मोह मोह के धागे भाग - पंधरा

लवस्टोरी


         शिवांश भारतात परतला त्याच्या मित्रांना
त्याने त्यांच काम झालय आणि त्यांना त्याचा
फायदा होणार होता. तो खुप मेहनतीने पुढे जात
होता. त्याच हे यश मित्रांनी सेलीब्रेट करायच
ठरवल, त्यामुळे त्या तिघांचे तर प्लॅनिंगही सुरू
झाल होत , पण शिवांश मात्र वेगळच काहीतरी
वागत होता. कुठल्यातरी विचारात आहे हे त्यांना
त्याचा चेहरा सांगत होता. पण तो बोलत मात्र
काही नव्हता, पण नक्की याच्या डोक्यात काय
शिजतय हे विचारण्याची कुणीही हिम्मत करत
नव्हत. त्याच्या मित्रांना वाटत होत की मधु
त्याच्यापासून दुर गेली म्हणून त्याला आता तिच्या
नसण्याचा त्रास होत असावा.

     इकडे मितालिच्या लग्नाची धुमधाम सुरू होती. राजेशने  क्रीम कलरची शेरवानी घातली होती. त्यावर पांढरा तुरा असलेला लाल रंगाचा
राजेशाही फेटा, हातात कट्यार, डोक्याला मुंडावळ..,एखाद्या राजकुमारा सारखाच तो दिसत होता.

                   तिकडे मिताली देखील बोहल्यावर चढायला तयार होतं होती. तिच्या हातावर,
पायांवर मैत्रिणीनी भरीव मेहंदी काढली होती. हळद लागल्याने तिची गोरी काया, जणू काही हळद पिऊन पिवळी झाल्यासारखी दिसत होती. हातात हिरवा चुडा, पायात पैंजण, डोकयावर बिंदिया, नाकात नथ, गळयांत सोन्याचा साज, मुंडावळ, डोळयांत काजळ, ओठांवर सुंदर लिपस्टिक, केसात भरगच्च गजरे, लाल शालू त्यावर हिरवा शेला..!! सगळा साज शृंगार करून तिच सोन्दर्य आणखीनच खुलून दिसत होतं. आईने लगेच तिची टित काढली.


            आज त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस म्हणजे लग्नाचा दिवस. मिताली आणि
राजेश आज आयुष्यभरासाठी एकमेकांचे होणार
होते. सगळ्यांची हाॅलमध्ये धावपळ सुरू होती.
एक एक विधी पूर्ण झाले आता दोघांची तयारी झाल्यावर त्यांना स्टेजवर बोलवण्यात आल. राजेश
नटुन आलेल्या मितालीला चोरून तिला बघूत होता, मध्ये अंतरपाठ धरण्यात आला. मंगलअष्टका
सुरू  झाल्या....  दोघेही एकमेकांना बघत होते पण
दिसत नव्हत. अंतरपाठ बाजुला झाला...
मंगलअष्टका संपल्या.... दोघांनाही वर उचलुन
एकमेकांच्या गळ्यात हार घातले...त्यांच लग्न
झाल होत...नंतर बाकीचे विधी करण्यात आले.
दोघांचे खुप फोटो काढण्यात आले. सगळे
त्यांना नाव घ्यायला सांगतात. मोठ्यांचे आर्शिवाद
घेतात... आता दोघेही जेवण करतात...एकमेकांना
घास भरवतात....सगळे त्यांना शुभेच्छा देतात...

थोड्या वेळाने मितालीची पाठवणी असते. ती
खुप रडत असते. आई, भाऊ बहींण मैत्रिणी तीच्या गळ्यात पडून रडतात. मिताली खुप रडते. दोघी
खुप जवळच्या मैत्रीणी होत्या, बहीणीसारख्याच
राहायच्य्या.  राजेशला आमच्या लेकीला व्यवस्थित
सांभाळा, तिला जीव लावा सांगतात... तोही
त्यांना तुम्ही काळजी करू नका सांगतो...दोघेही
सर्वांना भेटुन गाडीत बसतात.... राजेश  आणि
मिताली गाडीत बसुन निघून जातात.... सगळे
गाडी दुरवर जाईपर्यंत बघत असतात.... मधुही
तिच्याकडे ती जाईपर्यंत बघत असते.
             
        अजिंक्यही त्या लग्नाला आलेला असतो.
मधु निघणारच आपल्या बाळाला घेऊन ती आज
तिच्या मैत्रीणीच्या घरी थांबणार होती. पण
अंजिक्यने तिला ताई घरी चल म्हणून आग्रह
केला. मग मधुही त्याच्या घरी आत्यांना भेटण्यासाठी गेली. त्यांनाही तिला इतक्या दिवसा
नंतर भेटुन खुप छान वाटल. दोघींमध्ये पूर्वजन्मीच
नक्कीच मायलेकीच नात असाव अस मधुला
वाटायच. त्यांच्यामध्ये खुप छान बाॅडींग होत.

    
        त्याच दिवशी शिवांश अजिंक्यकडे पार्टीच
आमंत्रण द्यायला आला होता. त्याला अजिंक्य
भेटला, बोलला. शिवांशला फोन आला तस तो
अर्जंट निघून गेला. तो निघुन गेला नंतर अजिंक्यला टेबलखाली एक फोटो सापडला. त्याने
तो बघितला आणि ठेवून दिला, बहुतेक घाईत
याच्याकडून चुकुन झाल असेल. दोघांमध्ये थोडी
मैत्री झाली होती. मधु जायला निघाली. अजिंक्य
तिला स्टेशनपर्यंत सोडून आला.

    अजिंक्यचे वडील आणि आत्या बोलत बसले
होते. बर्‍याच दीवसांपासून त्यांना सवड मिळाली
होती. नाही तर त्यांना वेळच नसायाचा. अजिंक्यचे
बाबा म्हणजे विश्वासराव राजकरणात होते.
जनतेच्या हितासाठी झटणारा माणुस म्हणून
त्यांची ख्याती होती. ते स्वखर्चाने समाजसेवा
देखील करायचे. अजिंक्यही आपल्या बाबांपासुन
हे सगळ शिकत होता. करत होता.

     अजिंक्यची आईही प्रेमळ होती, शारदा नाव
तिच. मनाने खुप श्रीमंत व्यक्ती. अजिंक्यच्या
आत्यांना त्यांनी ज्युस आणुन दिला. टेबलवर
ठेवला. तेव्हा त्यांनी तो फोटो बघितला. तो फोटो
त्यांना तिथे पाहुन खुप आश्चर्य वाटल. हा फोटो
ईथे कसा, अजिंक्यकडे कसा आला ? असे
खुप सारे प्रश्न त्यांच्या डोक्यात थैमान घालू लागले.
त्यांनी तो फोटो घेतला आणि स्वतःजवळ ठेवला.
कितीतरी वेळ त्या फोटोला बघतु बसल्या होत्या.
शेवटी आज कितीतरी वर्षांनी त्यांचा हरवलेला
फोटो त्यांना मिळाला होता म्हणून त्या अजिंक्यला
मनापासुन थँक यु म्हणणार होत्या त्याचीच वाट
त्या बघत होत्या.

         
            शिवांश ऑफीसमधुन घरी गेला. त्याने
तो फोटो बघण्यासाठी काढयच ठरवल पण कुठेही
दिसत नव्हता, मिळत नव्हता. त्याच्याकडून
हरवला होता म्हणून तो खुप दुःखी झाला. आता
कुठे मिळेल मला तो फोटो, सगळ त्याला जे
शोधायच ते स्वप्न परत तुटल्यासारख त्याला वाटल.
अजिंक्य घरी आला, त्याला आत्याने विचारल,
" हा फोटो तुला कुठे सापडला ? "
तेव्हा त्याने सांगितल की तो फोटो माझ्या फ्रेंडचा
असेल काल तो मला भेटुन खुप घाईत गेला
तेव्हा त्याच्याकडून पडला असेल. मीच उद्या
त्याला द्यायला जाईल. अजिंक्यने आत्याकडुन
तो फोटो मागितला तेव्हा त्याने खुप वेळ त्या
फोटोकडे बघत होत्या. मुलगा लहान होता तो
आईला मोठा झाल्यावर कसा असेल, तिचा
चेहराही आठवत नसेल त्या बाळाला तेव्हाच
त्याला तिच्यापासुन दुर केल होत. किती दिवस
ती या फोटोला घेऊन जगत होती, आता तिला
सगळ आठवत होत. बरी झाल्यावर तिने खुप
वेळा बाळाला शोधायचा प्रयत्न केला, सत्यजित
तर आलाच नाही , दिसलाही नाही. ती समजत
होती की तो बाळालाही सोबत परदेशात घेऊन
गेला असणार, जेव्हा तिचा अपघात झाला.
तेव्हाच तिला काही आठवत नाही पण फोटोमुळे
तिला बाळाची आठवण व्हायची, तेव्हा ती माऊली
हा फोटो छातीशी धरून देवाला एकच प्रार्थना
करायची, माझ बाळ जिथे कुठे असेल तिथे
सुखरूप राहू दे, ज्याने आम्हांला वेगळ केलय
ना त्याला नक्क्की शिक्षा दे आणि मी मरायच्या
आधी तरी माझी आणि माझ्या लेकराची भेट
होऊ दे अस ती नेहमी म्हणायची. आज तिच
मन तिला सांगत होता. ती वेळ आली आहे.
हा फोटो नक्की तिच्या बाळाकडेच गेला असेल
कारण यासाठी तिने खुप देवांना साकड घातल
होत. सगळ्या मंदीरात गेली की ती हेच
म्हणायची की आमची मायलेकरांची भेट होऊ
दे आणि तिला आज का कुणास ठाऊक पण
तिची इच्छा पूर्ण झाल्यासारखी वाटत होती.

"   अग आत्या तु कुठे हरवलीस , दे तो फोटो
मला मला मित्राला द्यायचा ", अजिंक्य.


" तुझ्या मित्राला मला बघायच आहे, तिच अस
का म्हणत आहे त्याला काही कळत नव्हत.
अजिंक्य खुप लहान असेल तेव्हापासुन आत्या
त्याची काळजी घ्यायची. त्याचे खुप लाड करायची. त्याच्यासाठी गाण म्हणायची, खेळायची
हट्ट पुरवायची. तिने आपल्या मुलासारखच
माया लावली.

" बर तो आला की तुझी भेट करून देतो",
अजिंक्यच्या या वाक्याने तिच्या चेहर्‍यावर
स्माईल आली.
                                   
      
      शिवांशला फोटो सगळीकडे शोधून वैताग
आला होता. मी असा कसा आहे काहीच
सांभाळू शकत नाही. आईची आठवण होती ती
अजित कांकांमुळे तर माहीती झाल आणि नेमक
मी तो फोटो हरवुन बसलो तो स्वतःलाच बोलत
होता. मग त्याला आठवल की तो अजिंक्यच्या
घरी गेला होता. त्याला विचारायला हव म्हणून
तो गाडी घेऊन अजिंक्यच्या घरी गेला.
तेव्हा त्याला दारात पाहून अजिंक्यला कल्पना
आली की, हा फोटोच घ्यायला असेल, खरच
याच्यासाठी महत्वाचा असेल हा फोटो. पण
याने कधीही आपल्याला फॅमीली विषयी
सांगितल नाही आता तर आमची मैत्रीही झाली
आहे मग मी याला विचारायला हव हा विचार
अजिंक्य करत होता. शिवांश घरी आला.
अजिंक्यच्या आईने दोघांसाठी चहा आणला.

" बोल शिवांश आज इकडे काय काम आहे ? "
, अजिंक्य.


" अजिंक्य, खरतर तुला एक विचारायच होत
म्हणजे मी दोन दिवसांपूर्वी ईथे आलो हौतो,
घाईत होतो तेव्हा माझा चुकुन एखादा फोटो
पडला का ?  सहज विचारल."

" बर मला इथेच मिळाला तुझा फोटो, मी ही
खुप बिझी होतो, आज तुला द्यायला येणारच होतो.
तुच आला घ्यायला. ", अजिंक्य.
त्याला खुप छान वाटल. त्याचा टेन्शन एका
क्षणात दुर झाल, एक स्माईल आली चेहर्‍यावर.
आपली हरवलेली वस्तु आपल्याला पुन्हा मिळाली
की जो आनंद होतो ना तो असा शब्दांत व्यक्त
करू शकत नाही. तसच शिवांशच झाल होत.
अजिंक्य शिवांशला म्हणाला, आलोच मी तुझा
फोटो घेऊन, तेव्हा त्याने आत्याला सांगितल
की , दे तो फोटो माझा मित्र आला आहे त्याला
पाहीजे आहे " अजिंक्यच्या बोलण्यावर सविताला
काय बोलाव कळेना. त्याला तिने तो फोटो दिला.
अजिंक्यचे आईबाबाही आले. तिच्याजवळ फोटो
होता हे विश्वासरावांना माहीती होत. सविताने
सांगितलेल होत की तिचा आणि तिच्या बाळाचा
फोटो आहे.


     शिवांशला अजिंक्य म्हणाला, " शिवांश हा
फोटो कुणाचा आहे ?"

तेव्हा तो म्हणाला हा फोटो माझ्यासाठी खुप
महत्वाचा आहे. मी तर लहानपणापासून मी
आईला कधी पाहील नाही. पण हा फोटो आमच्या
दोघांचा आहे. हा माझ्याकडे कसा आला मला
माहीती नाही पण या मला जेव्हा आईची आठवण
आली तर मी हा फोटो बघतो. मनाला छान वाटल
आई आपल्याजवळच आहे वाटत. आई सोबत
नाही पण आठवण आहे. त्याचे डोळे पाणावले
त्याला अजिंक्यने धीर दिला. हे सगळ बोलण
सविताने ऐकल तिलाही भरून आल, ती त्याला
बघत होती. पण इतक्या वर्षांनंतर तो माझाच
मुलगा असेल तर आई म्हणून स्विकारेल का ?
तो माझ्यावर विश्वास ठेवेल का ? तो मला आई
म्हणेल का ? हे तिच्या मनात चालू होत.
ती पुढे आली तस शिवांश तिच्याकडे बघत होता.
त्याने मोठ्या आहेत म्हणून नमस्कार केला.
अजिंक्यने तिची माझी आत्या आहे अशी
ओळख करून दिली. ते दोघे बोलत बसले
होते. अजिंक्यच्या बाबांना ही गोष्ट सविताने
सांगितली की , " दादा, मी ईतक्या वर्षांपासून
माझ्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न करते, तो
भेटेल आमची भेट होईल याच आशेवर मी जगते
ते तुलाही माहीती आहे.

" हो सविता, काय झाल तु खाली बस बर मला
निट सांग, अशी घाबरली का आहेस ? "
विश्वासरावांनी तिला पाणी दिल. तिने ते पाणी
एका दमात संपून टाकल. ती सांगु लागली.
" दादा, तो फोटो मला परत सापडला रे, आता
अजिंक्यच्या बरोबर एक मूलगा बोलत बसला
आहे बघ, मी त्याच बोलण ऐकल की त्याला
कुणीतरी सांगितल आहे की " हा तुझा नि
तुझ्या आईचा फोटो आहे तो खुप जपून ठेवतो
अरे हा फोटो माझ्याकडूण हरवुन खुप वर्षे
झाली बघ तेव्हापासून मी खचुन गेले, निदान
मुलाची छानशी आठवण होती, तो माझ्यापासून
सत्यजितमुळे दुर गेला, त्यानेच त्याला पळवल
आणि कुठे ठेवल मला काहीच कळल नाही
नंतर तर सत्यजीतचाही पत्ता नाही लागला,
तु काय कमी केल का दादा, त्या मुलाला तुही
शोधत होता माझ्यासाठी, पण तेव्हा आपल्याला
माहीती मिळाली नाही. सत्यजित चालाख होता
त्याने या मुलाला काय सांगितल कुणास ठाऊक
माझ्याविषयी भलतसलत त्याच्या मनात विष
कालवल असेल. मी त्याला आता सांगीतल
की मीच तुझी ती आई आहे तर तो मला आई
म्हणेल का ? " सांग ना विश्वास. तु तर सख्या
बहीणीपेक्षा जास्त माया केली माझ्यावर. बघ
देव माझी कशी परिक्षा घेतोय, मुलगा समोर
आहे पण त्याला मी बोलू शकत नाही, ती खुप
रडायला लागली तेव्हा विश्वासराव आणि
त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला. तोपर्यंत
शिवांश निघूनही गेला होता.

" अहो, मी काय म्हणते, सविता ताई म्हणतात,
ते खर असेल तर त्या किती दिवसांपासून आपल्या
मुलाला शोधत असायच्या. आणि हा मुलगा
तौच असेल तर मला तर काहि सुचत नाही
आहे " , शारदा.

" शारदा, हे खर असेल तर आपण समजावू त्या
मुलाला, आई तर मुलाला ओळखु शकते ना
तिने ओळखल ग त्याला, तोच आहे म्हणते
बघुया आपण यावर काय करता येईल " ,
विश्वासराव.

      सविता आपल्या मुलाच्या विचारांत हरवून
गेली होती. देवाला विनवणी करत होती की
हा माझाच मूलगा असु दे आमची भैट होऊ दे.
तिकडे मधुच बाळ मोठ होत होत, त्याचा
वाढदिवस जवळ आलेला होता. तिच्यासमोरही
अनेक प्रश्न उभे राहिले होते. शेजारचे वगैरे
लोक तिला बाळाच्या बाबांविषयी विचारत तेव्हा
ति काय उत्तर द्याव समजत नव्हत परंतु ती
वेळ मारून न्यायची, लोकांच ठिक पण ऊद्या
माझ्याच मुलाने विचारल तर मी काय सांगणार.
तिला त्या क्षणी शिवांशची आठवण आली,
भेटाव का पुन्हा एकदा, होईल का ठिक सगळ.
बाळाच्या रडण्याच्या आवाजाने ती भानावर
आली.


                                         क्रमशः

**************************