डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग २२) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
सकाळ झाली होती. शलाकाला उठल्यापासून अस्वस्थता जाणवत होती. एकतर रात्रभर ‘ही रात्र वैऱ्याची आहे!’ हे शब्द तिच्या कानांत गुंजत राहिले होते; पण तिच्यावर असणाऱ्या संमोहनामुळे तिला उठता येत नव्हते. तिला आपले डोके जडावलेले जाणवत होते. आज सकाळीच शाश्वती आणि दिग्विजयही बंगल्यावर येणार होते. त्यांना सर्वांना काहीतरी विचित्र जाणवत होते. जसे की काही शक्तींनी नवे रूप धारण केले आहे. जसे त्यांच्याभोवती असणारे मोहिनी नावाचे वादळ अधिकच वाढत जात आहे. कशीबशी पूजा उरकून ती येऊन सोफ्यावर बसली. अरुंधती नुकतीच जिना उतरत खाली येत होती. शलाकाला डोके घट्ट पकडून बसलेले पाहताच तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. संमोहनाचा प्रभाव न झेपल्याने हे सर्व होत आहे, हे तिला माहित होतं. स्वयंपाकघरावर एक नजर टाकून ती दिवाणखान्यात आली.
“मॉम, सुधाने न्याहरी तयार केली आहे. मी सर्वांना बोलवते. तुम्हीही या.”

अरुंधती हसत म्हणाली.
“नाही. मला काही नको आहे. तुम्ही खाऊन घ्या.”
शलाका उद्विग्न दिसत होती.
“मॉम, तुम्हांला काही...”
“अरुंधती, जा.”
शलाका पहिल्यांदा तिच्यावर ओरडली.
‘माझे काही अडले नाही. तू उपाशी मृत्यू पावलीस, तर तुला वेदनांमध्ये बघणे आम्हांला शक्य होणार नाही. केवळ याकरिता तू वाचणे गरजेचे आहे, शलाका.’
अरुंधती मनातल्या मनात विचार करत बाकीच्यांना बोलवायला निघून गेली. काही वेळाने दिग्विजय आणि शाश्वती आले. त्यांनी शलाकाला असं उद्विग्न बसलेलं पाहिलं. विक्रमदेवही तिच्या बाजूलाच बसलेले होते. मुलं आपापल्या कामाला निघून गेली होती.
“शलाका.”
शाश्वतीने हाक मारली.
“मी आता थकले आहे गं. काय घडतंय हेच कळत नाही. असं वाटतंय जणू आजूबाजूला बरंच काही घडतंय; पण आपल्यालाच कळत नाही.”
शलाका खिन्नपणे म्हणाली.
“आमच्या कोणाचीच ह्याहून वेगळी परिस्थिती नाही. मी आज गुरूदेवांच्या आश्रमात गेलेलो. त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. काल पौर्णिमा होती. मोहिनींच्या शक्तींचा सर्वात मोठा दिवस होता. त्यामुळे इच्छा असूनही गुरुदेव आश्रमातून बाहेर पडले नाही. त्या पौर्णिमेचा प्रभाव आज दुपारी संपणार आहे. त्यांनंतर गुरूदेव इथे येणार आहेत.”
दिग्विजय त्यांना माहिती देत होता.
“काहीतरी विचित्र घडतंय हे खरं आहे; पण आपण धीर सोडून चालणार नाही. त्या मोहिनींमध्ये एवढी ताकद असती, तर त्या बारा वर्षांपूर्वीच परतल्या असत्या. बारा वर्षांनी तरी त्यांना कुठलं ताकदीचं घबाड मिळणार आहे? तू उगाचच नको त्या गोष्टीत काळजी करत राहतेस.”
शाश्वती शलाकाला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती.
“मोहिनी परत आल्या आहेत हे गुरूदेवांच्या बोलण्यातूनही जाणवत होतं, शाश्वती. मात्र त्यांची ताकद काय, त्या आल्याच का? हे काहीही आपल्याला माहित नाही.”
विक्रमदेवही काहीसे चिंतेत दिसत होते. ते सर्व बोलत असताना त्यांचा संवाद मधुरिमा दुरून ऐकत होती.
‘मांत्रिकाचे आज रात्रीपूर्वी इथे येणे मला योग्य वाटत नाही. त्याला रोखणे आवश्यक आहे.’
मधुरिमा मनात निश्चित करत तिथून बाहेर आली.
“मधुरिमा, तू कुठे जात आहेस?”
शलाकाच्या हाकेसरशी मधुरिमा थांबली. तिने शलाकाकडे पाहिले.
“मी कुठेही जात नाही. मला बंगल्यात बसून आळस येत आहे. म्हणून मी बऱ्याचदा सहज फिरून येते. आपणालाही आळस आला असेल, तर आपण येता काय?”
“नको. वातावरण चांगले दिसत नाही. तेव्हा लवकर परतलीस तर उत्तम.”
“नक्कीच. मी लवकर परत येईन.”
मधुरिमा निघून गेल्यावर शाश्वतीने शलाकाला विचारले.
“शलाका, ह्या मुलीला गुरूदेव आपल्यातील पवित्रता म्हणत होते ना? पण मला कमाल वाटते. त्या एवढ्या घनदाट जंगलात आणि तेही त्या मोहिनींच्या प्रदेशातून जाण्यायेण्याचा रस्ता असताना ह्यांना भीती कशी नाही वाटत?”
शाश्वतीला त्यांच्याबद्दल फार कुतूहल होते.
“मोहिनी फक्त आपल्या जीवावर उठल्या आहेत. सगळ्या जगासाठी त्या वाईट नाहीत. त्यांना काय भीती असणार? तसंही त्यांना माहित आहे, की त्या परिसरात वाईट शक्ती राहतात. मात्र त्यांना मोहिनी नक्की कोण आहेत हे माहित नसावं. शिवाय लहानपणापासून तिथेच राहिलेल्या आहेत. त्या तशा धीट आहेत.”
शलाका हसतमुखाने सांगत होती.
“अरुंधतीचं तर माहित नाही;पण मधुरिमामध्ये खरा स्पार्क आहे. ती खूप साधी असली तरी असामान्य वाटते.”
दिग्विजय विचार करत बोलत होता. त्याला मधुरिमा हे त्याच्या आयुष्यातलं आनंददायी पर्व वाटत होतं.
“तो साधेपणा आपल्याला उपयोगी पडतोय, तोपर्यंत ठीक आहे. एकदा का त्या मोहिनींचं संकट टळलं, की हिचं काय करायचं ते मग पाहता येईल.”
विक्रमदेव थोडेसे गूढपणे म्हणाले. सर्वांनीच होकारार्थी मान डोलावल्या.
___________________________________
क्रमशः.
___________________________________
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा