मोह मोह के भाग 45 अंतिम भाग

Story Of Love
मोह मोह के धागे भाग ४५ अंतिम भाग
क्रमश : भाग ४४
आज रविवार होता. नीरजच्या फॅमिलीला आज लचंला बोलावले होते त्यामुळे आज सगळे आनंदात आणि रिलॅक्स होते .. भाऊसाहेब घरी असल्यामुळे मीरा साडीच नेसायची .. पण सोनिया एकदम जीन्स घालूनच आली होती .. मग भाऊसाहेब आणि आई , माई सगळे एका बाजूला बसले आणि हे सगळे पुढच्या लॉन वर क्रिकेट खेळत होती .. रिया शंतनू , अजय , नीरज , सोनिया , एक दोन गार्डस ला बरोबर घेऊन टीम्स केल्या होत्या .. मीरा आधी नाही नाहीच म्हणत होती पण सर्वांनीच एवढा आग्रह केला कि ती पण उतरली .. बिचारीने कधी बॅट आणि बॉल हातात घेतलाच नव्हता पण अजय आणि नीरज चे पाहून बॅट घेऊन उभी राहिली .. आणि बॅट मारायला गेली तर पहिल्याच बॉल ला बोल्ड झाला .. आणि सगळे जोर जोरात हसू लागले ..
झाले इकडे इतका फुगा आला .. कि रागाने गाल लाल झाले .. आणि तिची ती चिडचिड बघून अजयला जाम हसू येत होते .. त्यात शंतनू चिडवत होता .. आत्या आऊट .. अंकल ने आत्याला आउट केले ..
सोनिया " शंतनू .. गप रे “बोलत होती पण तीच स्वतः किती तरी हसत होती ..
अजय" अरे हा ट्रायल बॉल टाकला होता मी .. आता बॉल टाकतो पुन्हा " आणि तो पण तोंड दाबून हसू लागला
मीरा अगदी तोंड वाकड करून " आले मोठे ट्रायल बॉल वाले .. मला नाही खेळायचं जा .. " आणि मुरका मारून आत गेली ..
तिच्यामागे अजय पण " ए आलो रे मी पाणी पियुन येतो .. म्हणून सटकला पण सगळे त्याला हसत होते . लगेच बायकोच्या मागे गेला म्हणून
मीरा " तुम्ही मुद्दामून मला आऊट केलंत .. माहितेय मला "
अजय " अरे .. असा कसा मी मुद्दामून आऊट करेन ?"
मीरा " ते काय ते स्पिन बॉल टाकलात "
तो हसतच " अग , स्पिन बॉल नाही बॉल ला स्पिन केलं असे म्हणतात .
मीरा " तेच ते .. तेच केलं ना तुम्ही .. साधा बॉल नाही का टाकता येत .. "
अजय " बरं. बाबा .. चुकलो .. आता नाही बॉल स्पिन करणार .. चल ना खेळायला "
मीरा " नाही .. नको .. सगळे हसतात मला .. मी कॉफी करून आणते सगळ्यांना .. "
अजय " नाही कोण हसत ?"
मीरा " नाही कसे ? तुम्ही पण हसले ? सगळे हसले .. मी पाहिलं ?"
अजय पुन्हा हसू लागला .. इतकी क्युट दिसत होती ती त्या लटक्या रागात .. एकदम नॅचरल .. आज आत्ता या क्षणी ती एकदम नॅचरल होती ..सहज जशी तिने नेहमी त्याच्या आजू बाजूला वावरावं अशी होती ती .. हक्काने भांडत होती त्याच्या जवळ .. रुसली होती .. त्याला ते सगळे इतकं आवडत होत .. नवरा बायकोचा लुटूपुटुचा संसार जसा आत्याला हवा होता त्याची सुरुवात झाली होती ..
---------------------------
एक महिन्या नंतर
मीरा रियाला पॅरिस मधल्या हॉटेल रूम मध्ये अंघोळ घालत होती अजय बेड वर बसून नीरज जवळ फोनवर बोलत होता
नीरज " काय मग साहेब .. कसे चाललंय हनिमून "
अजय " हा ठीक आहे .. काल दिवसभर डीझने लँडला होतो .. खूप साऱ्या राइड्स खेळलो .. तिघांनी खूप मज्जा केली .. रिया बघ किती चेकाळलीय .. अंघोळ करताना सुद्धा गोंधळ घालतेय .. आवाज येत असेल तुला "
नीरज " येस .. आय कॅन हिअर .. म्हणजे ओव्हरऑल ट्रिप खूप छान चालू आहे फक्त हनिमून बाकी आहे .. होय ना "
अजय " हमम .. अरे होईल रे . तू पण काय ?"
नीरज " तुला बोललो होतो रियाला इकडेच ठेव .. थोडातरी वेळ एकत्र घालवा .. पण नाही "
अजय " रियाला मी प्रॉमिस केलं होते .. मम्मा ठीक झाली कि तुला पॅरिसच्या डिझनी वर्ल्डला नेईन म्हणून "
नीरज " ठीक आहे .. एन्जॉय " आणि फोन ठेवून दिला.
अजयला पण तिच्या बरोबर एकांत हवा होता पण अजूनही प्रतिक्षेतच होता योग्य वेळेच्या ..
तेवढयात रिया बाथरोब घालून बाहेर आली आणि टुणकन उडी मारली आणि अजयच्या पोटावर बसली ..
रिया " डॅड .. मी मम्माला सगळी भिजवली .. मम्मा जाम वैतागलीय .. आय एम स्केअर्ड "
अजय " ओके .. डोन्ट वरी .. शी विल बी फाईन "
तेवढयात मीरा पण बाथरोब वर जरा तणतणच बाहेर आली
बेबी पिंक बाथरोब वर तिचे ओले केस .. आणि सुगंध बघून अजय बघतच राहिला एक क्षण
असल्या क्युट दिसत होत्या दोघी .. आधी रियाच्या गालावर ओठ ठेवले आणि हाताने मीराला जवळ बोलावून घेतले त्याने .. आणि तिच्या गालावर ओठ ठेवले .
तशी रिया खुदु खुदु हसू लागली
रिया " ऑ ... डॅडा यु किस्ड मम्मा "
अजय " येस .. बिकॉज आय लव्ह हर ... लाईक आय लव्ह यु "
रियाने पण त्याला आणि तिला किशी दिली " आय लव्ह यु मम्मा अँड आय लव्ह यु डॅड "
मीरा तर लाजून गप्पच होती
रिया " मम्मा इट्स युअर टर्न "
मग मीराने रियाच्या गालावर किशी दिली .. तसा अजय गाल पुढे करून " आय एम वेटिंग "
म्हणून मीराने हलकेच ओठ त्याच्या गालावर टेकवले
अजय तिच्या कानात हळूच "आय एम स्टील वेटिंग माय वाइफ .. थिंक अबाउट मी "
मीराने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले.. आणि हसली
----------------
थोड्या वेळातच आवरून सगळे पुन्हा पॅरिस फिरायला बाहेर पडले ..
रियाचा हात दोघांच्या हातात होता आणि ती आनंदात खिदळत होती (जसे स्टोरीच्या पोस्टर वर आहेत तसे ) तिघे आनंदात होते ..
एका रेस्टोरंट मध्ये बसले असताना अचानक समोरून राधा कोणीतरी फॉरेनर मुला बरोबर हातात हात घालून चालत येताना दिसली ..
अजयने तिला पहिले आणि तिला आवाज दिला
अजय " हे राधा .. "
राधा जी धावत आली ती डायरेक्ट अजयच्या गळ्यातच पडली.. आणि इकडे जळफळाट सुरु झाला
राधा " हे हाऊ आर यु ? या एम सो ह्यॅप्पी टू सी यु "
अजय " मी मस्त .. मीरा आणि रिया पण आहेत "
तशी ती जरा ओशाळली " हे हाय मीरा .. कशी आहेस .. रिया तू कशी डार्लिंग बोलतच तिने रियाच्या गालावर हक्काने ओठ ठेवले " कदाचित हिची आई होण्याचा मान मला मिळाला असता असा विचार झटकन येऊन गेला . मीरा तिच्या जागेवरून उठली आणि अजयचा हात कोपरा पासून पकडला आणि उगाचच त्याच्या कोटावरून बोटं फिरवली एक रागाचा लूक त्याच्याकडे टाकला आणि लगेच तिच्याकडे बसुन " हाय .. आम्ही इकडे हनिमूनला आलोय "
राधा "ओह .. ग्रेट "
तेवढयात रिचर्ड तिकडे आला
राधा " अजय , मीट माय बॉयफ्रेंड रिचर्ड "
अजय " हे रिचर्ड .. काँग्रट्स .. जस्ट टेक केअर ऑफ हर .. शी इज माय बेस्ट फ्रेंड "
रिचर्ड " येस .. डेफिनेटली .. अँड थँक्स बडी .. यु रेंजेक्टड हर सो शी ऍटलीस्ट कन्सिडरड मी "
अजय " नो आय डिड नॉट रेंजेक्टड हर माय फ्रेंड .. शी इज बेटर दयान मी इन एव्हरी आस्पेक्ट .. आय जस्ट सेड नो बिकॉज आय लव्ह मीरा .. बाय द वे मीट मीरा माय वाईफ अँड शी इज माय डॉटर रिया "
रिचर्ड " नाईस फॅमिली .. आय वीश आय विल अल्सो ह्याव स्वीट फॅमिली लाईक यु विथ राधा "
राधा " एस ऑफकोर्स रिचर्ड .. व्हेरी सून वयी विल गेट मॅरीड "
तसा रिचर्ड एकदम खुश झाला .. " ओह रिऍली .. यु अक्सेप्टेड माय मॅरेज प्रोपोजल थँक यु मनमुझल ( मॅडम ) आणि तिथेच त्याने राधाच्या ओठांवर ओठ ठेवले ..
रिया तिचे आईस्क्रीम खाण्यात मग्न होती .. पण मीरा आणि अजय ओशाळले
राधा " चलो देन .. बाय .. आमच्या लग्नाला नक्की या "
मीरा " राधा .. एक मिनिट .. मिराने पर्स मधून एक हिऱ्याचे लॉकेट काढले .. नुकतेच अजयने तिच्यासाठी घेतले होते ते
मीराने तिच्या गळ्यात घातले " काँग्रट्स .. " आणि तिला मनापासून एक छान मिठी मारली
राधा " अग .. हे कशा साठी ?"
मीरा " एका बहिणीकडून एक छोटीशी भेट .. सॉरी .. माझ्यामुळे तुला काही दुःख झाले असेल तर .. देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो .. "
राधाचे डोळे पाणावले " अजयची जागा भारतात तरी दुसरा कोणी घेऊ शकत नाही .. आणि रिचर्ड माझ्यावर खूप प्रेम करतो अगदी मी कॉलेज मध्ये असल्यापासून ..म्हणून तो परदेशी असला तरी बहुदा माझा सोलमेंट तोच असावा असे माझ्या मनाने मला कौल दिलाय "
अजय " आय नो रिचर्ड . तो एका फेमस कंपनीचा सी इ ओ आहे .. खूप चांगला आहे तो .. "
रिचर्ड " हे गाईज आर यु टॉकिंग अबाऊट मी? "
राधा " एस .. दे आर सेयिंग यु आर नॉट हँडसम " आणि हसू लागली
तसा रिचर्ड तिच्या मागे धावला " यु ... "
तसे हे दोघे पण खळखळून हसले आणि दोघांना बाय करून ते दोघे निघून गेले
----
मीराला आता या क्षणी अजयला किस करावे असे वाटत होते पण एकतर रिया होती आणि ते रस्त्यात होते त्यामुळे बिचारी पाण्याचे ग्लास वर ग्लास पियुन स्वतःला शांत करत होती .. अजयची काही वेगळी अवस्था नव्हती .. पण दोघेही बिचारे एकमेकांना दुरूनच बघत होते
तेवढयात समोरून नीरज सोनिया आणि शंतनू आले
नीरज " अजय .. मी आलो "
अजय : तू इकडे ?"
नीरज " अरे साल्या तोंड बघ तुझं .. सुकलंय " आणि हसायला लागला
अजय " शट अप .. तू कधी आलास ?"
नीरज " कालच .. तुझ्या मागे आहे मी .. चल एक काम कर आता रियाला सोड आमच्या बरोबर .. मी सगळ्यांना घेऊन आज पुन्हा डिझनि वर्ल्ड ला जातो "
तेवढयात शंतनू अजयला " अजय अंकल , कॅन आय टेक माय वूड बी वाईफ विथ मी ? प्लिज "
तसे सगळे जोर जोरात हसायला लागले
मग काय नीरज ,सोनिया , शंतनू आणि रिया पुन्हा डिझनीला गेले ..
आणि फायनली अजय आणि मीराला एकांत मिळाला .. अजय आणि मीरा अर्थातच रूम वर आले आणि दोघेही एकमेकांच्या जवळ यायला आसुसले होते . आपल्या प्रेमाची परीक्षा देत देत आज इथपर्यंत आले .. आज दिवस आहे का रात्र हे बघायची वेळच पडली नाही ..हॉटेल रूम मध्ये चालू असलेल्या त्यांच्या प्रेमाचा एकुलता एक साक्षीदार दिमाखदार आयफेल टॉवर होता.
समाप्त!!!

नमस्कार वाचकहो ..
फायनली .. आज लिहून पूर्ण केली हि कथा .. सर्वात जास्त वाट बघायला लावली मी तुम्हांला या कथेसाठी ..
संपूर्ण कथा कशी वाटली नक्की सांगा ..
ईराचे आणि वाचकांचे मनापासून आभार आणि धन्यवाद !!!

🎭 Series Post

View all