Login

मोह मोह के धागे भाग 30

Story Of Love
मोह मोह के धागे भाग ३०
क्रमश : भाग २९
अजय " मीरा , नक्की कुणीकडे झोपायचंय ? मला खूप झोप आलीय .. सकाळी लवकर मिटिंग आहे माझी .. इकडे झोपायचंय का ? बोलतच तिला ओढतच तिच्या बेडवर तिला घट्ट कुशीत घेऊन डोळे मिटून गाढ झोपून गेला
मीरा हळूच " काय आणि कसे वागू तेच कळत नाही मला "
अजय डोळे मिटून " मला पण तसेच होतंय ? तुला राग आला असेल तर सॉरी ?"
मीरा " अजय , प्लिज पुन्हा असे म्हणू नका कि मी नसले तरी चालेल .. मला खूप वाईट वाटले मघाशी"
अजय " पुन्हा तू माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस .. मला पण खूप वाईट वाटले होते सकाळी "
मीरा " सॉरी चुकलंच माझे"
अजय "सॉरी माझे पण चुकलं .. मी तुला गिफ्ट पण नाही दिले तू एवढं छान जेवण बनवलंस तरी "
मीरा " तुम्ही आज खूपच वाईट वागले माझ्याशी .. पुन्हा असे नका करू "
अजय " मीरा .. माझी चीड चीड होतेय .. मला तू हवीय पण मला तू भेटत नाहीये असे होतंय "
मीरा " अजय , मला पण तुम्ही हवे आहेत .. तुम्ही का नाही माझ्यावर हक्क दाखवत आहे ? का मला असे छळतायं ?"म्हणतच ती त्या अर्थाने त्याच्या जवळ जाऊ लागली आणि चक्क तो तिला दूर करत होता .. शेवटी नाईलाजाने तो बेड वरून उठला आणि त्याच्या रूम मध्ये जायला निघाला ..
तर मीराने पाठीमागून त्याला मिठीत घेतले
मीरा " अजय , नक्की काय चुकलंय माझे ? का मला असे दूर करताय "
अजय तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत " मीरा , मी थकलोय .. चल झोपूया .. मला उद्या सकाळी मिटिंग आहे लवकर "
मीरा " नाही .. प्लिज अजय , लांब नका जाऊ .. मला निदान तुमच्या कुशीत झोपण्याचा अधिकार तरी द्या .. आता तुम्ही वर आणि मी खाली असे नको "
अजय " तसे नाहीच करायचंय आपल्याला .. चल आपण वरती आपल्या बेडरूम मध्ये जाऊ "
मीरा " अजय , माझ्याकडून काही चुकलंय का ? सॉरी .. मी जाणून बुजून नाही तुम्हांला इग्नोर केलं "
अजय "मीरा , माझा पाय खूप दुखतोय .. मला उभे नाही राहवत आहे .. तू नसली येत तर मी जाऊ का ?" आणि तो रूमच्या बाहेर जाऊ लागला
तर मीरा हळूच गाणे गाऊ लागली
" बाहो में चले आ .. ओ .. हमसे सनम क्या परदा ओ .. हमसे सनम क्या परदा "
तसा तो गालात हसायला लागला
मीरा पटकन पुढे गेली आणि त्याचे गाल चिमटीत पकडले " असे हसता तेव्हा किती छान दिसता "
अजय अजून थोडासा हसला
मीराने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात घातले
मीरा " अजय , मी समजू शकते .. हे सगळे तुमच्या आयुष्यात एकदा होऊन गेलंय .कदाचित ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हांला तुमच्या पहिल्या पत्नीची जास्त आठवण येत असेल .. मला फक्त एवढंच सांगायचंय .. मला कसलीही घाई नाहीये .. मला फक्त तुम्ही खुश हवे आहात .. कालपासून तुम्ही अस्वथ वाटत आहेत .. रियाची आई म्हणून तुम्ही मला स्विकारलेत मला इतका आनंद होतोय कि मी शब्दांत सांगू शकत नाही .. माझ्यावर प्रेम तर तुम्ही नक्की करता यावर काही दुमत नाही फक्त कदाचित तुमच्या पहिल्या पत्नीची जागा मला द्यायला तुम्हांला नको वाटत असेल तर .. "
अजयने तिच्या खांद्यावर हात ठेवले " मीरा .. "
मीरा " हमम .. " त्याच्या डोळयांत आर पार बघत
हा विषयच मुळात इतका क्लिष्ट होता .. आणि तो आता लगेच थांबवा म्हणून
अजय " मीरा .. तू मला सिड्यूस करतेय का ?" आणि गालातच हसला
मीरा लाजतच .. " हो .. आता नवऱ्याला नाही तर मग कोणाला करू ?"
अजय " आवडले मला हा .." म्हणतच तिला दोन्ही हातांनी तिला उचलले.
मीरा त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकून त्याच्यकडेचं बघत होती
इकडे त्याच्या पायात भयानक कळा येत होत्या पण बायकोच्या नाना कला बघून भुलला होता तो
तिला तिच्याच बेडवर टाकून तिच्या शेजारी आडवा पडला तो
अजय " हा बोल .. काय म्हणणं आहे माझ्या बायकोचं ?"
मीरा काहीच बोलत नाही
मीरा मनात " डोंबल माझे .. किती ते वेड घेऊन पेड गावला जायचे एखाद्याने .. जसे काही यांना काही करायचेच नाही .. सगळे मलाच पाहिजे "
अजय " बोल ना आता .. आय एम ऑल युअर्स "
मीरा हसतच " ते .. ते .. तुमचं काय ते करार आणि त्याचे काय ते फायनल सेटलमेंट वगैरे असले काही नाही का ?" आणि पटकन तिने स्वतःच्या हाताने स्वतःचे डोळे झाकले
अजय मागे बेडवर आडवा पडला आणि जोर जोरात हसू लागला " ओह माय गॉड .. यु आर इम्पॉसिबल मीरा "
मीरा अजूनही तोंडावर हात ठेवून हसत होती
अजयने पडल्या पडल्याचं तिला कुशीत घेतले " थिंग्स आर सो मच इझी विथ यु माय डार्लिंग "
मीरा पण त्याच्या छातीवर डोके ठेवून शांत पडली
अजय " कसे सुचतं ग तुला हे सगळे ?"
मीरा " ह्या तुमच्या नाकावर जो राग आला होता ना तो काढायचा कसा यावर विचार केला तेव्हा सुचलं "
अजय " जोक्स अपार्ट .. आपण हनिमूनला कुणीकडे जायचं ?
मीरा " हनिमूनला बाहेर का जातात माहितेय का ?"
अजय " आय गेस ..टु स्पेंड टाईम टुगेदर "
मीरा " मग आता पण आपण टुगेदरच आहोत कि "
अजय पुन्हा हसला " अरे .. तू बिझनेस टायकून अजय सरपोतदारची बायको आहेस . आणि हे अजय सरपोतदारचे हनिमून आहे ते स्पेशल असले पाहिजे असे वाटत नाही का तुला ?"
मीरा " ओह रिअली .. असेही असत का ? मला माहित नव्हतं "
अजय " तुला काय मी कंजूष नवरा वाटलो का ?"
मीरा " नाही .. कंजूष नाही ओ .. पण वेळ का लावताय तेच कळत नाहीये मला "
खरंतर अजयचे हनिमून पहिलेच होते पण मीरा पास्ट विसरल्यामुळे तिच्या मानसिक दृष्ट्या तिचे पण पहिलेच होते ..
अजय " मीरा .. आपण ना जेव्हा दुसऱ्याला सल्ला देतो ना तेव्हा ती गोष्ट आपल्याला इझी वाटते .. पण जेव्हा स्वतःवर येते ना तेव्हा ती शिव धनुष्या सारखी असते "
मीरा " म्हणजे ? काही समजत नाही कशा संदर्भात बोलताय ?"
अजय " अग म्हणजे हेच ते कि माझ्या पहिल्या पत्नीची जागा मला तुला द्यायला वेळ लागतोय वगैरे .. मला सांग जर तुझे हे दुसरे लग्न असते तर तू देऊ शकली असतीस मला तुझ्या पहिल्या नवऱ्याची जागा ??"
मीरा " शट अप अजय ? काहीही बोलताय ? शी .. हा कसला प्रश्न ? " आणि फणकाऱ्याने बाजूला झाली
अजय " मीरा .. माझ्यासाठी या प्रश्नाचे उत्तर महत्वाचे आहे "
मीरा " अजय .. काय फालतूपणा लावलाय तुम्ही .. नका देऊ मला तुमच्या बायकोची जागा .. तुम्ही जाऊ शकता तुमच्या रूम मध्ये " ती पाठ फिरवून बोलली
अजय " मीरा .. मला उत्तर हवंय "
मीरा " मी कशाला दुसरे लग्न करेन ?"
अजय " अग .. म्हणजे .. जसे आता मी केले तशीच परिस्थिती तुझी असती तर "
मीरा " अजय .. जळलं .. दळभद्री लक्षण .. आपले लग्न होऊन दोन दिवस झाले नाहीत तर माझ्या दुसऱ्या लग्नाचा विचार करताय शी .. अजय .. मला खूप राग येतोय तुमचा .. प्लिज थांबवा हे सगळे "
अजय " बावळट ... मी तुला फक्त माझ्या परिस्थितीचा विचार करायला सांगतोय "
मीरा " नाही करायचाय मला हा असला विचार .. डोळे वाहू लागले तिचे
अजय " प्लिज ना मीरा , रडतेस का लगेच ? तू ना मला समजून घेत नाहीयेस "
मीरा " अजय तुम्ही मला समजत नाहीये .. माझे प्रेम आहे तुमच्यावर .. आणि आता ह्याच जन्मात नाही तर मी पुढील सगळे जन्म मला फक्त तुमचाच विचार करायचाय "
अजय डोक्याला हात लावून बसला .. नक्की कोण चुकतंय .. मी का ती ? मी मूर्ख आहे का ? का तिला त्रास देतोय मी .. "
अजय " सॉरी मीरा .. कदाचित मीच चुकीचे वागतोय .. सॉरी " कान पकडून तो उभा राहिला
मीराला मात्र आता रडू कोसळले .. दोन्ही हात स्वतःच्या हातात लपवून ती रडू लागली
अजय " सॉरी ना मीरा .. बघ आता ना मी उठा बशा काढू का ?"
मीरा " अजय , तुम्ही झोपा जाऊन .. खूप दमला आहेत तुम्ही .. पायही दुखत आहे ना " डोळे पुसतच
अजय " मीरा , खरंच मी आता माझ्या रूम मध्ये जाऊ नाही शकणार ?"
मीरा " का ?"
अजय " पाय बघ माझा "
तिने खाली पायांकडे बघितले तर खूप सुजला होता
मीरा " काय अजय .. मी सांगत होते ड्राइवर घ्या बरोबर .. पण ऐकत नाही तुम्ही .. " बोलतच तिने त्याला बेड वर बसलवले .. पायाची सूज बघितली लगेच तेल घेतले आणि त्याच्या पायाला तेल लावू लागली
अजय पण जरा बरं वाटलं तसाच मागे आडवा पडला ..
मीरा" झोपा आता .. " त्याला झोपवून त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला
अजय " तू पण ये ना .. " त्याच्या शेजारी आडवी पडली
अजय " सॉरी , मी .. " तो पुढे काहीतरी बोलणार होता तर तिने आता त्याच्या तोंडावर हात ठेवला
मीरा " आता झोपा .. काहीच विचार करू नका "
अजयने तिला एका हाताने जवळ घेतले आणि कपाळावर ओठ ठेवले
अजय मनातच " वन डे यु विल अंडरस्टॅंड कि मी हे सगळे का विचार करतोय "
मीरा मनातच " नक्कीच काहीतरी आहे जे तुम्हांला माझ्या जवळ येऊ देत नाहीये .. अजय , मी वाट बघेन तुमची "
अजय मनातच " तुला माहित नाहीये मी कसा स्वतःला तुझ्या पासून लांब ठेवतोय .. पण एक सत्य जे तू विसरली आहेस ते तुला आठवले कि त्याच्या परिणाम आपल्या या नात्यावर होण्याची शक्यता आहे .म्हणून तुला हे सांगून टाकावे म्हणून आत्मा तडफडतोय माझा.. कसे सांगू ग राणी तुला ? तू तर विचारही करायला तयार नाहीयेस "
मीरा " अजय , रियाची काळजी वाटते का तुम्हांला ? म्हणजे मी तिच्याकडे दुर्लक्ष करेन वगैरे असे काहीसे वाटतंय का ?.. विश्वास ... " ठेवा
असे ती बोलणार होती तर अजयने तिच्या भरून आलेल्या डोळ्यातले पाणी ओठांनी टिपले ..


नमस्कार वाचकहो !

कसे आहेत सगळे ? हात जोडून माफी मागते .. खूप उशिरा भाग पोस्ट करतेय मलाच लाज वाटतेय .. माझे बोट कापले होते आणि स्टीचेस होते हाताला .. लिहिणे शक्यच नव्हते .. सॉरी ..

ओव्हर ऑल स्टोरी कशी वाटतेय नक्की सांगा .. लवकरच तिला सत्य समजेल .. आणि मग उत्तरार्ध ककरायचा विचार आहे .. डोक्यात खूप छान विचार असतात पण लॅपटॉप ओपन करायला वेळ आणि संधी दोन्ही मिळत नाहीये .. बोट आता ठीक आहे म्हणून आज जागरण करतेय ..असो रडगाणे गायला मला पण आवडत नाहीये .. पण तुम्ही मला समजून घ्याल अशी अपेक्षा


शीतल माने
0

🎭 Series Post

View all