मोह मोह के धागे भाग 39

Story Of Love


मोह मोह के धागे भाग ३९
क्रमश : भाग ३८
त्याची आई , बाबा खूपच चांगले .. घर बघूनच सुबत्ता दिसत होती .. कशाचीच कमतरता नव्हती .. सगळी माणसं कशी आनंदात होती ..मागच्या अंगणात गाई म्हशी ओरडत होत्या .. आणि त्याच्या बाजूला कुस्तीचा आखाडा होता ..
त्याच्या आईने मला प्रेमाने जेवायला दिले .. मी पण अधाशा सारखा जेवलो .. खूप जेवलो "
थोड्या वेळाने तो माझ्या समोर एकदम लाल लंगोट घालून आला .. आणि त्याच्या धष्ट पुष्ट मांडीवर जोर जोरात हात मारून मला म्हणत होता " चल , आखाड्यात."
मी मनातच घाबरलो " हे असले कपडे घालून कसे काय ?" खूप लाज वाटत होती "
त्याने काहीच ऐकले नाही पण मी हि अडून राहिलो .. आखाड्यात येईन पण कपडे हेच ठेवेन
मग तो आणि त्याचे मित्र जोर जोरात हसले
तो " अरे लाजतोस काय मुलींसारखा ?"
आज पहिलाच दिवस होता म्हणून मी बाहेरूनच तो कशी प्रॅक्टिस करतो हे बघून संध्याकाळचा आश्रमात आलो .. पण आज छान वाटतं होते .. मला एक मित्र भेटला होता .. मला एक कुटुंब भेटले होते ..
तर असा हा माझा मित्र -- हेरंभ .. माझ्या आयुष्यात आलेलं एक वादळं "
हो वादळ सारखाच आहे तो .. जर मनात आणले तर सगळे जग नष्ट करण्याची ताकद आहे त्याच्या जवळ शिवाय जोडीला पैसाही आहे .. मी मित्र तर मानला बाबा त्याला
पुढे असेच दोन तीन दिवस कॉलेज सुटल्यावर त्याच्या जीप मध्ये बसून त्याच्या घरी जायचो , भरपेट जेवायचो . आणि थोडे घाबरत घाबरत आखाड्यात उतरायचो .. पण हे सगळे माझे काम नाही हे माझ्या मनाने मला कौल दिला होता .. कुस्ती वगैरे शक्यच नाही .. त्यापेक्षा गणितं सांगा .. पटपट सॊडवून दाखवेन " असे मी त्याला बोललो .. पण ऐकतोय कसला
आज त्याने मला शेवटी लंगोट घालायलाच लावली .. मी नवी नवरी सारखा लाजत अंगावर टॉवेल टाकत बाहेर आलो .. माझे गोरे श्रीश बघून त्याच्या मित्राने शिट्या वाजवल्या .. नालायक कार्टी .. पुरुष्या सारख्या पुरुष पण लाजवतात
हेरंब ओरडला तशी ती पोर गप्प बसली .. मग मी अलगद मातीत उतरलो .. आणि तेवढयात ..
एक मुलगी धावत आली आणि हेरंबच्या गळ्यात पडली
ती " दादा .. दादा .. मला बक्षीस मिळाले .. कसली तरी ट्रॉफी होती तिच्या हातात.
हेरंब " अरे वाह !! मीनाक्षी !! काँग्रट्स .. शाब्बास !! अशीच प्रगती कर .. खूप अभ्यास कर "
ती " दादा , मला ना फक्त गणितात प्रॉब्लेम आहे बाकी सगळे येत .. त्यामुळे माझा नंबर जातो "
हेरंब ने काहीतरी विचार केला आणि माझ्याकडे बघितले.
मी कावरा बावरा झालो होतो एका मुली समोर मी चक्क लंगोट मध्ये उभा होतो .. आणि हा मला नेमका हाक मारत होता
हेरंब " रोहन , हि ला गणित शिकवायचं काम तुझं "
मी समोर टॉवेल कसा बस पकडून माझी इज्जत वाचायचा प्रयत्न करतोय हे हेरंबच्या नाही पण मीनाक्षीच्या लक्षांत मात्र आले होते .. आणि ती मला बघून खळखळून हसू लागली
पिस्ता कलरचा ड्रेस , सिल्वर मोठे कानातले , आणि डाळींब सारखे दात दाखवत ती माझ्याकडे बघून बघून हसत होती
मी शरमेने मान खाली घातली
हेरंब जोरात ओरडला तिला " मीनाक्षी , बावळट .. चल चालायला लाग इथून "
आणि .. भर भर डोळे वाहू लागले तिचे .. रडू लागली .. मी तिरप्या नजरेने तिला बघत होतो .. काळेभोर बोलके डोळे रडून लाल झाले होते , डोळ्यातले काजळ पसरले त्याने आणखीनच सुंदर दिसत होती ती .. एकटक मी कसा काय ते बघतच बसलो तिच्याकडे
ती " दादा .. "
हेरंब " जा म्हणतो ना "
मी " राहू दे रे .. ओरडू नको " म्हणे पर्यंत मी सरळ जाऊन कपडे घालूनच आलो बाहेर
मी " हेरंब , हे कुस्ती बिस्ती मला नाही रे जमत ,प्लिज नको मला हे नाही करता येणार .. " आणि मी निघालो बाहेर
तर जिन्याने वर जातांना तिने मला चक्क वेडावून दाखवले .. चकणे डोळे , जीभ बाहेर , आणि हात दोन्ही डोक्याच्या शेजारी ठेवून बोटं हलवून वेडावून दाखवले
ती " तुझ्यामुळे दादा मला ओरडला .. हुम्म्म्म .. "म्हणतच टुणकन उडी मारत वर निघून गेली
धड धड .. धड धड ... हृदय उड्या मारू लागले .. अचानक काय होतंय मला काही कळेच ना "
कोणत्या तरी धुंदीत बाहेर पडलो .. तिकडून पण तिचा चेहरा डोळ्यांसमोरून हले ना "
------------------------------------------------------
कसलासा आवाज झाला म्हणून तिने मागे बघितले तर अजय होता
अजय " तू ठीक आहेस ?"
मीरा " हो "
अजय " फार रात्र झाली तर इथेच रहावे लागेल "
मीरा " तुम्ही गेलात तरी चालेल .. मी इथेच राहीन म्हणते "
अजय " मूर्ख आहेस का तू ?"
मीरा " अजय , आधीच तुम्ही माझ्यासाठी खूप केलंय .. मला अजून त्रास नाही द्यायचाय तुम्हांला "
अजय " मी बाहेर आहे " आणि रागातच बाहेर गेला .. कार चालू झाल्याचा आवाज आला .. म्हणजे तो निघून गेलाय हे तिला कळले

अजय निघून गेल्यावर जराशी भीती वाटली तिला .. पण आता घाबरून चालणार नाही आपल्याला एकटं राहायची सवय केली पाहिजे .. लवकरात लवकर अजय च्या आयुष्यातून आपली काळी सावट बाजूला झाली पाहिजे .. म्हणजे तो छान आणि मोकळे आयुष्य जगेल .. माझे त्याच्यावर प्रेम आहे खूप आहे .. पण म्हणून मी स्वार्थी नाही बानू शकणार .. त्याचे कल्याण हे माझ्यापासून दूर राहण्यातच आहे ..

आधी मी वेगळी होईन आणि मग रियाला हि लांब करेन त्याच्या पासून .. असा विचार करत होती ती

घरात एकटीला भीती वाटू लागली म्हणून बाहेर हॉल मध्ये येऊन बसली .. दार बंद आहे ना नीट चेक केले आणि बसली

डायरी हातातच होती आणि ती वाचू लागली

------------------------
खरंतर पुन्हा त्याच्या घरी जायचे नाही असे ठरवून आणि सांगून बाहेर पडलो होतो पण .. रात्रभर त्या चेहऱ्याने मला झोपूच दिले नव्हते .. तिच्या चेहऱ्याला पुन्हा पाहण्याची जणू ओढ लागली मला .. आणि मी त्यांच्या घरी पोहचलो .. पण आज दार बंद होते .. मी दरवाजा वाजवला तर आतून आवाज आला
"कोण ?""
मी "मी . रोहन . हेरंब चा मित्र "
ती "दादा , नाहीये घरी . तुम्ही उद्या या "
मी "हो चालेल .. तसे हेरंब कुणीकडे आहे ?"
आतून काहीच आवाज आला नाही .. मी म्हटले काहीतरी प्रॉब्लेम आहे .. आज एवढं सगळे घर बंद कसे काय ? आणि आवाज पण नीट येत नव्हता काहीसा रडवेला वाटला .. मी तिथेच बसून राहिलो .. म्हंटले थोडा वेळ थांबून घेऊ ..
मला हेरंबने मागच्या दारातून कसे आत यायचे ते दाखवले होते .. मी म्हटले एकदा आत जाऊन बघू का ? कारण हेरंबची जीप इथेच होती.. मग हा जीप न घेताच कसा बाहेर गेला ..
मागच्या दाराच्या फटीतून आत बघितले तेव्हा मला दिसले कि काही लोक हातात चाकू सुऱ्या घेऊन घरात दिसत आहेत .. आणि हेरंबला दोरीने खांबाला बांधले .आहे.. दरदरून घाम फुटला मला कारण हा दरोडखोराचा हमला होता त्यांच्या घरावर .. आज काल पेपर मध्ये सारखे येत होते दिवसा ढवळ्या घरात दरोडेखोर घुसत आहेत .. दाग दागिने ,तर नेतातच पण बाई माणसाला पण घेऊन जातात .. पुरुषांना दगडाने ठेचून मारतात ..
मी एकटा काय करू शकणार होतो .. मी लगेच धावत गावातल्या लोकांना बोलावले , कोणीतरी धावत जाऊन पोलिसांना कळवले .. पोलीस आल्यावर प्लॅन करून आम्ही मागच्या दारानी आत मध्ये घुसलो .. आणि पोलिसांनी गोळीबार करून त चौघांना ठार केले .. पण एक जण फरार झालाच त्या चकमकीत ..
आधी हेरंबळ सोडले .. एका रूम मध्ये आईला आणि बाबांना आणि मीनाक्षीला ठेवली होती .. तिच्या पण चेहऱ्यावर व्रण होते .. म्हणजे तिलाही त्यांनी मारले असावं असे वाटत होते ..
हेरंब एकदम त्या दिवस पासून शांतच झाला .. आपल्या घरातल्या लोकांना आपण वाचवण्यास असमर्थ आहोत असे वाटून तो दारू प्यायला लागला .. त्यांच्या घराला आता आधाराची गरज होती .. सगळेच घाबरले होते ..
मी तो आधार द्यायचे माझे कर्तव्य मानले .. मी मुद्दामून घरी जात राहिलो , त्यांना कधी स्वतःच्या हाताने बनवून खाऊ घालू लागलो , मीनाक्षीचा अभ्यास घेऊ लागलो . हळू हळू त्याच्या घरातला एक मेंबर झालो ..
पण हेरंब मात्र दारूच्या आहारी गेला .. तो घरापासून दूर जाऊ लागला .. मी समजवण्याचा प्रयत्न केला .. पण त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला
तितक्यात दार वाजले ..
अजयने खाण्याचे पार्सल आणले होते .. किचन मध्ये जाऊन स्वतः सामान घेऊन आला .. घर सांभाळण्यासाठी एक केअर टेकर ठेवली होती त्यामुळे घर स्वच्छ होते राहू शकेल इतके , शिवाय बेसिक भांडी कुंडी पण होती किचन मध्ये .
तिला प्लेट मध्ये दिले आणि स्वतःला पण घेतले
अजय "खाऊन घे."

🎭 Series Post

View all