मीरा घनश्यामला रडताना पाहून अंतर्मनातून खूपच खचली. तिने स्वतःला सावरले आणि त्याच्या पाठीवरून अलवार हात फिरवला तसा घनश्याम तिला अजूनचं घट्ट बिलगला.
"आपण बागेत आहोत.. इथे आजूबाजूला लोकं आहेत श्याम." मीराने हळूच घनश्यामला आठवण करून दिली पण त्याच्या पर्यंत मीराचे हे शब्द पोहोचलेच नाहीत जणू.
"खूप एकटा पडलोयं गं मीरा तू गेल्यापासून वरवर दाखवतोय मी किती आनंदी आहे ते पण नाही जमतं आहे मला आता हे असं मुखवटा घेऊन वावरणं" घनश्याम पुन्हा मुसमुसायला लागला. मीराने त्याला अलगद त्याच्यापासून दूर केले आणि ती त्याच्या समोर जाऊन बसली बाकावर.
तिने रूमाल दिला त्याला तसे त्याने डोळे पुसले पण डोळ्यातून येणारे पाणी आज काही थांबायचे नावच घेत नव्हते जणू.
" शांत होss " मीराने त्याच्या हातावर हात ठेऊन त्याला शांत करायचा प्रयत्न केला.
"मीराsss तू माझ्या आयुष्यात पुन्हा नाही का येऊ शकतं?" घनश्यामने भावनेच्या भरात विचारले तसे मीराने हात मागे घेतला तिचा.
"प्लीज घनश्याम बास आता. हे बघं आपण एकत्र येऊन पुन्हा त्याचं गोष्टी घडतील ज्या अगोदर भूतकाळात घडल्या आहेत. तुझ्या त्या इरिटेड करणार्या सवयी कधीच बदलणार नाहीत ज्यावरून कायमचं आपले वाद व्हायचे." मीरा वैतागून बोलली. तिला एका क्षणांत भूतकाळातील काही घटना डोळ्यांसमोर तरळताना दिसायला लागल्या.
भूतकाळात ;
" श्याम कायं हे पुन्हा तो ओला टॉवेल बेडवर? अरे कितीवेळा सांगितले तूला ज्या हातांनी तो टॉवेल बेडवर टाकायचा तसाच बाल्कनीत टाकलास तर कायं बिघडेल? " मीरा बाथरूम मधून नुकतीच बाहेर आली होती आणि आल्या आल्या बेडवर पडलेला तो ओला टॉवेल पाहून तिचे सकाळी सकाळीचं बिनसले होते.
" मीरा कायं ती रोजचीचं कटकट? कितीवेळा सांगतो ऑफिसला जाताना नको असे काही बोलत जाऊ, भांडत जाऊ दिवसभर आठवतं राहतं पण तुला हल्ली वाद काढायला कारणचं हवं असतं." घनश्याम ही रोजच्या भांडणांना वैतागला होता.
"हो का वादाला विषय मला लागतो की तूला? जसे तूला एखाद्या दिवशी हँगरला कपडे व्यवस्थित लावलेले नाही दिसले की चीड येते तितकीचं चीड मला बेडवर तो ओला टॉवेल पाहून येते. तू बदलतोस का तुझ्या सवयी पण आणि यामुळेच भांडणे होतात आपल्यात आणि उरलेली कसर तुझी आई भरून काढते. " मीरा फारच रागावली होती.
" मीरा आपल्या भांडणात आता आईला कायं मधे घेतं असतेस तू कायमं? तिने कायं केले? सगळे तर तुझ्या मनाप्रमाणे करते पण तू तिला कधीतरी मुलीच्या मायेने बोलतेस का? आईने कितीही काहीही केलं तरी तुझं तोंड कायमचं फुगलेलं.
अगं ती गावाकडे होती वडिलानंतर तिने एकटीने मला आणि ताईला वाढवले होते. मान्य आहे की आईचे विचार थोडे जुनाट आहेत पण म्हणून माझी आई वाईट ठरत नाही आणि मी कुठे गं तूला सगळ्या गोष्टी ऐकायला भाग पाडतो तिच्या? कायम तुझी बाजू घेतो पण तूला हल्ली फक्त वाद घालायचा असतो. छंदच जडला आहे. " घनश्याम धुसफुसत टाय बांधतो.
" ह्म्म सगळे बरोबर तुम्ही फक्त या घरात माझ्यामुळेच तर वाद होतो. मी काही बोलायचं नाहीच म्हणजे.. ठीक आहे मगं. " मीरा तणतणतं बेडरूमच्या बाहेर निघून गेली जाताना तिने बेडरूमचा दरवाजा जोरात ओढून घेतला त्यात तिचे बोट चेंगरले जरासे ती वेदनेने कळवळली
पण घनश्याम तिचा आवाज ऐकूनही तिला पहायला बाहेर आला नाही.
पण घनश्याम तिचा आवाज ऐकूनही तिला पहायला बाहेर आला नाही.
वर्तमान ;
" मीराss ए मीराss " घनश्यामने मीराच्या खांद्याला हलवून विचारले तसे मीरा भूतकाळातून बाहेर आली. एका क्षणांत कितीतरी आठवणी जाग्या झाल्या होत्या.
"कुठे हरवली होतीस?"
"काही जखमा उफाळून आल्या तुझ्या बोलण्याने." मीरा अतिशय उदासीने म्हणाली तसे घनश्यामने तिचा हात हातात घेतला आणि घट्ट धरला.
"मीरा काहीवेळा जखम देणारी आणि जखमांवर मलम लावणारी व्यक्ती एकच असते गं.
मला मान्य आहे गं भूतकाळात खूप काही चूका घडल्या आहेत पण तू सोडून गेल्यावर कळले की तुझ्याशिवाय मी राहू शकतो हा माझा भ्रम किती चुकीचा होता ते.
कसं असतं ना आपलं माणूस आपल्या जवळ असतं, ते हट्ट करतं, भांडण करतं तोपर्यंत आपल्याला ते सगळं बालीश वाटतं. कधी कधी खूप कंटाळा येतो पण जेव्हा आपली व्यक्ती दूर जाते आपल्यापासून तेव्हा लक्षात येतं की त्या सगळ्या बालीश वाटणाऱ्या गोष्टीच आयुष्यात काही नवे रंग भरत होत्या रोज.
हो खूप वाद झाले पण त्या प्रत्येक वादानंतर एकमेकांशी तो अबोला धरणं आणि त्यानंतर पुन्हा प्रेमाने एकमेकांना मनवणं, एकमेकांचा रूसवा काढणं, ते कान पकडून सॉरी म्हणणं या सगळ्या गोष्टी खूपच आनंद देणार्या होत्या पण तू जवळ होती तोपर्यंत त्या गोष्टीतील आनंद कधी दिसलाच नाही दिसले ते फक्त वाद.
मीरा तू दूर गेलीस आणि मला लक्षात आलं की आपल्या भांडणात पण एक मजा होती तू आयुष्यातून गेल्यापासून आयुष्यातील मजा, आयुष्यतला आनंदच हरवून बसलोय मी.
मीरा मला नाही माहित तू आदित्य सोबत खरंच मनापासून सुरूवात केली होती की नाही ते पण जर तूला नवी सुरुवात करायचीच आहे तर मगं पुन्हा आपल्या नात्याची नवी सुरुवात नाही का होऊ शकणार?
तू मला नव्याने ती संधी नाही का देऊ शकणार मीरा? प्लीज बोलं ना गं
हे बघं जे मनांत आहे ते बोलं आजतरी " घनश्याम मीराच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आणि मीराने नजर चोरली.
हे बघं जे मनांत आहे ते बोलं आजतरी " घनश्याम मीराच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आणि मीराने नजर चोरली.
क्रमशः
मीरा आजतरी मनातले व्यक्त करेल का? देईल का घनश्यामला ती पुन्हा एक संधी हे सगळे पाहण्यासाठी कथा वाचत रहा रोज.
©®ऋतुजा कुलकर्णी