क्रमश : भाग ३९
मीरा काही खायला प्लेट घेईना .. उगाच नको तिथे हट्ट करत होती . अजयचे पेशन्स ट्राय करत होती ..
अजयने सरळ शर्टच्या बाह्या फोल्ड केल्या .. आणि तिच्या पुढे घास पकडला आणि डोळ्यांनीच तिला खा म्हणून बोलला
त्याच्या नुसत्या एवढ्या ऍक्शनने मीराचे डोळे डबडबले
अजयने पुन्हा एकदा डोळ्यांनी खायला सांगितले आणि तिनेही आ केले ..
नेहमी ऑफिसला ती डबा घेऊन जायची आणि हा लहान मुलांसारखा तिच्या हातून जेवायचा आज तिनेही हा हट्ट करून बघितला ..
सगळे जेवण तीने असेच उरकलं ..
अजय " मी घरी फोन केला होता .. रिया छान रमलीय .. तिच्याशी खेळायला शंतनू आला होता .शिवाय भाऊसाहेब आणि आई आहेतच .. आपल्याला आज इथेच राहावं लागेल ..
मी पलीकडच्या रूम मध्ये बसतो .. माझी एक मिटिंग आहे ..
बॅग्स आतमध्ये आणून देतो .. तुला कुठे कम्फर्टेबल आहे तिकडे तू झोपू शकतेस .. आराम कर .. ठीक आहे ?"
मीराने मान हलवून होकार दिला
अजय स्वतः चे जेवण जेवता जेवता बोलत होता
अजय " उद्या सकाळी लवकर उठ .. एक काम आहे .. आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी .. रियाला घेउन भाऊसाहेब पण तिकडे येणार आहेत .. "
मीरा " कुणीकडे जायचंय ?"
अजय " ते कळेल उद्या तुला .. फक्त सकाळी साडी नेसून तयार हो "
मीरा " कोणत्या मंदिरात वगैरे जातोय का आपण ?"
अजय " सांगतो उद्या .. तसेच काहीसे आहे असे समज "
मीरा " ठीक आहे "
मीरा उठली आणि रोहन आणि तिच्या बेडरूम मध्ये गेली ..
तिने अजय ज्या रूम मध्ये बसणार होता त्या रूम मध्ये तिने स्वतःहून यावे असे त्याला वाटत होत पण ती तिकडच्या रूम मध्ये गेली\"
मीरा पुन्हा तो डायरी घेऊन वाचू लागली
------------------------
रोहनची डायरी
"अनाथ आश्रमात सगळे जण नऊ वाजताच झोपून जायची .. मग मी माझा अभ्यास करत बसायचो नेहमी .. पण हल्ली मीनाक्षी मला एकांतात असताना आठवायची .. तिचे डोळे खूप आवडायचे मला .. सतत तिच्या डोळ्यांत बघत बसावे असे वाटायचं .. आज तर चक्क डोळे मिटले कि तिचा चेहरा बेचैन करत होता .. नकळत मी तिच्याकडे ओढला जातोय हे मला कळत होते पण आपल्या जवलंग मित्राची बहीण आहे ती , परिस्थितीत फरक आहे .. जाती मध्ये फरक आहे .. हे सत्य माझे प्रेम फुलायचा आधीच मनात कोमेजून जायचे .. तिचा विचार झटकायचा प्रयत्न करत होतो .. आणि म्हणूनच २ दिवस मी त्यांच्या घरी गेलो नाही .. तर आमचा एक मित्र सोमेश्वर .. मला सांगून गेला कि मीनाक्षीचं आणि त्याचं लग्न हेरंबने ठरवलंय .. लवकरच लग्न लावून देणार आहेत .. बातमी ऐकून एकदम चर्र झाले .. काहीतरी हरवल्या सारखे वाटू लागले .. खूप एकटं एकटं वाटतंय आज .. डोळे भरून आले .. माझे अबोल प्रेम फुलण्याआधीच कोमेजले होते .. इतका हतबल निर्बल आहे मी कि जिच्यावर प्रेम केलं तिला सुद्धा सांगितले नाही .. "
पुढच्या पानावर
प्रिंसिपल सरांचे मानावे तितके उपकारच म्हणायचे .. मी केलेला सॉफ्टवेअर त्यांनी कॉलेज साठी विकत घेतला आणि चक्क मला ३ लाख आज मिळाले ..
आता ह्याच पैशांत मी माझे ऑफिस सेट करेन .. बिझनेस सेट करेन ..
थोड्याच दिवसात माझी स्वतःची एक सॉफ्टवेअर कंपनी असेल .. किती आनंद होतोय मला हे लिहताना ..काश मीनाक्षी असती माझ्या आयुष्यात .. आज जेव्हा कॉलेजमध्ये गेलो होती तेव्हा मीनाक्षीला पाहिले .. मला बघून जी नेहमी गोड हसायची ती .. तिने आज चक्क मान खाली घालून रागाने बघून निघून गेली .. तिला काहीतरी मला सांगायचं होत .. ती रागावलीय माझ्यावर असे का वाटले मला ..
देव तिच्या सगळ्या ईच्छा पूर्ण करो .. एक सुंदर आयुष्य ती जगो .. सर्व सुख , ऐश्वर्य तिला लाभो .. हीच साधी अपेक्षा आहे माझी ..
पुढील पानावर
आज मीनाक्षीचा आणि सोमेश्वरचा साखरपुडा होणार आहे .. सोमेश्वर आणि हेरंब स्वतः मला घ्यायला आले होते .. पण मी काहीतरी कारण सांगून टाळले .. नाही जायचं मला .. नाही पाहू शकत मीनाक्षीला दुसऱ्याची होताना ..
मी डायरी लिहायला बसलो खरा .. रात्रीचे १० वाजले होते .. माझ्या रूमचे दार वाजले .. मी दार उघडले तर बाहेर हेरंब आणि सोमेश्वर दोघे भयानक रागात माझ्याकडे बघत होते . मला बघताच दोघांनी माझी कॉलर पकडली आणि मला खेचून बाहेर ओढले आणि दोघे मला मारू लागले
काय होतंय मला काहीच समजेना .. एक दोन वेळा मी स्वतःला वाचवले आणि विचारले
" अरे का असे करताय ? का मारताय ? "
सोमेश्वर " तुझी हिम्मत कशी झाली ?"
हेरंब " साल्या .. तुला माझ्या घरात नेला .. माझा मित्र म्हणून तू तर माझ्या बहिणीवर डोळा ठेवलास ?"
मला काहीच कळे ना हे दोघे काय बोलतायत ?”मी काही नाही केलंय .. अरे प्लिज .. नीट बोलता का ?"
हेरंब " मीनाक्षी कुठे आहे ? कुठे पळवून , लपवून ठेवलीय .. बोल .. नाहीतर जीव घेऊन मी तुझा ? बोल ? हेरंब जोरात ओरडला
मी " काय बोलतोय हेरंब .. मला खरंच काही माहित नाही .. मी आज रूम मधून बाहेरच पडलो नाहीये "
हेरंब " खोटं बोलू नकोस .. मला माहितेय मिनाक्षीचं तुझ्यावर प्रेम आहे .. तीने स्वतः माझ्या समोर कबूल केलं होते ..तुझ्या सारख्या अनाथ , भिकारड्या , आणि खालच्या जातीच्या पोरा बरोबर लग्न नाही लावायचे म्हणून ह्या सोमेश्वरला हात जोडले आणि लग्न करायला सांगितले .. सोमेश्वर माझ्यासाठी मीनाक्षीची लग्न करायला तयार झाला .. पण नालायक माझी बहीण तुझ्या बरोबर पळून नाहीशी झाली .. बोल .. बोल कुठे आहे मीनाक्षी .. " बोलतच त्याने पुन्हा माझी कॉलर पकडून गळा धरला .. पण मी मात्र सुन्न झालो होतो .. माझे मीनाक्षीवर प्रेम आहे तेही एकतर्फी आहे हे मी जाणून होतो .. पण तिचेही माझ्यावर प्रेम आहे हे मला आत्ता अशा पद्धतीने कळलं
हेरंब मला किती तरी वेळ मारत होता .. पण मी ह्या जगात नव्हतोच .. मी मीनाक्षीच्या आठवणीत गेलो होतो .. मीनाक्षीचे डोळे मला सांगू पाहत होते कि तू पुढाकार का घेत नाहीस ? आणि मी ते समजू शकलो नाही .. कुणीकडे गेली असेल ती ? कोणत्या संकटात असेल ? अशा काहीश्या विचारात मी हेरंबचा मार खात होतो .. ती शिक्षा मला हवी हवीशी वाटत होती .. ह्याच लायकीचा आहे ..
शेवटी मारून मारून थकल्यावर हेरंब आणि सोमेश्वर निघून गेले .. जाताना .. माझी सगळी रूम धुंडाळून गेले होते .. त्यांना अर्थातच काहीच तिकडे मिळाले नाही ..
--------------------------
मी बेशुद्ध पडलो होतो .. अनाथ आश्रमातल्या माझ्या रूम मधल्या बेड वर होतो .. शुद्ध यायला लागली होती ..
आश्रमातल्या लोकांनी डॉक्टरांची ट्रीटमेंट करून मला जिवंत ठेवले .. आज बहुदा दोन दिवसांनी डोळे उघडले होते ..
डोळे उघडताच सर्वात पहिले आठवण आली ती मीनाक्षीची .. काय झाले असेल तीच ? लग्न झाले असेल का ? सोमेश्वर आणि हेरंब ला ती भेटली असेल का ?"
तेवढयात माझ्या समोर पाण्याचा ग्लास घेऊन एक नाजूक हात समोर दिसला .. मी पाणी नाही पण त्या हाताला पाहिले आणि मग चेहरा .. मी ताडकन उठूनच बसलो
माझ्या समोर मीनाक्षी उभी होती
मी " तू ? इथे ?"
मीनाक्षी काहीच बोलली नाही .. पण अनाथ आश्रमातले काका आणि काकू मात्र हसू लागले आणि रूम बाहेर निघून गेले
मी " तू इथे कशी ? आणि हेरंबने सोडले कसे तुला ? तो सोमेश्वर जीव घेईल तुझा ? तू जा ... तूझे लग्न होते ना ?"
मीनाक्षी " मी तुला माझा नवरा मानलाय .. माझ्याशी लग्न करशील आज आता , इथे ?"
मला काही समजे ना .. हि काय बोलतेय ? मी काय स्वप्नात आहे कि काय असे काहीसे वाटू लागले मला
मीनाक्षी " दादा त्या सोमेश्वर जवळ लग्न लावत होता ...माझे प्रेम आहे तुझ्यावर .. तुझ माझ्यावर प्रेम आहे माहितेय मला .. तुझ्या डोळ्यांत पाहिलंय मी .. मी घरातून पळून आले .. आश्रमातल्या गोठ्यात दोन दिवस लपले होते .. कोणालाच माहित नव्हते मी कुणीकडे आहे ते .. काल काकूंनी मला गोठ्यात पाहिले आणि मला तुला शुद्ध येऊ पर्यंत इथेच ठेवून घेतलं ..
मी " हेरंबला आपले लग्न मान्य नाही होणार .. आणि तो बोलतोय ते खरं आहे .. सोमेश्वर इतका उच्च कुळातील मी नाहीये .. तेवढा श्रीमंत हि नाहीये .. कदाचित तुझ्या दादाने तुझ्यासाठी योग्य निर्णय घेतला असेल .. मी .. "
मीनाक्षी जोर जोरात रडायला लागली .. "तुला पण मी नकोय ना .. म्हणून अशी कारणं सांगतोय ना .. मी .. जातेच आता जीवच देते .. त्या सोमेश्वर बरोबर लग्न करण्यापेक्षा मी मरून जाईल "
असे म्हणून ती रूम बाहेर जाऊ लागली .. मी पटकन बेडवरुन उठलो आणि तिचा हात धरला
ती रडत होती .. आणि मला सहन होत नव्हते ..
मी " सॉरी .. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर . पण हेरंब माझा मित्र आहे .. आपले नाते तो कधीच स्वीकारणार नाही .. तुला समजतंय का मी काय बोलतोय ते "
मीनाक्षी " मला सोमेश्वर जवळ लग्न नाही करायचे .. त्याची भीती वाटते मला .. त्याची नजर माझ्या शरीरावर जास्त असते .. मला नाही करायचं त्याच्याशी लग्न .. दादाला आईला बाबांना सांगून थकले पण कोणीही ऐकत नाही .. आणि तू .. तुला माहिती असूनही तू पुढाकार घेतला नाहीस .. तू का असे केलंस .. आय हेट यु .. म्हणत ती माझ्या छातीवर तिच्या नाजूक हाताने मारू लागली ..
दोन्ही हात हातात पकडून मी तिला घट्ट मिठीत घेतले .. " आय लव्ह यु .. आय लव्ह यु "

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा