Login

मोह मोह के धागे भाग 33

Story Of Love


मोह मोह के धागे भाग ३३
क्रमश : भाग ३२
अजय " ओह मीरा .. व्हाय डोन्ट यु अंडरस्टॅंड व्हाय यु आर डुईंग सेम मिस्टेक्स .. मला न सांगता का परस्पर निर्णय घेतेस ? "
त्याने सिक्युरिटीला धारेवर धरले .. ती किती वाजता गेली , कोणा बरोबर गेली , कशी गेली ? एक काळी कार त्या व्यतिरिक्त काही खास माहिती मिळे ना ..
मीराचा फोन रिंग होता तरी कॉल घेत नव्हती ..
डोक्यावर हात ठेवून विचार करू लागला तेवढयात त्याला बेड जवळ एक कागद दिसला आणि त्यावर पेन ठेवले होते
त्याने पटकन जाऊन ते चेक केले तर ती तिची चिठ्ठी होती
अहो,
मला माहितेय मी इथे नाहीये म्हणून खूप चिडाल तुम्ही .. सॉरी ..मला घ्यायला नक्की या मी वाट बघेन .. मी माझ्या हक्काच्या माहेरी जातेय .. तुम्ही नक्की या "
अजयने तो मेसेज रीड केला आणि जोरात ओरडला " यु बास्टर्ड .. आय एम गोइंग टू किल यु फॉर धिस "
सकाळ सकाळी त्याने कमिशनरला कॉल केला आणि मीराच्या भावाला बेल वगैरे तर नाही मिळाली हे चेक केले तर तसे काही झाले नव्हते.. मग आता कोण? त्याचे डोके काहीच चाले ना "
लगेच त्याने नीरजला फोन लावला.
नीरज एवढया सकाळी कोण अश्या भावाने त्रासिक चेहऱ्याने मोबाईल बघत होता पण समोर अजयचा मोबाईल बघितल्यावर खाडकन उभा राहिला
नीरज " हा अजय ? कधी येणार आहेस इकडे ? झाले का काम ?"
अजय " आय एम बॅक "
नीरज " कधी ?"
अजय " आताच ? "
नीरज " गुड .. टेक रेस्ट .. ऑफिसमध्ये भेटू "
अजय "जस्ट सेंड मीरा आणि रिया .. आय वॉन्ट देम इन हाफ अन अवर बॅक "
नीरज " व्हॉट राबिश ?"
अजय " हे बघ नीरज , हे फक्त तूच करू शकतोस .. बाकी कोणाच्या बापात एवढी हिम्मत नाही .. एवढ्या टाईट सिक्युरिटीला चुना लावायची .. सो प्लिज सेंड हर "
नीरज " तू ये इकडे माझ्याकडे .. आपण बसून बोलू "
अजय " ओके .. गिव्ह मी टेन मिनिट्स .. शॉवर घेतो आणि येतो "
नीरज " ठीक आहे "
अजय " आणि एक डोन्ट टेल देम .. आय विल गिव्ह सरप्राईझ अँड यु आर गोइंग टू पे फॉर इट "
नीरजने कपाळावरचा घाम पुसला
------
इकडे नीरजची बायको सोनिया रिया आणि मीरा ला घेऊन ट्रिप ला गेली होती .. ती उद्या येणार होती .. पण अजय एक दिवस लवकर आल्यामुळे गडबड झाली .. जर मीरा त्याला दिसली नाही तर तो मला नक्की खाऊन टाकेल या भीतीने नीराजला घाम फुटला
नीरज ने सोनियाला कॉल केला
सोनिया " काय रे नीरज ? आय एम ऑन व्हेकेशन . इतक्या लवकर का कॉल केलास ? झोपू द्यायचं ना "
नीरज " अरे .. तुम्ही कधी येताय ? अजय आलाय .. तो मारून टाकेल मला .. मीरा आणि रिया त्याला नाही भेटली तर "
सोनिया " अरे नाही रे .. आता तू आमची ट्रिप खराब करतोय "
नीरज " तो अजय लाईफ खराब करेल ?"
सोनिया " तू ना काही कामाचा नाहीस .. मीच बोलते आता अजयशी " बोलतच तिने फोन कट केला
इकडे सोनियाने मीराचा शॉर्ट ड्रेस घातलेला फोटो अजयला पाठवला
सोनिया " हाय अजय , मीरा इज एन्जॉयजिंग ट्रिप विथ मी .. आम्ही उद्या रात्री येऊ .. तर प्लिज घाईने बोलवू नकोस .. रिया पण शंतनू (नीरजचा मुलगा ) बरोबर खूप एन्जॉय करतेय .. ओके .. डोन्ट प्रेशराइज्ड हर "
अजय पटकन आवरून बाहेर आला तर मीराचा शॉर्ट ड्रेस मधला फोटो पाहून उडालाच .. त्यात सुद्धा हसताना जरा ऑकवर्ड झालेली पण क्युट गर्ल दिसत होती .. शंतनू आणि रियाला बीच वर खेळताना बघून तर खूपच आनंदला तो
"ओके " एवढाच रिप्लाय देऊन जरा शांत बसला
माईंना फोन करून बोलावून घेतले
अजय माईंना " माई . आता हे शेवटचं ? असे पुन्हा कधीच झाले नाही पाहिजे ? मी नसताना घराला कुलूप लागलंच नाही पाहिजे .. तुम्ही कुणीकडे जायचं नाही "
माई " मीरा मी सांगितले पण ती नाही ऐकली ?"
अजय " मीराला एकच सांगायचं .. तुला एकटीला जायचं तर जा .. रियाला घरीच ठेवायचं .. अशी दादांनी ऑर्डर दिलीय .. रिया सोडून ती कधीच जाणार नाही "
माई " हमम "
अजय " एका वेळी दोघींचे जीव धोक्यात येतात .. मला सुधरत नाही मग .. तुम्ही राग मानू नका . तुम्ही मला आई सारख्या आहात "
माई " हो दादा .. चुकलंच माझे .. पुन्हा असे होणार नाही "
अजय " आणि अशावेळी मला बिनधास्त फोन करायचा "
माई " ते ताईंविषयी मी तक्रार करतेय असे नको वाटायला म्हणून कॉल केला नाही "
अजय " मीरा अजूनही निर्णय घेण्या इतपत स्ट्रॉंग नाहीये .. तर आपल्यालाच परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून थांबवावी लागेल "
माई " बरोबर आहे तुमचं दादा "
---------
अजय छान तयार होऊन नीरज कडे आला
नीरज दारातच " यार तू नाराज नको होऊस .. मीरा माझी बहीण आहे .. आणि तिला माझ्या घरी आणायला मला तुझी परमिशन नक्कीच नकोय "
अजयने त्याला एक जादूची झप्पी दिली
नीरज " अरे.. मला वाटलं मी आता माझे काही खरं नाही तू तर एकदम झप्पी दिलीस "
अजय ने त्याची कॉलर पकडली " तुझी बहीण माझी बायको आहे साल्या .. निदान एक मेसेज टाकायचास ना ?"
नीरज " तुला तरसवायचीय मला .. त्याशिवाय माझ्या बहिणीला तू एक्सेप्ट करणार नाहीस .. बिचारी नवी नवरी वाट बघतेय तुझी "
अजय " मूर्ख , मी तिचे पेपर्स घेऊन स्वित्झर्लंडच्या डॉक्टरांकडे गेलो होतो .. मला कोणत्याही प्रकारची रिस्क नाही घ्यायची "
नीरज " तू मूर्ख .. किती वेळ लावतोय .. झाल ना आता लग्न तेही भाऊसाहेबांच्या समोर .. तरी अजून का थांबलाय तू ?"
अजय "नक्की काय म्हणणं आहे तुझं ? हनिमूनला जाणे ह्या व्यतिरिक्त काहीच नाहीये का आयुष्यात "
नीरज " एवढंच नसले तरी ते महत्वाचे आहे "
अजय " अरे हो .. पण मेंटली शी इज इल "
नीरज " आय थिंक यु नीड सायक्राटीस नाऊ "
अजय " चल आपले चॉपर बोलावं .. आपण पण जाऊ .. गुहागरच्या फार्म हाऊसवर .. त्यांना सरप्राईज देऊ "
नीरज " तुझं ना मला काय कळतच नाहीये .. आता ती येई पर्यंत पण थांबायचं नाहीये का ?"
अजय " ५० तास पेक्षा जास्त तास झालेत मी दोघींना पहिले नाहीये .. मला पाहायचंय दोघीना .. डोन्ट वेस्ट माय टाईम "
नीरज " सोनिया इज गोइंग टू किल मी "
अजय " आपण पण तिथेच थांबू आज ची रात्र "
नीरज " यु मिन आपण हॉलिडे ला जातोय "
अजय गोड हसतच " हो "
नीरजने लाडात येऊन अजयची पप्पी घेतली
अजय हसतच " यु आर टू मच नीरज "
नीरज " साहेब , जरा स्वतःकडे बघा .. असे ब्लेझर घालून जाताय का ट्रिप ला "
अजय " हेलिपॅडला मी येतो १० मिनिट्स मध्ये "
नीरज " ओके "
अजय " किती वेळ लागेल पोहचायला विथ चॉपर "
नीरज " १ तास फक्त "
अजय " ओके "
---------------------------------
पुढील एक तासात अजय आणि नीरज चॉपरने गुहागरला आले .. तिथून फार्म हाऊसला आले ..
सकाळचे ८वाजले होते .. बीचवर कोवळे ऊन होते
मीरा आणि रिया दोघी वाळूत बसून कॅसल बनवत होत्या आणि सोनिया आणि शंतनू पळापळी करत शिंपले गोळा करत होते ..
मीराला आज सोनियाने बर्मुडा टीशर्ट घालायला लावले होते .. केस मेस्सी बॅन मध्ये वर बांधले होते पायात स्लीपर्स .. गळ्यात छोटे डायमंडचे मंगळसुत्र आणि सोनेरी किरणांनी बहरून आलेला तिचा चेहरा ..
स्विमिंग कॉश्च्युम घातलेली रिया . रेतीत अक्षरश: लोळत होती .. खेळत होती आणि खूप हसत होती आणि तिच्या मम्माला प्रश्न विचारून हैराण करत होती ..
सोनिया आणि शंतनू आजू बाजूलाच होते त्यामुळे मीरा बिनधास्त रेतीत बसली होती तिचे लक्ष फक्त ती बनवत असलेल्या महालात होते आणि रियाकडे होते ..
दोन मिनिटाने शंतनूचा आवाज बंद झाला .. ती इकडे तिकडे बघू लागली तर अजय समोर उभा .. तो पण बर्मुडा , शर्ट आणि डोक्यावर हॅट घालून समोर उभा .. रियाला उचलून घेतले होते त्याने .. आणि रियाच्या डोळ्यांवर १०० डॉलर वाली स्माईल आली होती ..
अजयला बघून मीरा हडबडली .. "तुम्ही इथे ? कसे काय ?"
अजय " तुम्हांला दोघीना भेटायला आलो " एकदम शांतपणे बोलला
तेवढयात रिया " डॅड .. लूक .. आम्ही दोघींनी मिळून हे कॅसल बनवलं "
अजय " ग्रेट .. खूप छान आहे "
तेवढ्यात शंतनु आला
शंतनु " रिया .. इकडे ये . मम्मा आणि डॅड दोघे मिळून पाण्यात खेळत आहेत .. चल तू येतेस का ? आपण पण खेळू .. तू तुझी ट्यूब घे "
रिया " डॅड .. मी जाऊ का ?"प्लिज "
अजय " गो .. बी केअरफूल बोथ ऑफ यु "
शंतनू " येस अंकल .. आय विल टेक केअर ऑफ हर " आणि ते दोघे तुरु तुरु धावत एकमेकांचा हात धरून पाण्याच्या दिशेने धावत गेले
इकडे मीरा अजय कडे एकटक बघत होती .. ह्या असल्या ड्रेस मध्ये किती हँडसम दिसत होता ..
अजयने बसलेल्या मीराकडे हात केला .नकळत तिने तिचा हात त्याच्या हाती दिला
अजय " वॉक घेऊया "
मीरा जशी उभी राहिली तशी तिच्या लक्षात आले कि आपण बर्म्युडा घातलाय .. ती हाताने तिचे पाय झाकून घेऊ लागली
अजय " हे .. इट्स ओके .. यु आर लुकिंग स्टनिंग "
मीराला त्याच्या डोळ्यांत बघण्याइतके धाडसच नव्हते . धडधड धडधड आवाज येत होता .. पोटात गोळे येत होते
अजय " चालूया "
मीराने होकारार्थी मान हलवली .. दोघांनी एकमेकांच्या हातात हात घट्ट घेतले आणि अथांग समुद्राकडे पाहत चालू लागले.
0

🎭 Series Post

View all