मोह मोह के धागे भाग - आठ

लवस्टोरी
        मधु त्यादिवशी खुप खुश होती. तिला आज
शिवांशला भेटायला जायच होत. तिने सकाळी
लवकर तयारी केली. आज मितालीला महत्वाच
काम असल्यामुळे तिने मधुलाच तु त्याला भेटुन ये
सांगीतल आणि त्याला सगळ शांतपणे सांग.
मधुनेही मानेने होकार कळवला. मधु थोड्या वेळाने चहा नाश्ता करुन त्याला भेटायला निघाली.
ती त्याच्या घरीच त्याला भेटायला गेली. तो
बाहेर बसला होता. लॅपटाॅपवर महत्वाच काम
करत बसला होता. शिवांशला गेटवरुन काॅल
आला की तुम्हांला " मधु मॅडम भेटायला आल्यात
त्यांच महत्वाच काम आहे तुमच्याकडे "
ओके पाठवून दे म्हटल्यावर मधुला आत सोडल.
शिवांशने तिला पाहील. त्याच्यासमोर त्याचे मित्र
तिघेही बसले होते. तो त्यांच्याशी काहीतरी चर्चा
करत असल्याच तिला दिसल. ती दुरूच थांबली.
तो बोलवण्याची वाट बघु लागली. सुमितने त्याला
सांगितल की तु मधुशी नीट बोल तिच काय काम
आहे ते बघ. शिवाने मानेनेच होकार दिला.

     शिवांशने तिला जवळ बोलवल बसायला
सांगितल. सिमा मावशींनी दोघांसाठी चहा आणुन
दिला. त्याने तिला विचारल, " काय काम आहे
तुझ मधु , तुला माहीती आहे मला वेळ नसतो
मला खुप काम असतात आताही मी त्या तिघांशी
महत्वाच्या मिटींग्स, डील संदर्भात बोलत होतो. "

" साॅरी शिवा, तिच्या तोंडुन त्याच प्रेमाने नाव
ऐकुन तो ही शांत झाला. माझही तुझ्याकडे
महत्वाच कामच होत म्हणूनच आले नाहीतर
तु तर सांगितलेल माझ्या अजूनही लक्ष्यात आहे
की यापुढे मी तुला भेटायच नाही. असो मी
डायरेक्ट मुद्दाचच बोलते.

" त्या दिवशी आपल्यात जे काही झाल तेव्हा
पासून तु माझी साधी चौकशीही केली नाही.
फक्त या गोष्टीसाठी माझ्याबरोबर प्रेमाच नाटक
केलय तु मला सगळ माहीती आहे. मला तु
फसवल आहेस. हे सगळ मी विसरून जायच
ठरवल होत तर का मी पण त्यादिवशी तुला साथ
दिली. मी थांबवल होत पण तु ऐकल नाही. तुला
राग आला असता आणि माझ तुझ्यावर खुप
मनापासुन प्रेम होत आणि तु लग्नाच वचन दिल.
मी त्या धुंदीत... आनंदात होते. त्यामुळे माझ्याकडून हे अस झाल. पण मला काय माहीती
होत पुढे तु मला अस रस्त्यावर सोडून देशील,
निघून जाशील म्हणून मला अपेक्षा नव्हती की
तु इतक स्वार्थीपणे वागु शकतो. तुला काय रे
तु एका मुलीच आयुष्य खराब केलस आणि ते
विसरलासही. तुला त्याच जराही काही वाटत
नसेल. पण सगळ सहन आम्ही स्रीयांनीच करायच.
जे काही झाल त्याची शिक्षा मात्र आम्हीच भोगायची. लोकांचे टोमणेही ऐकून घ्यायचे.
बदनामी होते ती वेगळीच आणि आयुष्याची वाट
लागते. जगण्याची इच्छाही उरत नाही. आता
माझ पण तेच झालय तुझ्यामुळे मला जगण्याची
ही इच्छा उरली नाही. तिने त्याला तिचा रिपोर्ट
दाखवला. तिने त्याला ती प्रेग्नंट असल्याच
सांगितल. त्याचा मात्र तिच्यावर विश्वासच बसत
नव्हता. ती बोलत होती तो फक्त ऐकत होता.

 " मि काय म्हणते, मला तुला या गोष्टिचा दोष
एकट्याला अजिबात द्यायचा नाही. तु आता
माझ्याशी लग्न कर आणि आपण छान सुखाने
आनंदाने दोघेही राहूया... जे झाल गेल ते सगळ
विसरून पुन्हा आपण नव्याने सुरूवात करूया "
आता मात्र शिवाला खुप राग आला. त्याने तिला
म्हटल.

" मी काय बोलतो ते निट ऐक मधु , हे जे
झाल ते सगळ विसरून जा... आणि तु हे
बाळ ठेवू नकोस. तु ऊद्या रेडी राहा. मी माझ्या
ओळखीच्या हाॅस्पिटलमध्ये तुला घेऊन जातो.
सगळ ठिक होईल. नंतर तु तुझ्या आयुष्यात
पुढे जाऊ शकतेस " , शिवांशने हे बोलल्यावर
मधूची तळपायाची आग मस्तकात गेली.

      तिला हे बाळ हव होत. तिने शिवांशला
म्हटल की हे सगळ करण्याआधीच तुला विचार
करता नाही का आला ? आता तु जे बोलतोय
ना ते मला अजिबात पटत नाही. काहीही झाल
तरी मी अस काही करणार नाही तसही सत्य
कधीही लपून राहत नाही. हि गोष्ट आज ना ऊद्या
कुणाला समजेलच. आणि तु म्हणतो मी
आयुष्यात पुढे जाव कुणाला यातल काही सांगु
नये, ते सगळ ठीक आहे पण मी स्वतःशी तर
खोट बोलू शकते पण मला समोरच्या चांगल्या
मुलाला अस फसवायच नाही. मी या बाळाला
काही झाल तरी जन्म देईन. " , मधु खुप
रागात होती. तिने तिला वाटल ते सगळ त्याला
बोलून दाखवल. तो ही रागात होता पण त्याने
जे बोलल ते खुप चुकीच होत आणि ते मधुच्या
मनाला खुप टोचल... " कुणाला माहीती आहे
हे नक्की माझ्याचमुळे झालय का इतर कुणामुळे
झालय पण माझच नाव घेत आहे तु "

" बस झाल शिवांश, खुप ऐकून घेतल तुझ
मी तुला लाज नाही का वाटत हे सगळ
बोलायला... यानंतर तुझा चेहराही मला दाखवू
नको समजल. एक दिवस असा येईल ना तुला
तुझ्या चुकांची जाणीव होईल. तेव्हा तु येशीलच
माझ्याकडे मग मी बघते तुला " , मधुच्या
बोलण्याने शिवाला काही फरक पडला नाही.
   
     शिवांशला तिचा हा निर्णय मान्य नव्हता. त्याने
सांगितल की ठीक आहे यापुढे तुझ तु बघ. मला
परत इथे कधीही भेटायला येऊ नको. तु माझ
ऐकल तर ठीक नाहीतर मी तुला यापुढे कूठलाही
सपोर्ट करणार नाही. मधुला तो कसा स्वार्थी
आणि निर्दयी आहे हे कळल होत.

     शिवांशला भेटायला एक साहेब आले. मधुला
तिथुन निघताना चक्कर आली आणि ती
क्षणार्धात कोसळली. त्या व्यक्तीला मधुला
तिथे पाहून आश्चर्य वाटल. शिवांशही तिला
पकडण्यासाठी पुढे धावला पण त्या व्यक्तीने
त्याला अडवल. त्या व्यक्तीने कुठलाही विचार
न करता मधुला आपल्या गाडीत घेउन गेला.
शिवांश मात्र त्याच्या सहकार्‍यांवर ओरडला
" तुम्ही तर म्हटले की तो मला भेटायला आलाय
आणि मग मधुला पाहील्यावर त्या माणसाचा
चेहरा असा का पडला, कदाचित तो तिला
ओळखीचा असावा, त्याच्यामुळे तर नसेल ना
झाल... नक्की मधुचा तो कोण आहे हे पहील
शोधून काढल पाहीजे " त्याने त्याच्या माणसांना
कामाला लावल.

        
        मधुला जरा वेळाने जाग आली तेव्हा ती
एका हाॅस्पिटलमध्ये होती. अशक्तपणामुळे तिला
आयव्ही लावली होती. संध्याकाळी तिला बर
वाटु लागल्यावर डिस्चार्ज मिळाला. मिताली
तिला घेण्यासाठी आली होती. पण मधुला कळत
नव्हत की तिला इथे कुणी आणल होत.


     घरी आल्यावर ती शांत बसली. जे झाल ते
सगळ विसरण्याचा प्रयत्न करत होती पण
म्हणतात ना भूतकाळ काही आपला पिच्छा सोडत
नाही. शिवाची तिला आठवण आली. " तो असा
कसा बोलू शकतो मला. त्याच तर प्रेम होत
माझ्यावर मग काय झाल त्याला त्याच्या आयुष्यातुन काढून टाकल मला. मी ही परत
त्याला कधीही भेटणार नाही, तु कितीही मला
नाकारलस तरी माझ तुझ्यावर खुप प्रेम आहे
आणि कायम असेल.

" एके दिवशी माझा श्वास बंद होईल.
नको विचार करूस की माझ प्रेम कमी होईल.
अंतर फक्त एवढ असेल आज मी तुझी
आठवण काढत आहे.
ऊद्या तुला माझी आठवण येईल "

**************************

      शिवांशला त्याची चुक कळेल का ? तो मधुला
स्विकारेल की नाही काय वाटत तुम्हांला ?

        
                          क्रमशः