Login

मोह मोह के धागे भाग 35

Story Of Love
मोह मोह के धागे भाग ३५
क्रमश : ३४

अजयने पुन्हा एकदा तिला घट्ट मिठीत घेतले .. तिचा होकार आहे हे सांगण्या इतकी ती बोल्ड नक्कीच नव्हती याचीही त्याला जाणीव होती . त्याने तिला मिठीत घेताच अलगद तिच्या नाजूक हातांनी त्याला विळखा घातला आणि त्याला त्याचा होकार मिळाला .. तिचे कपाळावरचे केस हातांनी बाजूला करून तिच्या लाजऱ्या ड़ोळ्यांत आरपार पाहत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले
मीरा " सॉरी .. मी तुम्हांला त्रास देते ना ? मी आता परत कधीच अशी न सांगता येणार नाही "
अजय " हे प्लिज करच .. ओके "
मीरा " अजय , एक विचारू ?"
अजय " बोल ना ?"
मीरा " तुम्ही खुश आहेत ना ? ?"
अजय मिठीचे हात घट्ट करत " खूप जास्ती .. इतका आनंदी मी कधीच नव्हतो .. आज सगळे काही मिळाल्या सारखं वाटतंय आणि आज खूप मोकळंहि वाटतंय ? एक वेगळीच घुसमट होत होती विचारांची त्यातून मी बाहेर आलोय "
मीरा " आज मला पण तुमच्यात बदल जाणवला . आणि एक सांगू ?”ती लाजतच बोलली.
अजय " काय ?"
मीरा " हा बदल खूप आवडला ? तुम्ही माझ्यावर दाखवलेला हक्क आवडतो मला . मी कोणीतरी खास आहे असे वाटत मला.. आज इतक्या लांबून प्रवास करून आल्यावर सुद्धा केवळ आम्हांला दोघींना भेटायला तुम्ही इकडे आलात .. किती आंनद झालाय काय सांगू "
अजय " मीरा , माझ्या मेंदूत काही विचार होते कि जे मला तुझ्यावर हक्क दाखवण्यापासून लांब ठेवत होते पण आता त्या विचारांवर मी विजय मिळवलाय . आता तुला माझ्या पासून कोणी दूर करून शकत नाही .. कोणी म्हणजे कोणीच नाही .. अगदी तू सुद्धा "
मीरा " मी कशाला तुम्हांला अडवेन ? ती लटक्या रागात बोलली
अजय तिचा लटका राग बघून हसायलाच लागला ..
अजय " बघ हा.. प्रॉमिस मी .. मला काधिच तुझ्या पासून लांब ठेवणार नाहीस "
मीराने पटकन त्याच्या ओठांवर हलका किस केला " मी तुम्हांला कधीच अंतर देणार नाही .. हि गोष्ट मी सील विथ किस केली आहे
अजय " ओहो .. बायको तू भी कम नही .. आय लाईक इट .. तुझा सगळ्या खोड्या मला बघायच्या आहेत "
मीरा " अहो ,चला जाऊ बाहेर ? वहिनी वाट बघत असेल ?"
अजय " हो नक्कीच .. आणि एक मॅडम बी रेडी व्यिई आर गोइंग टू हनिमून "
मीरा कानातच " आय एम रेडी "
हे ऐकून तर त्याने त्याचा हात स्वतःच्या छातीवर घासला " हाय ! मार डाला .. तुम्हारी अदा ओ ने मार डाला "
मीराच्या चेहऱ्यावर झर झर लाली पसरली .. ती हि खुलत चालली होती त्याच्या बरोबर
मीरा " चला मी जाऊ का बाहेर ?"
अजय " चल जाऊ ? पण रात्री एक हप्ता बाकी आहे माझा लक्षात ठेव "
कुणाची नजर न लागो दोघांना अशा आनंदात होते दोघेही .. भविष्याची गोड स्वप्नं भूतकाळाला मागे सारून पाहू लागले होते
----------------------
मग रात्री धम्माल , मस्ती केली .. गाणी काय म्हटली , डान्स काय केले , जोक्स काय सांगितले , मुलं खेळून झोपली आणि मग ह्या दोघी सुद्धा मोकळ्या झाल्या .. आणि गप्पात सामील झाल्या ..
नीरज " मग अजय ? हनिमूनला कधी जातोय ?"
अजय " पासपोर्ट आला कि लगेच "
सोनिया " अरे वाह !! मुंडा तो तयार है .. अरे अजय आम्ही आज तुमच्या दोघांची रूम सजवणार होतो .. पण मग प्लॅन कॅन्सल केला .. कारण तुझा काही भरवसा नाही सो .. मला आता वाटतंय ? आम्हीं हे करायला पाहिजे होते "
अजय " अरे .. बरं झाले नाही केलंस ते .. मला ते तसले नाही आवडत ... फुल नि बिल बेड वर " अजय आज निर्लज्ज झाला होता थोडक्यात सुटला होता
नीरज "बघ सोनिया .. मी म्हटले ना त्याला नाही आवडत .."
सोनिया " काय यार !! बी सम रोमँटिक "
सोनिया मीरा कडे बघून " मीरा तुला काय आवडत ?"
मीरा " मी जाते झोपायला .. मला झोप आली " म्हणून विषय टाळू लागली
अजय हसतच " घ्या .. रोमँटिक .एक ग्लास वाईनचा दिलाय त्यालाही तीने हात नाही लावलाय अजून ."
मीराला जरा रागच आला " काय आहे ना सोनिया वहिनी .. प्रेम डोळ्यांत दिसले पाहिजे आणि तेच प्रेम कठीण काळात टिकवलं पाहिजे हे सर्वात जास्त महत्वाचे .. बाकी सगळे शून्यच . पूर्वीच्या बायकांचा रोमान्स म्हणजे नवर्याच्या आवडीचं खायला बनवणे , त्याच्या आवडीची साडी नेसणे थोडक्यात दोघांनी एकमेकांची खूप सारी काळजी घेणे इतकच असायचा "
अजय ने भुवया वर उचलून नीरज कडे बघितले
नीरज " बरोबर .. मीरा .. एकदम बरोबर आहे . "
सोनिया " सही !! अरे हि ना लेक्चरर वगैरे असली पाहिजे , भारी बोलते "
मीरा एकदम स्तब्ध झाली .मी काय आहे ? मी काहीच नाहीये .. सोनिया वहिनी नीरज दादाला सुटेबल आहे . तिची स्वतःची अशी आयडेंटी आहे . स्टायलिश , फॅशनेबल .. मी अजयला कोणत्याच बाजूने सूट करते का ?
झाले ह्या विचाराने एकदम नाराज झाली ती आणि तिच्यातला बदल अजयला जाणवला
अजय " बरं गर्ल्स .. आता तुम्हीं दोघी झोपायला जावा .. आम्हीच दोघे बॉय टाईम स्पेंड करतो "
नीरज ने पण सोनियाला खुणावले..
दोघी हसत उठल्या आणि गुड नाईट बोलून आपापल्या रूम मध्ये झोपायला गेल्या ..
या दोघी गेल्यावर .. हे दोघे मित्र बिअरच्या बाटल्यांचा चिअर्स करत , ग्रील वर खात गप्पा मारत बसले
नीरज " अजय , मला असे वाटते आपण मीरा चे ग्रूमिंग करू ? काय वाटते तुला ?"
अजय " नो नीड .. आय लव्ह हर जस्ट द वे शी ईज "
नीरज " हो रे .. पण तिला आपण कमी आहोत असे नाही वाटले पाहिजे .. म्हणजे बघ ना दि अजय सरपोतदारची बायको म्हणून तिला मिरवायचंय आणि ते तिने मोठ्या शान मध्ये मिरवावे असे वाटत मला "
