डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग २४) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
मधुरिमा अलगद पावले टाकत वनाच्या दिशेने निघाली होती. आपण तिचा पाठलाग करत आहोत ह्या भ्रमात विक्रमदेवही तिच्या मागोमाग जात होते. ते या सत्यापासून अनभिज्ञ होते, की तीच त्यांना मृत्यूचक्रात खेचून नेत होती. चालता चालता तिने दुर्धरवनाची सीमारेषा ओलांडली व काही पाऊले पुढे जाऊन ती थांबली. तिचा पाठलाग करतच विक्रमदेवांनीही नकळत वनाची सीमा ओलांडली, जे घातक होते ह्याची त्यांना कल्पना होती; पण आपण सीमा पार केली आहे हे त्यांच्या लक्षातच आले नव्हते. मधुरिमाने आपले उद्देश्य सफल झाल्याचे पाहून मंद स्मित केले व तिने चालण्याचा वेग वाढवला. विक्रमदेवही जवळजवळ धावतच तिच्यामागोमाग जात होते. अचानक काही वेळाने विक्रमदेव जागीच थबकले. त्यांच्या डोळ्यांत प्रचंड भीती दाटून आली होती. त्यांनी आजूबाजूचा परिसर पाहायला सुरुवात केली.
तीच घनदाट झाडी, तेच दुर्गम आणि भयाण दुर्धरवन, तोच धीरगंभीर वृक्ष आणि तोच शांत तलाव,
सगळे वातावरण जणू स्तब्ध झाले होते. पानांची सळसळही ऐकू येत नव्हती. त्या वृक्षाच्या पानांमागून कोणीतरी आपल्याकडे तीव्र कटाक्ष टाकून पाहत असल्याचे विक्रमदेवांच्या लक्षात आल्यावर, त्यांच्या अंगावर काटा आला.
“कोण आहे? कोण आहे तिथे? समोर ये. नाहीतर गोळी झाडेन.”

विक्रमदेव बंदुकीने त्या दिशेने निशाण साधत म्हणाले.
“मी आहे.”
त्या भयाण आवाजसरशी विक्रमदेव थरथर कापू लागले होते. तो आवाज एका स्त्रीचा होता; परंतु त्या आवाजात कोमलता नव्हती. अतिशय क्रोध होता. पैंजणांचा परिचित झंकार ऐकू येत होता. वृक्षाआडून ती पूढे आली.
“मधुरिमा तू इथे काय करत आहेस? एवढ्या रात्री घरातून बाहेर पडून इथे का आलीस तू?”
“हेच माझे निवासस्थान आहे. मी इथेच राहते. दिवसभर श्रम केल्यावर आपण स्वतःच्या गृही नाहीतर कुठे परतणार?”
तिने प्रश्न विचारला.
“काय बोलत आहेस तू? हा प्रदेश दुष्ट शक्तींनी भरलेला आहे. ताबडतोब बाहेर जाऊया. तू इथे का आलीस याचं उत्तर तुला बंगल्यावर गेल्यावरही देता येईल.”
“मी तुझी आहुती द्यायला आलेय, दुष्टा! तुझा काळ बनून आलेय. इथे दुष्ट शक्ती नाही राहत. कोणालाही हानी न पोहोचवणाऱ्या, स्वतःच्या जगात आनंदी असणाऱ्या मोहिनी राहतात. मी मोहापायी कित्येक जीवने पायदळी तुडवणाऱ्या तुझ्यासारख्या व्यक्तींचा विनाश बनून आलेय.”
मधुरिमा तिची तीक्ष्ण नजर विक्रमदेवांवर रोखत म्हणाली.
“मोहिनींबद्दल कसं माहित तुला? माझा काळ...का? मी काय वाईट केलं तुझं? उलट तुझी बहीण तर माझी सून आहे.”
विक्रमदेवांना बोलायचं खूप होतं; पण तिचा रुद्रावतार पाहून त्याच्या ओठांपाशीच शब्द अडकले होते.
“तू माझे विश्व पायदळी तुडवलेस. लाखो मोहिनींची छत्रछाया हिरावून घेऊन आमच्या मनात मानवांबद्दल भीतीची पडछाया निर्माण केलीस. मोहिनींच्या साम्राज्यात हाहाकार माजवलास. तुझ्या आणि शलाकाच्या मोहापायी आम्ही आमचे सर्वस्व गमावून बसलो. तुला वाटते तुला जिवंत सोडेन मी? जशी इथे घेऊन आले, तसं परत जाऊ देईन असं वाटतं का? नाही. तू इथे आला आहेस माझ्या इच्छेने आणि जाऊही शकतोस केवळ माझ्या इच्छेने! ह्याला शलाका जास्त जबाबदार आहे; पण प्रत्यक्षरित्या ह्या कटात नसलास, तरी तूही त्यात सहभागी होतास. जो कोणी जेव्हा कधी आमच्या साम्राज्यातील सौख्य हिरावून घेईल, ही मोहिनींची सम्राज्ञी त्याचा असाच विनाश करेल.”
मधुरिमाचे शब्द अंगार बरसावे त्याप्रमाणे विक्रमदेवांवर बरसत होते. ती मानव नाहीच तर मोहिनी होती. कोणी साधीसुधी मोहिनीही नाही, तर मोहिनींची सम्राज्ञी होती. मधुरिमाचा चेहरा आज त्यांनी पहिल्यांदा अतिशय निरखून पाहिला होता. काही क्षणात त्यांच्या चेहऱ्यावरील भीती दाटून आली. नक्की काय घडतंय हे त्यांना लक्षात आलं. आपण नाहक हिचा पाठलाग केला हेही त्यांच्या ध्यानात आलं. ते आता बंगल्यात असते, तर मोहिनी जास्तीत जास्त त्यांना घाबरवू शकल्या असत्या. त्यांना मारू शकत नव्हत्या; पण आज त्यांनी आखलेल्या मृत्यूचक्रात आणि पूर्णतः त्यांच्या प्रभावाखालील क्षेत्रात विक्रमदेव स्वतः आले होते. स्वतःहून त्याच जागी बारा वर्षांनी ते पुन्हा परतले होते. स्वतःला मृत्यूच्या खाईत लोटायला! भीती त्यांच्या मन आणि मेंदूवर स्वार झाली होती. याच अफाट भीतीच्या अंमलाखाली त्याने ती चूक केली, जी त्याला–मोहिनींच्या अपराध्याला मृत्यूच्या दारात सहजतेने खेचून नेणार होती. हो, आज त्यांच्यासमोर तो अरुंधतीचा सासरा नाही, तर त्यांना अपराधी म्हणून उभा होता. त्याने घाबरून ती आता काय करणार याचा विचार करत तिच्या डोळ्यांत पाहिले आणि तिच्या डोळ्यांतील मोहिनी त्याच्या शरीराच्या कणाकणात पसरली. तिचा क्रोध तिच्या नजरेतील संमोहनातून त्याच्यापर्यंत पोहोचत होता. आता ती शांत झाली होती. त्याच्या विचारांवर तिला पूर्ण नियंत्रण मिळालं होतं. विक्रमदेव तलावाच्या दिशेने चालू लागले. त्या वृक्षाच्या ढोलीत त्यांनी हात घातला. अगदी हे सर्व परिचित असल्याप्रमाणे त्यांनी त्यातून एक रत्नजडित खंजीर बाहेर काढला.

खंजीर हातात घेत ते तलावाच्या काठी उभे राहिले. डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच त्यांनी तो खंजीर स्वतःच्या छातीत खुपसला. रक्ताचे थेंब सर्वत्र पसरले. खंजीराची कळ जाणवताच ते मोहिनीच्या प्रभावाखालून बाहेर पडले. त्यांनी एकवार मधुरिमाकडे पाहिले. ती शांत आणि निश्चल उभी होती. त्यांनी शेवटचे दूरवर दिसणाऱ्या बंगल्याकडे पाहिले.
“श...शलाका...स...सावधान!”
एवढेच शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले व क्षणात ते तोल जाऊन तलावाच्या पाण्यात कोसळले. तलावाचे पाणी रक्ताळले होते. अचानक पाण्यात जणू अग्नी पेटला असावा, तसे पाणी उसळू लागले व काही क्षणात त्या देहाची राख होऊन गेली. मधुरिमा पाणावल्या नजरेने पाहत होती. ते आनंदाश्रू होते.
“मी ठरलेल्या दिवशी मृत्यूचक्राची पहिली आहुती पूर्ण केली. मी हा सूडाचा खेळ पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. शलाका, तुझा सर्वनाश केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. या अखंड जाज्वल्य मृत्यूचक्रात तुला यावंच लागेल. तुझा मृत्यूही अटळ आहे.”
तिचा आवाज जंगलभर निनादला. संपूर्ण वातावरण तिच्या भीतीच्या पडछायेखाली होते. तिचे ते विक्राळ रूप साऱ्या आसमंताला शहारा आणत होते. ती कितीतरी वेळ गर्जत होती. कितीतरी वेळ तलावाच्या त्या रक्ताळलेल्या पाण्याकडे पाहून आनंदत होती. तिच्यादेखत मृत्यूमुखी विक्रमदेवाची अवस्था आठवून हसत होती. काही वेळाने ती तलावाकाठी गेली व तिने तो खंजीर उचलला व त्या वृक्षाच्या ढोलीत पुन्हा ठेवून दिला. ती शांत झाली होती. तिने आजूबाजूला पाहिले. जमलेल्या सर्व मोहिनी थरारून उभ्या होत्या. मधुरिमाच्या या स्वरुपाला पाहून त्याही पराकोटीच्या घाबरल्या असल्याचे स्पष्ट होत होते. गोड, मोहक दिसणारी, काही क्षणांपर्यंत त्यांची छोटी युवराज्ञीच असणारी ती काळाहून भयाण बनली होती. तिच्या चेहऱ्यावरील तो वेड्यासारखा आनंद पाहून त्या थरारल्या होत्या. तिचे हे क्रूर आणि भयाण रूप प्रत्येक मोहिनी प्रथमच पाहत होती. त्यांची अवस्था पाहून ती मंद हसली व सर्वांना निश्चिंत राहण्याचा इशारा करून ती तलावाच्या पाण्याजवळ आली. तिने त्या पाण्याकडे शेवटचे पाहिले व ती त्या वृक्षाकाठी बसली. तिने आपल्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श त्या पाण्याला केला. त्याबरोबर त्या पाण्याचा रंग पुन्हा पूर्वव्रत झाला होता. ते पाणी आपल्या उदरात मृत्यूचक्र घेऊन शांत आहे असे कोणाला वाटलेच नसते. सर्व मोहिनींना वनाची आणि त्याहूनही ह्या तलावाच्या आसपासच्या क्षेत्राची सीमारेषा ओलांडण्यापासून मनाई करून ती परत जायला निघाली. तिला परतणे गरजेचे होते. मृत्यूचक्र आतुरतेने दुसऱ्या आहुतीची वाट पाहत होते. ती आकाशमार्गे परतली. खोलीत येताच तिने साधी वस्त्रे परिधान करत, पुन्हा शक्तीच्या योगे मानवरूप धारण केले. सारं काही अशा रीतीने शांत झाले होते, जणू काही झालेच नाही. ती शांतपणे पहुडली. बारा वर्षांत पहिल्यांदा ती शांत मनाने, सुखाने निजली होती.
___________________________________
क्रमशः.
___________________________________
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा