Login

मोह मोह के धागे भाग - दहा

लवस्टोरी
             मिताली ड्युटीवरून आली. ति मधुला
सगळीकडे शोधत होती. पण ती तिला कुठेही
दिसत नव्हती. तिलाही जरा भिती वाटली.
" ही कुठे गेली असेल यार  " ... मिताली दमुन गेली मधुला शोधून शोधून मग तिला विचार आला
की आपण वरती गच्चीवर जाउन बघूया म्हणून
ती धावतच वरती गेली तर समोर तिला मधु
दिसताच तिचा जिव भांड्यात पडला. ती रडत
होती. " काय झाल मधु ? " मिताली तिच्या जवळ
गेली तिचे डोळे पुसले. " शांत हो रडायला काय
झालय तुला , वेडे तु इथे बसली आहे आणि मी
वेड्यासारखी तुला शोधतेय. किती घाबरले मी
माहीती आहे क्षणभर नाही ते विचार येउन गेले.
मधु अशी कुठेही न सांगता नको ना जाऊ ग
मला तुझी खुप काळजी वाटते. " मधुने मितालीचा
केवीलवाणा चेहरा बघितला. खरच तिला
जाणवल की काळजीने तिने मला खुप शोधल.
ती आता आली दमुन गेली होती. तिची काळजी
मधूलाही समजली होती.

" बोल ना मधु काय झाल अचानक तुझ तर
सगळ ठरलय ना मग आज एकटीच बसुन
कश्याला रडत आहेस ग ? " , मिताली.

" मितु , अग मी त्याला कितीही विसरून जायच
म्हटल ना ग सारख मला त्याचा चेहरा समोर
येतो. मी त्याला विसरायच म्हणते आणि तो
कुठेही माझ्या नजरेला दिसतो त्यामुळे मला
त्रास होतो. मी ना ही सिटी सोडून दुसरीकडे
जाते. म्हणजे तो ना असा सारखा मला माझ्या
नजरेसमोर दिसणार नाही, थोड तरी मी त्याला
विसरू शकले आणि माझ पुढच आयुष्य मी
जगु शकेल. "

  मधू हे विसरत होती आपण एखाद्या
व्यक्तीला कितीही विसरायच म्हटल तर ते एवढ
सोप नसत... विसरल तरी आठवण येतेच.
मितालीला मधुच्या भावना समजल्या होत्या.
ती हे चांगल्यासाठीच म्हणत आहे नाहीतर
ती त्याच्यातच इथे अडकुन राहिली तर त्या
गोष्टीचा तिला त्रास होईल. म्हणून मितालीने
तिच्या निर्णयाच स्वागतच केल.


प्रेम हि अनुभूती आयुष्यभरासाठी असते.
एखादी व्यक्ती मनापासून आवडली तर ती
आपल्या मनात घर करून बसते. आपण त्या
व्यक्तीला आपली मानतो. हा आता ती व्यक्ती
आपल्यासोबत आयुष्यभर असण नसण
शेवटी हा नशिबाचा भाग म्हणायचा.
आयुष्यात नसतानाही ती आपल्यापासुन दुर
गेली असतानाही आयुष्यच त्याचे नावे करण
हिच तर खर्‍या प्रेमाची निषाणी असते.

" मधु मला तुझ म्हणण पटतय, मग तु एक
काम कर तु दुसरीकडे जाॅब शोधणार आहेस
ना मग तु माझ्याच गावी जा ना तिथे आई तर
एक मावशी सोबत एकटीच असते आणि तुलाही
मग बाकी काळजी करायची काही गरज नसेल.
ती तुझी खुप काळजी घेईल. " , मिताली.

" मधु , अग आई काळजी घेणारच मला माहीती
आहे. मला माहीती आहे मी पहिल्यापासुन तुझ्या
घरी येते. तुझ्यासोबत आई मलाही कपडे घेते.
तुला जे पाठवल जात तेव्हा मलाही न विसरता
पाठवते. मला आईसारख प्रेम करते तुझी आई.
मला आईला त्रास द्यायचा नाही पण मला तिला
भेटायला जायच आहे मी नक्की जाईल " , मधु

" मिताली एक सांगु मला ना कुणावर अवलंबुन
राहायच नाही आहे. तुला माहीती आहे ना
सोबत कितीही लोक असु दे ग पण संघर्ष
स्वतःलाच करावा लागतो. म्हणून ना अडचणीत
आधार नाही शोधायच ग, तर स्वतःलाच भक्कम
बनवायच अस मला वाटत "


" बर बाबा, ठिक आहे मधू तु ना खुप हट्टी आहेस
बघ, तुला जे हव तेच करत आहे. पण मधु मी
पण नाही राहू शकत ग ईथे तुला सोडून, मलाही
तुझी खुप सवय झाली आहे. तुझी काळजी ही
वाटते आहे. " , मितालीच्या बोलण्यातुन मधुला
समजल होत की मिताली तिला सोडून नाही
राहू शकत. मग तिने तिला मी आधी जाते.
तुझ्याही जाॅबच बघते तु लगेच ये मग अस
म्हटल्यावर मितालीने तिला घट्ट मिठी मारली.

" मधु बघ ना आयुष्यात काही होवो, कितीही
कठीण परिस्थिती येऊ देत. आपल्या मनाची
मुळ इतकी मजबूत असली पाहीजे की कुणी
आपली साथ जरी सोडली ना आपण मात्र
खंबीर पणे उभ राहील पाहीजे.  "
मधु अगदी खर आहे बघ तुझ...
मधुही खुप आनंदात होती. तेवढ्यात मितालीने
म्हटल, " मधु यार हळू ना.... आता काळजी
घे स्वतःची, तु आई होणार आहेस अस फार
मस्ती करू नको... " तशी ती ही हसायला
लागली. आज कितीतरी दिवसांनी ती मधुला
अस मनमोकळ हसताना बघत होती, तिलाही
खुप छान वाटल.


      मितालीने दोघींसाठी जेवण बाहेरून मागवल
तेही सगळ मधूच्या आवडतीच्या त्यामुळे ती ही
खुप खुश झाली. दोघींनी आनंदाने जेवण केल.
नंतर मिताली फोनवर आईशी बोलत बसली.
मधु गाणे ऐकत होती, तिला गाणे ऐकायची
खुप आवड होती. ती गाण ऐकत होती जणू
ते गाण तिच्यासाठीच आहे अस तिला वाटल.

मैं ता जिया ना मरा
हाय वे दस में कि करा...

दिल जुडे बिना हि टुट गये
हाथ मिलें बिना ही छुट गये
कि लिखे ने लेख किस्मत ने
बार बार रौंद अखियाँ
तैतु जो ना वेख सकीयाँ
खोले आए आज कुदरत ने
कहां मैं की वे दिन
तेरी सौंह तेरे बिन
मैं तो जिया ना मरा

छन से जो टुटे कोई सपना
जग सुना सुना लागे
जग सुना सुना लागे
कोई रहे ना जब अपना
जग सुना सुना लागे
जग सुना सुना लागे
जग सुना सुना है तो
ये क्युँ रोता है
जब ये दिल रोता है
रोए सिसक सिसक के हवायें
जग सुना लागे...

छन से जो टुटे कोई सपना
जग सुना सुना लागे
कोई रहे ना जब अपना
जग सुना सुना लागे
जग सुना सुना लागे रे
सुना लागे रे ...

   
        मधु ये मधु मितालीने तिला आवाज दिला.
तेव्हा ती झोपी गेली होती.


        दुसर्‍या दिवशी सकाळी शिवांशच्या इथे
आशिष सकाळीच आलेला होता. तो प्रचंड
घाबरला होता. शिवांशला दादा मला वाचला
च्या विनवण्या करू लागला. शिवांश नुकताच
व्यायाम करून आला होता. त्याच्या डोळ्यांत
आशिषविषयी राग दिसत होता. तो त्याच्या
पाया पडत होता.

" आशिष उठ उभा राहा, आधी मला सांग,
तु त्या मुलीशी अस का वागलास, का तिला त्रास
दिलास ? " शिवांश.


आशिष त्याला जे वाटत ते सांगु लागला.
दादा, मला ती मुलगी खुप आवडते. माझ तिच्यावर
खुप प्रेम आहे. मी तिला प्रपोझ करत होतो,
पण ती मला नाहीच म्हणते म्हणून...

तो पुढ बोलणार तेवढ्यात शिवांशने त्याच्या
कानाखाली वाजवली.
" ती मुलगी तुला नाही म्हणते कारण तिने ति
तुझा विचार नाही करू शकत. ती तुला ओळखत
नाही मग ती तुझ्या प्रेमाला होकार कस देईल.
मुलगी आहे ती मॅगी नाही लगेच रेडी व्हायला.
तिला तु आवडत नसेल मग का तु तिला
प्रेमासाठी तिच्याकडून जबरदस्तीने होकार
मिळवत आहेस. प्रेम काय अस मागुन मिळत
असत का ? " समजत कस नाही तुला त्यासाठी
तु तिचा होकार मिळवण्यासाठी तिला जो त्रास
दिलास ना... ते योग्य नाही.

नाही म्हटली ना ती मुलगी तुला मग तु तरी
तिच्यावर होकार मिळवण्यासाठी धमकी देत
होतास. मला सगळ समजल आहे. मी तुझा
व्हीडीओ बघितला आहे.

" दादा एकदा माफ करा फक्त परत अशी चुक
होणार नाही आणि झालिच तर तुम्हांला जी
शिक्षा वाटेल ती मला देऊ शकता " , शिवांशला
त्याच्या डोळ्यात केलेल्या चुकीबद्दलचा
पश्चाताप दिसुन येत होता.

" ठिक आहे एवढ्या वेळेस तुला माफ करतो
मी पण अशी चुक परत झाली तर मी तुला
अशी शिक्षा करेल की तु विचारही करू शकत
नाही." शिवांशने अस म्हणताच तो नाही दादा
मी परत अशी चुक करणार नसल्याची हमी
दिली. शिवांशने ही त्याला जाता जाता सांगितल
की आशिष एक लक्ष्यात ठेव...
परत कुठल्याही मुलीने तुझ्यावर प्रेम कराव
अशी जबरदस्ती तु करणार नाही, तुला ती मुलगी
आवडली म्हणून प्रेम म्हणजे दुसर्‍याच्या मनात
आपल स्थान निर्माण करता आल पाहीजे.
समोरच्या व्यक्तिचही आपल्यावर प्रेम पाहिजे
नाहीतर एकतर्फी प्रेम काही फायदा नाही.
प्रेम ही जगातील सुंदर भावना आहे समजल
ती अशी जबरदस्तीने मिळवू नको. एवढ बोलुन
तो फ्रेश व्हायला निघून गेला.


          मधु सकाळीच गावी जाण्यासाठी निघाली.
ती जात असताना एक कार तिच्यासमोर थांबली.
त्यातुन अजिंक्य खाली उतरला.
" हाय ! ताई तब्येत कशी आहे आता ? "
मधुने त्याला पाहिल्यासारख वाटत होत त्याचा
चेहरा पण नाव आठवत नव्हत. तेव्हा त्यानेच
सांगितल.

" साॅरी तुम्ही मला ओळखल नाही वाटत,
मी अजिंक्य पाटिल, तुम्हांला माझी आत्या
आठवली, हाॅस्पिटलमध्ये ॲडमिट होती. तुम्ही
तिला भेटायला आमच्या घरीही आला होता. "

" ओ.... रियली साॅरी, आल माझ्या लक्ष्यात
मला पटकन नाव लक्ष्यात नाही आल तुमच "
मधुने अस म्हणताच, इट्स ओके अजिंक्यने
म्हटल.

" तुम्हाला त्या दिवशी चक्कर आली होती मीच
तुम्हांला हाॅस्पिटलमध्ये पोहचवल हौत म्हणून
तुम्हांला आता तब्येत कशी आहे विचारल ",
अजिंक्य.

" मी आता ठिक आहे " , मधु
मधुनेही त्याच्या आत्याची तब्येतीची चौकशी केली.
त्याने ती बरी असल्याच सांगितल. मधु काहीतरी
विचार करत होती. तेव्हा अजिंक्यनेच तिला
म्हटल की , तुम्हांला मी ताई म्हटलेल राग आला
का ? " खरतर पहिल्यांदाच तिला इतक्या
प्रेमाने ताई म्हटल्यामुळे ते खुप आवडलही होत
आणि तिच्या डोळ्यांत पाणीही आल होत.

" अजिंक्य नाही रे , मला तर कुणीही नाही आहे
म्हणजे मी अनाथ आहे त्यामुळे तु अस ताई
म्हटला ना मला भरून आल एकदम "
छान वाटल मला लहान भावाने मला ताई
म्हटलेल. तिने डोळे पुसत म्हटल. त्यानेही तिला
सांगितल की कधीही तुला काही अडचण आली
ना तर नक्की मला सांग मी हा तुझा भाऊ
तुला मदत करेन. तिनेही त्याच्या डोक्यावरुन
मायेने हात फिरवला आणि ती काळजी घे
म्हटली त्याला आणि दोघेही दोन दिशांना
निघून गेले.  जाताना त्याने त्याच कार्ड दिल
होत. ते तिने आपल्या पर्समध्ये टाकल.

      मधुचा आता गैरसमज दुर झाला होता की
तिला शिवांशने नाही तर अजिंक्यने हाॅस्पिटलमध्ये
पोहचवल होत. 


      शिवांश ऑफिसला जायला निघाला, त्याला
नेहमीपेक्षा आज जरा जास्तच उशिर झाला होता.
सिमा मावशीने त्याच्यासाठी ब्रेकफास्ट दिला
तोही त्याने न खाताच तो ऑफिसला निघून गेला.
तो खुप घाईत होता. प्रशांत त्याच्यासोबत होता
पण त्यालाही कळेनास झाल होत की नेमक
आज शिवांशला झाल काय ? त्याच्या डोक्यात
काय सुरु असत त्यालाच माहीती आपण न
विचारलेल बर म्हणून तो गप्पच बसला.


       पुढे काही अंतर गेल्यावर शिवांशने गाडीचा
ब्रेक दाबला.... तो खुप घाबरला पुढे एक बाई
होती... त्याची हृदय खुप स्पीडने धावत होत.
तो तिला पाहत होता... त्याला काहितरी आठवल
होत... हि बाई तर ती आहे जो फोटो माझ्याकडे
आहे... त्यातली बाईसारखीच दिसते... तेवढ्यात
अजिंक्यला तिथे पाहून शिवांशला खुप राग आला
त्याचा हा काय स्पीडबेकर सारखा माझ्या
वाटेत आडवा येतो...

     शिवांशला अजिंक्य ओरडून खाली ये अस
सांगत होता. तो खुपच रागवला होता... त्याने
हाताच्या मुठी आवळल्या... आणि त्या गाडी
जवळ तो गेला...

      
                                      क्रमशः
   
**************************

    कथेचा आजचा भाग कसा वाटला नक्की
कमेंट करून सांगा. तुम्ही वाचुन कमेंट
दिल्या तर मी पुढचा भाग लवकर प्रकाशित
करेल.