Login

मोहन ची व्यथा भाग -1

शिक्षणातली तडजोड
गरिबीतलं शिक्षण आणि शिक्षणातली गरिबी..


जलद कथा.
मोहन ची व्यथा.
भाग -1

मोहन सकाळी सकाळी तयार होऊन घरोघरी पेपर पोहचवायच्या कामाला निघाला. अतिशय गरीब परिस्थिती मध्ये शिकणारा, इयत्ता नववीत शिकणारा मोहन स्वतः काहीना काही काम करून शिक्षणासाठी लागणार छोटा मोठा खर्च काढत होता.

त्याच्या सोबत असणारी सगळी मुले परिस्थिती ने उत्तम होती.
" मोहन... अरे मोहन.. " सकाळी सकाळी सात वाजता त्याला त्याच्या मित्राची हाक ऐकू येते.

" अरे तु इथे कसा..? आणि हे काय तु...हे काम करतोस..?" त्याला त्याचा मित्र नयन विचारतो.

" हो म्हणजे आता तुला कळलंच आहे तर... हो मी करतो हे काम." मोहन बोलतो, पण त्याला हे बोलताना त्याच्या बोलण्यात कसलाच कामा बद्दल खालिपना नव्हता.

" काम कोणतंच वाईट नसतं, भावा तु नको टेन्शन घेऊस मी कोणालाच ह्या बद्दल काही सांगणार नाही. " नयन त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला विश्वासाने सांगतो.

" तु इथे कसा...? " मोहन आश्चर्याने त्याला विचारतो.

" अरे मी इथेच राहतो, तुला वरतून पाहिलं म्हणुन पटकन खाली आलो. " नयन त्याच्या घराकडे बोट दाखवत बोलतो.

बराच वेळ दोघं मित्रांच्या गप्पा होतात, मध्येच नयन त्याला विचारतो, " मोहन दहावी नंतर तु काय करणार..? म्हणजे कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेणार..? "

मोहन त्याच्या ह्या प्रश्नाने जरा शांतच बसतो, पण न राहुन तो बोलतोच, " अरे माझी ईच्छा आहे खुप शिकायची, मोठं नाव कमवायची पण ते शक्य दिसत नाही. म्हणुन मग दहावी झाली कि जॉबलाच जाईन म्हणतो. " त्याच्या ह्या बोलण्यात नाराजी होती.
तो असं म्हणुन मान खाली घालतो, पण एक मित्र म्हणुन नयन ला फार वाईट वाटत.

" तु काय करणार आहेस..? तुझं स्वप्न आहे ना बाहेर गावी जायचं..? " मोहन त्याला आनंदाने विचारतो.

" हो रे पण.. तुझ्यासारखा हुशार नाही ना आणि तुला माहित आहे मित्रा, मला मार्क किती मिळतात ते.. त्यावर माझा खडूस बापुस किती हाणतो मला ते.. " आणि जोरजोरात तो टाळीवर टाळी देऊन हसु लागतो.

नयनच्या ह्या वागण्यावर मोहन ला हसु कि रडू हेच कळत नव्हत.

" अरे तु मुर्खा सारखा हसतोयस काय, तुला बाहेरगावी जायचंय तर आता पासुन चांगले मार्क मिळव. " मोहन त्याला खडसावून बोलतो.

"चल मी मिळवले मार्क तर तु येशील माझ्यासोबत बाहेरगावी..?" नयन ने त्याला किती निरागसपणे विचारलं होतं.

" मी आणि बाहेरगावी, अरे कस शक्य आहे. माझी परिस्थिती ही अशी गरिबीतली. त्यात ही काटकसर करून शिक्षण घेतोय, आणि त्यात बाहेरगावी यायला पण पैसा लागतो. जो माझ्या आईबापाकडे नाही. मी इथेच बरा आहे, तु जा. "
स्पष्ट शब्दांत मोहन बोलतो.