मोह मोह के धागे भाग 36 -बोनस भाग

Story Of Love
मोह मोह के धागे भाग ३६ _बोनस पार्ट

क्रमश : भाग ३५

पुन्हा दोघे गप्पांमढे रमले .. काही जुन्या आठवणी , एकांत , ड्रिंक्स आणि जिवाभावाचा दोस्त .. मस्त माहोल होता .. बिझनेस पासून ते रिटायरमेंट पर्यंत . फॅमिली गोल्स सगळे बोलत होते.. मधेच हसले , शांत झाले ..
अजय " नीरज यार कधी कधी मागे बघितले कि असे वाटते कि माझी लाईफ म्हणजे काहीतरी वेगळीच आहे .. इतकी स्पेशल कुंडली देवाने कशी काय लिहिली ?"
नीरज " म्हणजे काय ? दि अजय सरपोतदार आहेस तू "
दोघेही हसले
नीरज " साल्या तुझा ग्राफ उलटा आहे .. लोक आधी नवरा बनतात मग बाप बनतात .. तू आधी बाप
झालास आणि मग नवरा "
अजय " हो ना .. बाप झाल्यावर बदललो ना मी "
नीरजने एक घट्ट मिठी मारली त्याला .. यारवाली झप्पी
नीरज " एक बाप म्हणून तू नवर्यापेक्षा चांगला आहेस .. नुसताच नवरा नाही सगळ्या नात्यांमध्ये बेस्ट तू एक बाप आहेस .. बेस्ट फादर "
अजय " रियाच्या माझ्या आयुष्यात येण्याने मी खूप बदललो . खरंतर रियाच्या आधीच मीरा आली होती पण ते तुमच्या कोणाच्या लक्षात आले नाही "
नीरज " म्हणजे ?"
अजय " रोहनचा मृत्यू झाल्यावर माझ्यासमोर ९ महिने प्रेग्नन्ट मीरा जी माझ्याकडे मदत मागायच्याही कंडिशनमध्ये नव्हती .तिच्या डोळ्यांतले अश्रू मला पाहवत नव्हते .. तिने काय गमावलंय हे हि समजण्याच्या मनःस्थिती नव्हती ती .. मी पाहतच बसलो काही क्षण तिच्याकडे .. त्या मारकऱ्यांशी एकटी लढताना ती झाशीची राणी होती , नंतर पोटात वाढलेलया गर्भाची आई होती ,समोर धारातीर्थ पडलेल्या रोहनची वीरांगना होती .. एक दिवसात किती रूपं मी तिची पाहिली .. भारावलो होतो .. तिच्या पर्सनॅलिटी कडे बघून .पण ती आपल्या मित्राची बायको आहे आणि आता तो या जगात नाहीये .. हा विचारानं हात लटलट कापले माझे . हि कशी जगेल ? त्या ना जन्मलेल्या बाळाला कशी जगवेल , आपला नवरा आता या जगात नाहीये हे कसे पचवेल .. अशा विचारात मी तिला हॉस्पिटलला आणली .
डॉक्टरांनी रियाला माझ्या हातांवर ठेवले आणि मी रडलो .. बाळ जेवढा वेळ रडत होते तेवढा वेळ मी रडलो .. ह्या पोरीचा बाप मरता मरता माझ्यापुढे हात का जोडत होता ह्याची जाणीव झाली मला .. गोंडस मुलगी अनाथ होणार होती हे रोहनला कळले असावे बहुदा मृत्यूचे समयी .. आणि ते होऊ नये म्हणून त्याने मीरा चा हात माझ्या हातात दिला ..
मीराला शुद्ध आल्यावर खूप सारे पैसे देऊन तिची आणि रियाच्या भवितव्याची उत्कृष्ठ सोय करून कदाचित मी ह्या सगळ्यातून लगेच मोकळा होणार हो तो .. पण नियतीला काही वेगळंच पाहिजे होते .. मीरा कोमात गेली आणि रियाचा बाप झालो ..
तुला सांगतो नीरज , धिस इज द बेस्ट थिंग ह्यपन्ड विथ मी .. रियाचा बाप बनायचा रोल मी रियाला चांगल्या बोर्डिंग स्कुल , किंवा तशी काहीशी सोय करू शकलो असतो नाही असे नाही .. रियाने माझ्या हातात येऊन मला बाप बनवून टाकले .. आता इतका आनंद होतो तिचा बाप म्हणून मिरवताना .. ती जेव्हा बिलगते ना तेव्हा जगातली सगळी सुख माझ्यात पायात आल्या सारखी वाटतात "
नीरज " अजय . आज एक प्रश्न विचारावासा वाटतो ? प्लिज खरं उत्तर दे तेही ना रागावता "
अजय " विचार "
नीरज " मीराशी लग्न का केलेस ? म्हणजे ती रियाची खरी आई आहे आणि जगातली कोणतीही दुसरी स्त्री आईचे प्रेम तिला देऊ शकत नाही म्हणून तिचा विचार केलास का ?"
अजय " आय लव्ह हर " इतकेच उत्तर देऊ शकतो "
नीरज " टेल मी द ट्रुथ "
अजय " मीरा वर मी भारावलो होतोच पण ती रोहनची म्हणजे माझ्या निरागस मित्राची पत्नी आहे याची जाण काल पर्यंत माझ्या डोक्यांत होती . पण आता नाही .. आता ती फक्त माझी आहे आणि रोहन चॅप्टर इज क्लोज्ड फॉरएव्हर "
नीरज " ग्रेट .आता मस्त हनिमूनला जा .. एन्जॉय युअर लाईफ .. जे तू विसरून गेलायस "
अजय " अरे विसरलो नाही रे .. मीरा माझी झाल्यामुळे आता पुन्हा एन्जॉय करावंसं वाटतं "
नीरज " त्या रोहन च काय झाले ?"
अजय " त्याला रियाच्या जन्मानंतर मी माझ्या हाताने अग्नी दहन केलं .. त्याची एक स्वतःची कंपनी होती .. तीच कंपनी बहुदा तो मला विकून त्याच पैशांनी बाहेर च्या देशात जाण्याचा विचारात होता .. म्हणून त्याने मला बोलावले होते .. ती कंपनी वारस नाही म्हणून सरकारकडे जमा होती .. मी ती विकत घेतलीय .. पुढे मागे रियाच्या नावावर करून टाकेन आणि ते घर ज्या घरात दोघांनी स्वप्न पाहिली असतील ते घर रेंटचे होते पण रोहनच्या आठवणी मीरासाठी जपायच्या होत्या मला म्हणून ते घरही मी विकत घेतलय "
नीरज "पण हे रिस्की आहे .. त्या जागी मीरा गेल्यावर कदाचित तिला सगळे आठवले तर "
अजय " शक्यता कमीच आहे .. कारण मी डॉक्टरांना विचारून आलोय .. ९९ परसेन्ट ते होणार नाहीये "
नीरज " देव करो आता काही आठवू पण नये तिला "
बोलता बोलता नीरजने मागे बघितले तर मीरा सुन्न उभी राहून सगळे ऐकत होती
तो कुठे बघतोय तिकडे अजयने बघितले आणि त्याच्या हातातली बाटली खाली पडली
अजय पटकन पुढे धावला .. आणि त्याच्या मागे नीरज पण
अजय तिला हात लावणार तर तिने हातानेच त्याला खुणावले " थांबा " आणि दोन पाऊले मागे झाली
अजय " मीरा .. प्लिज लिस्टन टू मी "
मीरा सुन्नच होती .. सत्य असे काही असेल असा विचारही तिने केला नव्हता . रिया अजयची त्याच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे हेच त्याने तिला सांगितले होते म्हणण्यापेक्षा पटवले होते .
मीरा " मी .. मी विधवा .. असताना तुम्ही माझ्याशी लग्न केलेत .. पाप .. पाप आहे हे .. देव आपल्याला कधीच माफ करणार नाही "
अजय " मीरा .. स्टॉप .. प्लिज असे काही बोलू नको .. असे काही नसतं "
मीरा " मला आणि रियाला तुमच्या आयुष्यातून जावे लागेल . मला जावे लागेल .. मी या पापाची धनी नाही होऊ शकत " तिचा आवाज खोल गेला होता .. ती घाबरली , भेदरली आणि अनपेक्षित सत्याने धक्क्यात होती
नीरज " यार अजय , ती बेशुद्ध होतेय .. चल निघूया .. तिला हॉस्पिटल मध्ये न्यावे लागेल "
म्हणतच होता तोपर्यंत मीरा जमिनीवर कोसळणार तर अजय ने तिला हातांवर धरले . डोळे भरून आले होते त्याचे
नीरजने चॉपरला बोलावले .. सोनियाला उठवले ... रियाला त्याने घेतले , शंतनूला सोनियाने घेतले आणि मीराला अजयने घेतले होते ..
खूप प्रश्न होते .. मीरा पुन्हा कोमात तर नाही ना जायची .. मीरा त्याला सोडून तर नाही ना जायची ? मीरा शिवाय अजय कसा राहणार होता ? अजय सुन्न झाला होता ..

