Login

मोह मोह के धागे भाग - तेरा

लवस्टोरी
          दोन वर्षांनंतर मधु आपल्या बाळाला घेऊन
मिताली सोबत मार्केटला गेली होती. मुंबईत
कामानिमीत्त आलेल्या अमित आणि शशांक
शिवांचे मित्र तसेच जवळची विश्वासातील माणस
त्यांना मधु आपल्या बाळासोबत दिसली. एवढ्या
गर्दितुनही वाट काढीत ते दोघे तिच्याजवळ जाव,
बोलाव आणि तिलाही सांगाव की जे झाल ते
विसरून जा... शिवांशही तुझी खुप आठवण
काढत असतो. तो तुला विसरला नाही आहे हे
तिला सांगाव हा विचार करून शशांक पुढे जात
होता. पण अचानक मधु आणि बाळ दिसेनासे
झाले. ते दोघे वेड्यासारखे तिथे शोधतच होते.
पण ते कुठे कुठल्या दिशेला गेले काहीच कळायला
मार्ग नाही. पण मधुकडे बाळही होत म्हणजे
तिच दुसरीकडे लग्न तर झाल नसेल ना ही शंका
शशांकला येत होती. कारण त्याला जे झाल
त्याची कल्पना नव्हती.

   ते दोघे गर्दीत मधुला शोधून शोधून थकुन गेले.
शेवटी निराशाच पदरी पडली. " आता शिवाला
काय सांगणार आपण मधु आम्हांला दिसली
पण आम्ही तिला भेटु शकलो नाही तु किती
रागवेल आपल्यावर याची कल्पना तरी केली
का शशांक ? "


" बरोबर आहे तुझ अमित तो खुप चिडेल पण
मी काय म्हणतो त्याची मधु मुंबईत आहे, ती
सेफ आहे हे ऐकुन त्याला बर तरी वाटेल, तेवढच
समाधाम मिळेल रे आपण त्याला सांगून टाकुया
आणि हो आपण या दोन दिवसात मधुला शोधून
काढूया... "


        अमितने शिवांशला फोन करून त्यांना
मुंबईत मधू दिसल्याच सांगितल आणि तिच्यासोबत
बाळ होत हेही सांगितल. तेव्हा मधू मुंबईत आहे.
ही बातमी ऐकुनच त्याला खुप छान आणि मनाला
बर वाटल की त्याची मधु जिथे कुठे आहे तिथे
ती छान आहे. शिवांशने त्यांना म्हटल ठीक आहे.
आपण माणसांना सांगु तिथे तिला शोधायला.
आणि मी पण दोन दिवसात भारतात परततोय.

         शिवांश दोन दिवसांनी भारतात रिटर्न जाणार होता. त्याच इथल कामही झाल होत.
त्याला काही गिफ्ट्स आणि शाॅपिंग करायची
होती. म्हणून तो आनंदाच्या भरात गाडी पार्क
केली त्यादिशेने जात होता. त्याच्या हातात एक
फाईल होती. त्यात तो फोटो होता, ज्यात त्याला
वाटायच की तो आणि त्याची आई आहे म्हणून
तो फोटो नेहमी आपल्या जवळ ठेवायचा, त्याच
मन त्याला सांगायच की तुझी आई आहे
कुठेतरी ती तुला नक्की भेटेन. कितीदा त्याला
अशी स्वप्न पडली आहे तो नेहमी जागा व्हायचा.
पण मग आश्रम मध्ये त्याला सांगितल की तु
अनाथ आहे. पण त्याला आठवतय त्याला आधी
एक माणुस भेटायला यायचा. जस कळत वय
झाल तस तो पुन्हा कधीच आला नाही. तो
त्या फोटोला घेऊन आपल्या आईला शोधत
असायचा कधीतरी ती आपल्याला भेटेल ही
आस त्याच्या मनाला लागुन राहायची. पण
मित्र म्हणायचे, " तुझे आई बाबा असते तर
तुला इतक्या दिवसांत भेटायला आले नसते
का ? " तेही खर होत म्हणा. मग तो यावरून
नेहमी नाराज व्हायचा. देवा सगळ काही दिल
पण आईवडीलांच प्रेम कधी मिळालच नाही.


     शिवांशला फोन आला होता, तो फोनवर
मराठीत बोलत होता. तो गाडीजवळ पोहचला.
तेवढ्यात एक व्यक्ती धावत त्याच्याजवळ आली.
" सर एक्सक्युज मी, तस त्याने त्या आवाजाच्या
दिशेने पाहील. साठीच्या आसपासचा माणुस
होता. त्याने शिवांशला तो फोटो दिला जो
शिवांशक्या फाईलमधुन खाली पडला. शिवांशने
त्याला थँक यु म्हटल. तो माणुस सारख शिवांशकडे बघत होता. " तुम्ही मराठी बोलत
आहात... हो ते जरा माझ्या जवळच्या मित्राशी
बोलत होतो ....  पण तुम्हांला कस माहीती की
मी भारतीय आहे " , शिवांश .

" अहो, तुम्हाला मराठीत फोनवर बोलताना
आता बघीतल तेव्हा समजल , तस मी पण
महाराष्ट्रीयन आहे पण गेल्या तीस वर्ष इथेच
वास्तव्यास आहे. माझी ओळख अजित देशमाने.
मी मुंबईचा आहे. " , अजित.

शिवांशला है ऐकून खुप आनंद झाला आणि
त्या माणसालाही शिवांशला भेटुन छान वाटल
कुणीतरी आपल माणुस भेटल्यासारख वाटल.
मराठी माणुस किती प्रगती करू शकतो, तो
जगाच्या कानाकोपर्‍यांत जाऊन पोहचला आहे,
परदेशातही मराठी ऐकुन त्याचा ऊर अभिमानाने
भरून आला. ते दोघेही एका काॅफी घेत बसले .
तो माणुस सारख शिवांशच्या चेहर्‍याकडे बघत
होता तो डायरेक्ट म्हणाला , एक विचारू

" हो विचारा ना... " , शिवांश.

" हा फोटो तुमचा आहे का... ? त्या माणसाला
जाणुन घ्यायच होत की हा फोटो या मुलाकडे
कसा आला ? त्याला काही जुन्या गोष्टींची
आठवण झाली. तो खुप विचार करू लागला....


              मितालीच लग्न ठरल होत. तिच लग्न
पुण्यात होणार होत. त्यासाठी मधु आणि बाळही
तिकडे गेले होते. मितालीच लग्न दोन दिवसांवर
येऊन ठेपल होत. मधुला पुण्यात जायला नको
वाटायच... परत त्याच जुन्या आठवणी...
तो दिवस आणि ते सगळ... त्याने तिला सोडलेल
अस सगळा भुतकाळ डोळ्यासमोर उभा राहीला.
पण मधु तिची खास मैत्रिण होती तिच्या
आयुष्यातील महत्वाचा क्षण ती तिला नाही
म्हणून दुखावू शकत नव्हती. भिती याचीच होती
की तिला आणि बाळाला इथे कुणी बघु नये.


      शिवांशला त्या माणसाने त्या फोटोविषयी अस
काही सांगितल की त्याचा तर विश्वास बसत नव्हता. त्याला त्याच्याच नशीबाच वाईट वाटत
होत.... दोन दिवसांनी तो भारतात परतला...
तो एका वेगळ्याच शोधात होता.

    
                                          क्रमशः