पहिली फेरी
कथामालिका
मोहात अडकवणारा तो एक क्षण
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. कथेचा उद्देश फक्त मनोरंजन हा आहे. चुकीची माहिती अथवा कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. धन्यवाद.
भाग १
आज "स्वस्तिका" बंगला अगदी नव्या नवरी प्रमाणे सजला होता. कारण ही तसेच होते , कालच सागर आणि श्वेताचे लग्न झाले होते. घरात आनंद सळसळत होता. आज त्या दोघांची मधुचंद्राची रात्र होती. गुलाबाची फुलं, हार, गजरे, सुवासिक मेणबत्त्यांनी त्यांची पूर्ण खोली खूप आकर्षक पद्धतीने सजवली होती. सागरचे मित्र त्याला आता तो कसा बायकोचा गुलाम होणार म्हणून भारी भारी पीजे मारत त्याला चिडवत होते. पण त्याला आता ओढ मात्र फक्त या गोड क्षणांची लागली होती. इकडे श्वेताची पण परिस्थिती काही वेगळी नव्हती. ब्युटीशियन श्वेताला तयार करत होती तर वहिनी, नंदा , मैत्रिणी तिला पहिल्या रात्रीच्या कुठल्या कुठल्या गोष्टी सांगून घाबरवत होत्या तर कधी कुठला जोक सांगून स्वतःच जोरजोराने हसत होत्या. मात्र श्वेता सुद्धा सागरच्या स्वप्नात रंगली होती.
श्वेता सागरच्या वहिनी सोबत वरती सजवलेल्या त्यांच्या खोलीत आली. श्वेताला बघून सागरचे तर होशच उडाले होते, इतकी सुंदर लावण्यवती ती दिसत होती. त्यांच्या पाठोपाठ सागरची आई, मावश्या, आत्या, वहिनी, बहिणी सुद्धा आल्या. सगळे जमले तसे सागरच्या मित्रांचा गोंगाट कमी झाला. आईने दोघांना खाली पाटावर बसवले. दोघांचे औक्षण केले. श्र्वेताची ओटी भरली. श्वेताला मात्र आता ते सगळं बघून खूप लाजल्यासारखे होत होते. आई नंतर पाच जणींनी त्यांचे औक्षण केले. मस्करी करत, हसत सगळं छान सुरू होते. स्वस्तिका मात्र या सगळ्या गमतीजमती दुरूनच टिपत बसली होती. आणि त्याचे सुद्धा अधूनमधून लक्ष स्वस्तिकाकडे जात होते.
"ठीक आहेस?" तो तिच्याजवळ येत म्हणाला.
तिने काहीच न बोलता होकारार्थी मान हलवली.
"थकलीयेस? ये बस इथे."
"मी ठीक आहे."
"हम्म. चार पाच दिवसांपासून बघतोय, काय चाललंय तुझं?"
"म्हणजे?"
"मध्येच हसते काय, लाजते काय? मध्येच डोळ्यात आसवे काय जमतात? काय झाले?"
ती एकटक त्याच्याकडे बघत होती.
पण तिची नजर त्याच्यात काहीतरी शोधतेय, असेच त्याला जाणवले.
पण तिची नजर त्याच्यात काहीतरी शोधतेय, असेच त्याला जाणवले.
"काही हवे?"
तिने होकारार्थी मान हलवली.
"काय?"
"जे हवे ते मिळणार मला?" ती खूप आशेने त्याच्याकडे बघत होती.
"प्रयत्न नक्कीच करू शकतो."
"नक्कीच?"
त्याने होकारार्थी मान हलवली. तिच्या डोळ्यात आनंदाच्या चांदण्या चमकू लागल्या. ओठांवर गोड हास्य लकेर पसरली.
"चल." म्हणत तिने त्याचा हात पकडला आणि त्याला वरती छतावर घेऊन जाऊ लागली.
"अग अग हळू. दमशील." तो तिच्यासोबत चालत म्हणाला.
पण कुठे तिचे त्याकडे लक्ष होते. ती स्वतःतच मग्न होती. " जे हवे ते देण्याचा प्रयत्न करू शकतो." या त्याच्या शब्दांनीच जसे काही तिला अमूल्य अशी भेट मिळाली होती. ती त्याला वरती घेऊन आली, मोकळ्या आभाळा खाली, स्वच्छ ताज्या हवेत. तिने त्याचा हात सोडला आणि आपल्या पुढ्यात त्याला उभे केले.
"मला ना, मला ना.." ती बोलतच होती, पण तिला दम लागला होता. ती मोठ्याने श्वास घेत होती.
"रिलॅक्स. आरामात सांग. मी इथेच आहे." तो तिचा उतावळेपणा बघून हसत म्हणाला.
"हो." ती सुद्धा गोड हसली.
"हा बोल, काय हवे?" थोड्या वेळाने त्याने विचारले.
" मी जे पण काही मागेल, त्यावरून तू मला जज तर नाही करणार?"
"म्हणजे?" तिच्या अशा प्रश्नाने तो गोंधळला.
" मी जे मागणार आहे, त्यावरून तू माझे कॅरॅक्टर तर नाही ठरवणार? माझ्या बद्दल चुकीचा विचार तर नाही करणार?"
"मनु, तुला माहिती आहे तू माझी बेस्टी आहेस. जितका ओपन मी तुझ्या सोबत आहे, तितकं माझ्या कोणीच क्लोज नाही."
"सेम हीअर."
"मग? मी तुला का जज करणार?" तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला.
"प्रॉमिस? तू मला चुकीचे समजणार नाहीस?"
"हो प्रॉमिस. बोल आता काय हवे आहे? आणि मीच काय, ही घरातील सगळी लोकं तुझ्या प्रत्येक इच्छा पुरवण्यासाठी जीव सुद्धा देतील."
"जीव नकोय मला." ती गाल फुगवत म्हणाली.
"ओके बाबा. पण बोलशील पुढे काही?"
"मला ते..ते हवय." ती सागरच्या खोलीकडे बोट दाखवत म्हणाली. तिथे वरती छतावरून सागरची खोली स्पष्ट दिसत होती.
"साग्याची रूम? अग तुझा दादाच आहे तो. तू त्याला सांगून तर बघ. तो त्याची सुहागरात कॅन्सल करून आधी रूम रिकामी करून देईल." तो मस्करी करत म्हणाला.
"नाही."
"मग?"
"तिथे जे सुरू आहे ते."
"म्हणजे?"
******
काय असेल स्वस्तिकाची इच्छा?
क्रमशः
©️®️ मेघा अमोल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा