Login

मोह मोह के धागे भाग - तीन

love story
      मधुला तो बरा होताना बघुन तिला आनंद
होत होता. तिच्या पोटात तर फुलपाखरेच
उडायला लागली होती. इकडे शिवांशला
स्वतःचा राग येत होता. आपण ठरवल होत
ना जे प्रेम आपल्याला आजपर्यंत कधीही मिळाल
नाही त्याच नावही काढायच नाही मग तरी
त्या मुलीचा नेहमी विचार करतोय, तिला
पाहील्यावर मनात अस का होत याचा त्याला
खुप राग येतो त्याने अजुन तरी ही मनातील
गोष्ट कुणाला सांगितली नव्हती. कदाचीत
मी तिच्या प्रेमात तर पडलो नाही ना...??


       शिवांश बरा होत होता. मधु रोज न चुकता
डाॅक्टरांसोबत ट्रिटमेंट साठी यायची. ती खुप
प्रेमाने शिवांशच करत होती. प्रत्येक गोष्ट त्याला
समजून सांगायची. मधुला अचानक लक्ष्यात
आल की आपण जरा जास्तच शिवांशची काळजी
करतो, तस त्याच्या मनात काही नाही तो किती
स्ट्रीक्ट माणुस आहे त्याच्याशी बौलायचीही
तिला समोर भिती वाटायची. ती कधीही त्याला
बोलत नव्हती. पण तो इतरांशी कस बोलतो
वागतो यावरुन तिला अंदाज आलाच होता.
पण आपण त्याचा जास्त विचार करण सोडून
दिल पाहिजे आणि ते बरही नाही. पण काही
केल्या त्याला समोर बघितल ना ती सगळच
विसरुन जायची. ती त्याच्यात गुंतत चालली
होती. ती त्याच्या प्रेमात पडली होती अजुन
तरी एकतर्फीच होती पण त्यानेही तिच्यावर
प्रेम कराव अशी तिची मुळीच अपेक्षा नव्हती.
तो तिला मनापासून आवडत होता पण हे फक्त
तिच्यापुरत होत. त्याला बघुन तिची कळीच
खुलायची. शेवटी कितीही काही केल तरी
आपणही माणुसच आहोत आपल्यालाही भावना
आहेत मग मी स्वतःला चुकीच का समजते.

      
    असेच काही महीने जातात. शिवांश आता
पूर्णपणे बरा झाला होता. तो त्याच्या बिझनेस
च काम मिटिंग्स अटेंड करणे , ऑफीसला जाणे
हि सगळी काम तो करू लागला. त्याला अस
पुन्हा उभ राहताना पाहून आज खरच मधुला
आनंद तर होता पण समाधानही होत की हा
पूर्णपणे बरा झाला. " चला आता आपण
उद्यापासून नाही यायच इथे तिला डाॅक्टलांनी
तस सांगितल होत. "  तस तिने शिवांशला
परत एकदा फोलोअपसाठी हाॅस्पिटलला यायाच
हा देशमुख डाॅक्टरांचा निरोप तिने शिवांशला
दिला त्यालाही बर वाटल. किती दिवस तो
फक्त आरामच करत होता. त्यालाही या सगळ्या
चा जाम कंटाळा आला होता पण काय करणार
त्याला बर व्हायच होत पुन्हा एकदा जोमाने
कामाला सुरूवात करायची होती हे त्याच
स्वप्न आज पूर्ण झाल होत.


     शिवांश बरा झाला, त्याच हाॅस्पिटलला येणही
कमी झाल. मधुचीही जबाबदारी संपली होती.
बर्‍याच दिवसांपासुन तिही त्याला विसरली होती.
तोही कामात खुप बिझी झाला होता. त्यालाही
वेळ भेटत नव्हता. थोड्याच दिवसांनी त्याचा
बर्थ डे होता त्यासाठी खास त्याने मधुलाही
आमंत्रित केल होत. त्याच्या बंगल्यावरच त्याने
सर्वांसाठी एक पार्टी ॲरेंज केली होती.


     आज शिवांशचा वाढदिवस होता. आज त्याने
स्वतःहुन वाढदिवसाला बोलवलय म्हणजे तो
आपल्याला विसरला नाही. त्यालाही मी आवडत
असेल का ? छे कुठे तो आणि कुठे मी तो
कश्याला माझा विचार करेल म्हणून मधु
नाराज झाली. तेव्हा तिला मितालीने समजावल.

" वेडा बाई, का कुणी तुझ्या प्रेमात पडणार
नाही. तु आहेच इतकी गोड तिचे गाल ओढत
मितालीने म्हटल. " मधुने मात्र अजुनच गाल
फुगवले. "अस नाही ग पण तो शिवांश का
माझा विचार करेल अस म्हणते मी "
मधुच्या या उत्तरावर मितालीने तिला सांगितल
फार पुढचा विचार नको करू. त्याने बोलवलय
ना मग ते क्षण एन्जाॅय कर ना मधु , तु फार
पुढचा विचार करत बसते.

" बर बाई नाही करत मी चालले माझी तयारी
करते मला रात्री उशिर होईल यायला म्हणून
मधु निघून गेली " जाताना तिने त्याच्यासाठी
एक गिफ्ट घेतल.


    शिवांशचा वाढदिवस म्हणून त्याचा पूर्ण
बंगल्याला लाइटींग करण्यात आली होती.
डेकोरेशनही अगदी डोळे दिपवून टाकणार
होत. शिवांशचे मित्र, स्टाफ आणि त्याच्यासोबत
काम करणारे लोक आज सगळे त्याच्या
वाढदिवसाला उपस्थित होते. पण त्याची नजर
आज एका व्यक्तीला शोधत होती. त्याने
सुमितला विचारलही " तु नक्की तिला बोलवल
आहेस ना "  शिक्षांशने विचारल्यावर त्याने
सांगितल की " भाई, ती येतच असेल. मी बघुन
येतो तो गाडी घेउन निघून गेला. "

        थोड्या वेळात मधु तिथे पोहचली. शिवांश
मात्र केक कट करायच सोडून तिच्याकडे एकटक
बघत होता. सुमितने त्याला हलकेच हाताला
हलवल आणि म्हटला " अरे ये शिवा लक्ष कुठे
आहे तुझ भाई आधी केक कट कर ना "
तेव्हा त्याच लक्ष जागेवर आल नि त्याने केक
कट केला. मधुही त्याला बघत होती. आज हा
शिवांश जरा जास्तच हँडसम दिसतो. पार्टी
सुरू होती. मधुला मात्र तिथे थांबण्यात काही
इंटरेस्ट वाटत नव्हता. उशीरही झाला होता.
शिवांशला मात्र सर्वांना भेटत होता. आज
सगळ्या मुलींची नजर त्याच्यावरुन हटतच
नव्हती. तो मात्र मधुला इकडे तिकडे बघत
होता पण ती निघून गेली होती. तो मात्र आज
वेड्यासारख तिला शोधत होता.


      त्याने सुमित आणि शशांकला विचारल,
" तुम्हांला मधु जाताना दिसली का ?"

" नाही भाई , दिसली नाही कुठेही आम्हांला
वाटत ती लवकर निघून गेली असेल "
सुमित आणि शशांकच बोलण शिवांशला
ही पटल होत. शिवांशने आज जास्तच ड्रिंक्स
करत होता. हे दोघेही मित्र त्याला थांबवत
होते पण आज तो वेगळच वागत होता.
कुणाचही ऐकत नव्हत नेमक त्याला काय झालय
कुणालाबी कळत नव्हत विचारल तर सांगतही
नव्हता. शिवांशने प्रशांतला गाडी काढायला
लावली आणि ते चौघेही मित्र दुर ठिकाणी
जाऊन बसले. पण कुणाला आपण ईकडे
का आलोय हे शिवांशला विचारायची हिम्मत
नव्हती. पण शेवटी सुमित त्याचा जिगरी
दोस्त त्याने विचारलच " शिवा आपण इकडे
या वेळेला काय करतोय तुला माहीतीये ना
आपल्याला ऊद्याच मुंबईला जायच आहे "

" हो रे शिवाने उत्तर दिल मला सगळ माहीती
आहे पण आता या क्षणाला मला शांतता हवी
होती. त्याला आज खुप एकटेपणा जाणवत
होता. त्याला त्याच्या आईची खुप आठवण येत
होती. त्याला त्याचे वडील आठवत होते पण
नंतरून त्यांनीही त्याला भेटायला येण सोडल.
कधी त्याने आईबद्दल विचारल तर लहान होतो
तर सांगितलही नाही. पण आई काही आठवत
नाही. बर्‍याच वर्षांपासून त्याला त्याचे वडील
तो कसा आहे हे विचारायला बघायला आलेले
नाही. त्याला त्यांचा खुप राग आला होता.
तो आज जे काही होता ते स्वतःच्या जीवावर
त्याने बिझनेस वाढवला होता. अनेक लोकांना
त्याने रोजगार दिला होता. कितीतरी लोक
त्याच्या हाताखाली कामाला होते. शिवाय
त्याचे जिगरी दोस्तही होते. तीच त्याची फॅमीली
होती. तो रडत होता हे त्या तिघांना दिसल.
त्यांनी त्याला शांत केल. त्याच्या पाठीवरुन
मायेने हात फिरवला आज पहील्यांदा त्यांनी
असा हळवा शिवाला पाहिल होत.

        थोड्या वेळाने तो शांत झाला आणि ते
घरी आल्यावर मात्र त्याला आज मधु किती
सुंदर दिसत होती आपण साध तिला बोलूही
शकलो नाही. तिने त्याच्या साठी खुप केल होत.
ती त्याची खुप काळजी घ्यायची. कधी भेटली
तर स्वतःहुन तब्येतिची त्याच्या चौकशी करायची आजपर्यंत त्याला अस प्रेमाने विचारणार,
आपल वाटणार कुणी भेटल नव्हत.


         दुसर्‍या दिवशी शिवांश ड्राईव्ह करत होता.
सोबत सुमित होता त्याच्या आज त्यांची एक
महत्वाची मुंबईला मिटिंग होती लवकर
पोहचायच होत म्हणून वेगाने गाडी चालवत
होता. पण पुढे गेल्यावर त्याने ब्रेक दाबला
आणि त्याचे हात थरथर कापू लागले. तो
खुप घाबरला आणि पटकन खाली उतरला.
समोर त्याला मधु दिसली. ती खाली कोसळली.
क्षणार्धात...