मोगरा फुलला प्रीतीचा अंतिम भाग 5

कथा आरतीच्या बलीदानाची
मोगरा फुलला प्रीतीचा
.....
आणि आरती पाहते तर सुशील तिच्या समोर असतो.
"आरती आरती तू एवढं मोठं सत्य माझ्या पासून आज पर्यत लपवत आलीस..?"...सुशील बोलतो.
तशी आरती आणि अनिल त्या बाकड्या वरून उठत सुशीलला पाहायला लागतात.
अनिल समोर येऊन सुशीलचं कॉलर पकडतो आणि बोलतो.
"एका मुली सोबत एवढा मोठा धोका करताना लाज नाहीं वाटली.."...तसा सुशील त्याच कॉलर सोडवत बोलतो.
"लाज या शब्दा विषयी तू बोलतोय जो स्वतःच माझ्या सारखा आहे.. मि आरती पासून कधीच काही लपवलं नाहीं.. लग्नाच्या पहिल्या रात्रीं सगळं काही सांगून मि मोकळा झालो होतो.
त्या नंतरचा तिचा निर्णय मला मान्य होता."
....
तसा अनिल रागात बोलतो...
तुझ्या सारखा म्हणजे मि काय समलिंगी वाटतो तुला...?
...
हो माझ्या सोबत तुझ बोलणं आणि माझ्याशी जिव्हाळा लावणं त्या मागे तुझं समलिंगी मन मि तेव्हाच ओळखल होतं.. पण मि आपल्या नात्यात मर्यादा ठेवली होती.. आणि नातं सुरु होण्या अगोदर संपवून मि तुझ्या पासून दूर झालो.
....
आरती दोघांना शांत व्हायला सांगत असते पण तिच कोण एक ऐकत नाहीं.
....
"तू असशील गे सुशील मि गे नाहीं मि स्ट्रेट आहे.."..अनिल बोलत असतो.
...
तसा सुशील बोलतो... "तू जरी गे नसलास तर तू नक्कीच बाय सेक्स्युअल आहेस...एका पुरुषाला स्त्री आणि पुरुष दोघां विषयी आकर्षण म्हणजे तो व्यक्ती बायसेक्स्युअल असतो.
तू बाय सेक्स्युअल आहेस... ऍक्सेप्ट कर.."
दोघांचे चाललेले वादा वाद आणि आरती जोरात ओरडत त्यांना शांत करते.
....
तशे दोघे शांत होतात..
आज हा प्रसंग अनुभवून खूप दुःख होत आहे..."माझा प्रियकर माझ्या नवऱ्याच्या प्रियकर".... इतकं माझं दुर्दैव्य... मि नक्की का जन्म घेतला..माझं प्रेम मला भिन्न जाती मूळ त्यागावं लागलं आणि माझा नवरा मला लैंगिकते मुळे दूर लोटावा लागला.
'मि अपीशी आहे अपीशी' म्हणत आरती रडत तिथून पळायला लागते.
तसा सुशील तिच्या मागे जातो.
"आरती आरती थांब कुठं जातेय तू..."
आणि दोघांना पळताना पाहता अनिल सुद्धा त्यांच्या मागे पळायला लागतो.
"ये आरती थांब ना.."....म्हणणारा अनिल आणि तसा सुशील मागे वळून पाहतो.
सुशीलचा तो चेहरा पाहता अनिलला तो भूतकाळ आठवतो.
नयन बनून भेटलेला तो सुशील... त्या भेटीतले चॉकलेट... ते पत्र अनिलला सगळं काही आठवता.
अचानक त्याचे डोळे भरून येतात.
.....
आपण त्या दिवशी न सांगता सुशीलच्या रूमवर गेलो नसतो..तर समोर काय झालं असतं.
पत्रात लिहिल्या प्रमाणे सुशीलचा आवडता मोगरा देऊन जर मि त्याच्या समोर प्रेम प्रस्ताव मांडला असता तर...?
अनिलच्या मनात सुशील विषयी चाललेले विचार आणि आरती त्या बागेच्या गेट वर जाऊन ऑटोला हात दाखवत असते...पण एक ऑटो थांबत नसतो.
.....
सुशील आरती जवळ जाता तिचा हात पकडतो आणि बोलतो.
"आरती ये आरती अशी का न सांगता पळत सुटलीस...तुला माहिती आहे ना मि तूझी किती काळजी करतो.."
....
तशी आरती आपल्या भरलेल्या डोळ्याने सुशील कडें पाहते.
"काळजी... प्रेम... या गोष्टी आता तू न बोलल्या तर चांगल आहे "....माझा हात सोड सुशील म्हणत आरती तिचा हात झटकायला लागते.
तसा अनिल येऊन तिचा दुसरा हात पकडतो.
"आरती सॉरी आय एम सॉरी.. मि येऊन तुमच्या दोघात फूट पाडली तुमचा चालणारा संसार माझ्या मुळे गैरसमजाच्या खाईत आला."
अनिलचे शब्द आरतीच्या कानी पडता... तिच्या डोळून टप टप अश्रू गळायला लागतात.
दोघांचे हात झटकत आरती रस्ता ओलांडून समोर जाते.
.....
तशे दोघे आरतीच्या मागे मागे जायला लागतात.
आरती समोर असणाऱ्या फुलांच्या स्टॉल वर जाऊन एक मोगऱ्याचा गजरा खरेदी करते.
आणी मागे आलेल्या अनिल सुशीलला पाहत तो गजरा अनिलच्या हातात देते.
...
सुशील तू म्हणलास ना मि तुझ्या पासून अनिल विषयी लपवलं.. तर तू सुद्धा बंगलोर मध्ये जे काही झालं होतं ते माझ्या पासून लपवलं.
लग्नाच्या एक वर्षा नंतर जेव्हा तू मला सोडून बंगलोरला गेला होतास आणि जेव्हा अचानक परतलास तेव्हा मि तुझ्या त्या प्रेम युगल पुस्तकात ते पत्र वाचलं होतं.
अनिल हे नाव वाचता मला माझ्या अनिलची आठवण झाली होती पण तुझा अनिल माझा झाला असेल ही गोष्ट माझ्या डोक्या बाहेरची होती.
....
लग्ना नंतर मि माझी शारीरिक गरज तुझ्या सारख्या समलिंगी व्यक्ती कडून कशी जबरदस्ती भागवली हे मलाच ठाऊक आहे.
माझे प्रत्येक स्वप्न मि तुझ्या सोबत राहताना फक्त आणि फक्त तोडून जगले आहे.
माहिती नाहीं पण आई वडिलांना सुद्धा स्वतःच्या पोटच्या गोळ्या पेक्षा या समाजाची इतकी का पर्वा आहे.
आज माझ्या सारख्या किती मुली कित्येक सुशीलला सोबत घेऊन जगत असताल.
त्यांच्या भावनांच्या बळ्या आई,बाबा आणि समाजा साठी देत असताल.
माझ्या नियतीने माझ्या सोबत जे काही घडवलं ते कदाचित शास्वत असावं.
पण आता तुम्हा दोघांची नियती मि लिहिणार आहे.
.....
"पत्रात लिहिल्या प्रमाणे सुशील तुला मोगऱ्याचा गजरा हातात देऊन प्रेम प्रस्ताव हवा होता ना..?
अनिल अनिल हा पकड मोगऱ्याचा गजरा आणि आज सुशीलची इच्छा पूर्ण कर.
तुमच्या दोघांच्या प्रीतीचा मोगरा आज मला फुलताना पाहायचा आहे.
कारण आज जे काही मि ऐकलं आहे त्या नंतर ना मि सुशील सोबत प्राजक्ताच्या फुलांची सांसारिक बाग फुलवू शकेल.
ना अनिल तुझ्या सोबत प्रेमाच्या गुलाबाच्या बागेत चालू शकेल."
बोलत आरती तो मोगऱ्याचा गजरा अनिलच्या हातात देत तिथून निघून जायला लागते.
आरतीने समोर चाललेले चार पाऊले आणि सुशील आरती मागे आपले पाऊल वळवणार तसा अनिल सुशीलचा हात पकडतो.
...
"सुशी आता ती ऐकणार नाहीं... तिला प्रेमात आणि लग्नात दोन्ही मध्ये दुरावा भेटला आहे.. ती अगोदर माझ्या प्रेमाच्या विरहात दिवस काढत जगली आणि नंतर लग्नाच्या पिंजऱ्यात तिने स्वतःला बंद करून आपल्या भावनाची बळी दिली.. आता गरज आहे तिला तो पिंजरा तोडून एकटं जगण्याची आपल्या दोघां कडून तिला दुःख मिळालं आहे.. कदाचित नियतीच्या मनात सुद्धा हेच असावं..."..म्हणत अनिल तो मोगराच्या गजरा सुशीलच्या हातात देतो.
तसा सुशील अनीलला घट्ट मिठी मारून रडायला लागतो.
सुशीलचे अश्रूने भरलेले डोळे आणि त्याची नजर अचानक आरती चालत गेलेल्या रस्त्या कडें जाते.. आणि सुशील पाहतो तर आरती रस्त्याच्या मधोमत चालत असते आणि एक लॉरी "पि पि" आवाज करत शेवटी तिला धडकून जाते.
....
... समाप्त...
...
© सुनिध सोहमे.


🎭 Series Post

View all