मोगरा फुलला प्रीतीचा भाग 3

कथा आरतीच्या बलीदानाची
मोगरा फुलला प्रीतीचा
_____
त्या दिवशी मि खुपच गरबडीत ऑफिस साठी निघालो होतो..रोज प्रमाणे माझा टॅक्सीने तो प्रवास.. आणि गरीबडी गरीबडी मध्ये मि त्या दिवशी माझा फोन रूमवर विसरलो..टॅक्सी मध्ये बाजूला बसलेला तो अनोळखी व्यक्ती आणि पॅन्टच्या खिश्यात हात घालून चाचपून मोबाईल शोधणारा मि...
...
"अरेच्चा म्हणजे चार्जला लावलेला फोन रुम मध्ये विसरला.." मि स्वतःशीच पुटपुटलो.
तसा तो व्यक्ती मला बोलला..
"जर कुणाला फोन लावायचा असेल तर माझ्या फोन वरून कॉल करू शकता."
....
पण मला मुळात फोन करायचा नव्हता तर टॅक्सी वाल्याला पैसे पे करायचे होते.
पंधरा दिवसा अगोदर माझ चोरीला गेलेलं वॉलेट आणी त्या दिवसा पासून मि सोबत पैसे ठेवणं कुठ तरी बंद केल होतं.
....
तो व्यक्ती माझ्या हातात फोन देत होता... तेव्हा मि त्याला सगळं काही सांगितलं.
त्याने माझे पैसे टॅक्सी वाल्याला पे केले मि त्याच्या फोन वरून माझ्या नंबर वर मिस कॉल दिला.
आणि तितक्यात त्याचा स्टॉप आला.
...
तसा तो दिसायला खूपच हँडसम होता.. त्याचे ते डोळे सरळ नाक.. भरीव बॉडी आणि केसांची हेअर स्टाईल.. मला तर तो एखाद्या मॉडेल सारखा वाटला.
....
आणि त्याच रात्रीं मि त्याला कॉल लावला.
...
तू आज माझी केलेली मदत माझ्या साठी खूप काही आहे.
मि तुला पैसे तर परत करणारच आहे पण मला वाटतं आपण एकदा डिनर साठी भेटावं.... या अनोळखी शहरात मि गेल्या तीन वर्षा पासून एकटा राहत आहे ना कुणी मित्र आहे ना कुणी ओळखीचा.
मि बोलत होतो आणि हे ऐकता तो मला सेम हेअर बोलला.
माझा पण कुणीच मित्र नाहीं...आणि बोलण्या बोलण्यात आम्ही एकमेकांचे नाव विचारणं विसरून गेलो.
ठरल्याप्रमाणे रविवारी आम्ही भेटणार होतो... हॉटेल "जाझमन" ही बँगलोर मधील फाईव्ह स्टार हॉटेल ज्या ठिकाणी मि त्याला बोलवलं होतं.
.....
सायंकाळचे पाच वाजले तसा मला त्याचा मेसेज आला.
ये मि जस्ट हॉटेल बाहेर पोहचलो आहे तू कुठ आहेस...?
आणि मि त्याच्या समोरच उभा होतो.. दोघांनी एकमेकांना पाहता स्मित हास्य केलं.
मि त्याच्या जवळ जात त्याला हात मिळवला.
हाय मि 'अनिल' मि माझ्या नावाचा परिचय दिला.
तसा तो माझा हात जोरात दाबत "हॅलो मि नयन" म्हणत त्याने मला त्याच्या नावाचा परिचय दिला.
...
आणि आरती या भेटी नंतर जे काही घडलं ते खरंच अनअपेक्षित होतं.
मला कधीच वाटलं नव्हतं... मि एक पुरुष असताना एका पुरुषाच्या प्रेमात पडेल.
.....
"काय काय बोलतोय तू अनिल....".. आरती अनिलचे शब्द ऐकता त्याला विचारते.
तुला काय कधी वाटलं नव्हतं...?
...
तसा अनिल तिला सांगायला समोर सांगायला लागतो..
हॉटेल जाझमन मध्ये केलेल्या डिनर नंतर.
आमची ओळख खुपच गहरी झाली.. नयन आणि मि रोज भेटायला लागलो.
नयनला पाहता अचानक माझ्या हृदयाची स्पंदन वाढायला लागली.
त्याचा तो सुंदर मुखडा बघता माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य तरळायला लागलं.
नयनला चॉकलेट खूप आवडायची म्हणून मि प्रत्येक भेटीत त्याला चॉकलेट दयायला लागलो.
...
नयन नेहमी माझ्या रूमवर यायचा पण त्याची रुम त्याने मला आता पर्यत दाखवली नव्हती.
दोन महिन्याच्या ओळखी नंतर आणि खूप साऱ्या भेटी नंतर मि त्याला एका रुम मध्ये राहूया का विचारले.
पण नयनने या साठी नकार दिला.
मि पूर्णतः नयनच्या प्रेमात पडलो होतो पण नयनला मि या विषयी कधिच काही बोललो नाही.
मला त्याचा सहवास हवाहवासा वाटायचा.
तो सुद्धा मि बोलवता माझ्या भेटीला यायचा.
....
तू आयुष्यातुन गेल्या नंतर तूझी भर कोणीतरी काढत आहे असं नयनला भेटून वाटलं होतं.
...
आरती नयनला सुद्धा माझ्यावर प्रेम जडलं होतं हे मला नयनच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी समजलं.
जेव्हा मि त्याला न सांगता त्याचा रूमचा पत्ता काढला होता.
नयन नेमकाच अंघोळी साठी निघाला होता आणि मि दरवाज्याची कडी वाजवली होती.
दरवाजा उघडत नयनने मला रूममध्ये बसायला सांगितलं आणि स्वतः अंघोळीला गेला.
...
नयनच्या रुम मध्ये एका टेबल वर खूप सारी पुस्तके ठेवलेली होती.
मि त्या टेबल जवळ जाऊन ती पुस्तकं पाहायलो लागलो.
त्यातच एक "प्रेम युगल" नावाच शिर्षक असलेलं पुस्तक माझ्या हाती पडलं.
मि ते पुस्तक उघडता पाहितलं तर त्यात त्यात एक पांढरा कागद होता.
आणि त्यावर लाल शाहीने खूप काही लिहिलं होतं.
जे वाचता मि तर खूप आनंदी झालो...!
....
काय लिहिल असणार त्या कागदावर...?
..
© सुनिध सोहमे.

🎭 Series Post

View all