मोगरा फुलला प्रीतीचा सिक्वल

मोगरा फुलला कथेशी संबंधित..
वसंतात वाळलेल्या मोगऱ्याला..
मि पाणी घालून वाढवले..
त्याच्या हिरवळीने अनेकांचे लक्ष वेधले..
....
मोगऱ्याला मात्र मि जिवा पाड जपले..
रोज त्याची काळजी अपत्या सारखी घेऊनी..
त्याला लहानाचे मोठे केले..
...
मोगरा बहरायला लागला त्याच्या सुगंधाने..
आजू बाजूच्यांना जवळ येण्यास भाग पाडले..
त्याच्या जवळ असणारी गर्दी..
मला नेहमीच नकोशी वाटायची...
....
पण मानवी नजरेने त्याला नजर लावली..
नुकतीच उमलणारी फुले कित्यकाने..
तोडून नेऊनी दोऱ्यात ओवली...
.....
कुणी मोगऱ्याचा गजरा वेनीला लावून मिरवला...
तर कुणी देवाच्या पायी ती शुभ्र फुले वाहिली...
.....
आणि तो दिवस आला..
जेव्हा मला गजरा लावण्याची हौस जडली..
....
मात्र त्याच दिवशी...
माझ्या पती आणि प्रियकराची..
ती प्रेम कथा ऐकता...
माझी मोगऱ्याशी कायमची तूट झाली...
....
मि त्या दोघांना स्वातंत्र्य दिलं..
फुला पासून सुगंध दुरावणं मला नकोस होतं..
....
त्या नंतर मला मोगरा नकोसा झाला..
मि त्याला पाणी घालणे सोडले..
त्याला बघणे मला नकोसे वाटले....
....
आता काही दिवसांनी हा मोगरा वाळून जाईल..
हा विचार माझ्या मनात भिरभिरला..
पण तसे झाले नाही..
त्या दोघांनी त्या मोगऱ्याच्या झाडाच्या फांदया घेऊनी..
एक शेती तयार केली...
....
मि लावलेला मोगरा काही दिवसांनी जळून गेला..
आणि त्यांची मोगऱ्याची प्रीत बहरली...
.....
(आरतीच्या भावनेतून...)
...
.
© सुनिध सोहमे