Login

इस प्यार को क्या नाम दुँ भाग - पाच

लवस्टोरी
             आरोहीचे पेपर सुरू झाले. त्यानंतर दोघींची भेटच झाली नाही. आदितीही तिच्या व्यस्त होती. आरोहीला तर आदितीला साॅरी म्हणायच होत तिचे लास्ट इयरचे फायनल एक्झाम संपली.
ती काॅलेजला येऊ शकणार नव्हती म्हणुन आदीती मनातुन नाराज झाली. तिचे सगळे फ्रेंन्ड्स तिला आरोही वरुन चिडवत असायचे. पण आदिती तस काही नाही म्हणून विषय बदलायची.

     आरोहीचे पेपर संपले ती बाहेर गेली होती तिच्या मैत्रिणींसोबत. आरोही सोनियाला म्हणाली चल ना यार आपण पाणीपुरी खायला जाऊ, तिथे पाणीपुरी खात असताना तिच लक्ष बाजुला गेल.
पाहते तर तिथे आदिती त्याच मूलासोबत उभी होती... आरोही मात्र त्या दोघांना बघुन नाराज होते आणि पटकन तिथुन निघूनही जाते. आदितीने तिला बघितल नव्हत.

     
     आदितीला राहवत नव्हत तिला आरोहीशी बोलायच होत म्हणून तिनेच अन्वयीला घरी बोलवल होत, आणि सोबत तुझ्या मैत्रीणीलाही आण म्हणून सांगितल आज अन्वयीचा वेगळा प्लॅन होता म्हणून तिने फक्त आरोहीला एकटीला पाठवल तिलाही हे बरच होत म्हणा आदितीशी बोलायला भेटेल तिची माफी मागता येईल.
आरोही आदितीच्या घरी पोहचते... आदिती तर त्या दोघींची वाट बघत बसली होती, दोघींची खर तर फक्त आरोहीशी आज बोलता येईल त्यासाठी अन्वयीला हि बोलवाव लागल कारण आरोहीच काॅलेज संपल होत आणि आदितीला सुट्ट्या लागल्या होत्या. त्यामुळे तिच्याजवळ सद्या वेळ होता.


     थोड्याच वेळात दारावरची बेल वाजली तशी आदितीने दार ओपन केल बघते तर आरोही एकटीच आली होती खर तर आदितीच्या मनासारख झाल होत... अन्वयी आलीच नव्हती.

" अन्वयी नाही आली का सोबत तुम्हांला एकटीला पाठवल का ? " , आदिती.

" हो तिला वेळ नव्हता मैत्रीणीसोबत गेली काम आहे म्हणाली महत्वाच " , अन्वयी.

" अच्छा " , आदिती

" काकु आहेत का घरी, काय काम होत तुम्ही अन्वयीला आणि मला बोलवलत ? " , आरोही.


" काम तस काही नव्हत, मला एकटीला खुप बोअर होत होत म्हटल अनुला आज बोलावून घ्याव कारण ऊद्यापासून मी ही गावी चालले " , आदिती.

      
" अच्छा... फक्त अन्वयीला बोलवल होत आणि तिने तिला काम निघाल म्हणून मला पाठवल माझ काय आहे मग चल मी निघते " , आरोही एवढस तोंड करुन जायला निघाली... तस आदितीने तिचा हात पकडला... तिला तो स्पर्श हवासा वाटत होता.
हात खर तर आदितीने सोडूच नये अस वाटत आरोहिला तरीही ति आपण आदितीवर रागवलो आहोत असे दाखवण्यासाठी म्हणते,

" प्लिज आदिती, माझा हात सोड, मला जाउ दे मी पाठवुन देते अनुला तिच काम झाल की मग तुम्ही दोघी एन्जाॅय करा "

आदितीला कळत होत की आरोही अजुनही तिच्यावर नाराज आहे.

" आरू , प्लीज थांब ना ग मला तुला थोड बोलायच होत... " , आदिती आपल्या नाजुक आवाजात बोलते खरतर इतक प्रेमाने हाक मारल्यावर तेही आपल्या आवडत्या व्यक्तीने मग आरोही थांबणारच ना...

आरोही तिच्याकडे न बघताच म्हटली हा बोल काय बोलायाच होत तुला...

" आरु, तु अजुनही माझ्यावर नाराज आहेस माहीती आहे. माझ काही चुकल असेल तर मला माफ कर " , आरोहीने तिच्याकडे पाहिल आदीचे डोळे पाणावले होते. यार खरच किती सुंदर आहे ही फक्त शरीराने नाही तर मनानेही आहे हे आज आरोहीला समजल होत.


" मी काय म्हणते आरू, माझ चुकल असेल तर खरच साॅरी " आदितीने पुन्हा एकदा माफी मागीतल्यावर आरोही भानावर आली आणि म्हणाली...


" नाही आदि, तुझ काही चुकल नाही मीच तुला त्यादिवशी नको नको ते बोलले मीच तुझी मनापासून माफी मागते... रियली साॅरी "

हिच्या तोंडुन माझ नाव ऐकताना किती भारी वाटत यार ! आदिती पुन्हा एकदा आरोहीच्या डोळ्यांत हरवली आणि ती एकटक आरोहीकडे बघत होती.
खरतर तीच अस बघण हे आरोहिला ही आवडत होत म्हणूनच तिने आदीला रोखल नाही पण तिला लाजल्यासारख होत होत म्हणून तिनेच म्हटल,

" आदि तु मला सगळ विसरून माफ करशील का ? " , आरोही.


" हो करेन ना पण एका अटीवर " , आदिती.

" कुठली अट आहे तुझी " , आरोही.

" माझ्याशी मैत्री करशील का ? " आदिती

आरोही जरावेळ काहीच बोलत नाही. गप्पच बसते. ती आदितीची मज्जा घ्यायच ठरवत.

" यार ही माझ्याशी मैत्रीही करू शकत नाही आणि माझ्या मनात तर मैत्रीच्या पुढे जाउन मी आरूचा विचार करते खरच तिला जर हे समजल ती तशी नसेल तर आमची मैत्री सुरू होण्याआधी तुटेल ती आपल्या भावनांना कंट्रोल मध्ये ठेवत होती.

" चल मी आपल्या दोघींसाठी काॅफी आणते "
आदिती डोळे पुसत कीचनमध्ये निघून गेली. त्यावेळी त्या दोघींशिवाय घरात कुणीच नव्हते.

" एवढी सुंदर व्यक्ती आपल्याला मैत्रीचा हात पुढे करत आहे तर आरू नाही कश्याला म्हणेल,
आरोही हळूच किचनमध्ये जाते आणि आदिला
मिठी मारते... आदितीला कळतच नाही की हे काय सुरु आहे....


" आदि मला आवडेल तुझ्याशी मैत्री करायला "
आरूने अस म्हटल्यावर आदिती खुप खुश झाली.

     दोघींनी त्यादिवशी एकत्र काॅफी घेतली आणि खुप वेळ त्या गप्पा मारत होत्या. आदितीला खुप फ्रेंड्स होते पण माहीती नाही तिला आरोही सोबत खुप छान वाटल.

      
आरोही आणि आदिती दोघींच्या मैत्रीचा प्रवास तर सुरू झाला... पुढे काय नि कशी वळण येतात यांच्या आयुष्यात बघूया....