Login

मोह मोह के धागे भाग - सात

लवस्टोरी
       मधुला शिवांशने त्याच्या आयुष्यातुन दुर केल
होत. त्याला तिचा खुप राग यायचा ती दिसली तरी
तो तिला इग्नोर करून राग राग करून निघून
जायचा. हेच मधुला कळत नव्हत की काही
दिवसांपूर्वी आपल्यावर प्रेम करणारा आणि आपली काळजी करणारा माणुस आता अस
वागतोय हे तिला सहन होत नव्हत. ती रोजच
कामात व्यस्त असायची, त्याला विसरायच म्हटल
तरी तिच्यादृष्टीने सोप नव्हत. तिने शेवटी मनाने
खर प्रेम केल होत त्याच्यावर आणि ती इतक्या
लवकर हे विसरण अशक्य वाटत होत. म्हणतात
ना टाईम इज द बेस्ट मेडीसीन. यात थोडा तरी
तिला वेळ जाऊ द्यावा लागणार होता. मधु एकटी
पडली होती. त्या दिवशी तिची जेवणाची इच्छा
नव्हती मग तिने रात्री फक्त काॅफी घेतली आणि
मोबाईल मध्ये गाण ऐकू लागली. ते गाण जणू
तिच्या भावना त्या गाण्यातुन व्यक्त केल्यासारख
तिला वाटल ती ते ऐकत होती.

तेरी मेरी गल्लां हो गई मशहूर
कर ना कभी तू मुझे नज़रों से दूर
किथे चली ऐ तू किथे चली ऐ तू
किथे चली ऐ किथे चली ऐ

जांदा ऐ दिल ये तो जांदी ऐ तू
तेरे बिन मैं ना रहूं मेरे बिना तू
किथे चली ऐ तू किथे चली ऐ तू
किथे चली ऐ, जान चली ऐ

काटूँ कैसे रातां ओ सावरे
जिया नहीं जाता सुन बावरे

के रातां लम्बियां लम्बियां रे
कटे तेरे संगेयाँ संगेयाँ रे
के रातां लम्बियां लम्बियां रे
कटे तेरे संगेयाँ संगेयाँ रे

       तेवढ्यात दारावरती बेल वाजली. एवढ्या
रात्री कोण आल असेल मधुला खुप भिती वाटली.
शिवा तर आला नसेल ना... परत बेल वाजली.
पलीकडून आवाज आला, " अरे यार मधु किती
वेळ लावतेस दार ओपन करायला. मी आहे
मिताली. " हा... तिने सुटकेचा निःश्वास सोडला.
आणि पटकन दार उघडल. मितालीला समोर
बघून मधूला काही सुचल नाही. ती तिच्या गळ्यात
पडली. इतक्या दिवस आपली मैत्रिण दुर होती
मितालीने तिला जवळ घेतल आणि दोघी आत
आल्या. मिताली जेवण करून आली होती.
मधूने तिच्या आईच्या तब्येतीबद्दल विचारल,
मितालीने सांगितल की आई आता पूर्णपणे बरी
आहे. मधुला हे ऐकुन बर वाटल. मितालीला
वडील नव्हते फक्त आईच तिच जग होती.
म्हणुन मधुला नेहमी मितालाची काळजी वाटत.


     एक दिड महीना होऊन गेला होता परत
शिवांश मधुला भेटायला कधीही आला नाही.
भेटण तर दुरची गोष्ट पण तो साध तिला बोलतही
नव्हता. तीला दुसर्‍या दिवशी वाॅमेटींग होऊ
लागली. खुपच विकनेससारख जाणवत होत.
ती स्वतः वैद्यकीय क्षैत्रात असल्याने तिला अस
का होत आहे म्हणून ती विचारात पडली.
तरी तिने स्वतःला सावरल, थोडा वेळ पडून
राहीली. नंतर तिने चहा बिस्कीट खाल्ली. तिच
कश्यातच मन नव्हत. तिने आज सुट्टी टाकली
होती बर वाटत नाही म्हणून मिताली मात्र
तिची तयारी करून ऑफीसला निघाली. तिला
ही मधुला बर वाटत नाही दिसत होत. तिने
तिला काळजी घ्यायला लावली आणि हाॅस्पीटल
मध्ये जाऊन यायला लावल. मधुनेही तिला
" मी जाईन नॅतर हाॅस्पिटलला तु माझी काळजी
करू नको, " तिला टिफीन दिला आणि बाय
करुन मिताली निघून गेली. 

      मधु ती जिथे होती तिथे नाही दुसर्‍या हाॅस्पिटल मध्ये ती गेली. तिने तिने लेडीज
डाॅक्टरला तिला जे काही होतय ते सांगितल असता
त्यांनी तिला प्रेग्नंसी टेस्ट करायला सांगितली.
तिनेही शंका दूर करण्यासाठी केली. ती टेस्ट
खरच पाॅझिटीव्ह आली. मधुची शंकाही खरी
ठरली. तिला डाॅ. ने आत बोलवल आणि तीची
टेस्ट पाॅझिटीव्ह असल्याच सांगितल, त्यांनी
तिला काळजी घ्यायला सांगितली. दुसर्‍या काही
ब्लड टेस्ट साठी त्यांनी तिला दुसर्‍या दिवशी
बोलवल. तिला हे ऐकुन एकदम शाॅकच बसला.
तिच्या पायाखालची जमिनच सरकली. आता
काय कराव तिला काही सुचत नव्हत. तिला
ओरडणार कींवा रागवणार घरी कुणी नव्हतच.
पण ज्याच्यावर प्रेम केल ज्याच्यामुळे हे झाल
तो तर बोलायलाही तयार नव्हता. तीने डोळे
पुसले आणि आजच त्याला सांगायला ती
जाणार होती. तिला अर्जंट त्याला भेटायच होत.

         घरी आल्यावर मितालीने तिला विचारल,
" तु हाॅस्पिटलला गेली होती का ? काय म्हणाले
तुला डाॅक्टर ?"  मधु आपल्या मैत्रीणीला कस
आणि कोणत्या तोंडाने सांगणार होती. पण तिच
शिवांशवर प्रेम आहे हे मितालीला माहीती होत.
मग हिम्मत करुन मधुने मितालीला त्यादिवशी
झालेल सगळ सांगीतल. आज त्याच्यामुळे
झालेली गोष्टही तिने न लपवता सांगितली.

" मधु इतक सगळ झाल. आता तरी त्याने तुझा
स्विकार केला पाहीजे.त्यानेही प्रेमाची कबुली
दिली होती. काही झाल तरी त्याला तुझ्याशी
लग्न करावच लागेल. तु आणि मी उद्याच त्याला
हे सगळ सांगुन देउ . ", मिताली.

" काय यार मधु प्रेमात वेडी झाली त्याच्या आणि
हे काय होउन बसल सगळ " पहिल प्रेम तुझ
आणि ते ही अश्या मुलावर केलस तु "
मितालिच बरोबरच होत. तेव्हा मधू तिला म्हटली,

पहील प्रेम हे पहील प्रेम असत....❤️
  त्याच्यापेक्षा सुंदर या जगात काहीच नरत.
पहिल प्रेम मिळो अथवा न मिळो पण सुंदर
आठवणींची आयूष्यभर सोबत होते नाही का ?
प्रेमात पडायला एक क्षण पुरेसा असतो...
प्रेम कधी पहिल कींवा शेवटच नसत...
कारण प्रेम हे केव्हाही होऊ शकत...
प्रेम हे फक्त प्रेम असत...  ?
म्हणतात ना....  "  सच्चा प्यार चाहे दो पल के
लिए ही हो.... मगर एहसास जिंदगी भर के
लिए दे जाता हे ।

" हो का मधु मॅडम झाल प्रेमावर बोलून, मग
माझही आता ऐका प्रेमात विश्वास असावा
लागतो तरच नात पुढे टिकत " , मिताली.

नात कुठलही असू द्या...त्यात विश्वास हवाच.
विश्वास हा खोडरबर सारखा असतो.तुम्ही केलेल्या
प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.जिथ विश्वास असतो ना, तिथ नात आपोआप बनत जात.आयुष्यात कधीच कोणाचा विश्वास तोडू नका.तुमचा स्वताःवर चा विश्वास कधीच गमावू देऊ नका कारण तो परत मिळवण कठीण असत.
विश्वास हा किती छोटा शब्द आहे...

  वाचायला सेकंद लागतो...
  विचार करायला मिनीट लागतो...
  समजायला दिवस लागतो...आणि
  सिध्द करायला संपूर्ण आयुष्यच लागत...

   " हो तुझ अगदी बरोबर आहे मिताली अग पण
मन हे वेड असत ना ते प्रेमात पडताना नाही ना
या सगळ्याचा विचार करत. प्रेम हे ठरवुन होत
नाही ना " पण प्रेम हे फक्त प्रेम असत ते
फक्त समजायला हव.

      प्रेम ही भावना समजली तर खुप सुंदर आहे. प्रेम म्हणजे विश्वासाच नात...प्रेम म्हणजे एकमेकांचा केला जाणारा आदर... प्रेम म्हणजे काळजी... प्रेम म्हणजे एकमेकांना साथ देणे... आपल सुख- दुख शेअर करणे.... प्रेम म्हणजे एकमेकांना समजुन घेणे.प्रेम हे काही सांगुन
होत नाही.प्रेम कोणत्याही क्षणी होत.प्रेमात रंग, रूप जात, पात असा भेदभाव नसतो. प्रेमात पडताना या गोष्टींचा विचार आधी केलेला नसतो.आपण कुणाच्या  तरी नकळत प्रेमात पडतो, त्या व्यक्तीचही आपल्यावर प्रेम असाव लागत.चेहरा बघून केलेल प्रेम कधी टिकत
नाही आणि मन बघून केलेल प्रेम कधी तुटत नाही अस म्हणतात.प्रेमात पडायला एक सेकंदही पुरेसा असतो. प्रेमात माणुस काहीही करायला तयार होतो.प्रेमात विश्वास असावा पण आंधळा विश्वास नसावा.

        त्यादिवशी मधु प्रेमावर खुप छान बोलत होती. तिच्या मनातल्या भावनाच तिने व्यक्त केल्या
होत्या. मितालीला ही समजल होत की तिच्या
बोलण्यावरून की मधुच खुप प्रेम आहे शिवांशवर
त्यामुळे आपल्या मैत्रिणीला तिने उद्या साथ
द्यायची ठरवली. मधु प्रेमाच्या गोष्टी करताना
कधीची शांत निरागस लहान मुलाप्रमाणे
मितालिच्या मांडीवर डोक ठेवुन शांत झोपी
गेली होती. मग मितालीने तिला निट झोपवल.
दुसरा दिवस मधुसाठी खुप महत्वाचा होता,
मधु शिवांशला भेटुन ही बातमी देणार होती.
तिला वाटल कदाचीत तो हे ऐकून बदलेल.
तो तिच्याशी लग्न करेल. पुढे खुप स्वप्न तिने
रंगवली होती.

         बघूया पुढे काय होतय पुढील भागातुन
कळेल.