या बाजूला गेली हे तिलाही कळले नाही. एक जोरदार कार तिच्या बाजूने भरधाव गेली ती तशी मीरा भानावर आली ती पट्कन बाजूला सरकायला गेली आणि तिचा सँडल किंचितसा वाकडा झाला, ती पडलीच असती पण घनश्यामने तिचा हात पकडला.
" मीरा ठीक आहेस ना गं? तुला आजही रस्त्यावरून चालताना भान नाही का राहत जराही?" घनश्याम तिच्यावर जोरात ओरडला.
"ठीक आहे मी आणि चूक त्या कारची होती बाकी मी भान ठेवूनच चालते कारण आयुष्यात माझी काळजी घेणारे कोणी नाही उरले हे माहित आहे मला चांगलेच." मीरा पुढे चालायला लागली पण मीराचे हे शब्द त्याला चांगलेच टोचले.
तो तिच्या पाठोपाठ चालायला लागला आणि अचानक कायं झाले कोणास ठाऊक मीरा त्याच वेगाने पाठीमागे फिरली.
" तुझा हात दाखव " मीराचे हे बोलणे ऐकून घनश्याम जरासा गोंधळला.
" म्हणजे? " त्याने न रहावून विचारले तसे मीराने त्याचा हात पकडला आणि ती त्याच्या मनगटाकडे पहायला लागली.
इतकावेळ तिचे लक्ष गेलेच नव्हते कदाचित् त्याच्याकडे म्हणून तर तिला त्याच्या हातातील ते घड्याळ दिसले नव्हते बहुतेक पण आत्ता जेव्हा तिला आवरताना त्याने तिचा हात पकडला तेव्हा मीराला त्याच्या हातातील घड्याळ दिसले.
"तू दर सहा महिन्यांनी घड्याळ बदलतोस, तुला नवनवीन घड्याळ घालायला आवडतात मगं हातात हे जुने घड्याळ का आहे आत्ता?" मीराचा प्रश्न ऐकून घनश्याम हसला
" माणसं साथ सोडून जातात असे म्हणालीस पण तरीही त्या माणसांच्या सवयी कायम जवळ राहतात नाही" घनश्यामने मीरा कडे पाहून एक कटाक्ष दिला तसा मीराने त्याचा हात सोडला.
" मीरा हे घड्याळ तू मला आपल्या लग्नाच्या वाढदिवशी दिले होते ते ही तुझी चार महिन्यांच्या पगारातील थोडे पैसे बाजूला ठेवून हे घड्याळ मी माझ्यापासून कसे दूर होऊ देईल मगं? " घनश्याम एवढे बोलून थांबला पण मीरा मात्र त्याच्या बोलण्याने एकदम आश्चर्यचकित झाली.
क्रमशः
घनश्याम आणि मीरा यांचे जर का लग्न झाले होते तर मगं नेमके कायं घडले त्या दोघांमध्ये की त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या हे जाणून घेण्यासाठी कथा वाचत रहा
©®ऋतुजा कुलकर्णी