मोगरा फुलला प्रीतीचा भाग 4

कथा आरतीच्या बलीदानाची
मोगरा फुलला प्रीतीचा
______
काय नक्की काय लिहिलं होतं त्या पत्रात...?
आणि हा 'नयन' कोण त्याचा सुशीलशी काय संबंध...? आणि..तुला तो इतका कसा आवडायला लागला की तू त्याच्या प्रेमात पडला...अनिल..सुशील सारखा तू पण....? आरती बोलत असताना.
...
आणि अनिल आरतीच्या ओठांवर बोट ठेवत बोलतो.
"आरती प्लिज काही गैरसमज करून घेऊ नको तेरा वर्षा नंतर आपण सोशीअल मीडिया माध्यमामुळे आज भेटलो आहोत... मला आपल्यात परत दुरावा नको.."
...
आरती ओठा वरच बोट काढत अनीलला बोलते.
"अनिल पुढे काय झालं...मला ऐकायच आहे..?"
...
तसा अनिल सांगतो...
आरती त्या कागदावर नयनने सगळं काही रेखाटल होतं.. जे त्याच्या मनात होतं.. तो सुद्धा माझ्यावर प्रेम करायला लागला होता.. पहिल्या भेटीत तो त्याचा जीव माझ्यात गुंतून गेला होता.
असच काही त्यात लिहिलं होतं...ते पत्र वाचता त्या पुस्तकात ठेवत असताना बाथरूमच्या दरवाज्याची कडी वाजली तसा मि त्या टेबला पासून दूर झालो.
.....
नयन टॉवेल गुंडाळून बाहेर आला आणि बाजूला असणाऱ्या हँगर वरची कपडे अंगावर चढवायला लागला.
मि नकळत त्याला न्याहाळत होतो तसा तो कपडे घालत केस विचरून माझ्या जवळ आला.
....
"निल वाटलंच होतं तू माझ्या रुम पर्यत पोहचशील...लपून माझा पाठलाग करून तू माझा पत्ता शोधलास हे मला आवडलं नाहीं..."...नयन मला रागात बोलला.
...
"सॉरी नयू पण मला समजतं नव्हतं जर आपली मैत्री इतकी घट्ट आहे तर त्यात राहण्याची जागा लपवायचा काय संबंध.."... मि दबक्या आवाजात बोललो.
.....
आपल्यात घट्ट मैत्री आहे..पण आज तू माझ्या पर्यत पोहचून माझा तुझ्या वरचा विश्वास कायमचा जाळलास... मला आज नंतर भेटायचा प्रयत्न करू नकोस..चालता हो इथनं.. सुशील मला जोराच्या आवाजात जेव्हा रागात बोलला.
तसा मि त्याला समजवण्याचा प्रयत्न करू लागलो.. पण सुशील माझी एक ऐकत नव्हता... मि त्याला पुन्हा पुन्हा सॉरी बोललो आणि शेवटी त्याने मला त्याची शपथ देत रुम बाहेर जायला सांगितलं.
....
मि रुम बाहेर जाता त्याने दार जोरात लावून घेतलं.. आणि दुसऱ्या दिवशी माझा नंबर त्याने ब्लॉक केला.
तो सोशियल मीडिया वापरत नाहीं हे त्याने मला अगोदरच सांगितल होतं... म्हणून मि त्यावर त्याचा शोध न घेता थेट त्याची रुम गाठली.
...
पण दुसऱ्या दिवशी मि जाता पाहितलं तर त्या रूमला लॉक होतं.. बाजूच्या शेजाऱ्याला विचारपूस करता मला काहीच माहिती मिळाली नाहीं.
मि रुम मालका कडें जात जेव्हा 'नयन' नाव उच्चारलं तेव्हा त्यांनी नयन नावाचा कुणीही व्यक्ती या ठिकाणी राहत नाहीं म्हणून सांगितलं.
हे ऐकता तर मि परेशान झालो.
मी त्यांना परत परत विचारता रुम मालक मला त्या रुम जवळ घेऊन गेला.
तुम्ही या रुम विषयी विचारताय ना ही रुम काल रात्रीं 11 दरम्यान खाली झाली आहे.. या ठिकाणी 'सुशील नवखरे' नावाचा भाडेकरू राहत होता... बोलत रुम मालक निघून गेला.
.....
म्हणजे मला नयनने त्याच नाव सुद्धा खोट सांगितलं होतं मि स्वतःशीच प्रश्न करायला लागलो.
...
"काय म्हणजे नयन बनून सुशील तुला भेटला आणि..."...आरती विचारत असताना.
...
अनिल बोलतो... हो आरती हा सुशीलच मला नयन म्हणून भेटला...मला प्रेमात पाडून एक चुकी शोधून मला दूर लोटून गेला.
मला त्याच सुशील नवखरे हे नाव जेव्हा कळलं तेव्हा मि सर्वात अगोदर त्याला सोसिअल मीडिया वर शोधलं आणि पाहितलं तर मि त्याची खूप सारी फोटोज् तुझ्या सोबत पाहिली.. मग ते लग्न असो की इतर..
माझ्या सोबत नियती इतका घाणेरडा खेळ कसा खेळू शकते हा प्रश्न मि स्वतःला विचारत होतो.. आरती मि स्वतः तर दुःखी होतो पण तुझ्या विचाराने माझे दुःख अजून वाढल होतं.
मला तुझ्या पर्यत सुशीलचा खरा चेहरा पोहचवायचा होता..पण आपल्यात असणारं अंतर आणि आपला नसलेला कॉन्टॅक्ट या मुळे मि काही करू शकलो नाहीं.
....
हे सर्व ऐकता आरती रडायला लागते.
अनिल मि गेल्या जन्मात नक्की काय पाप केलं असावं की या जन्मात मला हे दुःख झेलावं लागत आहे.
आरती बोलत असताना तिची नजर बाजूला ठेवलेल्या फोन कडे जाते आणि आरती पाहते तर सुशीलला बोलल्या नंतर तो कॉल कट झालेला नव्हता.
आणि आरती फोन हातात घेत स्पीकर वर टाकत बोलते.
"हॅलो हॅलो सुशील" आणि तितक्यात तिला समोरून आवाज येतो.
"आरती आय एम हेअर.. समोर बघ..."... आणि आरती समोर पाहते तर...
....
काय होईल शेवटच्या भागात प्रेमाचा मोगरा नक्की कुणाच्या बाजूने फुलेल..?
....
© सुनिध सोहमे.


🎭 Series Post

View all