मोह मोह के धागे भाग 44

Story Of Love
मोह मोह के धागे भाग ४४
क्रमश : भाग ४३

अजय नुकताच अंघोळ करून बाहेर आला तर त्याचे घालायचे कपडे बाहेर काढलेलं होते .. एकदम गोड हसू आले त्याच्या चेहऱ्यावर .. सगळे तर आवडीने करते पण समोर येत नाही ... डोळ्यांसमोर उभी राहत नाही .. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली
अजयने बेडरूम मधून एक मोठी हाक मारली पहिल्ययांदा
अजय " मीरा .... मीरा "
मीरा किचन मध्ये त्याच्याच नाश्त्याचं बघत होती .. त्याची अशी हाक आल्यावर मीराला जरा ओशाळला सारखे झाले . भाऊसाहेब जे पेपर वाचत होते ते पेपर बाजूला करून तिच्याकडे बघू लागले .. आई आणि माई एकमेकींकडे बघून गालात हसल्या .. ती पण चेहरा लपवून लाजू लागली
मनातच " काही पण करतात .. घरात एवढी सगळी माणसे असताना .. असे कोण हाक मारतं बसतं का ? सगळे तर काढून ठेवलं होते .. मग कशाला बोलवत असतील ?"
तेवढयात पुन्हा एकदा हाकांचा आवाज आला
तशी मीरा धावतच जिन्याने वर चढू लागली
भाऊसाहेब " हळू ... जिना चढताना घाई नका करू सुनबाई "
आई " अहो .. मला वाटतं आता त्यान्ना हनीमूनची तिकिटं काढून पाठवूनच द्यावी .. नाही का ?"
भाऊसाहेब " त्याच्यापेक्षा बाकि सगळ्यां नाचं घाई आहे "
तशी आईंनी नाक मुरडले आणि फणकारण्यांने आत मध्ये गेल्या .. आणि भाऊसाहेब गालातच हसले ..
मीरा धावतच रूम मध्ये आली
अजय टाय बांधत होता .. ती त्याच्या मागे उभी राहिली .. आरशातूनच त्याच्या डोळ्यांत पाहून विचारू लागली " काय ?"
अजय " हि टाय बांधतेस का ?"
मीरा " का ? .. म्हणजे रोज तर तुमची तुम्हीचं बांधता "
अजय " हो तेच तर ना .. रोज तर मीच बांधतो .. आज पासून हे काम तू करायचं ? "
मीरा " पण का ?"
अजयने तिचे हात हातात घेतले आणि त्याच्या टाय वर ठेवले तशी ती बोलता बोलता टाय बंधू लागली ..
मीरा " मला एवढी छान जमेल कि नाही ? मला प्रॅक्टिस नाहीये ?"
अजय " तू रियाची टाय तर रोज बांधून देतेस ना ? मग प्रॅक्टिस झालीच असेल ... माहितेय मला "
तिची चोरी पकडलीय गेली होती म्हणून तिने नजर चोरली
ती टाय बांधताना अजय एकटक तिच्याकडे पाहत होता ..
मीरा " काय बघताय ?"
अजय " तुला ? तू माझ्या समोर उभी कधी राहतेस ? म्हणून आज पासून रोज हे काम तू करायचस .. म्हणजे मला डोळे भरून निदान पाहता तरी येईल ..
तशी मीरा लाजली .. एकदम हळू आवाजात " काहीपण असतं तुमचं "
अजय " काहीपण नाही ग बाई .. बाकीचे नवरे मॉर्निंग किस शिवाय ऑफिसला जात नाहीत .. "
तशी मीराच्या छातीत धस्स झाले .. आणि पटकन ती खाली पळाली .. हसतच आणि तो मागून" ए मीरा .. थांब ना "
अजय मुद्दामून आता स्वतः थोडा पुढाकार घेत होता .. तिला त्याच्यात इतक गुंतवायचं होतं त्याला कि ती त्याला सोडून जायचा विचार करणार नाही .. हेच सध्यातरी त्याला योग्य वाटले
-------------------------------
असेच दिवस छान चालू होते .. हळू हळू आंखोहि आँखोंमे इशारे होऊ लागले होते .. नव्याने प्रेमात पडत आहेत कि काय असे वाटत होते .. दोघेही हळू हळू खुलत होते .. प्रेम ज्यात स्पर्श कमी पण काळजी , हक्क जसे अजय म्हणाला तसे मनापासून तिने आधी त्याला स्वीकारणे गरजेचं होते आणि त्यासाठी तो तिला तेवढा वेळही देत होता .. त्याने मनातून ठरवले होते कि जोपर्यंत ती स्वतः पत्नी या नात्याने त्याच्या जवळ येत नाही तोपर्यंत तोही पुढे जाणार नव्हता ..
-------------------------
भाऊसाहेब आणि अजय गप्पा मारत होते .. मीरा किचन मध्ये होती आणि रिया आजी बरोबर देव घरात शुभंकरोती म्हणत होती ...
भाऊसाहेब " मीराच्या भावाची फाशी रद्द करून जन्मठेपेसाठी तूम्ही अर्ज केला आहे का ?"
अजय " हो ?"
भाऊसाहेब " काही गरज नव्हती .. तो गुन्हेगार आहे .. त्याला कोर्टाने बरोबर शिक्षा दिली होती .. तूम्ही कशाला यात पडलात ?
अजय " मीराला एकदा तिच्या भावाला भेटवायचं आहे ?"
भाऊसाहेब " का ? कशाला ? का स्वतः अजून त्यात अडकून पडलाय तुम्ही ? मला काही कळत नाही ?"
अजय " भाऊसाहेब , तिच्या भूतकाळात तिचा भाऊ सुद्धा खूप महत्वाचा आहे .. आणि अजून तिने त्याचे नाव काढलं नाही पण आज ना उद्या ती हे म्हणेलच तेव्हा माझ्याकडे उत्तर नसेल म्हणून तो जिवंत असणे गरजेचं आहे.. आणि तसेही तिच्या आई वडिलांचे हि तेच म्हणणं आहे कि त्याला एवढ्या लहान वयात मरताना आम्ही नाही पाहू शकत "
भाऊसाहेब " तो गुन्हेगार आहे .. हे विसरू नका अजय ?"
अजय " मी त्याला गेल्या काही दिवसांत भेटलो .. त्याला विचारायला गेलो होती कि आपल्याच बहिणीच्या नवऱ्याला मारायला तुला काहीच कसे वाटलं नाही ? इतका खालच्या दर्जाला गेलास कि गरोदर बहिणीला वरून खाली पाण्यात ढकलून द्यायला सांगितले होतेस ? "
आधी तो काहीच बोलत नव्हता .. मी खूप बोललो त्याला .. असे वाटत होतो पट्ट्याने त्याला फोडून काढावे पण पोलीस स्टेशन मध्ये कायदा हातात घेता येईना "
बऱ्याच वेळा नंतर तो एकच वाक्य बोलला
" मीनाक्षीला विस्मृती आलीय ते चांगलंच आहे.. मला पण आली असती तर बर झालं असत "
मला काहीच संदर्भ लागेना .. मग मी रोज त्याला भेटत राहिलो .. त्याच्या नक्की मनात काय आहे हे जाणून घ्यायचे होते मला ..
भाऊसाहेब " मग ?काही वेगळे कळले का तुम्हांला ?"
अजय " हो .. हे असे काही असेल मला वाटलेच नव्हते "
भाऊसाहेब " काय आहे ?"
अजय " त्याने रोहनला मारायला नाही पाठवलेली माणसं , त्याचे नाव वापरले गेले .. कारण तो उघड उघड किती तरी वेळा रोहनला बोलला होता कि मी जीव घेईन तुझा .. मी मारून टाकेन दोघांना .. पण तो ते फक्त धमकावायला बोलायचा , रागात होता तो .. आपल्या बहिणीमुळे सख्या मित्रापुढे मान खाली घालावी लागली , अख्ख्या गावात त्याची निंदा झाली त्याच राग खूप आला होता त्याला .. त्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले .. आणि गायब झाले .. दोघे जिवंत आहेत का मेले हे हि समजत नव्हते म्हणून तो शोधत होता त्यांना .. पण ते दोघे सापडले त्याच्या मित्राला म्हणजे सोमेश्वरला .. ज्याच्या जवळ मीराचं लग्न तो लावून देणार होता .. त्या सोमेश्वरचा हि इगो दुखावला गेला होता .. भर मांडवात पोरगी आली नव्हती .. त्यामुळे त्याचा मीरावर खूप राग होता आणि त्याही पेक्षा रोहनवर ..
सोमेश्वर आणि हेरंब दोघे रोज रात्री दारू पियुन आपले दुःख , राग एकमेकांना बोलून दाखवायचे .. रागात\" दोघे समोर आले ना तर त्यांना कसे मारायचे ह्याच्यावरच बोलायचे .. पण दारू उतरल्यावर त्याला मीराची काळजी वाटायची .. म्हणून तिला शोधायचा .. पण गावात सगळ्यांना वाटू लागले कि तो तिला मारायला शोधतोय ..
पण सोमेश्वरला जेव्हा तिच्या मैत्रिणीकडून ती नक्की कुणीकडे राहते हे कळले तेव्हा त्याने दरोडेखोरांना पैसे देऊन हल्ला करवला आणि स्वतःचे नाव हेरंब सांगितले .. जेव्हा ते मारेकरी पकडले गेले तेव्हा त्यांनी हेरंबचे नाव सांगितले आणि हेरंब जेलमध्ये गेला .. पण ठोस पुरावे न मिळाल्यामुळे त्याला कमी शिक्षा झाली पण शिक्षे नंतर त्याला आई वडिलांनी घरात घेतले नाही .. तेव्हा तो सोमेश्वरला भेटायला गेला ..
सोमेश्वरने तेव्हा हेरंबवर सुद्धा प्राण घातक हल्ला केला .. तेव्हा त्याला कळले कि हे सगळे सोमेश्वरने केलंय .. पण हेरंब वर कोणीही विश्वास ठेवे ना .. आणि त्याला वाटले कि रोहन आणि मीरा पण आता या जगात नाही राहिले म्हणून मग तो असाच भिकाऱ्या सारखा राहू लागला .. पण नेमक एकदा सोमेश्वरच्या माणसांनी मीराला शहरात पाहिले .. आणि त्यांनीच तिला आणि रियाला किडनॅप केले .. ह्या वेळी पण त्यांनी तीच ट्रिक वापरली .. आमचा बॉस हेरंब .. म्हणून माझ्यावर प्राण घातक हल्ला आणि मीरा आणि रियाला किडनॅप करायच्या आणि रोहनच्या मृत्यूचे कागदपत्र दाखवून पोलिसांनी त्याला अटक केली आणि आपण पण जोर लावला त्याला बाहेर पडायला काहीच चान्स ठेवला नाही .. लेगच केस लावली आणि त्याला फाशीची शिक्षा डिक्लेअर झाली ..
म्हणून मग सध्या तरी मी त्याची फाशी रद्द करायला अर्ज केलाय .. कारणं दोन्ही गुन्ह्याच्या जागी प्रत्यक्षात तो दिसलेला नाहीये "
भाऊसाहेब " अरे देवा , हे खूपच भयानक प्रकरण आहे "
अजय " हमम ..रागात माणूस बोलून जातो मी मारून टाकेन तुला .. तसाच तो बोलायचा त्याचाच गैरफायदा घेऊन सोमेश्वरने त्याला अडकवला ."
भाऊसाहेब " मग आता ?"
अजय " आता केस री ओपन वगैरे करावी लागेल .. सोमेश्वरचे नाव कुठेच नाहीये .. तो तर गावचा सरपंच होऊन बसलाय .. त्यामुळे जरा कठीणच आहे .. बघू .. जेव्हा होईल तेव्हा होईल .. पण म्हणून मी फाशीची शिक्षा रद्द व्हावी या साठी प्रयत्न करतोय आणि ते होऊन जाईल .. इतके तर मी नक्कीच करू शकतो "
भाऊसाहेब " चला , म्हणजे आपण म्हणतो तसा निदान भाऊ क्रूर नाहीये .. "
अजय " हो .. बघू आज ना उद्या मी त्याला बाहेर काढेनच .. थोडा वेळ जाईल पण आपण प्रयत्न करू शकतो "
भाऊसाहेब " मला वाटतं , सध्या मीराला ह्यातला काही सांगू नये तुम्ही "
अजय " नाहीच .. अजिबात नाही .. आता कुठे ती जरा नॉर्मल होतेय .. आता अजून नवीन धक्का नाही द्यायचाय तिला .. तसेही तिला काहीच आठवत नाहीये .. नाहीतर लगेच माहेरी जायचं म्हणून मागे लागली असती .. पण आता तिने नीरजला भाऊ मानला आहे आणि तेच तिचं माहेर आहे असे वाटतं तिला "
भाऊसाहेब " हे छान झाले ".
भाऊसाहेब " अजय , मी कधी बोललो नाही तुम्हांला पण तुम्हीं फारच वेगळे निघालात .. आज मला गर्व आहे तुमचा .. मीरा, रिया ला स्विकारणे आणि हे सगळे सोपस्कार करणे सोप्प नाहीये .. "
अजय " भाऊसाहेब , तुमचे संस्कार आहेत हे .. परिपक्व विचार कसा करायचा हे तुम्हींच आम्हांला शिकवले आहे .. "
भाऊसाहेब "आम्ही फक्त विचारच करायचो .. पण तुम्ही तसे वागला आहेत ..देव तुम्हांला कधीच काहीच कमी पडू देणार नाही खात्री आहे मला "
अजय " नक्कीच , आज ना उद्या मीराचा आणि माझा संसार छान होणारच आहे मला खात्री आहे "
भाऊसाहेब " नक्कीच " बोलतच त्यांनी भरली डोळ्यांनी पाठ थोपटली अजयची
जाता जाता भाऊसाहेब "रियाशी खेळायला आता एक भाऊ किंवा बहीण आणावी लागेल लवकर .तेवढं लक्षांत ठेवा ..
तसा अजय चक्क लाजला.

🎭 Series Post

View all