भाग -2
" हम्म्म्म तुझं बरोबर आहे, पण नशिबात असेल तर नक्की भेटेल." नयन बोलतो.
बराच वेळ नयन आणि मोहन गप्पा मारून, आपापल्या घरी जातात.
शाळेची वेळ होते, मोहन शाळेत गेल्या गेल्या नयन त्याला मिठी मारतो, " मित्रा फारच कौतुक तुझं, तु फारच हुशार विद्यार्थी आहेस हे सिद्ध केलंस तु. " आणि नयन त्याच्या पाठीवर थाप देतो.
मोहन त्याच्या अशा बोलण्याने गोंधळतो, " अरे काय झालं, असं अचानक काय झालं..? " मोहन आश्चर्याने विचारतो.
" तु स्कॉलरशिप मध्ये सहभाग घेतला होतास, आठवत..? त्यात तु आपल्या शाळे मधुन पहिला आला आहेस.. " नयन आनंदाने सांगतो.
" काय बोलतोस काय..मला अजुन खरंच वाटत नाहीये.. " मोहनच्या डोळ्यांतुन पाणी येतं.
तेवढ्यात तास भरल्याची घंटा वाजते आणि शिक्षिका आत येते, सगळी मुले उठुन स्वागत करतात, " चला तर मग आज महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे बरं का मुलांनो. तर शांत चित्ताने तुम्ही ऐकायची आहे, आणि गोंधळ नको मला बरं का.. "
सगळी मुले आपआपसात कुजबुज करायला लागतात, " मॅडम आम्हाला माहित आहे, तुम्ही आज स्कॉलरशिप चा निकाल जाहीर करणार आहात ना..? " त्यातलाच एक मुलगा बोलतो.
" हो... " मॅडम बोलतात.
" मोहन शिंदे.. उठुन उभा रहा.. आणि पुढे ये.. " मॅडम आधी कडक आवाजात बोलतात.
" मोहन शिंदे.. उठुन उभा रहा.. आणि पुढे ये.. " मॅडम आधी कडक आवाजात बोलतात.
मोहन उठुन उभा राहतो आणि पुढे जातो, तेवढ्यात माईक वरून प्राध्यापिका मॅडम चा आवाज येतो..
" नमस्कार माझ्या गुणी विद्यार्थांनो आज आपल्या शाळेचा स्कॉलरशिपचा निकाल लागला आहे, आणि त्यात मोहन शिंदे ह्याने पहिला नंबर पटकवला आहे. त्यामुळे आपल्या शाळेचा महाराष्ट्रात नाव झालं आहे. तर आपण सगळे मिळुन त्याच अभिनंदन करूया. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया.. " आणि हे सारं ऐकुन मोहन ला भरून येतं..

शाळा सुटताच मोहनला प्राध्यापिका मॅडम त्यांच्या कॅबिन मध्ये बोलवतात.
" मोहन सगळ्यात आधी तुझं अभिनंदन पुन्हा एकदा, आणि हो अशीच यशाची पायरी चढत रहा. बरं तु पुढे अजुन काही करावं असं आमच्या शिक्षक वर्गाचे म्हणणे आहे.. " मॅडम त्याच्या पाटीवर मायेने हात ठेवत.
" मोहन सगळ्यात आधी तुझं अभिनंदन पुन्हा एकदा, आणि हो अशीच यशाची पायरी चढत रहा. बरं तु पुढे अजुन काही करावं असं आमच्या शिक्षक वर्गाचे म्हणणे आहे.. " मॅडम त्याच्या पाटीवर मायेने हात ठेवत.
हे ऐकताच तो गोंधळतो, " म्हणजे... मी समजलो नाही मॅडम..? "
" अरे तु ह्याही पेक्षा एक मोठी परीक्षा होणार आहे, आणि महाराष्ट्रातुन तु आपल्या शाळेमधुन पहिला आलास ह्या साठी तुला ह्या परीक्षेला बसाव लागेल. तु फक्त तयारी कर, आणि आम्ही आहोच कि तुझ्या सोबत तुला मदत करायला. " मॅडम एकदम उत्साहात बोलत असतात.
मॅडम च बोलणं ऐकताच तो शांत बसतो.
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा