डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग २३) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
मधुरिमा आश्रमात पोहोचली होती. आश्रमात स्वतःच्या रूपात जाणे हा धोका ठरू शकत होता. तिने शलाकाचे रूप धारण केले. राज्याभिषेक झाल्यावर तिच्या शक्ती अफाट वाढल्या होत्या. शलाका आणि मांत्रिक सुर्यभानाची फार जुनी ओळख असल्यामुळे कोणीही तिला रोखलं नाही. ती थेट आश्रमात शिरली. मांत्रिक सूर्यभान ही तिला बघून आसनावरून उठले.
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग २३) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
मधुरिमा आश्रमात पोहोचली होती. आश्रमात स्वतःच्या रूपात जाणे हा धोका ठरू शकत होता. तिने शलाकाचे रूप धारण केले. राज्याभिषेक झाल्यावर तिच्या शक्ती अफाट वाढल्या होत्या. शलाका आणि मांत्रिक सुर्यभानाची फार जुनी ओळख असल्यामुळे कोणीही तिला रोखलं नाही. ती थेट आश्रमात शिरली. मांत्रिक सूर्यभान ही तिला बघून आसनावरून उठले.
“शलाका.”
मधुरिमाने डोळे घट्ट बंद करून पुन्हा उघडले. तिचे निळेशार डोळे चमकले. काहीतरी वाईट घडतंय याचा आभास होण्यापूर्वीच मांत्रिक सूर्यभान संमोहनाच्या आहारी गेला होता.
“ऐक, तुला आता निद्रिस्त व्हायचे आहे. तुझी निद्रा खूपच मोठी असणार आहे. विसरून जा याक्षणी काय घडू पाहत होते. तुला केवळ निद्रेची आवश्यकता आहे.”
मधुरिमा अतिशय मधुर आवाजात बोलत होती. मांत्रिक सुर्यभानाने मान होकारार्थी डोलावली. त्याच्यावर आपण टाकलेली मोहिनी उतरायला उद्याचा दिवस जाईल हे माहित असल्याने, मधुरिमा निर्धास्तपणे बाहेर पडली. शलाका कधीही येऊन कधीही जात असल्याने, तिथे कोणीही तिला येण्याचे कारण विचारत नव्हते. ती शलाकाच्या रूपात बाहेर पडली. थोडे दूर आल्यावर तिचे मूळ रूप पुन्हा परत आले. तिने बंगल्याजवळ आल्यावर आभाळाकडे पाहिले. तिची तीक्ष्ण नजर आभाळाला भिडताच वारे जोरात वाहू लागले होते. मुसळधार पावसाची चिन्हे दिसू लागली होती. तिने शांतपणे बंगल्यात आणि तद्नंतर आपल्या खोलीत प्रवेश केला. तिला आता काही चिंता नव्हती. तिच्या मार्गातील मोठा अडथळा मांत्रिक सुर्यभान तिच्याच संमोहनामुळे निद्रिस्त होता. तिला आज रात्रीची प्रतीक्षा होती. दुर्धरवन मृत्यूचक्रात पडणाऱ्या पहिल्या आहुतीसाठी सज्ज झाले होते.
*******
वैजयंती दुपारी मधुरिमाच्या खोलीत आली. मधुरिमा खिडकीतून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत होती. तोही तिच्या शक्तीचा एक आविष्कार होता, जो ती न्याहाळत होती.
“प्रणाम राज्ञी.”
मधुरिमाने आपली नजर तिच्याकडे वळवली.
“आपण काल सांगितल्याप्रमाणे मी अर्णवचा पाठलाग केला होता. आज दुपारी तो मांत्रिकाच्या आश्रमाबाहेर मांत्रिकाच्या मुलीला भेटला होता. ते काय बोलत होते ह्याची पूर्णतः कल्पना आली नाही. मात्र त्याला तंत्रविद्या शिकण्याची इच्छा आहे असे त्याच्या बोलण्यातून ऐकू आले. तिने त्यासाठी नकार दिला. अजून तीही शिकत असल्याने सद्यस्थितीत ती त्याला शिकवू शकत नाही, असे तिचे म्हणणे होते.”
“धन्यवाद वैजयंती. ह्या माहितीचा भविष्यात मोहिनींना नक्कीच उपयोग होणार आहे.”
“आपण धन्यवाद देणे योग्य नाही, राज्ञी. आमचा जन्मच तुमच्याकरिता झाला आहे. अंतिम क्षणापर्यंत आमचे जीवन आपल्यालाच बहाल आहे. त्यामुळे आपला शब्द हा आम्हां मोहिनींसाठी आदेश आहे. अजून काही आज्ञा आहे का?”
“नाही.”
मधुरिमा तिच्याकडे पाहून हसत म्हणाली. वैजयंती खोलीतून बाहेर निघून गेली. मधुरिमा मात्र आज नितांत शांत होती. ती आत्मचिंतन करत होती. जणू कोणाचे तरी स्मरण करत असावी असे भासत होते. बाहेर शलाका आणि इतर सर्वजण मात्र चिंतेत होते. पौर्णिमेचा प्रभाव कधीच संपला होता. मात्र गुरूदेव अजूनही आले नव्हते. आपल्याभोवती भीतीचे एक सावट निर्माण होत असल्याचे त्यांना जाणवत होते. ते सर्वच मनातून फार घाबरलेले होते. बघता बघता दिवस सरला. शलाका आणि इतर सर्व मात्र प्रत्येक सेकंद मोजत होते जणू! ही रात्र त्यांच्या पचनी पडत नव्हती. काहीतरी अघटित होणार नाही ना ही भीती सतत त्यांच्या मनात रुजून राहिली होती. जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपायला निघून गेले. आज कानांत काही गुंजत नसल्यामुळे शलाकाला गाढ झोप लागली होती. विक्रमदेव मात्र जागे होते. त्यांना अस्वस्थ वाटत होते. पाणी घेण्यासाठी म्हणून ते जग घेऊन खाली येत होते. तेवढ्यात नेहमीप्रमाणे मध्यरात्री बाराच्या सुमाराला मधुरिमा बाहेर आली व गच्चीवर न जाता जंगलाच्या दिशेने जायला निघाली. सगळे गाढ निद्रेत होते; पण विक्रमदेवांनी मधुरिमाला बंगल्याचे दार उघडून बाहेर जाताना पाहिले. त्यांना काहीतरी चुकीचे वाटले. शलाकाला उठवले तर ती अजूनच घाबरेल म्हणून त्यांनी कपाटातली बंदूक घेतली व तिच्या मागोमाग तिला चाहूल लागू न देता ते तिचा पाठलाग करू लागले. विक्रमदेव आपल्या मागोमाग येत आहेत हे माहित असणाऱ्या मधुरिमाच्या चेहऱ्यावर एकच स्मित उमटले. पहिल्या आहुतीसाठी रात्र सज्ज झाली होती.
___________________________________
क्रमशः.
___________________________________
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा