मोह मोह के धागे भाग 42

Story Of Love
मोह मोह के धागे भाग ४२
क्रमश : भाग ४१

आजची पहाट खूप वेगळी होती ..
रडून रडून थकलेली मीरा अजयच्या मिठीत शांत झोपली होती . बाहेर पक्षांचा किलबिलाट होता . थोडासा लांबून पाण्याचा खळखळणारा आवाज येत होता . सूर्याची कोवळी सोनेरी किरणं पसरली होती आणि थोड्याशा गारव्यामध्ये किरणं शरीराला सुखावत होती . .
अजयने डोळे उघडले, मीराला मिठीत शांत झोपलेलं बघून तोही शांत झाला . तिला तिचा भूतकाळ कळल्यावरही ती आपल्या मिठीत आहे ह्याचा एक वेगळाच आनंद होता त्याला मनातून .. अलगद ओठ तिच्या कपाळावर टेकवून तो उठला आणि फ्रेश होयला गेला ..
आज एका महत्वाच्या कामासाठी जायचं होते .. स्वतःच आवरून तो मीरा उठायची वाट बघत बसला .
थोड्यावेळाने मीरा उठली .. डोळे उघडताच तिला समोर अजय पाहिजे होता .. इकडे तिकडे पाहिल्यावर तो एक चेअर वर लॅपटॉप घेऊन काम करताना दिसला तशी ती शांत झाली .
उठून फ्रेश होऊन बाहेर आली .
अजय " झाली झोप ?"
मीरा " हो .. सॉरी माझ्यामुळे उशीर झाला का ?"
अजय " नाही.. पण आवर लवकर .. निघावे लागेल आता आपल्याला .. " बोलतच अजयने तिला बॅगेतून एक साडी काढून दिली .. मीरा त्याच्याकडे बघतच बसली .. कारण त्याने जी साडी दिली ती पांढरी साडी होती.
अजय चेहरा लपवून पुन्हा लॅपटॉप कडे वळला .
मीरा काहीच न बोलता आवरून आली .. पांढरी साडी त्याला लाल काठ होते ..
तयार झाल्यावर .. दोघे तिकडून निघाले ..
अजयने सगळे सामान गाडीत भरले .
मीरा " अजय ती डायरी मी माझ्या बरोबर घेऊ का ?"
अजयने एक नजर तिच्याकडे पाहिले आणि शांतपणे बोलला " घे "
मीरा पटकन निघताना डायरी घ्यायला त्या रूम मध्ये आली .. डायरी तर तिने उचलली पण का कुणास ठाऊक एक नजर तिच्या आणि रोहनच्या फोटोकडे शांतपणे बघितले .. हात जोडले त्याच्या समोर
मीरा " रोहन .. मी आणि रिया तुमच्या इच्छेप्रमाणे एकदम खुश आहोत . सर्व सुखे अजयने आमच्या दोघींच्या पायांशी ठेवली आहेत आणि फक्त कर्तव्य म्हणून नाही तर ते आमच्या दोघींवर जीव ओवाळून टाकतात . मी मात्र अभागी ना तुम्हांला सुख देऊ शकले ना अजयला .रोहन, अजय आपल्या मुलीला वडिलांचे प्रेम देतच आहेत .. माझ्यावर एका पतीने जेवढे प्रेम करावे तेवढे प्रेम करत आहेत .. मला आता त्यांना एका पत्नीने जेवढं प्रेम करायला पाहिजे तेवढं प्रेम द्यायचं आहे .. तुम्ही आहेत ना माझ्या या निर्णयात .. कारण आज मी त्यांची पत्नी आहे हे हि सत्यच आहे. "
तितक्यात बाहेरून हॉर्नचा आवाज आला ..
भरून आलेले डोळे भरून पुसत एकदा रोहनच्या फोटो वरून हात फिरवून ती बाहेर पडली . बहुदा त्याला कायमचे सोडून
----------------
अजय मीरा एका देवस्थान जवळ आले .. भाऊसाहेब , आई , माई , आधीच आले होते . रिया आणि शंतनू खेळत होते , नीरज , सोनिया पण होते .
रिया या दोघांना बघताच धावतच आली,अजयने तिला उचलून घेतले आणि तिच्या गालावर किशी दिली .. मग ती मीरा कडे आली आणि मम्माला किशी देऊन खेळायला पळाली ..
अजय " रिया , केअरफूल स्वीटहार्ट ! "
मीरा अगदीच भांभावून जात होती .. अजयचे निस्वार्थ प्रेम पाहून ..
भाऊसाहेब " अजय .. आम्ही सगळी तयारी केलीय .. तुम्ही ते आणले का ?
अजय " हो .. आणलंय "
मीराला खूप सारे प्रश्न पडले होते .. पण कोणचं काहीच सांगे ना ..
अजय एक बॅग घेऊन आतमध्ये गेला आणि पूजेचे कपडे घालून आला .. आणि मंदिराच्या मागे घाटावर एका ठिकाणी पूजा मांडली होती तिकडे बसायला गेला ..
त्याच्या मागे सगळे शांतपण चालत गेले .. मीरा रियाला घेऊन जरा मागे बसली ..
एका बाजूला भाऊ साहेब , आई ,माई , सोनिया पण बसले होते नीरज पण होताच
भटजींनी पूजा आणि मंत्र सुरु केले.
भटजी कोणाचे कार्य करायचे आहे
अजय " रोहन *********** "
मीराने पटकन अजयकडे पाहिले आणि त्याच्याकडे आश्यर्य ने पाहिले .. त्याने डोळ्यानेच तिला आश्वस्थ केलं
अजयने विधिवत रोहनचे कार्य जे कि त्याच्या मृत्यूनंतर कोणी केलेच नव्हते इनफॅक्ट करायला कोणच नव्हते .. ते
सगळे विधी नीट करून झाल्यावर .. रिया कडून त्याच्या पूजेला नमस्कार करून घेतला .. रियाच्या आणि मीराच्या हस्ते रोहनच्या अस्थी समुद्रात विसर्जन केल्या ..
खऱ्या अर्थाने रोहन दोघींच्या तुन मुक्त होत होता आणि तितक्याच ह्या दोघी .. हे सर्व दुरून कोणीतरी दोघे पाहत होते .. आणि त्या दोघांना सुद्धा अजयनेच बोलावले होते ..
पूजा झाल्यावर पण मीरा रडत होती .. अजयच्या आईच्या कुशीत आपल्या आईची कुशी समजून मोकळी होत होती ..
तितक्यात मीराचे जन्मदाते आई वडील तिच्या समोर आले
मीराची आई " मीनाक्षी ... "
तशी मीरा एकदम त्यांच्याकडे बघू लागली
मीरा एकदम शांत झाली ..
कारण अजूनही तिची स्मृती आलेली नव्हती .
तितक्यात अजय आला तिथे
अजय " मीरा , हे .. रियाचे आजी आजोबा आहेत .. आणि रोहनचे सासू सासरे आहेत त्यामुळे आज त्यांनी इथे असणे गरजेचे होते .. मीच त्यांना बोलावलंय "
मीरा अजूनही काहीच रिअक्शन देत नव्हती
मीराची आई " आम्ही तुला समजू शकलो नाही .. काही चुका आमच्याकडून झाल्या आणि काही तुझ्याकडून . पण हेरंब ने जे काही केले ते आमच्याही विचार शक्तीच्या बाहेर होते .. बदला हा एकच विचार त्याच्या डोक्यात होता .. तो दरोडेखोरांचा हमला आणि नंतर ..नंतर सगळेच बदलले .. तुझ्यावर तर लहान बहीण म्हणून जीव ओवाळून टाकायचा .. पण तू रोहन साठी तुझ्या दादाला आई वडिलांना सोडून पळून गेलीस हे तेव्हाहि चूक होते आणि आताहि आमच्या दृष्टीने चूकच आहे . "
अजय " हे बघा , तुमचं काम झालंय .. आता तुम्ही गेलात तरी चालेल .. कारण अजूनही मीरा तुम्हांला ओळखत नाही . तुमचा एक मुलगा , एक मुलगी आणि सोन्यासारखा जावई तुम्ही गमावला आहेत .. मी माणूस म्हणून तुमच्या दुःखाला समजू शकतो . तुमच्या आयुष्यातली भावनिक गरज मी कधीच पूर्ण करू शकत नाही पण माझ्या पत्नीचे आई वडील म्हणून आता आपले पण एक नातं आहे .. तुम्ही माना किंवा ना माना .. भविष्यात तुम्हांला कधी काही गरज पडली तर नक्कीच मी तुमच्यासाठी असेन .
मीराच्या बाबांनी भरल्या डोळ्यांनी मीराच्या डोक्यावरून हात फिरवला .. " सुखी रहा " असा आशीर्वाद दिला .. रियाच्या डोक्यावरून हात फिरवला मनोमन आशीर्वाद दिला आणि त्याच पावली बायकोचा हात हातात घेऊन पटापटा चालू लागले
रिया धावतच अजयकडे गेली होती आणि अजयने तिला नेहमी प्रमाणे उचलून घेतले
रिया " डॅडा .. ते आजी आजोबा कोण आहेत ?"
अजय " जसे मी तुझा डॅड आणि ममा तुझी मम्मा तसेच ते तुझ्या मम्माचे आई बाबा आहेत "
रिया " म्हणजे माझे आजी आणि आबा आहेत ना ?"
अजय " हो "
रियाने बेंबीच्या देठा पासून " ओ आजी .. ओ आबा ... "अशी हाक मारली
तसे मीराचे आई बाबा थबकले .. आता सगळी ताकद संपली होती .. ह्या प्रेमळ , हक्काच्या हाके पुढे सगळा राग- , द्वेष सगळे सगळे संपले होते उरले होते ते फक्त निरागस प्रेम \"
भरल्या डोळ्यांनी दोघांनी त्यांचे हात पसरवले आणि छोटीशी रिया धावतच त्यांच्याकडे धावत गेली .. आणि दोघांच्या मिठीत सामावली
आणि इकडे मीरा अजयच्या मिठीत सामावली
अजय " मीरा , ते तुझे आई बाबा आहेत .. तू त्यांना माफ कर .. त्यांचे वय झालेय .. त्यांनाही आधाराची गरज आहे "
मीरा रडतच अजयच्या मिठीत गेली
मीरा " अजय .. तुम्ही किती मनाने मोठे आहात .. थँक यु .. तुम्ही माझ्यासाठी जे काही केले आहे ते कोणचं करू शकत नाही "
अजय " मीरा .. आय लव्ह यु " बोलतच त्याने तिच्या कपाळावर किस केलं .. सगळे तिकडून निघाले .घरी आले.

🎭 Series Post

View all