अजय " पण आता हि ती ते करूच शकते ना ?"
नीरज "कॉन्फिडन्स कि कमी है ! आणि तो येईल काहीतरी अचिव्ह केल्यावर , शिकल्यावर"
अजय " म्हणजे काय म्हणायचंय ?"
नीरज " राधा आठवतेय तुला ?"
अजय " हो .. खूप चांगली मुलगी आहे ती .. गुड फ्रेंड ऑफ माईन "
नीरज " ती मुलगी तुला भाऊसाहेबांनी आणि मी फायनल केली होती .. परफेक्ट होती तुझ्यासाठी .. स्टाईल , ग्रेस , एडुकेशन , पोझिशन "
अजय " येस .. शी इज "
असे अजय बोलला आणि आतमध्ये काहीतरी भांड पडल्याचा आवाज आला .. दोघांनी आत मध्ये बघितले तर मीराच्या डोळ्यांत अश्रू आणि पाण्याचा ग्लास खाली पडला होता
अजय " ओह शीट !! घ्या आता लागली वाट "
नीरज तोंड दाबून हसू लागला
अजय " नो यार .. प्लिज .. यु कान्ट बी सो मिन "
नीरज " व्हॉट ? मी काय केलंय ?"
अजय " राधाचा विविषय तूच काढलास ना ?"
नीरज " तू एक काम कर .. आधी तिला बघ .. तिला झोपवून ये .. मी बाहेर थांबतो "
अजय पटकन उठला आणि तिच्या जवळ गेला
अजय " मीरा .. तू झोपली नाहीस ?"
मीरा रडतच " पाणी प्यायला आले होते .. "
अजय " तू प्लिज गैरसमज करू नकोस ?"
मीरा " नाही .. बरोबर आहे तुमचं ? मी नाहीये तुमच्यासाठी मॅच .सॉरी .. माझ्यामुळे तुमचे आणि राधाचे लग्न झाले नाही "
अजयने रडणाऱ्या मीराला दोन्ही हातात उचलले आणि बेडरूम मध्ये नेऊ लागला
मीरा " प्लिज .. ठेवा खाली "
अजय " अरे .. बायको .. तू वेडी आहेस का ? मला फक्त तू आवडतेस ? तू अर्धवट ऐकून काहीतरी गैरसमज करू नकोस ?"
मीरा " मला राधा सारखं बनायचंय .. उद्या कोणी मी तुम्हांला सुटेबल नाही असे म्हणून तुम्हांला हिंणवायला नको”
अजयला हसू कि रडू असे झाले होते
अजय " अरे डार्लिंग .. नाहीये असे काही "
मीरा " असेच आहे .." डोळे वाहत होते
अजय "मीरा .. प्लिज मला नाही कन्व्हीन्स करता येत .. मी सांगतोय ना तुला .. मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं होते "
मीरा " का पण ? का ? राधा एवढ्या चांगल्या मुलीला का नाकारले ?"
अजय " कारण .. माझे तुझ्यावर प्रेम आहे, होते आणि राहील "
मीरा एकदम शांत झाली
अजय " गुड गर्ल ..मी आता बाहेर जातोय , नीरज वाट बघतोय .. तू छान झोपून जा "
मीराने मान हलवून होकार दिला
मीरा " अहो , लवकर या झोपायला . "
अजय " का ? करमत नाहीये का ?"
मीरा हसतच " तुम्ही राधा बद्दल बोलू नये म्हणून "
अजयने डोक्याला हात मारून घेतला
मीरा " मी तुम्हांला कोणाशी शेअर करणार नाहीये "
अजयने पटकन तिच्या कपाळावर किस केलं .. " माझी पझेसिव्ह बायको .. आय लव्ह यु "
तिला शांत करून अजय पुन्हा बाहेर आला .. आणि दोघे गप्पा मारत बसले ..
0

🎭 Series Post

View all