मोह मोह के धागे भाग 43

Story Of Love


मोह मोह के धागे भाग ४३
क्रमश : भाग ४२
दोन एक दिवसांनी घरातील वातावरण एकदम नॉर्मल होऊ लागले . मुख्य म्हणजे आई आणि भाऊसाहेब आता थोडे दिवस इकडेच राहणार होते त्यामुळे रिया आणि भाऊसाहेबांची गडबड गोंधळ चालू असायचा .. रिया रात्री आजी आबांकडेच झोपायला जायची . छान स्टोरीज ते तिला सांगायचे ..
आईसाहेबांनी मीराला चांगलीच हाताखाली घेतली होती .. घराण्याचा कुलाचार जो शिकवायचा राहिला होता ते आता त्या इथेच थांबून शिकवत होत्या . आणि तीही तेवढ्याच हौशीने सगळे काही शिकून घेत होती .
अजयचे मध्यंतरी कामात दुर्लक्ष झाले होते म्हणून ऑफिसचे काम संपता संपत नव्हते .. अगदी रात्र रात्र ऑफिसमध्येच थांबायचा .. कारण इंटरनॅशनल मिटींग्स असायच्या ..
भाऊसाहेब आणि आई इकडे राहिले होते त्यामुळे मीरा जी अजयच्या रूममध्ये गेली ती आता तिकडेच सेट झाली होती .. म्हणजे आता हीच माझी पण रूम आहे इतके तिचे त्या रूम मध्ये रुटीन सेट झाले होते .
अजयला वेळ नव्हता आणि मुद्दामून तो तिला स्पेस देत होता .. मानसिक दडपणातून ती बाहेर येऊ दे आणि मगच हनिमूनचा विचार करू म्हणून तो हि कामात स्वतःला रमवून घेत होता ..
मीरा सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत घरात कामात असताना खूप आनंदात असायची .. अगदी अजयचे सुद्धा करताना एकदम आनंदात करायची .. तेव्हा तिला काही वाटायचं नाही पण रात्र जवळ आली कि तिला बेचैनी यायची
तीच एक मन अजूनही तिला सांगायचं कि मी एका मुलीची आई आहे .. अजयला माझ्या पेक्षा नक्कीच चांगला पार्टनर मिळाला असता .. रोज रात्री असे वाटायच कि मी निघून जाऊ का यांच्या आयुष्यातून .. सुरुवातीला होईल त्यांना त्रास पण येतील ते बाहेर .. यातच त्यांचं कल्याण आहे ..वगैरे वगैरे असे विचार यायचे आणि लगेच दुसरे मन सांगायचं .. किती प्रेम, काळजी करतात ते आपली .. आपण त्यांना सर्व सुखं दिली पाहिजे .. आता लग्नाला ३ महिने झाले तरी अजूनही नॉर्मल मॅरीड लाईफ सुरु झाली नाही .. आधी माझे आजारपण . माझा भूतकाळ .. किती त्यांना वाट बघायला लावू ..
त्याचे तिच्यावर असलेलं निस्वार्थ प्रेम तिला त्याच्या पासून दूर जाऊ देई ना .. पण तीच स्वतः आपण स्वार्थी तर झालो नाही ना अशा विचाराने कधी कधी रात्रभर जागी राहायची ..
करायला पाहिजे ते त्याच सगळं आनंदात करत होती .. त्याचे कपडे काढून ठेवणे , आवडीने त्याच्या आवडीचे जेवण बनवणे , त्याला काय हवं नको ते बघणे .. अगदी दिवसा ती हसतमुखाने त्याच्याशी बोलायची सुद्धा पण रात्र तिला खायला उठायची .. त्याच्या जवळ एका रूम मध्ये झोपायला हि ऑकवर्ड वाटायचं ..
हे सगळे अजय ऑबझर्व करत होता .. ती दिवसभर आनंदात असते .. रात्री काहीशी टेन्शन मध्ये असते ..
एकदा तर रात्री १२ वाजता तो आला तर ती गॅलरीत बसून रडत होती ..
अजयने त्याचा ब्लेझर तिथेच टाकला अन गॅलरीत गेला
अजय " मीरा .. काय होतंय ? बरं नाहीये का ? काही दुखतंय का ? "
मीरा रडतच " अजय , मी नाहीये तुमच्यासाठी योग्य पार्टनर .. मी नाही ये ... माझ्यापेक्षा खूप चांगली पार्टनर मिळाली असती ना तुम्हांला .. का तुम्ही माझ्याशी लग्न केलंत .. एखाद्या अनाथ आश्रमात राहिलो असतो ना दोघी ? किंवा ..
अजय "मीरा .. काय बोलतेय ? वेडी कुठली ? असे का बोलतेय ? माझं काही चुकलंय का ?"
मीरा " माझ्या शरीराला तुमच्या आधी कोणीतरी स्पर्श केला होता हे सत्य समोर आले ना कि मला खूप बेचैनी येते .. असे वाटतं कि मी तुमच्या आयुष्याचं मातेरं केलं .. रोज रात्री मला मी तुम्हांला सोडून जाऊ कि काय असा विचार येतो .. हि रात्र माझा जीव खायला उठते अजय .. मी काय करू ?"
मीरा रडत रडतच तिचं मन मोकळं करत होती .. सगळे सुरळीत झाल्या नंतर अजूनही मी तुमच्या जवळ आले नाही तुम्हांला माझा राग येत असेल ना .. तुमचा हक्क आहे तरीही तुम्ही मला वेळ देताय ... माझं मन मला खूप खातंय "
अजय " शु .. काय मीरा ... बावळट आहेस का तू ? कशाला निगेटिव्ह विचार करतेस ?कितीदा तुला सांगितलं समजावून तरी पुन्हा तेच "
मीरा " मी काय करू अजय ? मला काहीच समजत नाहीये ? असे का होतं मी सोडून जावे तुम्हांला असे का वाटतं मला ? मला नाही जायचंय लांब .. माझे खूप प्रेम आहे तुमच्यावर पण तरीही माझी बुद्धी मला मी लांब जा असे सांगते .. मी कशी आणि कधी बाहेर येणार .. काहीच कळत नाहीये मला .. "
अजय " मीरा .. माझे प्रेम आहे तुझ्यावर .. जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो ना तेव्हा त्याच्या गुण दोषांसकट प्रेम होत असते .. हे शरीर तर प्रेम व्यक्त करण्यासाठी माध्यम आहे .. जसे अंग झाकायला कपडे असतात ना तसे .. आतले शरीर तर तेच असते ना तसेच आहे हे ,प्रेम आधी आत्म्यावर होत असते . प्रेम हे असेच उगाचच कोणावर पण होत नाही . ज्याच्याशी आपले मागच्या जन्मापासून काहीतरी संबंध असतो ना त्याच्यावरच होते .. मला सांग आज माझ्या आजू बाजूला तुझ्यापेक्षा सक्षम , सुंदर स्त्रिया नव्हत्या का पण माझ्या अंतर आत्म्याने बरोबर तुला मला भेटवले .. तेव्हा काही गोष्टी या आपल्या हातात नसतात .. आहे माझे प्रेम तुझ्यावर यात तुझा काय गुन्हा आहे का ? मला माझं प्रेम कधीच तुझ्यावर थोपवायचं नव्हतं . आता तूच मान्य करतेस ना तुझं पण माझ्यावर प्रेम आहे मग आता निगेटिव्ह विचार कशाला करतेस शोना .. यामुळे तुझ्या तब्बेतीवर परिणाम होतो .. आता तर तुला तुझा सगळा भूतकाळ मी सांगितलाय , तरीही तुला तुझा भूतकाळ आठवला नाहीये .. मग कशाला भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीसाठी तू आपला छान वर्तमानकाळ खराब करतेय .. त्रास होतो मीरा मला पण ."
