मोगरा फुलला प्रीतीचा भाग सुरवातीचा 1

कथा आरतीच्या बलीदानाची.
मोगरा फुलला प्रीतीचा
_____
ति आज निघाली होती.
तिच्या प्रियकराच्या भेटीला.
तब्बल तेरा वर्षा नंतर.
मनात तिच्या हजारो विचार होते.
पण ते विचार बाजूला सारून तिला त्याला भेटायच होतं..
त्याला घट्ट मिठी मारून तिच्या सोबत घडलेल अपरिचित सांगयच होतं...
.....
काय होईल कस होईल...?
तो आताही तसाच असेल ना... तो बदलला तर नसेल...?
भेट झाल्यास तो माझ्या सोबत व्यवस्तिथ बोलेन ना..?
त्याच्या मनात तो काम भाव तर नसेल ना..?
आणि शेवटी ति ऑटो मधून उतरून ठरलेल्या  बागे जवळ पोहचली..
....
त्याला कॉल लावता..त्याने प्राजक्ताच्या फुलांच्या झाडा जवळ उभा आहे म्हणून सांगितलं.
तशी तिच्या मनाची धडधड जोरात वाढली.
ति समोर पाच पाऊले चालता तो प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध तिला आला.
आणि ति त्या झाडा जवळ जाता पाहते तर.
त्या ठिकाणी कुणीच नव्हत.
मोबाईल मध्ये पाहत ति त्याला कॉल लावणार तितक्यात मागणं आवाज आला ..
...
"आरती ये आरती..."
आणि ति मागे वाळून पाहते तर.
तो अनिल असतो.
तिच पहिलं प्रेम... ज्याला तिने आपल मानून हृदयाच्या कप्प्यात बंधिस्त केल होतं...
दोघे एकमेकांना न्याहाळत होते...
अनिल ने पाहितल तर ति लाईट पिंक रंगाच्या घेरदार टॉप मध्ये खुपच सुंदर दिसत होती.
तिने कानात घातलेले ते पेन्सिल कलरचे मोठे झुमके...
ओठाची नैसर्गिक गुलाबी रंगता.
आणि डोळ्यातील ते काजळ... अनिल तर तिला पाहतच पाहत राहिला..
ति पण त्याला मनभरून पाहत होती...
त्याचे व्यवस्तिथ जमवलेले केस त्याच्या भुवयी वरचं ते तीळ आणि तिला जांभळा रंग आवडतो हे त्याला माहिती म्हणून जांभळा रंगाच्या त्याने घातलेला शर्ट ति पाहता हसत बोलली.
"मला आता जांभळा रंग आवडत नाही रे..."...आरती.
"का बरं...."... अनिल ने विचारले.
"आता सगळं बदललं आहे ना म्हणून आवडते रंग ही बदलले.."
बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आलेले होतं.
"काय काय बदललं माझ्या साठी तु आज ही माझी आहेस गं..." अनिल भावुक होत बोलता.
आरती त्याच्या निकट जाऊन त्याला घट्ट मिठी मारून रडायला लागली.
"अनिल माझं जीवन नरक झालं रे अनिल..."
आरती उमसत उमसत रडत असताना... अनिल तिला शांत करायला लागला.
....
आपल्या बाहुतून विलग करत बाजूला असणाऱ्या एका लोखंडी बाकड्या तो तिला घेऊन बसला.
...
आरती आरती प्लिज शांत हो ना...अनिल बोलत असताना अचानक आरतीचा फोन वाजायला लागला.
.....
"कैसे मुझे तुम मिल गए..
किस्मत पे आइ ना यकिन..."
....
आरती फोन उचलते.
"हा अहो बोला..."...आरती.
"कुठं आहेस तू मी घरी आलोय आणि पाहतोय तर दरवाजाला लॉक आहे...." सुशील.
"मी जरा माझ्या मैत्रिणी कडें आली आहे.. तुमच्याकडें दुसरी चावी आहे ना..." आरती.
"चावी तर आहे पण मी घाईत आलो... असू देत तू येई पर्यत मी थांबतो... "..सुशील.
"नाही नाही तुम्ही त्या खिडकीच्या बाजूला असणाऱ्या मनी प्लॅन्टच्या कुंडीकडें जा त्या कुंडीच्या आत तुम्हाला चावी दिसेल..." आरती.
आणि सुशील बरं ठीक आहे म्हणत कॉल कट करतो.
.....
फोन बाजूला ठेवता अनिल तिचा हातात हात घेत विचारतो.
आरती तुझ्या सांसारिक जीवनात सगळं ठीक तर आहे ना..?
आणि सांसारिक जीवन हा शब्द ऐकता आरतीचे डोळे पुन्हा पानवतात..
...
नाही अनिल नाही काहीच ठीक नाही...ती भावुक होऊन बोलायला लागते.
"सगळं काही तर तेव्हाच विस्कटल जेव्हा मी आपल्या प्रेमाचं बलिदान देऊन आई बाबा मुळे सुशीलला होकार दिला.
पण सुशील सोबत मी लग्नगाठ बांधता... माझ्या आयुष्याच्या सात जन्माच्या गाठी आता दुःखात जगाव्या लागणार असं वाटत आहे..."
...
काय आरती हे तू काय बोलतेय... अनिल विचारतो.
....
हो मी जे काही बोलतेय खरं बोलतेय अनिल आपल्याला आपल्या प्रेमाच बलिदान फक्त आपला धर्म भिन्न आहे म्हणून द्यावं लागलं... पण समधर्मी जीवनसाथी निवडता आजही मी माझ्या भावनाच बलिदान रोजच देत आहे... अश्रू ढाळीत आरती बोलत असताना.
....
अनिल तिचे अश्रू पुसत बोलतो.
नक्की असं काय घडलं बोल आरती...?
आणि आरती त्याला सांगायला लागते...
....
काय घडलं असणार आरती सोबत...?
जाणून घेण्यासाठी वाचत रहा..
मोगरा फुलला प्रीतीचा
....
© सुनिध सोहमे.

🎭 Series Post

View all