डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग २१) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
नचिकेतने मधुरिमाला मार्ग दाखवत मागील बाजूस आणले. त्याने समोरील अडगळीच्या खोलीचे दार उघडले. अडगळीच्या खोलीच्या मध्यभागी ठेवलेली पत्र्याची अवजड पेटी त्याने सावकाशपणे उचलली आणि बाजूला केली. त्याखाली एक लोखंडी दरवाजा होता. तो उघडताच खाली पायऱ्या दिसत होत्या. दोघे मिळून त्या पायऱ्या उतरू लागले. त्याने पायऱ्या उतरताच तिला डावीकडे वळायला सांगितले. डावीकडे एक अंधारलेले दालन होते. त्या दालनातून सरळ चालत ते पुढे आले. हळूहळू समोरचे दालन प्रकाशमान होत गेले. दालन पूर्णतः सोन्याच्या राशींनी भरलेले होते. मधुरिमाच्या नजरेला एक अर्धवट उघडी सुवर्णजडीत पेटी दिसली. नचिकेतला त्यातील एकेक वस्तू बाहेर काढण्याचा आदेश दिला. नचिकेत बराच वेळ सर्व काढत होता; पण मधुरिमाची त्या सुवर्णावर नजर नव्हती. मोहिनींच्या राज्यात ह्याहून कितीतरी सुवर्ण होते. ती ज्या गोष्टीच्या शोधात आली होती, ती गोष्ट शोधायचा तिचा प्रयत्न चालू होता. इतक्यात तिची नजर दालनातल्या एका कोपऱ्यात गेली. कोपऱ्यात पूर्ण काळोख होता. सुवर्णाच्या तेजाचा प्रकाश सर्वत्र पसरला असूनसुद्धा तो कोपरा प्रकाशाला जणू स्वतः जवळ फिरकू देत नव्हता. मधुरिमाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तिने नचिकेतला तळघराच्या पायऱ्यांवर जाऊन उभं रहायचा आदेश दिला व ती त्या कोपऱ्याच्या दिशेने जाऊ लागली. कोपऱ्यात एक उंचसा कोच ठेवण्यात आला होता व त्यावर हिरव्या रंगाची रत्नजडित गोलाकार पेटी होती. मधुरिमाने ती पेटी अलगद उघडली आणि तिच्या चेहऱ्यावरील स्मित अत्यानंदात बदलले. त्यात एक निळ्या रंगाच्या अमूल्य रत्नांनी जडवलेला राजमुकुट आणि तशाच निळ्याशार रत्नांचा कमरबंद होता.
मधुरिमाने ते साहित्य आपल्या हातात घेतले आणि ती पेटी मंत्रोच्चार करून बंद केली. ह्या कारणाने ती कोणालाच उघडता येऊ नये हा तिचा उद्देश होता. ते साहित्य घेऊन ती वर आली व नचिकेतला घेऊन सर्व पूर्वव्रत करून ती बंगल्यात परतली. नचिकेतवरची मोहिनी उतरताच त्या मोहिनीच्या अफाट ताकदीने त्याला प्रचंड थकवा आल्याचे जाणवत होते. आपण काय करायला आलो होतो हे विसरून तो आपल्या खोलीत जाऊन झोपला. मधुरिमाने आपल्या खोलीत जात अलकनंदाला पुकारले. अलकनंदा क्षणात तिथे पोहचली.

“तू आता परत जाऊ शकतेस. तुझे कार्य झाले आहे.”
अलकनंदाने क्षणांत तिथून वनात रवाना झाली. मधुरिमाने एकवार खिडकीतून आभाळाकडे पाहिले व दोन्ही हात समांतर आणत तिनेही आकाशमार्गे जंगलाकडे प्रयाण केले. ती जाताच खिडकी आपोआप बंद झाली व ती आपल्या कार्याकरिता निघून गेली.
********
पाहता पाहता पौर्णिमेचा दिवस उजाडला होता. मोहिनींच्या साम्राज्यातील आज उत्सवाचा दिवस होता. आज यज्ञाचा शेवटचा दिवस होता. यज्ञाची शेवटची आहुती महायज्ञात दिल्यावर मोहिनींना मृत्यूचक्र आरंभ करण्याचे अधिकार मिळत होते. आज त्यांच्यासाठी सर्वांत मोठी रात्र होती. त्यांची युवराज्ञी आज अभिषिक्त राज्ञी होणार होती. आज रात्रीनंतर मोहिनींच्या ताकदींना सीमा राहणार नव्हती. तब्बल बारा वर्षांनी मोहिनींच्या साम्राज्याला नव्या आशेची सुरुवात लाभत होती. मधुरिमा केव्हाच दुर्धरवनात पोहोचली होती. यज्ञाच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण दिवस तिला अनुष्ठान करणे भाग होते. बंगल्यावर नेहमीप्रमाणे सर्व सुरू होते. मधुरिमा बऱ्याचदा नाश्ता करायला बाहेर यायचीच नाही. त्यामुळे दुपारी जेवणाच्या वेळेला शलाकाला मधुरिमाची आठवण झाली. ती अरुंधतीच्या खोलीत आली.
“मॉम, काही काम होतं का? मी येतेच आहे.”
अरुंधती बेडशीटची घडी घालत म्हणाली.
“अगं मी तुला हे विचारायला आले, की ही मधुरिमा कुठे गेली? मी तिच्या खोलीतही पाहिलं. ती बंगल्यात कुठेच नाही. सर्वजण जेवणासाठी तुम्हां दोघींची वाट पाहत आहेत.”
“अं...मी येतेय. मधु कुठे गेली मला माहित नाही. चला पाहूया.”
अरुंधती शलाकासोबत खाली आली. सर्वचजण डायनिंग टेबलवर बसून त्यांची वाट पाहत होते.
“अरु, अगं मधुरिमा कुठे आहे? सगळे थांबलो आहोत.”
सिद्धांतने अरुंधतीला पाहताच प्रश्न केला. यानिमित्ताने सर्वचजण तिच्याकडे पाहत होते. प्रसंगावधान राखत अरुंधती सर्वांसमोर आली व तिने सर्वांच्या डोळ्यांत पाहत म्हटले.
“मधुरिमा, येईल. ती येणार आहे. निर्धास्त रहा.”
तीही एक मोहिनी होती. तिच्या डोळ्यांतील मोहिनीचा सर्वांवर प्रभाव पडला होता. काही वेळासाठी ते मधुरिमाला नक्कीच विसरून जाणार होते; पण त्यांच्यासमोरून असं सहज निसटणं शक्य नव्हतं. आभाळ भरून आलं होतं. वादळी पावसाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसू लागली होती. अरुंधती आणि वैजयंती एकमेकांकडे पाहू लागल्या. त्यांना जाणीव झाली की आता वेळ समीप आली आहे. त्यांना प्रस्थान करणे गरजेचे होते; पण त्या सर्वांसमोर आपल्या शक्ती प्रकट करू शकत नव्हत्या. कारण अजूनही यज्ञ संपला नव्हता.
“शांत निद्रा घ्या. उद्याची सकाळ तुमच्या आयुष्यात वेगळीच कलाटणी घेऊन येणार आहे. निद्राधीन व्हा.”
रागिणी समोरच्या दरवाजातून प्रवेश करत म्हणाली. अचानक कोण आले हे पाहण्यासाठी सर्वांनी तिच्याकडे पाहिले. पूर्ण बंगल्यात तिचा आवाज घुमला अन् तिच्या डोळ्यांत पाहताच दुसऱ्याच क्षणाला सगळे आपापल्या जागी निद्राधीन झाले होते. तिचा आवाज आणि तिचे संमोहन खूप ताकदीचे होते. कारण शेवटी ती मोहिनींच्या त्या अद्भुत साम्राज्याची सेनापती होती. आज पौर्णिमेची रात्र होती. तिने तिचा शक्तीप्रयोग सारी शक्ती एकवटून केला होता. पाहता पाहता उरलेल्या तिघीही मोहिनी रुपात प्रकट झाल्या. सर्वजणी बंगल्याबाहेर पडल्या व त्यांनी आपल्या शक्तीने बंगल्याभोवती शक्तीकवच निर्माण केलं. जेणेकरून कोणालाही आत प्रवेश करता येऊ नये–खास करून सूर्यभान मांत्रिकाला. सर्वांनी एकत्र जंगलाकडे प्रयाण केले. सूर्य मावळतीला झुकल्यावर ध्यान सोडत मधुरिमाने महायज्ञात शेवटची आहुती दिली. महायज्ञ संपन्न झाला होता. सर्वजणी केवळ चंद्रोदयाच्या प्रतीक्षेत होत्या. पौर्णिमेच्या चंद्राचा पूर्णाकार दिसू लागला होता. वादळी पाऊस सुरू झाला होता. त्याच तलावाच्या काठी त्या पाचजणी आणि त्यांच्यासारख्या लाखो मोहिनी हात जोडून उभ्या होत्या. काही मोहिनींच्या हातात तबके होती. त्यात विविध वस्तू होत्या. आज त्यांची युवराज्ञी खऱ्या अर्थाने त्यांची राज्ञी होणार होती. अखंड शक्तीस्रोत आज तिच्याठायी वसणार होता. ती आली. आकाशमार्गे प्रकटली. ती तलावाकाठी पाठमोरी उभी होती. तिने हळूहळू तलावाच्या पाण्यात प्रवेश केला. काही वेळातच ती तलावाच्या पाण्यातून बाहेर आली. पाण्यात विहार करूनही तिच्या वस्त्रावर पाण्याचा थेंबही दिसून येत नव्हता. तिने शक्ती प्राप्त केल्याचा पहिला संकेत त्यांना मिळाला होता. तिने एकेक करत तबकातल्या वस्तू परिधान केल्या. तिने तो कमरबंद कमरेत बांधला. राजमुकुटही आपल्या मस्तकावर ठेवला. पैंजण, कंकण आणि आपली अंगठी परिधान करत ती सज्ज झाली. ती आता तलावाच्या बरोबर मध्यभागी पाण्यात उभी राहिली. तिने सर्व मोहिनींना आवाहन केले. सर्व मोहिनींनी आपली ताकद त्या तलावाच्या पाण्याच्या दिशेने रोखली. पौर्णिमेचा चंद्र बरोबर मध्यभागी आला होता आणि बरोबर तिच्या माथ्यावर त्याचा प्रकाश पडल्यावर तिचा राजमुकुट चमकला. पाण्यातून एक स्तंभ बाहेर आला. त्या स्तंभावर राजदंड ठेवला होता.
तिने राजदंडाला एकवार नमन करून तो हातात घेतला. पावसाचे थेंब जागच्या जागी थिजले होते. जणू मोहिनींची ताकद त्यांना वनात प्रवेश करण्यापासून अटकाव करत होती! सर्व मोहिनी गुडघ्यावर बसून हात जोडून तिच्या समोर उभ्या होत्या. तलावाच्या पाण्यातून राजसिंहासन बाहेर आले होते. ती राजसिंहासनावर विराजमान झाली आणि दुर्धरवनात मोठ्याने आवाज घुमला.
“प्रणाम राज्ञी!”
लाखो मोहिनींनी तब्बल बारा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर तिला ‘राज्ञी’ या नावाने पुकारले होते. त्यांचे डोळे भरून आले होते. चंद्रप्रकाशाबरोबर मोहिनींच्या राजसिंहासनाच्या, राज्ञीपदायोग्य सर्व शक्तींचा ओघ तिच्यात सामावला. ती अतिशय तेजस्वी, परंतु शांत दिसत होती. दूरवर दिसणाऱ्या बंगल्याच्या भिंतीही थरारत होत्या. कदाचित त्यांना ही जाणवलं होतं, की आज रात्री मृत्यूचक्र आखले जाणार आणि पुढील अमावस्येच्या आत त्या मोहिनींचे सारे अपराधी एकेक करून त्या मृत्यूचक्राची आहुती ठरणार! मोहिनींची शक्ती कोणतीही काळी शक्ती नव्हती. ती सत्याची शक्ती होती. न्यायाची शक्ती होती आणि न्याय जेव्हा मृत्यूचक्राचे आयोजन करतो तेव्हा त्यात बळी नाही, आहुत्या पडतात. पुन्हा एकदा तिचा भीषण आवाज साऱ्या जंगलात निनादला.
“शलाका, मृत्यूचक्राला आरंभ झाला आहे. ही रात्र वैऱ्याची आहे.”
वातावरण शांत झाले होते. मधुरिमा पाण्यातून अलगद पावले टाकत बाहेर आली.
“मी तुम्हांला आदेश देतेय. मृत्यूचक्र आता आखले जाणार आहे. या तलावाच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येक मार्गावर मोहिनींनी सापळे रचलेले असले पाहिजेत आणि तुम्ही दोघीही परत माझ्यासोबत येणार आहात. उद्या रात्री मृत्यूचक्रात पहिली आहुती पडणार हे निश्चित आहे.”
सर्वांनी एकत्र बसून ठरवले. अरुंधती बंगल्यावर परत जाणार होती. वैजयंती अर्णवच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्याच्यावर लक्ष ठेवणार होती. त्याच्या सध्याच्या हालचाली मधुरिमाला संशयित वाटत होत्या. तर मधुरिमा आधी मांत्रिक सुर्यभानाच्या (गुरुदेव) आश्रमात जाऊन महत्वाचे कार्य पूर्ण करून येणार होती. उद्या रात्री पडणारी पहिली आहुती कोणाची असावी याची इतर मोहिनींना कल्पना नव्हती; परंतु राज्ञीचा आदेश आहे म्हणजे आहुती पडणार हे नक्की होते.
___________________________________
क्रमशः.
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा