डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ०२) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ०२) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
बंगल्यात गडबड सुरू होती. सकाळचा नाश्ता तयार करून नोकरांनी डायनिंग टेबलवर आणून ठेवला होता. फॉर्मल ड्रेस घालून तयार झालेले अर्णव आणि सिद्धांत रूममधून बाहेर आले. डायनिंग टेबलवर बसत त्यांनी समोर नुकत्याच पूजा करून बाहेर आलेल्या शलाकाला पाहिले.
“गुड मॉर्निंग मॉम.”
“अं... गुड मॉर्निंग मॉम! सॉरी, उठायला थोडा उशीर झाला.”
“इट्स ओके बेटा, गुड मॉर्निंग.”
शलाका आपल्या दोन्ही मुलांकडे पाहत प्रेमाने म्हणाली.
“मॉम, ही डिजाईन बघ कशी वाटतेय?”
सिद्धांत आपल्या मोबाईलमधील एक फोटो दाखवत म्हणाला.
सिद्धांत आपल्या मोबाईलमधील एक फोटो दाखवत म्हणाला.
“इट्स सो ब्युटीफुल, सिद्धांत.”
“मॉम, तुझ्याचसाठी तयार करून घेतोय. तुला हिऱ्याचे दागिने खूप आवडतात ना?”
अर्णव हसून म्हणाला.
“अर्णव, सगळं मॉमसाठीच करून कसं चालेल? काहीतरी माझ्या सुनांसाठीही करून घ्या.”
शलाका गालात हसत म्हणाली.
“मॉम, नॉट अगेन! मला कंटाळा येतो या विषयाचा.”
अर्णव काहीसा चिडून म्हणाला.
“गुड मॉर्निंग ऑल!”
हातात महागडं मनगटी घड्याळ बांधत विक्रमदेव डायनिंग टेबलजवळील खुर्चीवर बसले.
“गुड मॉर्निंग, डॅड.”
“अर्णव, तू का सकाळ सकाळ चिडचिड करत आहेस?”
“तुम्ही मॉमला समजवा. ती कशाला सकाळसकाळ सुनेचा विषय काढत बसते?”
“का? त्यात काय प्रॉब्लेम आहे?”
विक्रमदेव किंचित हसत म्हणाले.
“हं, मीही तेच म्हणतेय. प्रॉब्लेम काय आहे? कधी ना कधी तर करावंच लागणार आहे.”
शलाका हसत म्हणाली.
“मग ते तुझं तू बघ मॉम. मला अरेंज मॅरेजसुद्धा चालणार आहे. फक्त आता नाही.”
“आणि तुझं काय सिद्धांत?”
शलाकाने आपली नजर सिद्धांतकडे वळवली.
“मॉम, मी नाही अरेंज मॅरेज वगैरे करणार हा. आय प्रेफर लव्ह मॅरेज! तेही ती मुलगी आपल्यासारख्याच घराण्यातील असली तरच!”
“बरं, पुरे. साडेसात वाजलेत. आपल्याला निघायला हवं.”
विक्रमदेव नाश्ता संपवत म्हणाले.
“काय? अरे देवा, मी पुन्हा सोनूला उठवायला विसरले.”
शलाका खुर्चीवरून उठणार इतक्यात नचिकेत बाहेरून आत आला.
“गुड मॉर्निंग ऑल!”
नचिकेत शलाकाजवळ आला व तिला मिठी मारत म्हणाला.
“गुड मॉर्निंग मॉम! काळजी करू नकोस. आज मी स्वतःहून उठलोय.”
“आह..फाईन. कुठे गेला होतास?”
“मी जॉगिंगला गेलेलो. व्यायाम केल्यावर बरं वाटतं.”
तो उत्तरला.
“नचि, तू ऑफिस कधी जॉईन करणार आहेस?
अर्णवने विचारलं.
“कितीवेळा सांगू दादा? मी आपल्या कंपनीत काम करणार नाही. मला त्यांत रसच नाही. डायमंड अँड ऑल! मी एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करेन.”
नचिकेत समोरील डिशमधील सफरचंदाची फोड खात म्हणाला.
“मॉम, इट्स नॉट फेअर. आम्हीच काम करायचं का फक्त कंपनीसाठी? ह्याला तर काही पडलीच नाही.”
सिद्धांत रागवला होता.
“मॉम, प्लिज! मी काहीही झालं तरी आपल्या कंपनीत काम करणार नाही.”
नचिकेत शलाकाच्या नजरेला नजर देत म्हणाला.
“हो, ठीक आहे. तू तुला हवं ते कर, सोनू. कोणी काही बोलत नाही.”
शलाका इतरांकडे रागाने पाहत म्हणाली.
“मी तयार होऊन नाश्ता करायला येतो. मला नऊला मुलाखतीला जायचं आहे.”
नचिकेत धावत आपल्या खोलीत निघून गेला.
“मॉम, पण का?”
सिद्धांत अजूनही तक्रार करत म्हणाला.
“चल, आवर लवकर. ती आता तिच्या सोनूचं सोडून तुझं ऐकतेय, हा तुझा गैरसमज आहे.”
विक्रमदेव हसत म्हणाले. सिद्धांतचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. काही वेळाने ते तिघेही बाहेर पडले. शलाकाही सर्व आवरायला आत निघून गेली.
शहराच्या बाहेर असणाऱ्या दहा-बारा बंगल्याच्या वस्तीमध्येच हा सुंदर बंगला होता. बंगल्याच्या पुढे भलीमोठी बाग आणि चारही बाजूनी भक्कम भिंतीवजा तटबंदी होती. बंगलाही खूप विस्तीर्ण होता. एखाद्या राजमहालापेक्षा कमी नसावा. शलाकाचे पती विक्रमदेव राठोड हिऱ्यांचे व्यापारी होते. हिऱ्यांच्या खाणी, त्यातून मिळालेल्या हिऱ्यांपासून वेगवेगळे अलंकार बनविणे, ह्या उद्योगात विक्रमदेव गेली कित्येक वर्षे काम करत होते. सिद्धांत आणि अर्णवसुद्धा त्याच उद्योगात त्यांना मदत करत होते. श्रीमंती घरात अगदी नांदत होती. सुखसोयी अगदी पायाशी होत्या.
शलाका आणि विक्रमदेव यांना तीन मुलं होती. मोठा मुलगा अर्णव, मधला सिद्धांत आणि धाकटा मुलगा नचिकेत–त्याचं उच्चशिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. त्यामुळे त्याच्या करिअरला अजूनही सुरुवात झाली नव्हती. शलाका ही मूळची तापट स्वभावाची होती. आपल्या मनाचा थांग कधीच दुसऱ्याला लागू नये याची काळजी ती घ्यायची. याउलट विक्रमदेव मात्र अगदी सौम्य स्वभावाचे होते. मनातलं अगदी सहज बोलून टाकत असत. अर्णवचा स्वभाव तसा शांत होता. तो वस्तुतः स्वतःहून कोणाच्या वाट्याला जायचं नाही, अशा विचारांचा होता. मात्र कोणी मुद्दामून डिवचत असेल तर मात्र त्याचा पारा चढायचा. अर्णवच्या गुणातील विशेष म्हणजे तो कधीही आईच्या शब्दाबाहेर जायचा नाही. सिद्धांत मात्र मुळचाच तापट! आईचे गुण त्याने जसेच्या तसे घेतले होते. त्याला आईवडिलांचं सोडून स्वतःचं एक स्वतंत्र मत होतं आणि आपली मतं कोणासाठीही बदलायला तो तयार नसायचा. यापेक्षा वेगळा नचिकेतचा स्वभाव होता. त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनाचा थांग लावणं कोणालाच शक्य व्हायचं नाही. तो कितीही गहन विचारात असला, तरी चेहऱ्यावर एक गोड हास्य लेवून फिरायचा. ह्यामुळे तो सगळ्यांनाच आवडायचा. शलाकाचा तर तो खूप लाडका असल्यामुळे, तो म्हणेल तेच करण्याची घरात जणू प्रथाच पडलेली होती. शलाका त्याला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायची. खूप सुखी भासत असलेल्या ह्या कुटुंबाच्या बाबतीत भूतकाळ वर्तमानात काय वाढून ठेवणार आहे, ह्या कल्पनेने शलाका थरारून आपल्या खोलीत उभी होती.
________________________________________
क्रमशः.
________________________________________
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा