Login

मोह मोह के धागे भाग - बारा

लवस्टोरी
शिवांशने अजिंक्यला थांबवल पण त्याने
वेळ नाही म्हटल, शिवांशला त्याने आज
संध्याकळची वेळ आणि ठिकाण सांगितल.
त्याला मधुविषयी माहिती काढायची होती म्हणुन
तर तो अजिंक्यला भेटायला जाणार होता...



            अजिंक्यने शिवांशला एका रेस्टारंट मध्ये
बोलवल. शिवांश आपल्या मित्रांसोबत त्याला
भेटायला गेला. अजिंक्य बरोबर वेळेवर आला.
शिवांशने त्याला म्हटल मलाही आज वेळ नाही
आहे पण मला तुला एक विचारायच आहे .
" तु एकदा माझ्याइथुन एका मुलीला हाॅस्पिटलला
नेल होत ती मुलगी आता सद्या कुठे आहे ? "

" का इतक्या दिवसांनंतर तु विचारत आहे ?
तु मला सांग ती तुझी कोण आहे हे सांग आधी.

तेवढ्यात अमित म्हटला, गर्लफ्रेंड आहे त्याची
पण आता ती सद्या गायब आहे यामागे तुझा
तर हात नाही ना... अमितने उगीच बाण मारला
लागला तर लागला कारण इतक्या सहजासहजी
उत्त्तर देण्यार्‍यतला अजिंक्य नव्हता. त्याला
दोन चार भेटीतच अमित ओळखुन होता.
हा खुप हुशार आहे. अजिंक्य चेअर वरून उठला
आणि त्याने शिवांशच्या खांद्यावर हात ठेवून
म्हटल, " साॅरी ब्रो, मला ती मधु आता कुठे
आहे खरच माहीती नाही. पण मला एक कळत
नाही तुझी गर्लफ्रेंड आहे आणि ती सद्या कुठे
गेली ते तुलाच माहीती नाही आणि तु तिला
एकदा माझ्यासोबत बघितल म्हणून मला
विचारण्यासाठी आलास. " अजिंक्यच्या या
बोलण्यावर शिवांश खुप चिडला, अमितने
त्याला शांत केल. त्याच्या कानांत सांगितल.

" शिवा कुल डाऊन यार, आता तु थोडा तुझ्या
रागावर कंट्रोल कर नाहीतर हा आजही निघून
जाईल काही न सांगता " तस शिवा ही शांत झाला.
त्याला अमितच बोलण पटत होत.


" अजिंक्य म्हणाला, तुला एकतर मधुवर विश्वास
नाही, म्हणुन तु तिच्यावर पाळत ठेवून आहेस
अस मला वाटल. "

" अजिंक्य, तु जरा जास्त बोलतोय अस वाटत
नाही का, माझ्यासमोर आवाज वर करून
बोलायची कुणाची हिम्मत नाही समजल ",
शिवांश.


" हो ना मग ऐक , तु ज्या मुलीबद्दल चौकशी
करतो, नजर ठेवून आहेस , आता ती कुठे गेली
तुलाच माहीती नाही. तुला फक्त एकच नात
माहीती आहे अस वाटत. नात कुठलही असो,
आपण माणुसकी म्हणून कुणाला मदत करू
शकत नाही का ? रक्ताच्या नात्यापेक्षा परकी
माणसे माणुसकीच दर्शन घडवतात तुला नसेल
याचा अनुभव पण मला आहे. "


" ते सगळ ठिक आहे पण तु माझ्या गर्लफ्रेंडला
माझ्या डोळ्यादेखत उचलुन हाॅस्पिटलला नेलस
त्याआधी ना मी तुला तिच्यासोबत कधी बघितल.
ना तिने कधी तुझ्याविषयी सांगितल ", शिवांश.

आता मात्र अजिंक्यला खुपच राग आला, हा
माणुस त्या एवढ्या चांगल्या मुलीबद्दल अस
बोलतोय. जी मुलगी स्री आहे का पूरूष हे न
बघता सर्वांना मदत करते. हा माणुस गैरसमज
करून घेत आहे. अस तो मनातच म्हणत होता.

" बोल ना अजिंक्य आता तुझी बोलती बंद
झाली " , अजिंक्य.


" तु जिला तुझी गर्लफ्रेंड म्हणतो ना तिच्याबाबतीत
गैरसमज करत आहे ना ती मुलगी खुप चांगली
आहे. कुणालाही मदत करते आणि निःस्वार्थी
पणे सेवा करते हे तर तुला माहीतीच असेल.


      असेच एक रात्री माझ्या घरी कुणीही नव्हत.
सगळे लग्नासाठी गेले होते चार पाच दिवसांसाठी.
आत्याची तब्येत बरी नव्हती म्हणून तिला इथे
ठेवल आराम करण्यासाठी आणि मी एकटाच
होतो. तिला त्या रात्री तब्येत अचानक बिघडली.
मला तेव्हा काही सुचल नाही. तिची हालत तर
खुप काही मिनिटांतच खुप बिघडली. मी तिला
हाॅस्पिटलला नेल त्वरित तिच्यावर ट्रिटमेंट सूरू
झाली. घरच लग्न होत त्यामुळे घरच्यांना तरी
कस टेन्शन देणार. ते कोकणात गेले होते. उगाच
त्यांना टेन्शन नको म्हणून मी फोन केला नाही.
तेव्हा मी स्वतःच घाबरून गेलो हौतो. आत्याला
काही झाल तर घरचे सोडणारच नाही मग...
तेवढ्यात एक नर्स आली माझ्याकडे. तुम्ही त्यांचे
रिलेटीव्ह का म्हणून तिने माझ्या चेहर्‍यावरूनच
ओळखल की याला टेन्शन आलय पेशंटच.
तेव्हा तिने मला सांगितल की

"काळजी करु नका. त्या आता ठीक आहेत
फक्त दोन दिवस ॲडमिट असु द्या बर्‍या हौतील त्या. " जणु त्या क्षणी ति त्याला आपली बहिण
आहे असच वाटली. म्हणुन मी तिला सगळ
सांगितल की यांच्यासोबत कूणीही नाही आहे
लेडीज वगैरे मी एकटा आहे बाकी सगळे दुर
गावी गेले आहेत. तिने मला समजुन घेतल
माझी परिस्थीती आणि म्हटली की असु दे.

" मी आहै ना मी दोनू दिवस त्यांची काळजी
घेईल तुम्ही टेन्शन घेऊ नका "
आणि खरच तिने काळजी घेतली. आत्याला तर
ती तिच्या मूलीसारखी वाटली. त्यांची ओळख
आणि मैत्रीही झाली. मी मात्र आई मुलीच हे
नात दुरून बघत होत. जेव्हा घरच्यांना कळल
हे , आत्या ठणठणीत बरी झाली तेव्हा बाबांनी
त्या मुलीचे आभार मानले. अशी आहे ती.
एक दिवस माझ्या तोंडून ताई ही हाक निघाली
तिलाही खुप छान वाटल तिच्याही डोळ्यांत
पाणी आल. ती मला तिचा लहान भाऊ म्हणते.
दोन तीन वेळेच्या भेटीत मला तिच्यात माझी
बहीण मिळाली. अजिंक्य खुप भावुक झाला
होता. त्याच्या मित्राने त्याला धीर दिला.


    पहाडासारखा माणुस शिवांश त्याच्या डोळ्यांतही पाणी आल होत. त्याची काळजी घेणारी मधु त्याला आठवली, वर्ष होऊन गेल
असेल आज अजिंक्यमुळे ते दिवस त्याला आठवले.  अजिंक्य बद्दल मी काय गैरसमज केला
होता म्हणूम त्याला स्वतःच्या विचारांची लाज
वाटली आणि तो खाली पाहत होता. रूमालाने
आपले डोळे त्याने पुसले.

  
     अजिंक्यने स्वतःला सावरल आणि म्हटल,
  " मि. शिवांश माझी ही बहीण कुठे राहते हे मी
कधीच तिला विचारल नाही. खरतर ती मला
परत भेटली नाही. फक्त दोनदा भेट झाली आमची.
त्यानंतर मला ती कुठेही दिसली नाही. तुम्ही
तिच्याबद्दल गैरसमज करुन घेतला ना तो दुर
झाला का तुमचा ?  माझ्या मोठ्या ताईसारखी
आहे ती मला. बहीण भावाच नात आहे
आमच्यात समजल. ती कधी काही झाल ना
तुझ्यामुळे तुला सोडणार नाही मी एवढ लक्ष्यात
ठेव. "


       " तुला नाही कळणार बहीण भावाच नातं
कस असत ते... शशांक लगेच पुढे आला.
" ये भाई गप्प बसुन तुझ ऐकतोय म्हणून तु
त्याला काही बोलणार का  ? "
शिवांशने त्याला इशार्‍याने शांत राहायला सांगितल. तेव्हा अजिंक्यने त्याला साॅरी म्हटल.

     माझी बहीण देवाने लहानपणीच माझ्यापासून
हिरावून घेतली म्हणून मधूमध्ये मला माझी
बहीण दिसली. तिला त्या क्षणी मी बघु शकलो
नाही म्हणून तिला मी लगेच हाॅस्पीटलला नेल
उचलून तेव्हा मला क्षणभरासाठी ती माझीच
ताई मला दिसली. मला ती मुलगी कोण आहे
हे त्यावेळेस कळलही नाही. साॅरी त्यासाठी

त्याने आपले डोळे पुसत म्हटल,

जगातील सर्वात सुंदर आणि Best नात म्हणजे...
बहीण - भावाच नात.... कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे... म्हणून बहीण - भावाच नात
खुप खुप गोड आहे. आपला भाऊ लहान असू
दे कींवा मोठा आपला पाठीराखा असतो...
प्रत्येक भावाच आपल्या बहीणीवर खुप प्रेम
असत... या जगात आईवडीलांच्या नंतर सर्वात
जास्त प्रेम आणि काळजी करणारी व्यक्ती म्हणजे
भाऊ... भाऊ म्हणजे बहीणीच्या काळजाचा
तुकडा असतो... बहीणीचही आपल्या भावावर
खुप प्रेम असत...

        अजिंक्य हे सगळ बोलून झाल्यावर शिवांशला साॅरी म्हणून निघून गेला. शिवांशलाही
लहानपणापासून अनाथ असल्याने त्याला
कुठल्याही नात्यांच महत्व माहीतीच नव्हत. त्याला
अशी नाती कधी मिळालीच नाही. एवढच काय
त्याला तर आईवडीलांच प्रेमही मिळाल नव्हत.
माणुस मुळात वाईट नसतो पण परिस्थितीमुळे
तो तसा बनतो. तसच शिवांश होता. तो तस
सर्वांसाठी खुप करायचा, त्याला काळजी
वाटायची म्हणुन पण आपल म्हणणार अस कुणी
नव्हत. आज पहिल्यांदा त्याला मधुला गमावल्याची
भिती वाटत होती. तो तिचा विचार करत अजूनही
तिथेच बसुन होता. आज त्याच्या हातात नेहमी
सिगारेट, बियर असायची त्याची जागा आज
अश्रुंनी घेतली होती.


      प्रशांत त्याला म्हटला की , " भाई लक्ष
कुठे आहे तुझ आपण निघायला हव आता
बराच उशीर झालाय "  तेव्हा त्याच लक्ष जागेवर
आल. मित्र सगळे खुप गप्पा मारत होते पण
त्याच लक्ष आणि मन कश्यातच लागत नव्हत.
आज अजिंक्यकडूनही कळल की मधु कुठे
गेली त्यालाही माहीती नव्हत.


" वेळ निघून गेल्यावरच लोकांना कळते
जपलं असतं तर संपल नसतं...
मग ती संपत्ती असो कींवा नाती... "

       शिवांशचही तेच झाल होत. त्याला मधुची
आठवण येत होती. पण ती आता त्याच्यापासुन
खुप दुरुन निघून गेली होती. शिवांशने तिच्यावर
खोटा आरोप केला. सगळ करूनही त्याने नकार
दिला त्यानेच त्याच्या आयुष्यातुन तिला दुर केल
आणि आज तो स्वतःच पश्चाताप करत होता.


     शिवांशने मधुला विसरण्यासाठी स्वतःला
कामात जास्त व्यस्त ठेवू लागला. त्याचा बिझनेस
ही वाढत होता. त्याला काही दिवसांकरिता
परदेशात जाव लागणार होत. त्याच्या तिनही
मित्र आणि इतर त्याची काही विश्वासु माणस
इतला बिझनेस सांभाळणार होते. म्हणून शिवाला
टेन्शन नव्हत.


         मितालीही मधुजवळ राहायला गेली होती.
दोघीही सोबत राहत होत्या. मितालीने मधुची
खुप चांगली काळजी घेतली. त्यांना काका
काकुही हेल्प करायचे. मधुची तिथेही खुप ओळख
झाली होती. खुप छान दिवस जात होते. असच
एक दिवस मधुचे दिवस भरले. तिला जवळच
हाॅस्पिटलमध्ये दाखल केल. मिताली तिच्या
सोबत होती. मधुने गोंडस मुलाला जन्म दिला
होता. तिला त्या इवल्याशा बाळाला पाहून
खुप आनंद झाला.

  
         दोन वर्षांनंतर मधु आपल्या बाळाला घेऊन
मार्केटला चालली होती... सोबत मितालीही होती.
दोघीही खुप हॅपी दिसत होत्या. हे मुंबईत
कामासाठी आलेल्या अमित आणि शशांकने
बघितल. खुप गर्दी होती, गर्दितुन वाट काढीत
ते त्या दोघींच्या जवळ जात होते....


                                 क्रमशः

****************************

       शिवांशच्या मित्रांनी मधुला आणि बाळाला
बघितल, ते दोघे त्यांच्याजवळ जाऊ लागले पण
पुढे गर्दी खुप होते. ते शिवांशला कळवतीलच
कारण इतक्या दिवसांनी त्यांना मधु दिसली.
शिवांशही तिच्याच शोधात होता... पण पुढे
नक्की काय होईल हे पुढील भागातुन कळेल.