Login

मोहन ची व्यथा भाग -3 अंतिम भाग

शिक्षणातली तडजोड
भाग -3 अंतिम भाग

" पुन्हा परीक्षेला बसायचं, उदया ही सुद्धा परीक्षा उत्तीर्ण झालो तर...आणि काही खर्च करावा लागला तर काय करायचं..? आमच्या कडे तर इतके पैसे नाही.. आई बाबा काय म्हणतील..? नको तो डोक्याला ताप.. नाही नको.. मॅडम ना नको सांगतो.. " मोहन स्वतःच्याच विचारात हरवतो.

" मोहन.. अरे मोहन.. कुठे हरवलास..? " मॅडम त्याला किती तरी आवाज देतात.

मोहन विचारातुन बाहेर येतो, " अरे कुठला इतका विचार करतोयस..? तुला माहित आहे तु जर ही परीक्षा उत्तीर्ण केलीस ना तर तुला पुढे जाऊन खुप फायदा होईल आणि सरकार तर्फे ही परीक्षा आहे. तुला कसलंच टेन्शन नाही. तुला पुढे जाऊन उच्च पदावर नोकरी सुद्धा मिळेल, आणि भारतात किंवा बाहेरगावी कुठे ही.. "
मॅडम त्याला खुप समजावतात.

हे ऐकुन त्याच्या मनात अति आनंद होतो, सकाळचं नयन च बोलणं त्याला आठवतं.

खरंच नशीब बदलत, पण आधी आपण गरिबीत जगतोय. त्यात हे शिक्षण कसबस घेतोय, " मॅडम मी घरी बोलुन तुम्हाला कळवतो. " तोह शांत स्वरात बोलतो.
आणि मॅडम च्या कॅबिन बाहेर येतो, ढसाढसा रडतो जणु स्वतःलाच दोष देतो.

तोह घरी येतो, हात पाय धुतो, " पेपर चे पैसे आलेले आहेत जोशी काकांनी आणुन दिले, तु किराणाचं थोडं फार बघ." आई नेहमीच हिशोब सांगत होती.

आई नुसतीच त्याच्याशी बोलत होती, पण तो मात्र स्वतःच्याच विचारात होता.

" अरे काय करतोय, अजुन झालं नाही का तुझं. कि आंघोळ करून बाहेर येणार आहेस..? " आई बोलत होती पण ह्याच काहीच उत्तर येत नाही.

तो बाहेर येतो, " मला काही तरी सांगायच आहे, तु थांब जरा. " तो शांतपणे बोलतो.

" काय झालं..? शाळेतुन काही तक्रार आहे का...? " त्याची आई घाबरून डोक्याला हात लावते.

आई त्याची नसलेल्या भीतीने घाबरते, " अगं असं काही नाही, मी एक परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. "
तो आनंदाने ही गोष्ट सांगतो.

" अरे वाह,,,, अभिनंदन... पण पुढे काय..? " आई विचारते...

" पुढे काय..? म्हणजे...? " मोहन नाराजीच्या स्वरात विचारतो.

" पुढे काय म्हणजे..? अहो ताई तो पुढे अजुन शिकणार आणि खुप चांगला सेटेल होणार.. " दारातुन नयनच्या पप्पांचा आवाज येतो.

दारापाशी चप्पल काढत " येऊ का आत..? " नयन चे पप्पा विचारतात.

" काका तुम्ही इथे...? " मोहन चटकन पुढे येतो. " या ना आत.." काकांना बोलतो.

नयन आणि त्याचे वडील आत येतात, मोहन ची आई पटकन माठ मधुन ग्लासभर पाणी काढते आणि देते, " अहो शिकायला आमच्या कडे पैसे नाही, गरिबीतल शिक्षण आणि शिक्षणातली गरिबी काय ति ज्याला त्याला माहित. " मोहन ची आई बोलते.

"सगळं मान्य आहे ताई, पण त्याच्या नशिबात शिक्षण आहे तर आपण कोणीच त्याला थांबवू शकत नाही. आणि अभिमानाची गोष्ट आहे कि तो इतका हुशार आहे ते. " नयन चे वडील मोहनच्या आईला समजावून सांगतात.

" अहो पण दादा... " मोहनची आई बोलते.

तेवढ्यात नयन चे वडील मध्येच हात दाखवून त्यांच बोलणं थांबवतात.
" मी ह्या पुढील त्याच्या शिक्षणाचा खर्च करणार आहे, मी घेतो जबाबदारी. फक्त त्याने पुढील परीक्षा द्यावी आणि शिकाव." आनंदाने नयन चे वडील बोलतात.

हे ऐकुन मोहनच्या आईला धक्काच बसतो, " अहो दादा हे कशाला..? "

नयन चे वडील मोहन कडे पाहतात, " शिक्षण घेशील ना पुढचं..? "

" हो काका.. " मोहन त्यांच्या कडे पाहुन हसतो आणि आनंदाने हा म्हणतो.

मोहनच्या उत्तराने नयन खुश होतो, " बघ पाहिलंस ना नशिबातलं कोणीच काहीच हिरावून घेत नाही मग ते शिक्षण असो किंवा अजुन काही. "
" तुला कस माहित, तु ऐकलंस कि काय मॅडम आणि माझं बोलणं..? " मोहन विचारतो.

" होय.. " नयन हसुन बोलतो.
आणि दोघेही आनंदाने एकमेकांना मिठी मारतात.

समाप्त