मोह मोह के धागे भाग 38

Story Of Love


मोह मोह के धागे भाग ३८
क्रमश: भाग ३७

आपण हॉस्पिटल मध्ये आहोत , ती पेशन्ट आहे याचे त्याला काही नव्हते .. मस्त तिच्याच बेड वर घोरत पडला होता तो .. इतकी गाढ झोप लागली होती त्याला . आणि अजय साहेबांना डिस्टरब करण्याची कोणाची टाप नव्हती ..
एक दीड तासा नंतर नीरज आला .. तर समोरचे चित्र पाहून डोक्याला हात मारून घेतला त्याने ..
डॉक्टर " मिस्टर नीरज , त्यांना उठवता का ? पेशंटला चेक करायचं आहे .. "
नीरज " मी बघतो "
नीरज त्याच्या जवळ गेला .. आणि त्याला हळूच हाक मारून उठवू लागला .. कारण त्याला मीराला जागं करायचं नव्हतं .. पण झाले उलटं मीराने डोळे उघडले आणि कमालीची ओशाळली .. तीच उठली आणि फ्रेश होयला गेली . नर्सच्या मदतीने फ्रेश झाली .. नीरजने घरातून आणलेला गोडाचा शिरा खाल्ला ..मग गोळ्या घेऊन दुसऱ्या बेडवर तिचा सेट अप करून घेऊन .. तिकडे आडवी पडली.
दोन दिवसांनी मीराला डिस्चार्ज मिळाला . अजयने हॉस्पिटल मधून आल्यावर तिला डायरेक्ट त्याच्या रूम मध्ये शिफ्ट केले . कारण घरात भाऊसाहेब आणि आई होत्या .
अजय " मीरा , आता कसे वाटतंय ?"
मीरा " हो .. मी ठीक आहे "
बोलता बोलता तो तिला मदत करायला जात होता तर ती त्याचा स्पर्श तिला कसा कमी होईल हे बघत आहे हे त्याला जाणवले
अजय " मीरा , मी आजारी असताना तू माझं सगळे केलेस .तेव्हा तर आपले ऑफिशिअली लग्न पण नव्हतं झाले . आता तुला मदत करण्याचा माझा हक्क का काढून घेतेय "
मीरा " नाही .. असे काही नाही .. मी ठीक आहे .. मी माझे माझं करू शकतेय "
अजयला जरासा रागच आला .. नक्की कसे वागावं तिच्याशी त्याला कळेना .. तिला माझ्या भावना कळत आहेत कि नाही काय समजत नव्हतं त्याला .. त्यातून चिडचिड होत होती.
जेवताना आज तिचे सगळे लक्ष फक्त रियाकडे होते .. म्हणजे तसे नेहमीच असायचे पण आज तिला नव्याने कळले होते कि रिया तिच्या उदरातून आली आहे .. आपला अंश आहे त्यामुळे आज तिला जेवण भरवताना सुद्धा वेगळेच भाव दिसत होते .. तिचे लक्ष रियाकडे , आणि तिच्याकडे अजयचे लक्ष होते .. त्याला बघूनच कळत होते कि ती आज बायको , प्रेयसी पेक्षा ती फक्त आई आहे .. आपले लेकरू जन्मापासून आता हातात घेतोय असेच काहीसे भाव होते तिच्या डोळ्यात .
रियाला झोपवल्यावर अजयच्या रूम मधेच यावे लागेले तिला .. खूप अस्वथ वाटत होती . आपल्याला एक मुलगी आहे पण आपल्याला मागचे काहीच आठवत नाहीये .. नुसते समोरचा म्हणतोय म्हणून मी रियाची आई आहे असे कसे समजावू मनाला .. तिचे वडील नक्की कसे होते ? त्याचा मृत्यू कसा झाला असेल ?"
रूम मध्ये येरझाऱ्या घालताना बघून त्याने न राहवुन विचारले .
अजय " मीरा , तुला काही बोलायचंय का ? मला तू अशी अस्वथ का वाटतेय ?"
मीरा " मला .. सगळं माहित करून घ्यायचंय .. माझ्या बरोबर काय झाले होते ? मी नक्की कोण आहे ? मी तुमच्या आयुष्यात कशी आले सगळे सांगाल का मला ? म्हणजे ते .. रोहनचा मृत्यू कशामुळे झाला .. आम्ही कुणीकडे रहायचो .. नक्की काय झाले होते तेव्हा ?"
अजय " हे .. रिलॅक्स ... इतकी हायपर नको होऊस .. आताच आजारातुन उठलीय तू "
मीरा " अजय .. प्लिज तुम्ही मला न्याल का माझ्या भूतकाळात प्लिज "
अजय " ठीक आहे .. पण मला आपल्या दोघांत सगळे क्लिअर पाहिजे "
मीरा " म्हणजे ?"
अजय " म्हणजे ? तू आपल्या दोघांच्या नात्या बद्दल काय विचार करतेय हे मला जाणून घ्यायचे आहे."
मीरा जरा गप्पच बसली
अजय " बोल ना मीरा "
मीराने पुन्हा त्याच्या समोर हात जोडले
मीरा " तुम्ही . खूप महान आहात .. तुमचे विचार पण पुढारलेले आहेत . तुमचे आई वडील तर त्याहून पुढारलेले आहेत .. पण . मी एक विधवा आहे .. जिने नवरा गेल्या नंतर साधे दहा दिवसाचे सुतक सुद्धा पाळले नाही .त्याच्या जाण्याचे दुःख सुद्धा मोकळे पणाने केले नाही .. उलट इकडे महालात राहून आयुष्य एजनॉय करतेय असे वाटतेय मला .. तुमच्या उपकाराची परतफेड कशी करू असे झालंय मला ?"
अजय भयानक संतापत होता मनातून .. पण काही करू शकत नव्हता
अजय " ठीक आहे .. उद्या सकाळी तयार रहा .. तुला मी तुझ्या घरी घेऊन जाईन. "
मीराने हलकी मान हलवली आणि बेडवर झोपायला गेली .
अजय " एक मिनिट माझे बोलणे पूर्ण झाले नाही ."
मीरा " हा बोला "
अजय " रिया इथून कुणीकडे कधीच जाणार नाही . तुझ्यावर मी जबरदस्ती करू शकत नाही कारण तू स्वतः एक अडल्ट आहेस .. तुझे निर्णय घेण्याचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे तुला . आणि तू घेतलेला निर्णय जरी मला आवडला नसला तरी मान्य करावाच लागेल .. "
मीरा " तुमचे खूप उपकार झाले माझ्यावर कि माझे शील तुम्ही अजूनही जपून ठेवलेत . तुम्ही खरोखर निस्वार्थी पणाने माझ्याशी नातं निभावले आहे ."
अजय " माझे प्रेम आहे मीरा तुझ्यावर .. प्रेम कधीच ओरबाडून , जबरदस्तीने ओढून ताणून नाही मिळवू शकत मी इतके संस्कार तर नक्कीच आहेत माझ्यावर."
मीरा " खरंतर , उपकार म्हणून तुमच्या प्रेमाचा मी अपमान करतेय झालेच तर मला माफ करा . मी तुमच्या योग्य नाही हे त्रिवार सत्य आहे जे माझे मन मला ओरडून ओरडून सांगतंय."
अजय " ठीक आहे .. जशी तुझी ईच्छा "
----------------------------
दुसऱ्या दिवशी सकाळी अजय आणि मीरा दोन दिवस बाहेर जात आहे असे सांगून आणि रियाची जवाबदारी भाऊसाहेबांवर टाकून निघाले .
संपूर्ण रस्त्यात अजय काहीच बोलला नाही . दोन एक तासांनी त्याने एक ऍम्ब्युलन्स त्याच्या मागे मागे बोलावून घेतली ..
मीराला घेऊन तो रोहनच्या घरी आला .. कदाचित मीरा इथे आल्यावर तिला तिचा भूतकाळ आठवेल .. किंवा ती धक्क्यात जाऊन बेशुद्ध झाली तर म्हणून ऍम्ब्युलन्स पण होती मागे .