नमस्कार वाचकहो ,

आज चक्क दोन भाग पोस्ट करतेय . स्टोरी संपवायची घाई झालीय आता मला .. तुम्हांला तरी किती त्रास देऊ .. एक झाले कि एक काही ना काही चालूच आहे .. आणि मग लिखाण मागे पडतंय .. खूप गॅप पडतोय . तरीही तुम्ही वाचता , छान कमेंट्स देता त्या बद्दल मनापासून धन्यवाद !

बोनस भाग देऊन एक सुखद धक्का देतेय ज्यात खूप मोठा धक्का आहे ..

वाचून नक्की सांगा कसा वाटला भाग

लवकरच हि कहाणी संपवणार आहे अर्थात नेहमीसारखी व्यवस्थित क्लाजर असेल .

एक मनात आले म्हणून बोलते . माझ्या स्टोरीत पूर्णविराम नसतो आणि हि एक व्याकरणातील मोठी चूक आहे असे बऱ्याच जणांचे मत आहे .. पण हे जे टिम्ब मध्ये मध्ये मी देते ते टिम्ब स्टोरीला लाईव्ह बनवते असे मला वाटते .. पूर्णविराम दिला कि ते वाक्य संपून जाते आणि मला ते संपवायचे नसते .. अजून पुढे आहे अशी आशा असते त्यात .
काही ठिकाणी पहिला उकार , दुसरा उकार यातही चूक असते जी कि मला माहित असते पण मी ती दुरुस्त करत नाही कारण ती लॅपटॉप वर टाईप करताना झालेली असते .. मराठीत टायपिंग करेक्शन करायला खूप वेळ जातो .. माझा मुद्दा तुम्हांला कळला मुद्द्यापेक्षा भावना कळली तरी भरपूर असे मला वाटते .. तो काही धडा नाहीये , काना मात्रा आणि पूर्णविराम चेक करायला .. असो हे माझे मत झाले ..मुळात माझे भाग मोठे असतात .. त्यामुळे काही चुका मी दुर्लक्षित करते पण याचा अर्थ माझ्या लिखाणाचा दर्जा त्यावर नसावा असे मला वाटते ..
सहज मनात आले ते लिहिले .. तुमचे काय मत नक्की सांगा .. असेच छोटीशी वाचकांशी चर्चा म्हणून हा विषय छेडला बाकी काही नाही .. नकारात्मकता ठेऊन तुम्ही माझे लिखाण वाचू नये म्हणून हि सगळी उठाठेव .
बाकी नेहमीच मला वाचकांच्या कमेंट्स मधून प्रेम मिळाले या बद्दल मी ईराची आणि वाचकांची आभारी आहे .
सौ. शीतल महेश माने

🎭 Series Post

View all