Login

मोगरा

देवाची निर्मिती
आमच्या घरा जवळच्या ..

चर्च मंदिराच्या कॅम्पस मधला..

मोगरा...!!

सुंदर बहरलाय..

वरून रापत्या उन्हाचा..

चटकवनारा मारा सोसवतही..

शांत..फ्रेश..सुगंध..दरवळतोय..

त्या छोट्याश्या रोपट्याच्या ..

जवळ्पासहूनही जाताना..

आपोआपच मान ..

वर आकाशाकडे उंचावते..

देवाची विलोभनीय निर्मिती...!!

मनाला तजेला देणारा...

मंत्रमुग्ध करणारा ..

सुवासिक दरवळ ..!

आपोआपच नम्रतेने मान खाली झुकवतो....

अंतरंगाने अंतर्मुखातच ..नमन केल्याचा भास होतो..!

"आहेस कुठं रे तू अहंकारी मानवा...?"

भर उन्हातही या कणखर भूमीवर चांदणे चमकवण्याची किमया आहे का रे तुझ्यात...??
@Sush**