घर जवळ आल्यावर मीरा नाही पण अजयच्या डोळ्यांसमोर तो दिवस आणि तो प्रसंग सर सर आला .. रोहनचा रक्तात माखलेला चेहरा आठवताच त्याने आपोआप डोळे मिटले ..
मीरा " कुणीकडे आलोय आपण ?"
अजय " हे तुझे आणि रोहनचे घर आहे .. या घरात तुम्ही दोघे राहत होतात. "
त्याने दरवाजा उघडून दिला .. तो बाहेरच थांबला .. पण ती मात्र पटकन आत गेली .. पटपट सगळ्या खोल्या तिने बघितल्या .. सगळे परकं .. काहीच ओळखीचे वाटत नव्हतं ..इथे या आधी कधी आलेय असे सुद्धा वाटे ना ."
बेडरूम मध्ये एक ठिकाणी तिची नजर खिळली
भिंतीवर रोहन आणि तिचा ती प्रेग्नंट असताना काढलेला खळखळून हसतानाच फोटो होता .. रोहनचा हात तिच्या पोटावर होता आणि दोघे आनंदात हात होते एकमेकांकडे बघत ..
ह्या फोटोत आपण आहोत .. नक्की आपणच आहोत ना .. इथं पासून प्रश्न पडले होते तिला .. काहीच आठवत का नाहीये ? या विचाराने डोळे वाहू लागले होते
बाजूला असलेले कपाट तिने सहज उघडले .. तर समोर त्या दोघांचे कपडे होते काही छोट्या मोठ्या वस्तू होत्या ज्या कि तिला अपरिचित होत्या.
एका ड्रॉवर मध्ये तिला एक डायरी दिसली .. तिने ओघातच ती डायरी काढली आणि वाचू लागली
-----------------
आज कॉलेज मध्ये माझ्यावर रॅगिंग होत होते .. त्या वात्रट मुलांनी मला इतके परेशान केले होते कि माझ्या कपड्यांवर आले होते . ग्राउंड वर मला माझ्या अंगावरचे कपडे उतरवायला सांगत होते .. मी हि तसा लेचा पेचा नाहीये पण त्या १० /१२ टारगट मुलांसमोर माझा निभाव लागेना . शेवटी मी शर्टची बटन काढायला लागलो आणि ते सगळे टाळ्या वाजवू लागले एकेक बटन काढत मी शर्ट काढला .. त्यावर त्यांचे समाधान झाले नाही आता पॅन्ट हि काढ म्हणून प्रेशराइज्ड करू लागले .. तेवढयात तिथे जीप मध्ये बसून दोन चार अजून टारगट मुले आली .. हि मुलं त्यात आणखी हि मुलं ती हि श्रीमंत म्हणजे आता मला बहुदा निर्वस्त्र करूनच सोडतील असे वाटून घाबरलो मी .
पण झाले वेगळेच त्या जीप मधून उतरलेला मुलगा त्या टारगट मुलांना नडला आणि त्या रॅगिंग मधून त्याने मला वाचवले ..
मी हात जोडून धन्यवाद दिले त्याला ..
तो " काय नाव रे तुझे ?"
मी " रोहन "
तो " न्यू ऍडमिशन ?"
मी " हो "
तो " कुठचा आहेस ?"
मी " ****** गावाचा ."
तो " मग आता इथे कुणीकडे राहतोय ?"
मी " अंगण अनाथ आश्रमात मुलांना शिकवतो त्यामुळे तिकडेच राहतो."
तो " नुसता अभ्यास करून नाही चालत आजकालच्या जमान्यात .. जरा बॉडी बिडी पण कमव .. काय आई बापाने काही शिकवलं नाही का ?"
मी " नाहीये कोणी मला ? मी लहानाचा मोठा अनाथ आश्रमातच झालोय .. "
तो " चल , माझ्या घरी येतोस का ? "
मी " नको बोललो " पण मनातून असे वाटले कि ह्याची साथ सोडू नये."
तो "अरे चल रे जरा आखाड्यात उतरवतो तुला .. आपली पर्सन्यालीटी अशी असली पाहिजे कि लोक बघून घाबरली पाहिजे."
नाही होय म्हणता म्हणता मी घरी गेलोच त्याच्या ..

🎭 Series Post

View all