Login

मोह मोह के धागे 32

Story Of Love


मोह मोह के धागे भाग ३२
क्रमश : भाग ३१

मीरा किचन मध्ये सूप करत होती रियासाठी .. मोबाईल वाजला हे पाहून सुद्धा तिने नाक मुरडून कॉल घेतला नव्हता .
अजयने लगेच माईंच्या मोबाईलवर कॉल लावला
मीरा " माई, ह्यांचा असेल तर मी घरी नाहीये सांगा "
माई " का ?"
मीरा " असेच " ती नजर चुकवत बोलली
माई हसतच " काय रुसल्याव कि काय दादांवर ?"
मीरा " नाही हो माई , मला आत्ता बोलावं नाही वाटतं आहे "
माई " बरं " फोन उंचलत बोलल्या
माई " हॅलो दादा .. पोहचले का तुम्ही ?"
माई " हो .. रिया गेलीय स्कुलला येईल इतक्यात "
मीरा अजूनच रागात " अजूनही फक्त रियाचं . माझी साधी चौकशी पण नाही केली " धुसपूस वाढली
माई " नाही त्या घरात नाहीयेत ?....मला माहित नाही "
त्याने आता आपली चौकशी केली हे कळताच कान टवकारले तिचे
माई " हो ठीक आहे .. चालेल "आणि माईंनी फोन ठेवून दिला
मीरा " काय बोलले ते ?"
माई " काही नाही .. ते रियाची चौकशी करत होते .. बाकी काही नाही "
मीरा " माझ्या साठी काय बोलले ?"
माई " काहीच नाही .. मी म्हटले त्या बाहेर गेल्यात तर म्हटले कि ठीक आहे "
मीरा " मला फोन करायला सांगितलं आहे का ? किंवा काही निरोप ?" एकदम अस्वथपणे तिने विचारले आणि माई गालात हसल्या
मीरा " माई हसू नका ना .. सांगा ना "
माई " अहो ताई , तुम्ही दादांच्या म्हणजे आता तुमच्या रूम मध्ये गेला नाहीत का ? असे विचारत होते ?"
मीरा " मग तुम्ही काय सांगितलेत ?"
माई " म्हटले मला माहित नाही ?"
मीरा गॅस बंद करून धावतच अजयच्या रूम मध्ये गेली .. आणि माई गालातच हसल्या
मीराने रूमचे निरीक्षण केले तर काहीच नव्हतं .. मग का असे विचारले असेल तेवढयात अजयचा पुन्हा कॉल आला आणि यावेळी तिने पटकन उचलला
अजय " हॅलो .."
मीरा " हमम.. "
अजय " चिडलीस का माझ्यावर ?"
मीरा " हमम .. "
अजय " तुला सांगून आलो नाही म्हणून "
मीरा " हमम .. "
अजय "बेड साईडचा ड्रॉवर ओपन कर"
मीराने लगेच ड्रॉवर ओपन केला त्यात एक लिफाफा होता
अजय " मी घरात नाहीये हे बघायला सुद्धा तू आपल्या रूम मध्ये आली नाहीस ?"
मीरा " तुम्ही नसताना कशी येऊ तुमच्या रूम मध्ये ?"
अजय "का? हि तुझी रूम नाहीये का ?"
मीरा " मला वाचायचयं काय लिहिले आहे ते .. मी पुन्हा फोन करू का ?"
अजय " माझ्यावरचा राग गेला का ?"
मीरा " हमम .. "
अजय " ठीक आहे बाय "
मीरा " सॉरी .. उगाच चिडले तुमच्यावर "
अजय " मीरा , जेवढ्या हक्काने तू रियाच्या रूम मध्ये जाऊन तिची चिट वाचलीस तेवढ्याच हक्काने हि वाच "
मीरा "अजय .. कधी याल ?"
अजय " लवकरच " आणि फोन ठेऊन दिला त्याने
लगोलग त्याने नीरजला फोन लावला .. ऑफिसच्या कामाचे बोलून झाल्यावर
अजय " नीरज, मीराच्या पासपोर्टच काम झालेय का ? एकदा जरा तू फॉलो अप घेशील का प्लिज ?"
नीरज " ओह हो , क्या बात हें !! हनिमून ट्रिप कधी होतेय असे झालेलं दिसतंय ?"
अजय " बुक तिकिट्स फॉर पॅरिस .. आम्ही तिघे पॅरिसला जाऊ "
नीरज " अरे येड्या .. रियाला माझ्याकडे सोड थोडे दिवस .. तुम्ही दोघे जा "
अजय " नो वे .. रिया विल बी विथ असं ओन्ली "
नीरज "मग कसला हनिमून .. मीरा वैतागणार आहे तुला एकदा "
अजय " रिअली !! यु थिंक सो "
नीरज " मग काय ? काहीतरी कर बायको साठी .. सेंड हर फ्लॉवर्स , गिफ्ट्स जरा पॅम्पर कर "
अजय " आय डोन्ट थिंक मीरा नीड्स पॅम्परिंग "
नीरज " एव्हरीवन नीड्स पॅम्परिंग .. इव्हन यु अँड मी अल्सो "
अजय " ओके आय विल थिंक "
नीरज " ओके .. टेक युअर टाईम "
--------------------
मीराने अधाशासारखे ते लेटर ओपन केले
“माय डिअर लवली वाईफ,
धस्स !! झाले तिला पहिलीच ओळ वाचून
दोन दिवस आऊट ऑफ कंट्री जातोय .. तुझी आणि माझ्या लेकीची काळजी घे .. सॉरी अचानक जाणे झाले म्हणून समोरून सांगतले नाही ..आय विल मिस यु .. कीप स्माइलींग ..
अजय
सिम्पल शब्दात त्याने प्रेम काळजी व्यक्त केली होती
मीराने कितीदा वाचले तरी मन भरतच नव्हते .. आपोआप तिचे ओठ त्या चिट वर लागले
तेवढयात मीराला कोणाचा तरी फोन आला ..
मीरा " पण का ? कशाला ? नको ना ?"
समोरून कोणीतरी " मीरा .. आता तू माझं पण ऐकणार नाहीस का ?"
मीरा " तसे नाही .. पण .. त्यांना त्रास द्यायला नको वाटत मला "
समोरून " मला माहित नाही .. मी गाडी पाठवतोय आणि मी सांगतो तसेच झाले पाहिजे ?"
मीरा " हे चिडतील माझ्यावर खूप .. मला असे घर सोडून बाहेर जायला परमिशन नाहीये "
समोरून " आय डोन्ट नो एनीथिंग .. सगळे तुझ्या फायद्याचेच आहे ? "
मीरा " बर ठीक आहे " नाराजीतच बोलली
मीरा खाली आली
मीरा माईंना " माई , मी आणि रिया दोन दिवस बाहेर जाणार आहोत तर तुम्ही सुट्टी घ्या "
माई " कुणीकडे जाताय ?"
मीरा " आहे जरा काम आहे "
माई " मागच्यावेळी खूप प्रॉब्लेम झाला होता ताई , तुम्ही अजून साध्या आहेत .. कोणावर बी विश्वास ठेवता .. दादा आले कि त्यांना घेऊन जावा .. माझे ऐका "
मीरा नजर चुकवत " माई दुपारी जेवून झाले कि आम्ही निघू .. तुम्ही पण निघा " बोलतच मीरा तिच्या रूम मध्ये गेली
माईचा नाईलाज झाला शेवटी आता ती तिची मालकीण होती आणि तिचे ऐकण्या शिवाय माईंना पर्याय नव्हता
रिया स्कुल मधून आल्यावर मीरा , रिया एका स्पेशल आलेल्या गाडीत बसून कुणीकडे तरी गेल्या .. तेही अजयला न विचारता .
माईंना काही फारसे पटले नव्हते पण अजयला मीराची कम्प्लेंट करणे हि त्यांना योग्य वाटे ना "
इकडे मीराच काय चालले आहे ह्याची जराही कल्पना नसलेला अजय तिच्यासाठी हिऱ्याचे दागिने चॉईस करत होता .. गेल्यावर तिला आपल्या मनातल्या सगळ्या भावना, प्रेम व्यक्त करायचं आणि लवकरच आपली नॉर्मल मॅरीड लाईफ सुरु करायची अश्या काहीश्या विचारात होता तो .. म्हणूनच तिला पॅम्परिंग करण्यासाठी त्याने तिच्यासाठी डायमंड जुलरी पर्चेस केली .
कधी एकदा तिला मिठीत घेतो .. आणि तिच्या मिठीत माझ्या अस्वथ झालेल्या मनाला शांत करतो असे काहीसे त्याला होत होते
कसे बसे त्याचे काम उरकून अजय रात्रीतच भारतात यायला निघाला ..
सकाळ सकाळी मीराचे दर्शन होईल ह्या उत्सुकतेने त्याला फ्लाईट मध्ये पण चैन पडला नव्हता .. इतक्या अधीरतेने तो घरी आला.. दारा समोर उभा राहून बेल वाजवू लागला ..
बराच वेळ बेल वाजल्यावर त्याने नाईलाजाने त्याच्या जवळच्या चावीने दार उघडले .. धावतच मीराच्या रूममध्ये डोकावले तिथे कोणी नव्हते .. जिन्याने पळत वरती गेला .. रियाच्या रूम मध्ये नक्की दोघी माझ्या प्रिन्सेस झोपल्या असतील अशा विचारात गेला पण तिथेही कुणी नाही म्हटल्यावर जरा धस्स झाले त्याला.
कदाचित माझ्या आठवणीत दोघी बेडरूम मध्ये असतील म्हणून पटकन तिकडे गेला .. बेडवर कोणी नाही म्हटल्यावर जरासा घाम फुटला त्याला.. त्याने जोरात आवाज दिला .
माई ....
पण माईंच्या रूम मधूनही रिस्पॉन्स आला नाही आणि त्याचा घसा भीतीने सुकला .. कारण मागच्या वेळी तो गेला होता तेव्हाही ती अशीच माहेरी गेली होती. आणि पुढचं सगळे आठवून भीतीने शहारा आला.

(मीराला कोणाचा फोन आला असेल ? काय वाटतं .. कमेंट मध्ये नक्की सांगा)
0

🎭 Series Post

View all