मोह मोह के धागे भाग 37

Story Of Love
मोह मोह के धागे भाग ३७
क्रमश : भाग ३६

नमस्कार वाचकहो !!
कसे आहात सर्वजण ?
सर्वात पहिल्यांदा ईराला आणि इराच्या वाचकांना मनभरून नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
नूतन वर्ष 2023 आपण सर्वांना आनंदाचे भरभराटीचे , सुखदायी, आरोग्यदायी आणि ऐश्वर्य संपन्न जाओ हीच सदिच्छा .
खूप गॅप नंतर लिहितेय सॉरी .. रागावू नका .भाग कसा वाटला नक्की वाचा आणि सांगा .
मीराला हॉस्पिटलमध ऍडमिट केले होते . ती आय सी यु मध्ये होती . डॉक्टरांना भीती वाटतं होती कि ती पुन्हा कोमात जाईल. हे ऐकल्यावर अजयच्या अंगातले त्राणचजणू कोणीतरी काढून टाकले होते .
तो एकदम सुन्नच झाला
काही वेळा पूर्वीच त्याने नवीन आयुष्य सुरु करण्या बद्द्दल बोलला होता आणि लगेचच अघटित घडले होते .
तेवढ्यात सोनिया रडणाऱ्या रियाला घेऊन आली .. आत ती सोनिया कडे राहण्याच्या मनस्थितीत नव्हती . अजय तिला घेण्याच्या मनस्थितीत नव्हता .. आणि हॉस्पिटल मध्ये नुसता गोंधळ सुरु झाला होता.
नीरज " अजय ,सांभाळ स्वतःला .. रियाला तुझी गरज आहे .. प्लिज तिला घे .. रडून रडून हॉस्पिटल डोक्यावर घेतलंय तिने "
अजय " सोनियाला आणि शंतनूला घरी पाठव .. रियाला माझ्याकडे दे .. मी घेतो तिला."
नीरज रियाला घेऊन आला तशी रियाने लिटरली झेपच टाकली अजयकडे
रिया " रडतच , मला नाही रहायचं हॉस्पिटल मध्ये .. मला डॉक्टर काका टूच करतील .. डॅडा .. मम्माला घे आपण घरी जाऊ."
अजयने त्याच्या खिशातला स्वच्छ रुमाल काढला .. तिचे नाक डोळे पुसले .. तिला पाणी पाजलं
अजय " आधी रडायचं थांबवं .. मग बोलू .. आणि डॉक्टर तुला काही करणार नाहीत .. ते मम्माला बरं नाहीये ना .. म्हणतच त्याने तिला काचेतून आत झोपलेली मीरा दाखवली .. " ते बघ मम्मा झोपलीय .. तिला बरं नाहीये ना .. मग तू गुड गर्ल आहेस ना .. मग अजिबात रडायचं नाही .. ठीक आहे. "
रिया मुसमुसतच अजयच्या मानेत चेहरा खुपसून शांत झाली .. तो हळुवार , प्रेमाने तिला थोपटत होता .. शांत एकदम शांत करून तिने आपोआप डोळे मिटले त्याच्या खांद्यावर .
रात्र कशी बशी काढली त्यांनी ..नीरज होताच त्याच्या सोबतीला ..
मीरा अजूनही बेशुद्धच होती ..
तेवढयात समोरून भाऊसाहेब आणि आई आले ..
भाऊसाहेबांना बघून अजय धावतच त्याच्या मिठीत गेला .. आणि रडू लागला
अजय " भाऊसाहेब , मीरा .. बहुतेक पुन्हा कोमात .. "
भाऊसाहेब " अरे बाळा असे काही नाही होणार .. ती आता बघ शुद्धीवर येईल .. मी सांगतो."
आई पण त्याच्या पाठीवर हात फिरवू लागल्या भरल्या डोळ्यांनी
आई " माझे लेकरू कधीच रडलं नाहीं ग आई अंबे .. माझ्या लेकराच्या पदरात सुख घाल तुझी खणा नारळाने ओटी भरेन."
आईंनी बाजूच्या बेडवर झोपलेल्या रियाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला .
भाऊसाहेब " हे बघा अजय , काही काळजी करू नकोस .. ती येईल शुद्धीवर ."
नीरज " भाऊसाहेब, तुमचा प्रवास कसा झाला ? मी तुम्हांला आणि आईला घरी सोडतो .. तुम्ही रियाला घेऊन घरी जा .. "
अजयने डोळे पुसले .. वास्तवाची जाणीव झाली त्याला ..आपले आई वडील आता वयाने म्हातारे आहेत .. त्यांनाही फार धक्के सहन होणार नाहीत .. आपल्याला असे हात पाय गाळून चालणार नाहीत त्यांच्या समोर. "
नीरजने अजयच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधार आणि दुजोरा दिला.
नीरज " मी येतो अर्धा तासात परत."
सगळे घरी निघालेच होते कि नर्स धावत आली
नर्स " मिस्टर अजय , तुमची वाईफ शुद्धीवर येत आहेत."
तसे सगळेच खुश झाले
नर्स " तुम्हांला डॉक्टरांनी भेटायला बोलावले आहे."
अजय धावतच डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेला.
डॉक्टर " मिस्टर अजय . त्यांनी आताच डोळ्यांची हालचाल केली होती आणि हातही जरासा हलवला होता म्हणजे आता काही वेळेतच त्या शुद्धीवर येतील."
अजय " थँक यु डॉक्टर .. यु सेव्हड माय लाईफ. "
डॉक्टर " पण .. मला तुम्हांला काही सांगायचं आहे “.
अजय " बोला ना सर ."
डॉक्टर " एक म्हेणजे त्या शुद्धीवर येतील तेव्हा त्या कोणत्या स्थितीत असतील हे सांगू शकत नाही. "
अजय " म्हणजे ?”
डॉक्टर " म्हणजे त्या कदाचित जिथे त्यांची मेमरी गेली होती तिथे पोहचतील किंवा आता बेशुद्ध पडल्या तिथे."
अजय " म्हणजे .. "
डॉक्टर " म्हणजे त्यांना शुद्ध आली कि त्यांना तुम्हीं लक्षात असाल कि नाही हे सांगू शकत नाही.. आणि आता त्यांना आपण जबरदस्ती आठवण्यासाठी लगेच फोर्स करू शकत नाही."
अजय एकदम मलूल झाला .. डोळे पाण्याने भरले होते पण दाखवता येत नव्हते."
डॉक्टर " सॉरी .. पण तुम्ही लगेच त्याच्या समोर येऊ नका .. आपण अंदाज घेत घेत आपली ऍक्शन ठरवू."
अजय " तिने जर तिचे बाळ कुठे आहे हे विचारले तर ?"
डॉक्टर " तर .. मुलीला आधी भेटवू .. मग हळू हळू तुमच्याशी ओळख करून दे. "
अजय "ओळख " खटकलाच हा शब्द त्याला.
डॉक्टर " सॉरी .. पण तुम्हांला नव्याने तुमचे नातं फुलवायला लागेल."
अजय " ठीक आहे .. तुम्ही सांगा मला मी कधी तिच्या समोर जायचे ते .. " आणि थेट उठलाच तो तिथून आणि वॉशरूम मध्ये गेला .. भरभर डोळे भरून आले .. ओल्या डोळ्यांवर भसाभसा पाणी मारले त्याने .. अश्रू लपवायचा निव्वळ प्रयत्न करत होता .. पण हट्टी अश्रू ऐकतच नव्हते.
नीरज त्याच्या मागे आलाच लगेच
नीरज " अजय , तिने डोळे उघडलेत .. चल ना."
अजय " तू .. हो ना पुढे .. मी आलोच."
नीरज " अजय , डोळे उघडल्यावर तिने सर्वात पहिले तुझे नाव घेतलंय .. तिने मला , भाऊ साहेबांना आईंना आणि रियाला हि ओळखलंय .. तिच्या निस्तेज डोळ्यांत ती तुला शोधताना दिसतेय .. चल."
अजयच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू ओघळला .. पण आता सावरायला नीरज होता त्याला .. त्याला घट्ट मिठी मारली नीरजने
नीरज "अजय , क्षणभर मी हि घाबरलो होतो .. पण थँक गॉड तिला आपण सर्व आठवतोय."
अजय " चल .. "
अजय एका अनामिक ओढीने तिच्या रूम मध्ये आला . तिला बेडला मागे टेकवून बसवली होती आणि रिया तिला चिकटून बसली होती ..
त्याची आणि तिची नजरानजर झाली .. तो नुकताच रडून आलाय हे तिला लगेच कळले
भाऊसाहेब " अजय , मीरा शुद्धीवर आली .. मी म्हटले होते ना .. ती येईल शुद्धीवर."
आईंनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला .
भाऊसाहेब " चला रिया , आपण घरी जाऊ .. आणि मम्मा साठी गरम गरम नाश्ता घेऊन येऊ."
तशी रिया उठून तिच्या आबांकडे गेली
रिया " मम्मा .. लवकर घरी ये .. मला नाही आवडत हॉस्पिटल .. डॅडा .. त्या डॉक्टर अंकल ने मम्मा ला टूच केलं ..तू ओरड त्याला."
नीरजने रियाला उचलून घेतले आणि तिघांना घेऊन घरी निघाला ..
अजय तिच्या बेडच्या शेजारी असलेल्या चेअर वर बसला .. अजूनही दोघे एकमेकांकडे बघत होते
मीराने भरल्या डोळ्यांनी त्याला हात जोडले .. तिची हि ऍक्शन त्याला काही कळलीच नाही .. एकदम तिने परके करून टाकले होते त्याला.
अजय ने तीचा जोडलेला हात हातात घेतला
अजय "कशी आहेस ? मी किती घाबरलो .. तुला जरा सुद्धा माझी काळजी नाहीये मीरा .. अशी कशी ग तू .. बायको आहेस म्हणून असा त्रास द्यायचा असतो का ?"
मीरा रडतच " का ? का ? केलेत असे ? मी .. मी नाहीये तुमच्या साठी सुटेबल .. मी एक वि ... (एक हुंदकाच आला ) विधवा आहे ."
अजय " आत्ता माझी बायको आहेस तू .. हेच त्रिवार सत्य आहे .. आणि बास आता .. नको काहीच बोलूस .. मीरा .. मी थकलोय आता .. मला आता जास्त त्रास नको देऊस प्लिज " म्हणतच बेडवर तिच्या शेजारी आडवा पडला.दोघांचेही डोळे भरून वाहत होते
मीरा " अजय , माझा नवरा कसा गेला ? मला काहीच आठवत नाहीये . रोहनचा फोटो पाहिलाय .. पण .. काहीच आठवत नाही .मी काय करू ? मी कोण आहे ? माझा मेलेला नवरा , माझे जन्मदाते आई वडील , मी जन्म दिलेली मुलगी यातले काहीच आठवत नाही .आज रियाला छातीशी लावताना उर भरून आला .. मी कसे तुम्हांला धन्यवाद देऊ .. तुम्ही आमच्या दोघींचा प्राण वाचवलात .. माझ्या सारख्या अभागी स्त्रीला , विधवेला लग्न करून घरात घेऊन आलात.. ती रडत रडत खूप काही बोलत होती तर अजयने तिच्या ओठांवर बोट ठेवले
अजय " शु .. बास आता अराम कर .. मला पण झोप आलीय .. रात्रभर मी जागा आहे "
अजयने तिच्या केसांमधून हात फिरवला .. खाली झुकून तिच्या कपाळावर ओठ ठेवले.
अजय " मीरा ,रिया माझी माझ्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे हे तुला माहित असताना तू माझ्याशी लग्न केलेस ना .मग रिया तुझी मुलगी आहे हे मला माहित असताना देखील मी तुझ्याशी लग्न केले तर यात गैर काय आहे ?आपले एकमेकांवर प्रेम आहे .. यापलीकडे सत्य काहीच नाहीये ."
मीरा " भाऊसाहेब आणि आईंना कळले तर ... "
अजय " त्यांना सगळे माहित आहे . भाऊसाहेबांनी स्वतः तुला सून म्हणून स्विकारले आहे."
मीरा डोळ्यांवर हात ठेवून रडू लागली " मी तुमच्या आयुष्यात येऊन तुमच्या आयुष्याची वाट लावली ."
अजय " मीरा .. नको ना प्लिज ... मला नाही आवडत आहे हे असले बोलणे .. आय लव्ह यु मीरा .. तू बेशुद्ध होतीस तर मरायला आलो होतो मी .. मी रडलोय मीरा आज .. तू किती महत्वाची आहेस माझ्यासाठी काय सांगू .. तुला कळत नाहीये का ?"
थोडा आवाज वाढला त्याचा .. बेचैन झाला होता
अजयने तिथेच बेडवर तिला कुशीत घेतले आणि डोळे मिटले