मीरा " सॉरी "
अजयने तिचा चेहरा हातात घेतला .. अंगठ्याने तिचे डोळे पुसले
अजय " नातं , प्रेम आधी मनापासून स्वीकारावं लागत ..तरच शरीर एकत्र येऊ शकतं .. अजूनही तु मनापासून मला तुझा नवरा मानला नाहीयेस .. म्हणून अजून आपल्यात ऑकवर्ड नेस आहे .. आणि खरं सांगू तुला पाहिजे तेवढा वेळ घे तू .. माझे काही हि म्हणणं नाही .. फक्त ना अशी रडत नको जाऊस .. तुझ्या आणि रियाच्या डोळ्यांत पाणी बघितले ना कि खूप त्रास होतो मला .. असे वाटत कि माझ्याच प्रेमात काहीतरी कमी राहिलं कि काय "
मीराने त्याला घट्ट मिठी मारली " नाही अजय , तुमच्या प्रेमात कधीच काहीच कमी नाहीये .. तुम्हांला माहितेय मी येताना रोहनच्या फोटोला हात जोडून नमस्कार करून सांगून पण आले कि मला आता माझ्या या नात्यात पुढे जायचं आहे .. आणि मी खरंच सांगते मी गेले काही दिवस हाच विचार करतेय कि आपल्यात नॉर्मल मॅरीड लाईफ सुरु करेन .. पण रात्र आली कि मन खायला उठतं .. एक प्रकारचं गिल्ट येत राहतं "
अजय " नको ना राणी .. आता असेल तसले विचार काढून टाक मनातून .. जे काही आहे ते हेच आहे हे आधी स्वीकार कर .. मगच ते सगळे नॉर्मल होईल .. मला सोडून जायचा तर अजिबातच विचार करू नकोस .. प्लिज . माझ्या प्रेमाची एवढी मोठी शिक्षा नको देउ मला .. तू जर लांब गेलीस तर मला जगणंच नको वाटेल .. प्लिज मीरा.. ट्राय टु अंडरस्टँन्ड .. आपण लग्न करायच्या आधीच आपण एकमेकांना आपले प्रेम कन्फेस केलं होतं .. मगच लग्न केलंय .मी आता थकलोय मीरा ..
म्हणतच तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून तिथेच खाली फ्लोअरवर आडवा झाला ..
मीरा" अजय , इकडे कुठे पडलात .. गार लागेल .. कपडे खराब होतील .. चला आत जाऊ "
अजय " राहू दे ना मीरा .. जरा शांत पडू दे ना "
पण तिने शेवटी त्याला उठवून बेडवर आणलेच .. तरीपण आज तिच्या मांडी वरच डोके ठेवून तो पडला होता .. आणि ती प्रेमाने त्याच्या केसांतून हात फिरवत बसली ..
तिच्या हलक्या मसाजने तो गाढ झोपून गेला पण पूर्ण रात्र त्याने तिच्या भोवतालचे हात जराही काढले नाहीत .. ती सुद्धा बसल्या बसल्या त्याच्या डोक्यावर डोके ठेवून तशीच झोपून गेली ..
--------------------------
सकाळी मीराला जाग आली तर अजय अजूनही तिला घट्ट पकडून झोपला होता . जणू तुला जाऊ द्यायचं नाहीये मला कधीच कुठेच .. आज त्याने त्याचा तिच्यावर असलेला हक्क पुन्हा एकदा दाखवून दिला होता
मीरा मनातच " सॉरी अजय , असा अविचार मी कधीच करणार आता .. बास झाले आता .. आता फक्त तुम्ही आणि मी आणि आपली मुलगी रिया .. खूप छान संसार करू .. असा मनातच विचार करतच तिने त्याच्या कपाळावर किस केले .. अलगद त्याचे डोके उशीवर ठेवले .. आणि आवरायला गेली ..

🎭 Series Post

View all