डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग २६) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
गुरूदेव निघून गेल्यानंतर सर्व मुलं बंगल्यात परतली होती. जे होत होतं ते कल्पनेच्या पलीकडील होतं, ह्याची त्यांच्यापैकी कोणालाच कल्पना नव्हती. आपल्या वडिलांसोबत काय झालं असावं? शलाका आपल्यापासून काय लपवत असावी? असे एक ना अनेक प्रश्न त्यांना पडले होते; परंतु उत्तरे देण्याची कोणाचीच मनस्थिती नव्हती. शलाका तर आतून पार तुटून गेली होती. इतक्या वर्षांची साथ मोहिनींच्या एका वाराने सुटली होती. दिग्विजय आणि शाश्वतीही व्यथित होऊन शलाकाशेजारी पलंगावर बसले होते. शलाका शून्यात नजर केंद्रित केल्यासारखी निश्चल होती. विक्रमदेवांच्या मृत्यूचा धक्का तर होताच; पण त्याहून अधिक मृत्यू समीप असल्याची भीती होती. तिचं मौन पाहून शेवटी शाश्वतीनेच बोलायचं ठरवलं.

“शलाका, बोल गं माझ्याशी. काही मनात नको राहू देऊ. विक्रमचं जाणं आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. तुझ्यासाठी किती कठीण आहे हे दुःख पचवणं, याची मला कल्पना आहे; पण मुलांसाठी आणि आपल्या भवितव्यासाठी तुला यातून बाहेर यायला हवं.”
शाश्वती तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर देत होती.
“शलाका, विक्रम माझाही प्राणप्रिय मित्र आहे. कदाचित तुला माझं बोलणं स्वार्थी वाटेल. मात्र आता आपण आपल्या जीवाचीही पर्वा केली पाहिजे. गुरूदेवांच्या सांगण्याप्रमाणे ती मोहिनी जी कोणी आहे, तिचा कर्णिकाशी काहीतरी संबंध नक्की आहे आणि जर तिला बारा वर्षांपूर्वीची घटना माहित आहे तर तिचं पुढील लक्ष्य आपणच असणारे आहोत.”
दिग्विजय म्लानपणे म्हणाला. शलाकाने अश्रूंनी भरलेले डोळे पुसले. शेवटी जे सत्य आहे, ते तिला स्वीकारावंच लागणार होतं.
“मला माहित आहे तुम्ही दोघे आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच बोलत आहात. विक्रमचा थेट सहभाग नसूनही तो केवळ प्लॅनमध्ये होता म्हणून तिने कसा निर्दयी वार केला पाहिलंत ना? विक्रमचं नक्की काय झालं असेल हेही कळलं नाही. काय करावं मी? मुलांच्या प्रश्नांची उत्तरं कशी देऊ? आता मी विक्रमच्या मृत्यूचा शोक करावा की स्वतःला सावरावं की मोहिनींशी सामना करण्याची तयारी करावी?”
शलाका खूप चिंताग्रस्त होऊन बोलत होती. ते बोलतच होते इतक्यात त्यांना दरवाजा ठोठावल्याचा आवाज ऐकू आला.
“कोण आहे?”
शलाका थोडी चिडतच म्हणाली. अरुंधतीने शांतपणे दार उघडला. तिच्या हातात फळांच्या रसाने भरलेले तीन ग्लास असणारा ट्रे होता. तिने आपलं बोलणं ऐकलं की काय, अशा अनामिक भीतीने ते तिघेही तिच्याकडे पाहत होते. मात्र ती शांतपणे आत आली.
“मला काहीही खाण्याची अजिबात इच्छा नाही. ते सगळं घेऊन जा.”
शलाका मान फिरवत म्हणाली.
“मॉम, मी समजू शकते; पण तुमच्या शरीरात अशक्तपणा आहे. गोळ्या-औषधं सुरू असताना काहीही न खाता राहणं तुमच्या आरोग्यासाठी ठीक नाही. मी तुम्हां दोघांसाठीही फळांचा रस घेऊन आले आहे. मॉमना समजवा.”
अरुंधती तो ट्रे शाश्वतीच्या हातात देत म्हणाली. आपण काही ऐकलंच नाही, या आविर्भावात ती तिथून निघाली. दिवाणखान्यात सर्वचजण बसले होते. सर्वांनाच विक्रमदेवांच्या मृत्यूबद्दल कळलं होतं; पण त्या तिघांचा गुरुदेवांबरोबर नक्की संवाद काय झालं हे माहित नव्हतं. सर्वांचेच चेहरे फार दुःखी आणि उदास होते. अर्थात मधुरिमाचा चेहरा उदास नव्हता. आपल्या प्रतिशोधाची पहिली पायरी पूर्ण केल्यावर ती का उदास असेल? परंतु तिचे नित्याचे धीरगंभीर भाव तिच्या चेहऱ्यावर असल्यामुळे तीही दुःखी आहे असा निदान आभास होत होता. सर्वत्र शांतता पसरलेली असतानाच अर्णवच्या मोबाईलची रिंगटोन वाजली.
“हॅलो.”
“हो.”
“आता येणं शक्य नाही.”
“काय?”
“ठीक आहे. मी येतोय.”
अर्णवने मोबाईल खिशात टाकला व तो शलाकाच्या खोलीत आला. शलाकाला गुरुदेवींनी बोलवल्याचं सांगून तो घराबाहेर पडला. वातावरणात अजूनही अस्वस्थता जाणवत होती. शलाका फारच अस्वस्थ असल्याने शाश्वतीही तिच्याशेजारी झोपणार होती. दिग्विजय आपल्या खोलीत निघून गेला. वातावरणात प्रचंड भूल पसरली होती. मोहिनींच्या शक्ती मृत्यूचक्रातील पहिल्या आहुतीमुळे प्रचंड वाढल्या होत्या. आता त्यांना कोणतीही सर्वोच्च शक्तीही रोखू शकणार नव्हती.
___________________________________
क्रमशः.
___________________________________
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा