मोह मोह के धागे भाग 41

Story Of Love
मोह मोह के धागे भाग ४१
क्रमश : भाग ४२

तिला मिठीत घेतले असतानाच काकू आल्या ..
काकू " चला .. आता आपण उद्या तुमच्या दोघांचे आधी लग्न लावून देऊ .. मगच बोला "
मी तिच्या डोळ्यांत बघितले .. रडून रडून लाल झालेल्या डोळ्यांत पण एक आनंदाची लहर आणि होकार होता .. तिच्या कपाळावर किस करायची ईच्छा झाली होती पण काकू तिथे होत्या ..
दुसऱ्या दिवशी अनाथ आश्रमात अत्यंत साधे पणात पण विधिवत लग्न लागले . प्रिन्सिपल सरांच्या मदतीने एका आड गावात एक बंगला मला रेंट वर मिळाला .. बंगला प्रशस्थ होता पण खूप लांब होता .. हेरंब विचारही करू शकणार नाही अशा ठिकाणी होता .. मागे मोठा मस्त असा वॉटरफॉल होता .. निसर्गाने वेढलेला असा सुंदर बंगला आता आमचं दोघांचं घर होत ..ज्यात मी राजा आणि ती माझी राणी होती ..
ती किती खुश आहे हे नुसत्या तिच्या डोळ्यांत बघूनच कळायचं मला .. एकेक वस्तू ..एकेक काम किती आनंदात आणि जीव ओतून ती करायची .. माझी तर सेवा म्हणजे काय बघायलाच नको .. कपडे जेवण , खूपच लाड करायची ..
मी खूप मेहनत करत होतो .. जगातली सगळी सुखं मला तिच्या पायात द्यायची होती ..आणि ती खरंच धनलक्ष्मी आहे .. मला खूप काम मिळत होते .. माझि कंपनी बाजारात मोठी होत आहे .. मोठं मोठ्या बिझनेस कॉन्फरन्सला बोलावण येत आहे.. सगळे सगळे मीनाक्षीसाठी आणि तिच्या पायगुणामुळेच होत आहे .. माझ्या सारखा सर्व सामान्य मुलगा एक बिझनेसमॅन म्हणून नवा रुपाला येत आहे . इन्वेस्टर्स मिळत आहेत .. खूप आनंदात आहोत दोघे .. कोणाची नजर लागू नये माझ्या आणि मीनाक्षीच्या संसाराला
-----------------------
आज मीनाक्षीला तिची मैत्रीण भेटली होती बाजारात तिने तिला सांगितले कि तिचा भाऊ आणि आई वडील खूप दुःखात आहेत .. मीनाक्षीने पळून लग्न केले म्हणून गावात लोक नाव ठेवत आहे त्यांना .. बाबांचे राजकारणातले नावही खराब झालेय .. हेरंब तर खूपच दारु प्यायला लागलाय .. मीनाक्षीला खूप वाईट वाटत होते . आपल्यामुळे आपले आई वडील आज खूप दुःखात आहेत हे कळल्यावर खूप रडत होती .. मी तरी काय करु शकणार होतो .. मी तिला समजावले .. आपण भेटायला जाऊया का ? पाहिजे तर आपण माफी मागून येऊ .. म्हणजे थोडे बरे वाटेल .. पण ती नाही म्हणते .. तिला वेगळीच भीती आहे .. एक तर हेरंब मला बघताच माझ्या जीवावर येईल आणि तेच तिला नको होते
मी " मीनाक्षी .. नको टेन्शन घेऊ .. आधी चिडेल तो पण नंतर माफ करेल तो .. माझाही मित्र आहे .. आणि आपल्याकडे एक गुडन्यूज पण आहे .. तो मामा बनणार आहे हे आपण त्याला सांगितले तर तो खुश होईल "
मीनाक्षी " तो साधा सुधा मामा नाहीये तो कंस मामा आहे .. तू .. एक काम कर आपण हा देशच सोडून जाऊ .. मला भीती वाटते .. आपण जर त्याच्या तावडीत सापडलो ना तर तो दोघांनाही मारून टाकेल "
कितीही तिला समजावले तरीही तिची भीती जातच नव्हती .. आणि आता आठव्या महिन्यात तिला असे घरात घाबरून बघून मला नकोसे वाटत आहे .. म्हणून आता मी पण हेच ठरवले आहे कि हा सगळा बिझनेस कोणा मोठ्या बिझनेसमॅनला विकतो जे काय १०/२० लाख मिळतील ते घेतो आणि मीनाक्षीला घेऊन कॅनडाला शिफ्ट होईन ..
----------------------------
मागच्या महिन्याच्या कॉन्फरन्स मध्ये मला अजय सरपोतदार दि ग्रेट बिझनेसमॅन भेटला होता .. चांगला मित्र झाला .. मला वाटतं तो माझा बिझनेस विकत घेऊन मला २० लाख पर्यंत पैसे देऊ शकेल
त्याला फोन करून बोलावू का ?येईल का तो माझ्याकडे ? मला मदत करेल का ? त्याने जर मदत केली तर नक्कीच मी लवकरात लवकर मीनाक्षीला घेऊन कॅनडात जाईन .. कॅनडात मला जॉब पण आहे .थोडे दिवस नोकरी केली कि मग तिकडे सेट होईल .. पासपोर्ट पण तयार झालेत .. मीनाक्षीला नववा महिना लागलाय .. बहुदा बेबीला घेऊनच तिकडे जावे लागेल .. पण तोपर्यंत अजय जवळ हि डील झाली तर किती बरें होईल .. मी माझी मीनाक्षी आणि आमच्या कुशीत आमचे बेबी .. क्युट फॅमिलीला घेऊन कॅनडात जाईन ..
विचार करूनच छान वाटतंय .. हे देवा.. प्लिज एवढी मदत कर .. माझ्या बायकोची डिलिव्हरी व्यवस्थित पार पडू दे .. मीनाक्षी आणि माझे पिल्लू हेच माझे जग आहेत आता .. त्यांच्यासाठी सर्व आयुष्य वेचणार आहे मी .. त्यांना कशाची कमी नाही पडू देणार ..
--------------------------------------
आज मी खरंच खूप खुश आहे .. मी अजयला फोन केला होता आणि तो मला भेटायला यायला तयार आहे .. किती चांगला आणि देव माणूस आहे तो .. एवढा मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा मला भेटायला यायला तयार झालाय .. त्याला घरी बोलायची माझी करणं आहेत .. एक म्हणजे त्याला सत्य परिस्थिती सांगायची आहे .मीनाक्षीला भेटल्यावर नक्कीच तो मला मदत करेल.. मला या देशातून बाहेर जायला नक्की मदत करेल . मीनाक्षी तर खूप आनंदी आहे .. तिला पण लवकरात लवकर बाहेर जायचं आहे .. एका नवीन देश आमची वाट बघत आहे ..
आम्ही दोघे अजयला भेटायला खूपच एक्ससायटेड आहोत. मी तर हवेतच उडत आहे .. आता इथून फक्त खुशीचाच मौसम असणार आहे आमच्या आयुष्यात..
कुछ तुम सोचो, कुछ हम सोचें,
फिर ख़ुशी का मौसम आए
तन्हा-तन्हा कौन जिया है
रहके तन्हा दिल घबराए
आ जाओ मिलके रिश्ता ये जोड़ें,
शर्तें बदल दें रस्मों को तोड़ें
इससे पहले कि ये दुनिया हमें आज़माए
कुछ तुम सोचो, कुछ हम सोचें…
आई हैं ख़ुशियों का पैग़ाम लेके बहारें
ये पल है अपना, इस पल में आओ तक़दीर अपनी सँवारें
ख़ाली-ख़ाली इस जीवन में प्यार भर लें हम तुन दोनों
दीवाने जो करते अक्सर वो ही कर लें हम तुम दोनों
इन फ़ासलों को आओ मिटा दें, इक दूसरे में ख़ुद को छुपा दें
इससे पहले कि ये दुनिया हमें आज़माए
कुछ तुम सोचो …
दुनिया की रस्मों को चाहत में शामिल न करना
मंज़िल हम अपनी पाके रहेंगे, हाँ तुम किसी से ना डरना
पागल रस्में, पागल दुनिया, और थोड़े हम तुम पागल
क़िस्मत में हो ना जाने क्या, सोचते हैं बस ये हर पल
अरमाँ है जिसका सपना वो बुन लें
तुम हमको चुन लो, हम तुमको चुन लें
इससे पहले कि ये दुनिया हमें आज़माए
कुछ तुम सोचो, कुछ हम सोचें,
फिर ख़ुशी का मौसम आए

----------------------------------------------
संपली डायरी वाचून झाली .. पुढे काही लिहायला बिचारा रोहन जिवंतच राहिला नव्हता .. मीराला खूप बेचैनी आली .. पुढे काय झाले .. त्यांचे स्वप्न पूर्ण झाले का ? का नाही ? का ?
जोर जोरात तिच्या आणि रोहनच्या फोटो समोर उभी राहून रडू लागली...
कारण पुढे काय झाले हे तिने ऐकले होते .. आज ती धाय मोकलून रोहन साठी रडत होती .. " रोहन ... रोहन .. हे काय झाले ? का ? झाले ? कसली हि पोकळी आहे माझ्या आयुष्यात
तिच्या रडण्याचा आवाज आला तसा अजय धावतच तिच्या रूम मध्ये आला
अजय " मीरा .. मीरा " मीराला धरून तो तिला शांत करत होता
मीरा " अजय .. रोहन ... ( हुंदका ) रोहनला मारले .. माझ्या भावाने मारले ना .. किती प्युअर सोल .. किती प्रेम करत होता तो त्याच्या मीनाक्षी वर .. "
अजयचे पण डोळे पाणावले .. एका प्रेम करणाऱ्याला एवढी मोठी शिक्षा .. नक्कीच नको होयला पाहिजे होती
अजय " रोहनच्या हत्याराला शिक्षा झालीय मीरा .. आज तो गजाआड आहे .. "
मीरा " खूप कोलॅप्स झाली होती . तिला तो आठवला नव्हता पण आज तिला तो नक्की कळला होता .. आज त्याच्यासाठी खूप वाईट वाटत होत ... एखादी कादंबरी वाचावी तशी ती डायरी वाचली होती .. त्यातली मीनाक्षी हि तीच होती हे हि तिला माहित झाले होतं पण बुद्धीला मीनाक्षी आणि मीरा वेगळ्या आहेत आणि आता ती मीरा म्हणून जगत होती ..
अजयने तिला पाणी प्यायला दिले .. त्याच्या कुशीत शिरून मीरा रडत होती .. आणि तो हि तिला रडून देत होता .. हे आवश्यक होतं... रोहनसाठी ती अजून पर्यंत कधीच रडली नव्हती .. आज अश्रू रोहनसाठी होते .. आणि ते आतमध्ये साठलेले अश्रू मोकळे होणे गरजेचे होते ..
अजयने तिला रडतानाच दोन्ही हातात उचलून घेतले .. आणि त्याच्या रूम मध्ये घेऊन गेला .. बेडवर कुशीत घेऊन पडला .. ती पण त्याच्या कुशीत किती तरी वेळ रडत होती .. तो केसांवरून हात फिरवून शांत करत होता .. नंतर रात्री दोघेही झोपून गेले .. त्यांचं त्यांना पण कळले नाही .

🎭 Series Post

View all