मेरी बेचैनियों को चैन मिल जाए
तेरा चेहरा जब नज़र आये
तेरा चेहरा जब नज़र आये
मेरे दीवानेपन को सब्र मिल जाए
तेरा चेहरा जब नज़र आये
ज़िक्र तुम्हारा जब जब होता है
देखो ना आँखों से
भीगा भीगा प्यार बेह जाता है
मेरी तनहाइयों को नूर मिल जाये
तेरा चेहरा जब नज़र आये
तेरा चेहरा जब नज़र आये
मे रात दिन ये दुआ करूँ
तेरे लिए मे जियूं मरुँ
चारों पहर तुझे देखा करूँ
मेरा जहाँ ये तुझपे फ़ना करूँ
ज़िक्र तुम्हारा जब जब होता है
देखो ना होंठों पे तेरा एहसास रेह जाता है
मेरे हर रास्ते को मंज़िल मिल जाये
तेरा चेहरा जब नज़र आये
तेरा चेहरा जब नज़र आये
बेरंग हवाएं मुझे ना जाने
दे गयी सदा क्यूँ अभी अभी
है सरफ़रोशी ये आशिक़ी भी
जायेगी जान मेरी इसमें कभी
ज़िक्र तुम्हारा जब जब होता है
देखोना हर लम्हा तेरी दास्ताँ
केह जाता है
मेरी हर एक तड़प को सुकून मिल जाए
तेरा चेहरा जब नज़र आये
तेरा चेहरा जब नज़र आये

🎭 Series Post

View all